Monday, September 22, 2025

नजरेपल्याडचा रायरी; दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड एका वेगळ्या नजरेतून भाग पहिला

 https://jounerneyofinformationwithhitesh.blogspot.com/2025/07/blog-post.html

नजरेपल्याडचा रायरी; दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड एका वेगळ्या नजरेतून भाग पहिला

नमस्कार माझं नाव हितेश माझं वय २१ वर्षे आहे.मला इतिहास ह्या विषयाची विशेष आवड आहे.मी मुंबई विद्यापीठातून कला शाखेतून बॅचलर ऑफ आर्ट्स पदवीधर आहे.
                 आजच्या या लेखात आपण महाराष्ट्रातील अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या किल्ल्यांं‍पैकी एक अश्या किल्ले रायगड बद्दल थोड्या वेगळ्या पद्धतीने माहिती जाणून घेणार आहोत. या लेखासाठी मला युट्युब या माध्यमावरील ‘roadwheel rane' या चॅनेल ची मदत झाली आहे.तसेच मी रायगड प्रत्यक्ष पहिला असल्याने त्याचे अनुभव ही या लेखात आपण पाहणार आहोत.
                दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड 
        रायगड समजून घेण्यापूर्वी आपणास रायगडाचे भौगोलिक स्थान,त्याचे महत्व, रायगडावरून दिसणारे त्याचे संरक्षक दुर्ग, गडासंबंधित चौकी,पाहारे,घेरा,मेट/माची,खळगा, खिंड इ. संज्ञा अभ्यासणे व रायगडाचा शिवपूर्वकालीन,शिवकालीन,उत्तरकालीन इतिहास अभ्यासणे क्रमप्राप्त ठरते.
  रायगडाचा इतिहास अभ्यासण्यापूर्वी रायगडाची भौगोलिक संरचना अभ्यासणे महत्वाचे ठरते.
 दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडाची भौगोलिक
संरचना आणी प्रभावळ
 रायगडाची उंची पायथ्यापासून सुमारे २७०० फूट तर समुद्रसपाटी पासून सुमारे ४, ४४९ फूट इतकी आहे १३ एकरात पसरलेला रायगड हा भारतातील आकरमानाने सर्वात मोठा किल्ला आहे. याचे बांधकाम राजश्री शिवरायांच्या आज्ञेने पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हिरोजी इंदलकर/इटळकर/इंदुलकर (हिरोजींचे आडनावाबाबत विविध कागदपत्रात,शिलालेखात वेगवेगळे  उल्लेख आढळतात.)यांनी बांधला इसवी सन १६५७ साली रायरीचे बांधकाम सुरु होऊन इसवी सन १६७० ला  रायरी दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड  झाला.
रायगडाचे भौगोलिक महत्व सांगणारी प्रकाशचित्रे.
चित्र साभार: roadwheel राणे youtube channel go and subscribe जरूर सबस्क्राईब करा.

   रायगडची प्रभावळ समजून घेत असताना खळगे,माची,मेट,पाहारे,चौकी, ह्या संकल्पना व रायगडचे संरक्षकदुर्ग व उपदुर्ग अभ्यासणे
महत्वाचे आहे.
 वातावरण अगदी साफ असताना रायगडवरून दिसणारे  संरक्षक दुर्ग व त्यांच्या दिशा.
पूर्व :-राजगड, तोरणा,लिंगाणा.
पश्चिम:- सिंधुसागर.
उत्तर:-मानगड,विश्रामगड.
दक्षिण:-सोनगड,चांभारगड.
आग्नेय:-मकरंदगड,प्रतापगड,कांगोरी, चंद्रगड,कावळ्या.
वायव्य:- तळगड,घोसाळगड,समराजगड, पदमदुर्ग,बिरवाडी,सुरगड,जंजिरा.
नैऋत्य:- पालगड,महाड,मंडणगड, बाणकोट.
 रायगडास  असलेले उपदुर्ग व त्यांचे रायगडपासून अंतर 
पन्हाळेदुर्ग-३८ कि.मी. 
दासगावचा किल्ला:-३४कि.मी.
मानगड-२८कि.मी.
कोकणदिवा-११कि.मी.
लिंगाणा-५६कि.मी.
किल्ले कावळ्या-५० कि.मी.
 कांगोरी-५० कि.मी.
चांभारगड:-२४ कि.मी.
सोनगड-३५ कि.मी.
 यावरून राजांनी राजधानीस रायरी का निवडला हे लक्षात येते. 
* रायगडास असलेले नैसर्गिक खळगे. 
खळगा म्हणजे एखाद्या किल्ल्याला असलेला त्याच्या दोन भागांच्या मधील बेचकिसारखा भाग. थोडक्यात एखादी बरणी उभी कापून दोन भाग केल्यास त्यातील एका भागाचा आतील भाग ज्याप्रमाणे असतो त्याला त्या बरणीचा खळगा म्हणता येईल उदा. हरिश्चन्द्र गडावरील कोकणकडा हा खळगा आहे.
रायगडास त्याच्या टकमक, भवानी, श्रीगोंदे, हिरकणी या चार टोकांच्या अवतीभवती दहा खळगे आहेत.ते प्रकाशचित्रासहित पुढील
प्रमाणे.
    साभार इंटरनेट
©hitesh chavan 

१. टकमकीचा खळगा:-
©hitesh chavan 
२. सातवीणीचा खळगा:-
©hitesh chavan 

३. माडाचा खळगा:-
©hitesh chavan 
४. भवानीचा खळगा:-
©hitesh chavan 
५. बाराटाकीचा खळगा:-
©hitesh chavan 
६. कोंडेखळीचा खळगा:-
७. काळकाईचा खळगा:-
©hitesh chavan 
८. हिरकणीचा खळगा:-
©hitesh chavan 
९. महादरवाज्याचा खळगा:-
©hitesh chavan 
१०. निवडुंगाचा खळगा:-
©hitesh chavan 
 
*  रायगडाला एकूण ३ खिंडी आहेत 
१. सुप्रसिद्ध वाळूसरे खिंड:-
 हिरकणी ची दंतकथा आपण सर्वांनीच ऐकलीय सध्याच्या हिरकणी बुरुजावरील कडा उतरून हिरकणी वाळूसरे खिंड उतरून घरी गेली. आजही स्थानिक लोक या खिंडीचा वापर करतात मी ही सहलीनिमित्त जेव्हा रायगडावर गेलो तेव्हा आम्ही याच खिंडीतून पायरीमार्गाशी जोडले गेलो 
©hitesh chavan 
२. काळकाईची खिंड:-
पोटल्याचा डोंगर व रायगड यांच्यामध्ये काळकाईची खिंड आहे.
©hitesh chavan 
३. खुबलढा बुरुजासमोरील सध्या अस्तित्वात नसलेली खिंड:-
शिवकाळात रायगडाला चित्त दरवाजा अस्तित्वात नव्हता आजही नाही; परंतु आजच्या रायगड स्मारक मंडळाने बांधलेल्या पायरी मार्गाची सुरुवात जिथून होते तिथे पूर्वी खिंड अस्तित्वात होती.जिच्यावर देखरेख करण्यासाठी खुबलढा बुरुजाची निर्मिती केलेली होती जुन्या मुख्य अश्या प्रचलित नाणे दरवाजाचा मार्गातील हा प्रमुख टप्पा होता.सध्या ही खिंड नामशेष झाली आहे व तेथे फक्त खुबलढा बुरुज अस्तित्वात आहे.
©hitesh chavan 
 रायगड शिवरायांच्या ताब्यात येण्यापूर्वी आदिलशाहीत महाराष्ट्रात हबसाण,शिरठाण, जावळी हे आदिलशाहीच्या अमलाखालील स्वायत्त प्रांत होते. एकप्रकारे ते राजे होते.
 हबसाण:- आफ्रिकेतील हबसाण म्हणजे आबेसेनेया लोकांना आदिलशहाने जो भूप्रदेश  दिला तो म्हणजे हबसाण.हे लोक म्हणजे जंजिरेकर सिद्धी होय.
शिरठाण:- इतिहास अभ्यासक अप्पा परब यांच्या मते शीर म्हणजे सैन्याची आघाडी आणी शिरठाण म्हणजे सैन्याचे बिनीचे ठाणे.शिर्केंकडे  या भागाची वतनदारी होती. रायगडसह कोकणातील रत्नागिरी,रायगड जिल्ह्यातील काही भाग हा यात येत होता यामध्ये सुर्वे,दळवी,शिर्के हि वतनदार घराणी होती.
जावळी:- नदीमाथ्यावरील 
कोयना व वारणा या नद्यांच्या मावळतीचा
भूप्रदेश म्हणजे जावळी.याच्या प्रमुखास ‘चंद्रराव'
हा किताब आदिलशहाने दिला होता यावर मोऱ्यांचे आधीपत्य होते.
रायगडवरील घेरा मेट, चौकी, पहारे
घेरा व चौकी:- 
गडाच्या आजूबाजूच्या गावांचा एकत्रित समावेश गडाच्या घेऱ्यात होतो या गडाच्या घेऱ्याचा बाहेर
असणाऱ्या पहाऱ्याला चौकी असे म्हणतात.
रायगडच्या घेऱ्यातील गावे:-
पाचाड,रायगडवाडी, छत्रीनिजामपूर, वाळूसरे आमडोशी, वारंगी, वाघेरी, वाघोली, कोंझर.
 मेट:-
मेट म्हणजे  माचीपेक्षा लहान  जेमतेम चौकी  पुरती जागा.उदा. मदार मोर्चा.
रायगडवरील काही मेट :-
आंब्याच मेट, कोठीच मेट, चाहूडीच मेट, म्हश्याच मेट, सावत्याच मेट.
पहारे:-
प्रत्यक्ष गडावरील संरक्षक दृष्ट्या आवश्यक ठिकाणाची सुरक्षेच्या दृष्टीने केलेली सोय म्हणजे
पहारा होय.
रायगडावरील एकूण २४ पहाऱ्यांपैकी काही पहारे:-
आंब्याचा पहारा,कळकीचा पहारा,केळीचा पहारा,
काळकाईचा पहारा, कोठीचा पहारा, गणेश पहारा, घरबिडीचा पहारा, चिलखताचा पहारा, जावळीचा पहारा, धोंडीचा पहारा, टकमकीचा पहारा, नांदगिरीचा पहारा, निसणीचा पहारा.

त्याच बरोबर राजगडप्रमाणे रायगडावरही विविध सदर(न्यायनिवाडा व कार्यालयीन कामकाजाची जागा)निर्माण करण्यात आल्या होत्या त्यांची एकूण संख्या १२ आहे. त्यातील काहींची नावे पुढीलप्रमाणे:-
कोंडेखळीची सदर, घरकीची सदर, महाराजांची सदर, टोकाची सदर, निगुडदाराची सदर,बाराटाकीची सदर, मुसीची सदर, राजगुडाची सदर, हिरकणीची सदर, माचीची सदर.
किल्ले रायगडवरील शिवकालीन प्रशासकीय विभाग:-
   image copyright:trekshitij.com
   प्रकाशचित्र साभार: ट्रेकक्षितिज 
image copyright:trekshitij.com
प्रकाशचित्र साभार: ट्रेकक्षितिज 
ट्रेक क्षितिजच्या संकेतस्थळावरील प्रकाशचित्रातील ट्रेकक्षितिज हे इंग्रजी नाव काढून आपले नाव टाकणे  किंवा याचा गैरवापर करणे हा गुन्हा आहे.

लष्करी विभाग:
रायगडावरील जगदीश्वर मंदिराच्या पुढील कोळिंब तलाव व तलावाच्या पुढील सर्व भाग हा
त्याकाळी लष्करी विभागात मोडत असे.

नागरी व वाणिज्य विषयक विभाग:
रायगडावरील बाजारपेठेपासून जगदीश्वर मंदिरापर्यंतचा भाग हा तत्कालीन नागरी व व्यापारी विभाग होता.

संवेदनशील व अतिसंवेदनशील मुख्य राजधानी विभाग :- 
अ)संवेदनशील विभाग:-
रायगडावरील होळीचा माळ ते नगारखाना हा भाग संवेदनशील मुख्य राजधानी विभाग होता म्हणजे आताच्या भाषेत (exclusive sensitive corridore) येथे सामान्य नागरिकांना परवान्याशिवाय प्रवेश नव्हता.

ब) अतिसंवेदनशील मुख्य राजधानी विभाग:-
नगारखाना ते महाराजांचा राजवाडा, मनोरे, गंगासागर तलाव, राणीवसा, मंत्र्यांचे वाडे, कुशावर्त तलाव हा सर्व परिसर हा अतिसंवेदनशील विभाग होता.आताच्या दिल्लीतील सेंट्रल विस्टा कॉरिडोर सारखा.
 
पहिल्या भागाची आपण येथेच सांगता करत आहोत भेटूया पुढील भागात 

संदर्भ व साभार:-
* Roadwheel राणे युट्युब चॅनेल.
* रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकातून-प्रा. प्र. के. घाणेकर सर.
*रायगड स्थळदर्शन- श्री अप्पा परब.
*ट्रेक क्षितिज 
विशेष सूचना : ©hitesh chavan या नावाने असलेली उपग्रह प्रकाशचित्रे विनपरवाना वापरण्यास सक्त मनाई आहे.

माहिती संकलन :- हितेश चव्हाण
लेखातील काही भाग काढून टाकायचा असल्यास किंव्हा लेखासंदर्भात काही अडचण असल्यास संपर्क 
Gmail :- chavanhitesh63@gmail.com
 
 
 

दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड होण्यापूर्वीचा किल्ले रायरी

 ☝️पहिल्या भागाची लिंक

नमस्कार माझं नाव हितेश मागील भागात आपण रायगडची प्रभावळ व नैसर्गिक संरचना समजून घेतली.आता रायरी ज्या जवळीच्या खोऱ्यात होता त्या जावळीवर राज्य करणाऱ्या चंद्रराव
मोरेंचा इतिहास,छत्रपती शिवराय व जावळी,जावळीच्या मोऱ्यांचे प्रभावळीतील इतर सरदारांशी असलेले सहसंबंध,व रायरीचा दुर्गराज रायगड होण्यापर्यंतचा प्रवास पाहणार आहोत.

चंद्रराव मोरेंचा इतिहास 
:-
चंद्रगुप्त मौर्य याच्या काळात मौर्य सम्राज्याचा विस्तार दक्षिण भारतातही मोठ्या प्रमाणात त्याच्या मृत्युंनंतर बिंबीसार हा राजगादी वर आला मात्र बिंबीसाराच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये गादीसाठी एकच नरसंहार झाला त्याच्या मुलांपैकी एक चंद्रराव मौर्य हा जावळीच्या खोऱ्यात सम्राट अशोकापासून वाचण्याकरिता लपून बसला. त्याकाळात जावळीचे खोरे हे कृष्णा व वारणा नद्या‌ंंकाठी पन्हाळा,विशाळगड ते रायरी महाबळेश्वर असे विस्तीर्ण व घनदाट होते या चंद्ररावाने येथे चंद्रराव मोर्य म्हणून आपले स्वातंत्र्य राज्य साथपन केले चंद्रराव मोर्य हा मोरेंचा घराण्याचा संस्थापक होय.‘मौर्य’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन मोरे हे आडनाव रूढ झाले.गुप्त,शुंग,चालुक्य,यादव, होयसाळ, राष्ट्रकूट, सातवाहन, शिलाहार या राजवाटिंपासून हे मौर्य साम्राज्य जावळी खोऱ्यात राज्य करत होते.
 चंद्रराव मौर्यास सहा मुले होती त्यापैकी थोरल्याला आपल्या जवळ ठेऊन बाकी मुलांना जवळीतील प्रदेश नेमून दिला.थोरल्या पिढीत चंद्रराव ते दौलतराव अश्या आठ पिढ्या झाल्या. मोऱ्यांच्या जावळी खोऱ्यातील एक पिढी देहूत स्थायिक झाली. त्यांच्याच पिढीत बोल्होबा व कानकाई या दाम्पत्याच्या पोटी जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला.
 चंद्रराव मौर्याच्या पिढ्या ह्या आपल्या नावापुढे ‘चंद्रराव’ हा 'किताब धारण करत. पुढे मोऱ्यांनी बहमणी सम्राज्याची चाकरी पत्करल्या नंतर हि हि प्रथा कायम राहिली.
इसवी सन १४५३ साली  पन्हाळा, व खेळणा किल्ल्यांवर घडलेल्या घटनेतुन शिर्के व मोरे यांची ताकत लक्षात येते.इसवी सन १४५३ साली पन्हाळा, व खेळणा किल्ल्यांवर बहामणी सरदार मलिक उददौजार ने आक्रमण केले त्याकाळी पन्हाळा शिर्केॅंकडे तर खेळणा हा मोऱ्यांच्या ताब्यात होता.तसेच शिर्के व मोरे व्याही होते. मलिक उददौजार ने पन्हाळा सहज घेतला तेव्हा शिर्के यांनी मलिक उददोजार ला घाबरून आपण धर्मांतरास तयार आहोत असे भासवून मोऱ्यांच्या ताब्यातील खेळणा हि घेऊन देऊ असे भासवले. खुश होऊन उददोजारने आपले सर्व १२००० सैन्य जावळीच्या दुर्गम घनदाट खोऱ्यात घुसवले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शिर्के व मोरे यांनी मिळून हे सर्व सैन्य कापून काढले मलिक उददोजार हि मारला गेला.बहमणी राजवटीने ह्या घटनेचा खूप मोठा धसका घेतला. मात्र पुढे जाऊन मोरे हे बहामणी राजवटीचे चाकर बनले.

जावळीच्या मोऱ्यांचे प्रभावळीतील इतर सरदारांशी असलेले सहसबंध 
:-
त्यावेळी(बहामणी काळ व त्या पुढील आदिलशाहीचा काळ )कोकणात शिर्के,सुर्वे, दळवी हि वतनदार मंडळी होती मोरे यांच्याशी त्यांची जवळीक होती.
छत्रपती शिवाजी महाराज व जावळी 
:-
   शिवरायांचा व जावळीचा प्रत्यक्ष संबंध हा इसवी सन १४४६ मध्ये तेव्हा स्वराज्य हे सुरुवातीच्या काळात होत शिवरायांची ओळख तेव्हा आदिलशाहीतील एका मातब्बर जहागीरदार शहाजीराजे यांचा मुलगा अशीच होती त्या काळात जावळीवर चंद्रराव म्हणून दौलतराव मोरे  व त्याची पत्नी मानकाई हे राज्य करत होता त्या काळात जवळीशेजारी दोन जहागिरी होऱ्या i) शहाजीराजेंची पुणे, सुपे इत्यादी. ii)रण्दुल्लाह खानाची वाई शहाजी राजे व रण्दुल्लाह खान हे मित्र होते. त्या काळात वाईची जहागीर रण्दुल्लाह खान याचा मुलगा रुस्तुम-ए-जमान  याच्याकडे होती व तो आणी शिवराय यांचे संबंध मित्रात्वाचे होते.
दौलतरावाच्या मृत्युंनंतर त्याची पत्नी मानकाईस वारस नसल्याने इतर मोरे जहागीरीवर हक्क सांगतील किंव्हा आदिलशहा आपली जहागीर जप्त करेल असे वाटले त्यासाठी तिने यशवंतरावास दत्तक घेतले परंतु
जावळीत होण्याऱ्या बंडाळ्या मोडून काढण्यासाठी तिला पाठिंब्याची आवश्यकता होती त्यासाठी तिने शिवरायांची मदत घेतली शिवरायांनी यशवंतरावास पाठिंबा दिला व यशवंतराव मोरे हा चंद्रराव यशवंतराव मोरे बनला.
         यानंतर मोऱ्यांनी काही काळ शिवरायांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले मात्र रण्दुल्लाह खानाच्या मृत्यूनंतर वाईची जहागीर जेव्हा अफझल खानाने ताब्यात घेतली तेव्हा त्याने मोऱ्यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरु केले मग मोरे हे हळूहळू शिवरायांचे उपकार विसरून अफझलखानाच्या बाजूने झाले.व स्वराज्यातील प्रदेशात हल्ले करून उपद्रव करू लागले या रागातून राजांनी जावळीवर हल्ला करावा व अफझलखानाच्या मदतीने राजांचा काटा काढावा असा डाव अफझलखानाच्या साथीने मोरेंनी रचला 
 याची खबर राजांना होतीच मात्र राजे योग्य संधीची वाट बघत होते राजांचे अनेक हेर जावळीत वेशांतर करून वावरत होते. आदिलशहाची प्रकृती अचानक बिघडल्याने अफझलखान हा  वाईहून विजापूरास गेला असता त्याची नेमणूक कर्नाटकतील कनकगिरी वर झाली हि संधी पाहताच राजांनी जावळीची मोहीम हाती घेतली.
तत्पूर्वी राजांनी यशवंतराव मोरेंना जरब पत्र व शिळीम्बकरांना अभयपत्र लिहिले.
राजे मोरेंना पत्रात लिहितात.
तुम्ही मुस्तफंद राजे म्हणविता, खरे राजे आम्ही हे राज्य आम्हाला शंभूने दिले तरी आपणास राजे न म्हणऊन, आमचे नोकर होऊन मुलुख घेऊन राहणे.
  मोरचेल,छत्रचामरे बाजोस ठेऊन जावळी खाली करोन हातरूमाले बांधून हुजूराचे भेटीस येणे इतकीयात बदफैली केलीयांस मारले जाल.”
 यशवंतरावाने यावर अतिशय गुर्मीत पत्र लिहुन उत्तर दिले.
तो म्हणतो.
“ चंद्रराव आमचा किताब आम्ही पिढीजात राजे. तुम्हास राज्य कोणी दिले मुस्तफंद राजा आपल्या घरी म्हंटल्यावर राजा कोण मानतो.येता जावळी जाता गोवळी दारुगोळा महजुद आहे. एकही पुरुष जिवंत जाणार नाही. उदीयाक येणे कराल तर आजच यावे. काही बेजबाबदार लिहिले ते कश्यास लिहिले थोर समर्थ असो."
 हे राजांना थेट आव्हानच होते राजेंनी जावळीची मोहीम आखूनच ठेवली होती मात्र यशवंतरावाने त्याला मिळालेल्या अखेरच्या संधीची हि माती केली.
 जावळीच्या मुख्य भागात जिथे राजधानी होती तिकडे त्याकाळात उतरायला दोनच मार्ग होते. रडतोंडीचा घाट व निसणीचा घाट.महाराजांनी आपल्या सैन्याची दोन भागात विभागणी करून मोठा भाग हा रडतोंडीच्या घाटाकडे रवाना केला व दुसऱ्या तुकडीसोबत महाराज अत्यंत अवघड असा निसणीचा घाट उतरून जावळीवर चल करून गेले. आजच्या श्रीक्षेत्र महाबळेश्वर मंदिरापासून अर्थर सीट पॉईंट कडे जाताना दहा मिनिटाच्या अंतरावर हा जुना निसणीचा घाट सुरु होतो.मात्र आजच्या काळात त्याचा वापर हा पूर्णपणे बंद झाला असे पायथाशी असलेल्या दरे गावाचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे हा ट्रेक करताना जाणकार व्यक्ती व स्थानिक ग्रामस्थांसोबतच करावा.
निसणीच्या घाटातील काही प्रकाशचित्र.
निसणीच्या घाटातून दिसणारा महाबळेश्वर येथील सुप्रसिद्ध लोडविक पॉईंट.
 निसणीच्या घाटातून दिसणारा प्रतापगड.व दरे गाव.
सर्व प्रकाशचित्रे साभार माऊन्टेन मॅडनेस युट्युब चॅनेल.©कॉपीराईट.
All pictures copyright reserved ©mountain_madness youtube channel's copyrighted picture.

इसवी सन १६५६ ला महाराजांनी जावळी जिंकली व जावळीवर स्वराज्याची भगवा जरीपटका फडकला.परंतु यशवंतराव हा रायरीस पळाला. तो अंगरक्षक मुरारबाजी देशपांडे यांच्यामुळे मुरारबाजींना महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे महाराजांनी रायरीस वेढा दिला यशवंतरावाने  तीन महिने निकराचा लढा दिला मात्र महाराजांनी रसद रोखून धरल्याने तो बिनशर्त तहास तयार झाला.व  त्या नंतर राजांनी यशवंतरावास व त्याच्या दोन मुलास कैद केले.परंतु यशवंतरावाने मोघलांना लिहिलेली पत्रे राजांना सापडल्याने राजांनी यशवंतरावांना मृत्यूदंड दिला. राजांनी रायरीचा किल्ला स्वराज्यात आला. महाराजांनी रायरीचा किल्ला पाहताच त्यांच्या तोंडी जे उदगार आलेत ते सभासद बखरीत लिहून ठेवले आहे.
सभासद म्हणतो ” राजा खासा जाऊन पाहता, गड बहुत चखोट. चौतर्फ़ा गडाचे कडे तासिल्यासारखे. दीड गाव उंच.पर्ज्यन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबादचे दशगुणी उंच, असे देखून संतुष्ट जाहले आणि बोलले तक्तास जागा हाच गड करावा."

आणि रायरीचा रायगड जाहला!
आणी अश्याप्रकारे रायरीचा दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड झाला.
जावळीच्या रण संग्रामात राजांना मुरारबाजी देशपांडे हे रत्न तर रायरी, प्रतापगड सारखे किल्ले व प्रचंड मोठा व महत्वाचा असा भौगोलिक प्रदेश हाती सापडला.
 पुढील भागात आपण प्रवासवर्णनातून मी अनुभवलेला रायगड पाहणार आहोत.

माहिती संकलन- हितेश चव्हाण.
©१३-७-२०२५copyright.
संपर्क:-GMAIL- जिमेल
संदर्भ:- काही युट्युब चॅनेल खालील युट्युब चॅनेल्स जरूर सबस्क्राईब करा 
3.google.com.
लेखकाच्या/संकलकाच्या नावाशिवाय 
सदर पोस्ट कोणत्याही समाज माध्यमावर प्रकाशित करणे हा गुन्हा आहे.
IT IS STRICTLY PROHIBITED TO SHARE THIS POST WITHOUT INCLUDING NAME OF WRITER OF THIS POST ON ANY SITE, SOCIAL MEDIA OR ANY PLATFORM.
 
 

शोध समाधीचा; रायगडावरील पुतळाबाईंच्या समाधीची कुत्र्याच्या समाधीद्वारे होणारी विटंबना!

छत्रपती शिवाजी महाराज व वाघ्या/ कोणत्याही प्रकारचा कुत्रा ह्यांचा कोणताही संबंध नव्हता. हे तत्कालीन प्रथम किंव्हा दुय्यम दर्जाच्या उपलब्ध साहित्य वाङमयातून दिसून येते या साहित्य वाङमयात सभासद बखर, शिवभारत, ९१ कलमी बखर, जेधे शकावली या ग्रंथाचा समावेश होतो. 
मात्र यातील सभासद बखर हि कृष्णाजी अनंत सभासद या महाराजांच्या समकालीन सल्लागाराने राजाराम राजांच्या आज्ञेने लिहिलेली व अष्टप्रधान मंडळातील वाकनीस या पदावरील दत्ताजी त्रिमल वाकनिसांच्या ९१ कलमी बखरी या समकालीन असल्याने प्रमाण मानल्या जातात यात हि कुत्र्याच्या उल्लेख नाही.परंतु राजकारण्यांच्या व ब्रिगेडी पिलावळीच्या नादाला लागून  त्या पवित्र जागी कुत्र्याची समाधी बसवण कितपत योग्य आहे? आज आपण पुतळाबाईंच्या समाधीच हि त्या वाघ्या कुत्र्याची समाधी असल्याचे ऐतिहासिक पुराव्यांचा आधार घेऊन सिद्ध करणार आहोत  
सर्वप्रथम काही ऐतिहासिक कागदपत्रातील शिवरायांच्या निधनाविषयीचे उल्लेख आपण पाहूया 
१. सभासद बखर:-
       शिवरायांच्या काळात सल्लागार पदावर(सभासद) कार्यरत असणाऱ्या कृष्णाजी अनंत सभासद ह्यांना छत्रपती राजाराम राजांनी शिवचरित्र लिहिण्याची आज्ञा केली रामराजे म्हणतात "आपण जुनी जाणती माहितीगार लोक त्याप्रमाणे स्वामींचे(शिवछत्रपती)संपूर्ण चरित्र इक्तेबार(आरंभा) पासून लिहिणे सभासद  शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक घटनांचा साक्षीदार असल्याने हि बखर प्रमाण मानली जाते यातील उल्लेख असा 
    , “मग काही दिवसांनी राजास ज्वराची व्यथा जाहाली.राजा पुण्यश्लोक.कालज्ञान जाणे.विचार पाहाता आयुष्याची मर्यादा झाली.असें कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यामध्ये सभ्य,भले लोक बोलावून आणिले.”

सभासद पुढे कुणा कुणाला बोलावले त्या माणसांची नावे सुद्धा देतो. ” बितपशील- कारकून - निळोपंत प्रधानपुत्र, प्रल्हादपंत, गंगाधरपंत हे जनार्दनपंताचे पुत्र, रामचंद्र निळकंठ, रावजी सोमनाथ, आबाजी महादेव, जोतीराव, बाळप्रभू चिटणिस हुजरे लोक - हिरोजी फरजंद, बाबाजी घाडगे, बाजी कदम, मुधोजी सरखवास, सुर्याजी मालुसरा, महादजी नाईक पानसंबळ.” या सर्व जाणत्या माणसांना राजांनी काही उपदेश केला, “त्यास सांगितले की आपली आयुष्याची अवधी जाली. आपण कैलासास श्रीचे दर्शनास जाणार. शरीर क्षीण देखून पन्हाळियावरि संभाजी राजे वडील पुत्र यांस सांगितले होते की 'तुम्ही दोघे पुत्र आपणास यांस राज्य वाटून देतो. आणि उभयता सुखरूप राहणे. म्हणोन सांगितले. परंतु वडील पुत्र संभाजी राजे यांनी ऐकिले नाही. शेवट आपला तो निदानसमय दिसताहे.” राजांचे अंत्यसंस्कार हे पुढे राजाराम महाराजांनी केले असा उल्लेख सभासद करतो.
 २. दत्ताजी त्रिमल वाकनीस ह्यांची ९१ कलमी बखर 
        शिवरायांच्या मंत्रिमंडळात वाकनीस या पदावरील दत्ताजी त्रिमल वाकनीस ह्यांच्या मूळ 91 कलमी बखरीतील उल्लेख असा आहे “नंतर राजे स्वामीस नवज्वर प्राप्त झाला. शके १६०२ रुद्र नाम संवत्सरे चैत्र शुद्ध १५ दोन प्रहरा, राजेस्वमी कैलासवासी झाले. सावधपणे संस्कार करून हरिदास कीर्तन करीत असता देह ठेवला.”
३.जेधे शकावली 
      जेधे शकावली ही कान्होजी नाईक जेधे यांच्या वंशजांकडून मिळवून छापण्यात आली. एक विश्वासाचे साधन म्हणून ही शकावली मानली जाते. त्यात लिहिले आहे,

“शके १६०२ रौद्र संवछर चैत्र शुध पौर्णिमा शनवारी दोप्रहरां दिवसां रायगडी सिवाजी राजे यांनी देह ठेविला”
४. शिवभारत 
     शिवरायांच्या पदरी असलेले कवी परमानंद ह्यांनी लिहिलेला काव्यात्मक संस्कृत ग्रंथ म्हणजे शिवभारत; परंतु ह्या संस्कृत ग्रंथाच्या उपलब्ध प्रतीं मध्ये इसवी सन १६६१ पर्यंतचेच उल्लेख आहेत.परमानंद हे अनेक महत्वाच्या घटनांचे साक्षीदार आहेत त्यात अग्रा भेट, अफझलखान वध इ. घटनांचा समावेश होतो परंतु हात राज्याभिषेक व त्यानंतरच्या घटनांचा उल्लेख नाही त्यामुळे शिवभारत हा अपूर्ण तरीही प्रमाण मानला जाणारा काव्यग्रंथ आहे.
 अश्याप्रकारे वरील साधनांचा अभ्यास केला असता त्यात कोठेही राजांच्या श्वान /इतर पाळीव प्राण्याने महाराजांसोबत त्यांच्या चितेवार उडी मारल्याचा साधा उल्लेख हि नाही. महत्वाच्या सभासद  बखरिसारख्या महत्वाच्या प्रमाण मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनातही तसा उल्लेख नाही.मग हा कुत्रा इथे आला कुठून?
जेम्स डग्लस जेव्हा रायगडा वर आला  तेव्हा त्याने रायगडावर एका मंदीराच्या समोर एक अष्टकोनी चौथरा असल्याची व हीच सेवाजीस टोम्ब अर्थात शिवसमाधी असल्याची नोंद केली व तसें स्केच बनवले मात्र त्यासोबतच बाजूलाच एक चौथरा असल्याची नोंद केली तो राजघराण्यातील व्यक्तीचा असावा असे नमूद केले;मात्र त्याची व त्या मंदिराची अवस्था बिकट असून चारही बाजूने झाडी माजली आहे.  तेथील लोकांची ते दुरुस्तीबाबतीची अनास्था त्याने आपल्या अ बुक ऑफ बॉम्बे 
या पुस्तकात व्यक्त केली आहे.
तसेच रायगडावर जी सतीशीला शिरकाई मंदिराच्या मागे आहे ती रायगडवर संभाजी राजांच्या काळात सती गेलेल्या पुतळाबाई राणी सरकारांचीच आहे याबत दुमत नाही. तसेच डग्लस ने आपल्या पुस्तकात ज्या चौथऱ्याची शिवसमाधीच्या बाजूला असल्याची व तो चौथरा म्हणजे राजघराण्यातील व्यक्तीची समाधी असल्याची नोंद केली ह्यावरून तो चौथरा हि पुतळाबाईंचीच समाधी असल्याचे लक्षात येते कारण शिवरायांच्या बाजूला कुत्र्यापेक्षा आवडती राणी पुतळाबाईंचीच समाधी असु शकते यात दुमत नाही  तसेच सभासद बखरीत पुतळाबाई संभाजी राजांच्या काळात सती गेल्याचा उल्लेख आहे पण पाळीव श्वानाचा नाही.
 किल्ले रायगडवरील शिरकाई मंदिराच्या मागील बाजूस असलेली सतीशीला.
      वाघ्या कुत्र्याचा पहिला उल्लेख शिवाजी महाराजांच्या निधनाच्या साधारण २५० वर्षानंतर लेखक चि. ग. गोगटे यांच्या महाराष्ट्र देशातील किल्ले यया पुस्तकात येतो तो असा 
 "महाराजांचा अंत झाल्यावर त्यांचे प्रेत पालखीत घालून दहानभूमीवर आणले गेले तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचा पाळीव श्वान हि होता मात्र अंत्यविधी झाल्यावर रिकामी पालखी पाहून त्या स्वामीनिष्ठ श्वानाने धावत जाऊन राजांच्या चितेवर उडी घेतली व स्वतःला जाळून घेतले ".
येथे एका गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते सभासद बखरिनुसार राजांचे अंतिमसंस्कार राजाराम राजांनी केले.त्यामुळे तेथे राजाराम राजे उपस्थित होते पण जर हि घटना खरी मानली तर सभासदाने एव्हड्या स्वामीनिष्ठ श्वानाचा उल्लेख टाळला असेल तर रामराजांनी त्याची हि चूक अमान्य केली असती व सभासद बखरीत तसा उल्लेख केला असता तसेच संभाजी राजांनीही त्या श्वानाचा यथोचित सन्मान केला असता त्याची निश्चित समाधी बांधली असती.मात्र असे काहीच घडले नाही ह्याचा अर्थ ती एक दंतकथा आहे हे दिसून येते.
आता ह्याला आधार म्हणून काही लोक तुकोजी होळकरांचा संदर्भ देतात असं म्हणतात की १९२६ च्या आसपास रायगड स्मारक मंडळ होळकरांकडे शिवसमाधीच्या जीर्णोदधारासाठी निधी मागायला गेले होते.मात्र तेव्हा त्यांच्या एका लाडक्या श्वानाचे निधन झाले होते.त्यामुळे तसेच इंग्रजांच्या भीतीने त्यांनी आम्हाला सुतक आहे त्यामुळे निधी देऊ शकत नाही असे सांगितले मात्र तेव्हा रायगड स्मारक मंडळाने तुमच्या कुत्र्याचे स्मारक  बंधू त्यासाठी निधी द्या असे सुचवल्यावर होळकरांनी निधी दिला मात्र हा हि मत प्रवाह चुकीचा आहे. कारण १९२७ च्या आसपास शिवसमाधीच्या जीर्णोदधाराचे काम पूर्ण झाले त्यासाठी रायगड स्मारक मंडळ,कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, बडोदा संस्थानाचे महाराजा सयाजीराव गायकवाड, इंदूरचे तुकोजीराव व ब्रिटिश पुरातत्व विभागाने मदत केली.
यात ब्रिटिश पुरातत्व विभाग सामील असल्याने तुकोजी होळकरांनी इंग्रज सरकारच्या भीतीने आपल्या श्वानाच्या स्मारकाच्या बदल्यात शिवसमाधीच्या जीर्णोदधारासाठी साठी निधी दिला हि बाब येथे खोटी ठरते.
 त्यानंतर दक्षिण दिग्विजया दरम्यान कर्नाटकतील एक गढी महाराजांनी जिंकून घेतली व त्या गढीच्या राणीला ती गढी भाऊबीज म्हणून तिच्या चोळीबांगडीसाठी दिली तेव्हा तिने शिवरायांचे शिल्प कोरले त्यात एक कुत्रा आहे त्यामुळेही या गोष्टीचे समर्थन करतात मात्र समकालीन मराठा ऐतिहासिक साधनात तसा उल्लेख नसल्याने ती बाबहि चुकीची ठरते हा कुत्रा राजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत कुठून तरी आला असावा. १९०५ पूर्वी वाघ्या कुत्रा हि दंतकथा होती मात्र शिवसमाधीच्या जीर्णोदधाराच्या दहा वर्षांनंतर १९३६साली आताचे हे स्मारक उभारण्यात आले ते हि राम गणेश गडकरिंच्या राजसान्यास या नाटकावरून त्याचे वाघ्या हे नावही पडले. 
मात्र पुतळाबाईंच्या समाधीवर तो कुत्रा बसवून त्या महान राणीचा तसेच एका सतीचा आपण अपमान करतोय हे सर्वांनी लक्षात घेऊन ती चूक दुरुस्त करण्याची वेळ आली आहे.ह्यात ब्राम्हणद्वेष, जातपात राजकारण न करता किंबहुना त्याला बळी न पडता सत्य स्वीकारून पुतळाबाईंना योग्य न्याय द्यायला हवा हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
माहिती संकलन:- हितेश चव्हाण©
सदर ब्लॉग माझ्या नावाचे श्रेय न देता कोठेही अपलोड  किंव्हा शेअर केल्यास योग्य ती कारवाई कॉपीराईट कायद्या अंतर्गत केली जाईल 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...