Friday, April 29, 2022

सफर सुधागडच्या नाणदांड आणि घोणदांड घाटवाटांची

https://smaranyatras.blogspot.com/2017/10/blog-post.html


सुधागडची सफर होऊन बरीच वर्ष ओलांडली होती त्यानंतर त्या विभागात जास्त भटकंती करण्याचा योग आला नव्हता. मोबाईलवर लुडो गेम खेळत असताना अचानक विश्राम दादांचा मेसेज आला "उद्या कुठे जाऊया का" तसं घरी राहून मला कंटाळा आला होताच म्हणा. त्याला कॉल करून त्यांच्या घरी येतो म्हणून बॅग भरून घरच्यांना भटकंतीसाठी जातोय असे सांगून निघणार आणि घराच्या बाहेर पाय पडता पडताच छोट्या भाऊ रायांची हाक "कोणत्या गडावर स्वारी साहेबाची" थोडा वेळ विचार करून पटकन तोंडात सुधागड नाव आलं आणि तिथून काढता पाय घेतला नाहीतर माँ साहेबांची प्रश्नावली तयार असतेच. मग कुर्ला वाशी करून विश्राम दादांच्या घरी आलो साहेबानी लागलीच प्रश्नकुठे जाऊया” लगेच उत्तर सुधागडच्या घाटवाटांची सफर.  सकाळी ला विश्राम दादाचे घर सोडून पनवेल एसटी स्टॅन्डवर गरमागरम चहा घेऊन खोपोलीच्या दिशेने गाडी पळवली. हवेत गारवा जाणवू लागला शिवाय थंडीचे दिवस त्यात धुकं त्यामुळे पाच दहा मीटर पेक्ष्या पुढील रस्ता दिसत नव्हता खोपोली वरून पाली साठी वळलो. एक ट्रक दणदणाट करत पाली कडे सुसाट पळत होता मग विश्राम पण त्यांच्या मागे सुसाट गाडी पळवत होता पाली जवळील रस्त्यावर पडलेल्या विहिरी सदृश एका खड्डयात गाडी जोरात आपटली आणि माझ्या पाठीच पार भुगा झाला. मग साहेबांना गाडीवर मागे कोणीतरी बसलं आहे याचा साक्षात्कार झाल्यावर गाडी सावकाश चालवत गाडी पाली मध्ये आणली. सकाळी :१५ च्या सुमारास मिसळपाव वर येथेच्छ ताव मारून ठाकूरवाडीत :३०ला पोचलो गावातील सर्व मंडळी चौकशी करू लागेल कुठे जाणार, सुधागडवर का, वाटाड्या हवा आहे का, जेवणाची सोय वैगरे वैगरे आम्ही लागलीच मुद्याला हात घातला. नाणदांड घाटाची वाट दाखवायला कोणी येणार आहे का तसे बहुतेक जण माघारी त्यातील एक आजोबा बोलले "पोरांनो नाणदांड ने आता जास्त कोणी जात नाही तुम्ही एक काम करा नाळेच्या वाटेने जा आणि त्याचं वाटेने खाली या" आम्ही आजोबा ना बोललो "बाबा फक्त वाटेला लावून दिलंत तरी पुढे आम्ही वाट शोधत जाऊ" आजोबानी गावाच्या बाहेरील वाटेला बोलले  "वाटेत शेतावर कामाला गेलेली मंडळी भेटतील ती तुम्हाला नाणदांडच्या वाटेला लावून देतील" असे म्हणून माघारी फिरले.

गावातून बाहेर येऊन उतरणीला म्हणजेच नदीकडे उतरू लागलो. सुधागड आणि त्याच्या जवळील प्रदेशात बर्याचश्या जुन्या घाटवाटा आणि लेण्या आहेत त्यात वारसदार, वाघजाई, सवाष्णी तर घनगड जवळ डेऱ्या, नाणदांड, घोणदांड, गाढवलोट अश्या जुन्या वापरातील घाटवाटा शिवाय खडसांबळे आणि ठाणाळे लेण्या आहेत यामुळे या परिसराला प्राचीन काळापासून खूप महत्व आहे. चौल बंदरातून उतरणारा माल कोकणातून घाटावर ये जा करण्यासाठी या घाटवाटांचा वापर होत असे तसेच घाटवाटांच्या स्वरक्षणासाठी कोकणात सुधागड तर माथ्यावर तेलबैला आणि घनगड असे बलदंड किल्ले बांधण्यात आले असावेत. आता समोर सह्याद्रीचा अफाट नजारा डोळ्या समोर येऊ लागला डावीकडे सुधागड समोर तैलबैलाच्या जुळ्या कातळभिंती, घोडेजिनीची वाट, भोरप्याची नाळ सर्व डोळ्यात आणि कॅमेरा मध्ये साठवत पुढे निघालो.
शेतावर चाललेले दादा 
सहयाद्रीचा अफाट नजारा सुधागड तैलबेला 
तेच एक दादा शेतीच्या कामानिमित्त शेतावर जात होते त्यांना वाटेला लावून देण्याबद्दल विचारलं असता त्यानी लगेच होकार देत त्यांच्या बरोबर आम्ही वाटेवर चालू लागलो. डावीकडे एक छोटासा झाप आहे आणि शेत तिथूनच वाट आता नदी पार करून पुढे चढत होती दादांनी हीच वाट पकडून सरळ जा तिथे धनगराचा झाप आहे तिथून उजवीकडे वळा अस सांगून माघारी वळले.
नदी ओलांडून उजवीकडे वाट वळते 
धनगर वाड्याकडे जाणारी वाट 
 समोर गोल कातळकडा दिसतोय त्यांच्यावरून वाट जाते 
ओढ्याच्या उजवीकडून वाट आता जंगलात घुसली तसं थंडगार ऐसी मध्ये आल्यासारखं वाटलं दहा ते पंधरा मिनिटात धनगर वाड्याजवळ आलो. धनगर वाडयाजवळून एक वाट सरळ तर एक वाट उजवीकडे  पुढील वाट योग्य आहे का वाड्याजवळ कोणी आहे यासाठी हाकारे मारले. वाड्याच्या मागून एक दादा आले त्यांना नाणदांड ने जायचं सांगितल्यावर त्यांनी आम्हा दोघांस उजवीकडच्या वाटेने जायला सांगितले शिवाय वाटेवर आता गवत उगवलं आहे त्यामुळे सांभाळून जाण्यास सांगितले

धनगरवाड्याकडे जाताना लागलेला ओढा    
सुधागड दर्शन 
धनगरवाडा 
उजवीकडील वाट पकडून वाट आता चढणीला लागली पहिल्या एक दोन टप्यानंतर धाप लागू लागली थोडे अंतर चालून गेलो तेच एक ओढा वाटेवर लागला इथे थोडं खाऊन पुढे निघालो. वाट ओढा ओलांडून पलीकडे सरळ सोंडेला लागते आणि इथूनच आपली वाट लागायला सुरवात होते ती अशी कि या वाटेवरून सहसा कोणी जात नाही तसेच पावसाळ्यानंतर या वाटेवरून  कोणी गेलं नव्हतं  त्यामुळे वाटेवर भरपूर गवत हे गवत येवढं मोठे होते कि समोरील चालणारी व्यक्ती दिसत नसे शिवाय पाया खाली काय आहे ते पण दिसत नव्हते
दाट जंगलातून जाणारी वाट

हा छोटा ओढा पार करून डावीकडे वाट आहे

आंब्याच्या झाडाखालून जाणारी वाट 
त्यात सरळसोट चढाई पावलं पुढे गेलो कि पावलं परत मागे येत होतो नाकात आणि तोंडात गवत जाऊन जीव मेटाकुटीला आला जणू काही पण पायाखालील वाट काही सोडली नाही. अर्धी अधिक चढाई झाली होती मग मस्त मळलेली वाट लागली शिवाय माथा जवळ वाटू लागला होता तरी एक तासाची चढाई झालीच ती करून सकाळच्या ११ वाजता नाणदांड घाटाच्या माथ्यावर आलो
माणसापेक्ष्या उंच गवत
नाणदांडच्या वाटेवरून

माथा जवळ दिसताना 
जवळील एका झाडाजवळ बॅग फेकून सरळ आडवाचं झालो विश्राम मागे फिदीफिदी हसत होता पण त्याच्याकडे लक्ष ना देता मस्त ताणून दिली आता शरीर शांत झालं तेव्हा केवणी गावाकडे निघालो. भर दुपारी उन्हातून चालतोय असं एक क्षण सुद्धा वाटलं नाही एवढा भन्नाट वारा सुटला होता केवणीच्या पठारावर दहा पंधरा मिनिटात केवणीतील एक घराजवळ आलो. 
केवणीच्या पठारावरून दिसणारा सह्याद्रीचा अफाट नजारा 
केवणी गाव
केवणी गावातील एकमेव घर ढेहबे कुटूंबातील आजी आजोबा आणि त्यांनी पाळलेली ४ ५ गुरे बाकी केवणी गावात कोणी राहत नाही आजीने पाणी देत विचारपूस केली कुठून आलात पुढे कसे जाणार वैगरे आम्ही घोण्याच्या दांडा ने जाणार म्हटल्या वर आजी बोलल्या "त्या पेक्ष्या नाळेच्या वाटेने जा लवकर आणि सरळ ठाकूरवाडीत जाल" पण आम्हांला नाळेच्या वाटेने जायचे नव्हते हे बहुतेक आजी ने चांगलंच हेरलं होतं. आजीने घरातून बाहेर येऊन घोण्याच्या दांड्याची वाटेबद्दल माहिती सांगितली समोरील वाटेने सरळ जावा थोड्या अंतरावर उजवीकडे कडे एक वाट जाईल तिकडे न जाता सरळ जात रहा. उजवीकडील वाट नाळेच्या वाटेला लागेल सरळ गेल्यावर वाट उतरताना एक अर्धे मोडलेले आंब्याचे झाड़ लागेल म्हणजे तुम्ही वाटेवर बरोबर आहेत समजा अजून थोड़े पुढे गेल्यावर उजवीकडे एक बंद केलेली वाट आहे तिथून खाली उतरा डावीकडील वाटेकडे जाऊ नका" एवढं सर्व डोक्यात साठवून आजीला नमस्कार करून पुढील वाटेला लागलो आजीने सांगितल्याप्रमाणे उजवीकडील नाळेची वाट सोडून सरळ निघालो.
केवणीतून घोणदांड घाटाच्या वाटेला जाताना 
   विश्राम दादा वाट शोधताना 
मग वाट अर्ध्या तुटलेल्या आंब्याखाली आलो थोडा वेळ आराम करून पोटपुजा करून घाटवाट उतरू लागलो तेव्हा दुपारचे १:३० वाजले होते. उन्हं जास्त असलं तरी मोठमोठया झाडातून त्याचा त्रास कमीच होत होता त्यामुळे निवांत उतराई चालली होती एक मोठा खडक पार करून वाट मधेच डावीकडे वळली. 
हिर्डी ते आसणवाडी प्रदेश 
डेऱ्या घाट आसणवाडी
आजीने सांगितले होत ते पटापट उतराईच्या नादात डोक्यातून निघून गेलं होत त्यामुळे डावीकडील कड्यावर आलो पुढे वाट अशी नाहीच समोर डेऱ्याघाट, आसनवाडी, हिर्डी असा प्रदेश उलगडला. मग परत थोडे मागे येऊन मूळ वाटेवर आलो इथे गाईगुरे खाली जाऊ नये यासाठी हि वाट बंद केलेली दिसली त्यावरून उड्या टाकून पुढील वाटेला लागलो. 
मळलेली वाट
 समोर असलेल्या गोल कातळाच्या डावीकडून वाट खाली उतरते 
आता वाट मस्त मळलेली सरळ खाली उतरत उजवं डाव वळण घेत खालील पठारावर आली जंगलातून जसे पठारावर आलो तसे मानमोडणारी सुरेख दृश्ये समोर दिसू लागली. उजवीकडील पदरातून जाणारी वाट सोडून खालील वाटेला लागलो हि वाट सरळ नागशेतला उतरते. 

तसं पाहिलं तर उजवीकडील वाट पकडून खडसांबळे लेणी पाहून ठाकूरवाडीत जाऊ शकत होतो पण आम्हांला वेड लागले होते ते कोंडजाई डोहाचे नागशेतच्या पलीकडील धनगरवाडी जवळचा पूल पार करून कोंडजाई डोहाजवळ आलो. एव्हाना घड्याळात ३ वाजले होते परत एकदा पोटात सुका मेवा टाकून थोडी पडीक मारली आम्ही दोघेही एवढे शांत झोपलो होतो कि कधी दुपारचे ४ वाजले कळले नाही. 
कोंडजाई देवी जवळील कोंड
 कोंडजाई देवी 
  कोंडजाई देवी परिसर 
गावातील एक काका मासे पकडण्यासाठी जेव्हा डोहाजवळ आले तेव्हा त्यांनी आम्हांला उठवलं पटकन आवरा आवरी करून फ्रेश झालो काकांचे आभार मानून ठाकूरवाडीच्या वाटेला लागलो. डांबरी रोडवरील चाल कंटाळवाणी वाटू लागली मध्येच एक वाट उजवीकडे नदीकडे वळलेली दिसली. नदीतून पटापट अंतर पार करून नेणावली गाव गाठलं इथे एका दुकान वजा घरात चहा भेटेल का चौकशी केली असता दुकानातील ताईने चहा लगेच समोर केला. गवती चहा पिऊन चालण्यात आलेली मरगळ जणू कुठल्या कुठे उडून गेली होती आता पुढील वाटचाल आरामात करत खंडसांबळे गावातील पूल पार करून ठाकूरवाडीच्या वाटेला लागलो बरोबर संध्याकाळी ६:३० संधीप्रकाशात ठाकूरवाडीत पोचलो. सकाळी भेटलेल्या आजोबाना केलेल्या तंगडतोडीचा लघुचित्रपट सादर केला त्यांनी केलेल्या मदतीबद्दल मोबदला देण्याचा प्रयन्त केला पण आजोबांनी तो नाकारला उलट आम्हांला घरी नेवून मस्त गवती चहा पाजला. आजोबांचा प्रेमळ निरोप घेऊन विश्राम ने गाडी पालीच्या दिशेने पळवली मग खोपोली पनवेल करून विश्रामच्या घरी रात्री ९:३० ला पोचलो. सुधागडच्या त्या दोन घाटवाटांनी मनात घर नक्कीच केलं पुढील काही वर्षात तेथील प्रदेशाचा कायापालट होऊ नये तेथील रांगडं पण तसेच रहावं हीच मनोमन इच्छा

खुटेदार घाट-दुर्ग-ढाकोबा-दाऱ्या घाट

https://smaranyatras.blogspot.com/2014/02/blog-post.html

सह्याद्री या नावातच काही वेगळंपण आहे रोजच्या दैनंदिन जीवनाला कंटाळुन कधी एकदा शनिवार रविवार येतो आणि कधी सह्याद्रीला भेट देतो असं वाटतखूप काही शिकायला भेटतं सहयाद्रीकडून कधी कधी कुठे चुकलो तर बापासारखा राग दाखवतो पण ते तात्पुरतंच म्हणावं लागेल मग आई सारखं प्रेम करत त्या चुकीवर फुंकर मारतो असा सहयाद्री तर आता मायबाप वाटतो.

 सहयाद्री मध्ये भटकंती करून खूप दिवस झाले होते कामाच्या निमित्ताने भटकंती कडे थोडं दूर लक्ष्य झालं म्हणलं तरी चालेल विश्राम दर शनिवार रविवार फोन करून विचारत असे दिप्या काही प्लॅन आहे का पण कामापायी मी नकार देत असे. मग एकेदिवशी सहज म्हणून कंप्युटर वर मॅप चाळत बसलो होतो मॅप बघता बघता नजर दोन अनगड किल्ल्यावर आणि तेथील घाटवाटांवर पडली. लगेच विश्राम ला फोन या रविवारी तयार रहा प्लॅन जबरी आहे खूप चालावं लागणार पण भावाने कसलीही पर्वा करता लागलीच होकार दिला. या वेळी घाटवाट होती खुटेदार आणि दारा घाट त्या बरोबर दुर्ग आणि ढाकोबा असा पायलट ट्रेक तोही एक दिवसाचा बरं का. तारखेला शनिवारी आम्ही सकाळी ५ला अंधेरी वरून निघालो मग कल्याण फाटा मुरबाड करून सरळगावला चहासाठी गाडी थांबवली तेव्हा घड्याळात ६:४५ वाजले होते ५ मिनिटे गाडीला आराम देत धसई मग रामपूरला ७:२५ ला उतरलो. गावातील राम दादाच्या घरी खुटेदार बद्दल माहिती विचारली दादा बोलले वाट सापडायची नाही इतक्यात एकनाथ दादा तिथे आले राम दादांनी एकनाथ दादांना आम्हांला खुटेदारच्या वाटेला लावून देयाला सांगितले. आम्ही तिघे वाटे कडे निघणार इतक्यात राम दादा बोलले "पोरांनॊ चहा घेऊन जा आणि गाडी इथेच ठेवून जा कुठे चुकलात तर आल्या पावली परत गावी या" असं सांगून आमचे दोघांचे नंबर घेतले आणि त्यांनी त्यांचा मोबाइल नंबर दिला. मस्त गवती चहा घेऊन आम्ही गाव उजवीकडे सोडत खुटेदारकडे चालू लागलो 
 खुटेदार घाटाकडे

त्रिगुणधारी घाट 
सकाळचे ८ वाजले तरी हवेत गारवा होता वाट आता शेतातून दाट जंगलात शिरू लागली. उजवीकडे त्रिगुणधारी घाट तसेच पोशीची नाळ आणि माडाची नाळ दर्शन देत होती वाट आता सरळ चढणीची होती पहिल्याच चढाला आम्हां दोघांना धाप लागली दादांनी एक सफेद साल गेलेलं झाड दाखवलं तिथून वाट उजवीकडे जाते असं सांगितलं तसेच पाणी जपून वापरा शेवट पर्यंत कुठेच पाणी नाही शिवाय मधी २/३ कातळटप्पे आहेत ते सांभाळून पार करा अशी माहिती पुरवून एकनाथ दादा माघारी निघाले. विश्राम ने केलेल्या मदती बद्दल मोबदला देण्याचा प्रयत्न केला पण दादा नि साफ नकार दिला तरीही विश्रामने मोबदला घेण्यास भाग पाडलंच. 
 इथून दादा परत निघाले 
त्या घनदाट जंगलात आम्ही फक्त दोघे बाकी निरव शांतता, ती शांतता कायम ठेवत आम्ही पुढे सरकत होतो. वाट आता कड्याला चिटकून जात होती पहिला कातळटप्पा लागला इथे गावकऱयांनी जाडजुड रोप बांधला होता हा सोपा कातळटप्पा पार करून पुढे निघालो परत चढणीची आणि घसरडी वाट त्यावर माजलेल्या गवतामुळे अजूनच घसरगुंडी होत होती. 
पहिला कातळटप्पा

सफेद साल सोललेल्या झाडाजवळून उजवीकडे वळायचं 

घसरडी वाट
वाट एका मोठ्या दगडाला बगल उजवीकडे वळुन दुसऱ्या कातळटप्प्याजवळ आली होती हा कातळटप्प्या थोड्या लीलया करून पार करून पुढे निघालो परत घसरडी वाट पार करून वाटेत एक ठिकाणी खुंट्या मारलेल्या दिसल्या कदाचित याचमुळे या घाटाला खुटेदार म्हणत असतील.

 दुसरा कातळटप्पा

वाटेवर मारलेल्या खुंट्या 

वाटेवर मारलेल्या खुंट्या 
एक एक टप्पा पार करून तिसऱ्या कातळटप्प्याजवळ आलो इथे पायऱ्या खोदलेल्या निर्दशनास आल्या या वरून हि घाटवाट नक्कीच पुरातन असणार फक्त उभी सरळसोट चढणीची असल्यानी त्यावेळी फार कमी लोक हि वाट वापरत असतील. आता पोटात कावळे चांगलेच ओरडू लागले होते सोबत आणलेलं सुखा मेवावर ताव मारला पाणी पिऊन पुढच्या चढाई ला लागलो एव्हाना घड्याळात ९:१५ वाजले होते. 
कातळात खोदलेल्या पायऱ्या   

 सफेद झाड दिसतंय का बघा
थंड हवेच्या झुळका मधेच येत असल्याने घाटमाथा आता जवळ वाटू लागला होता तरी अजून बरीच चढाई बाकी होती वाट उजवीकडे वळत एका ठिकाणी थोडा अवघड पण जुन्या जाणत्या ट्रेकर्ससाठी सोपा कातळटप्पा या टप्प्यावर कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. 
उजवीकडे तिरपे चालल्यावर कातळातील तिसरा कातळटप्प्याजवळ येतो  

तिसरा कातळटप्प्या आणि त्यातील पायऱ्या 

खुटेदार घाटमाथा
या वरून हि घाटवाट नक्कीच पुरातन असणार या वर मत ठाम झालं पुढील २/३ छोटे टप्पे पार करून बरोबर १० वाजता खुटेदारा घाटाचा माथा गाठला. आता सूर्य देव आपलं काम जोमाने बजावत असल्याने दुर्ग किल्ल्याकडे वाटचाल करू लागलो गर्द झाडीतून वाट जात मोकळ्या पठारावरून दुर्ग मंदिरापाशी आलो. 
खुटेदार घाटमाथा

 दुर्ग किल्ल्याकडे  
दुर्ग मंदिराचे बांधकाम चालू असल्याने बाजूला एक स्वच्छ पाण्यानी भरलेली कुत्रिम टाकी होती परत एकदा पोटात काही ढकलून दुर्गा देवीचं दर्शन घेऊन दुर्ग किल्ल्याकडे चालू लागलो किल्ल्यावर दगडाच्या सडा पडला होता ५ मिनिटांत खालील पठारावर आलो.
दुर्ग मंदिर

दुर्ग मंदिराचं जिणोध्दार

ढाकोबा आणि ओढ्यातील वाट 
ढाकोबाची पुसट वाट पकडत पुढे निघालो खरं पण मनात थोडी वाटेबद्दल रुखरुख होतीच. वाट खाली उतरत ओढ्याजवळ जात होती दुर्ग ढाकोबाच्या या प्रदेशात स्थानिक लोक आणि आपल्यासारखे वेडेचं फिरतात. वाट ओढ्याजवळून डावीकडूनच जात होती भयाण जंगल दुर्ग पासून अर्ध्या पाऊण तासांची चाल झाली होती मध्येच एक ठिकाणी  मागून कोणीतरी चालत येत आहे असं वाटलं मागे वळून बघतो तर भिवाडे गावातील मंडळी ढाकोबाच्या दर्शनासाठी जात होते आता मनाला लागलेली रुखरुख थांबली. त्यांच्याशी बोलता बोलता कळलं कि या विभागात शिकारीसाठी आजुबाजुंच्या गावातील लोक येतात सहाजिकच त्यामुळे ढाकोबाच्या वरील जंगलात असंख्य वाटा झाल्या आहेत कुठेही झाडीत न घुसता उघड्या माळावरून चाल करा असा जणू काही त्यांनी उपदेश देऊन ते एखादी वोल्वो एसटी ला ओव्हरटेक करून जाते तसे निघून गेले. आम्हांला जास्त घाई नव्हती त्यामुळे आम्ही आरामात चाल करत पुढे निघालो पुढील ५ ते १० मिनिटात ओढ्याच्या प्रवाहाने रांजण खळघे असलेल्या ठिकाणी आलो. 
ओढ्यातील रांजण खळगे 

दुर्ग किल्ला
पोटभर पाणी आणि सुखा खाऊन थोडा आराम केला घड्याळाचा काटा १ वर आला तसा तिथून पुढे निघालो आता वाट ओढ्याच्या उजवीकडून चढणीला लागली होती त्या दाट जंगलावरून मला वासोट्याची आठवण झाली भर उन्ह असताना हि इथे ऐसी मध्ये आल्यासारखं वाटत होत. वाट ओढ्यातून पार उजवीकडे वळत एका उजाड माळावर आली गावातील मंडीळीने सांगितल्याप्रमाणे त्या उजाड माळावरील डावीकडची वाट धरली आणि पुढील १० मिनिटात एक छोटासा जंगल टप्पा पार करून पुढे येताच तसे आम्ही खुश कारण ढाकोबाच्या मंदिराने दर्शन दिले. तसे मंदिर हि साध्या बांधणीतले मंदिरापाशी दीपमाळ, नंदी, दगडी रांजण असे पाहण्यासारखे खूप काही ढाकोबाच्या मंदिराजवळील परिसरात आहे. 
ढाकोबा मंदिर परिसर

ढाकोबा   
 स्वच्छ पाण्याने भरलेली विहिर
डावीकड़े स्वछ पाण्यानी भरलेली विहीर थोडे फ्रेश होऊन मंदिरापाशी परत येणार तेच आमच्या पुढे गेलेल्या गावकऱ्यांनी देवासाठी मस्त खिरीचा नेवैद्य बनवला होता त्यांनी आम्हांला हि नेवैद्य घेण्यास सांगितले. गावकर्यांनी दिलेल्या नेवैद्य वर मस्त ताव मारून थोडा आराम केला त्या शांत वार्तावरणात कधी डोळा लागला कळलंच नाही. 
खिरीचा नेवैद्य 
गावकरी परत जायला निघाले नशीब त्यांनी उठवलं पाहतो तर घड्याळात ३ वाजले होते लगेच सर्व आवरून दारा घाटाकडे निघालो असताना. आंबोली गावातील काका बोलले चला मी तिकडेच जातोय तुम्हांला वाटेला लावून देतो. मनात बोललो देव पावला चला म्हणजे पुढची वाट लवकर पार करता येईल वाट जंगलात न घुसता मोकळया पठारावरून जाते. पुढील वाट एका दरीच्या ठिकाणी आली इथून दोन वाटा फुटतात उजवीकडे आंबोली गावाकडे जाणारी तर दुसरी ढाकोबा किल्ल्यावर जाणारी दादांनी सांगितलं कि थोडं पुढे गेल्यावर एक वाट डावीकडे वळते ती ढाकोबा किल्यावर जाते तर दुसरी सरळ जाणारी दाऱ्याघाटाच्या खिंडीत लागलीच दादांना निरोप देऊन वाटेला लागलो.ढाकोबा किल्याची डावीकडील वाट सोडून सरळ वाट पकडली कारवीच्या जंगलातून बाहेर येतो तेच समोर सह्याद्रीचं अनोखं रूपच पाहायला भेटलं जणू नाणेघाट ते जीवधन वर डोक्यावर ढाकोबा पाठी आंबोली गाव खाली सिंगापूर पळू गाव एखाद्या चित्रकाराने जणू काही चित्रंच रेखाटलेलं जणू असं भासत होत.
आंबोली गाव   

दाऱ्या घाट

नाणेघाट जीवधन परिसर 
भन्नाट वारा पिऊन तिथून कसेतरी खाली दारा घाटाच्या खिंडीत आलो खिंडीत ३ वाटा आलेल्या पहिली जी आम्ही काही वेगवेगळ्या उचापाती करून ढाकोबा कडून आलो ती दुसरी आंबोली गावातून आली आणि तिसरी दऱ्या घाटाची या खिंडीत भैरव देवाचं ठाणं आहे. भैरव देवाच्या पुढ्यात माथा टेकून पुढील घाटवाटेला लागलो दऱ्या घाटाच्या बाबतीत लिहायचं झालं तर नाणेघाट सारखा राजमार्ग या घाटातून पूर्वी बैलगाडी किंवा जाड सामानाची ये जा या घाटवाटेवरून केली जात असे. 
भैरवदेवाचं ठाणं

कातळातील उजवीकडील वाट
 दाऱ्या घाट
उजव्या बाजूला असणाऱ्या कातळाच्या बेचक्यातून एक छोटीशी पायवाट खाली हळूहळू कोकणात उतरताना दिसत होती आम्ही तिच्याकडे वळलो हि वाट वळसा मारून खाली मोठं मोठ्याला शिळांन मध्ये आली. मग एक दगडावरून दुसऱ्या दगडांवर दुसया वरून तिसऱ्या असं करत त्या जंगलाची शांतात अनुभवत खाली उतरत होतो दाट रान, उंच पहाड, भर्राट रानवारा, पक्षांचा किलबिलाट यात आपण हरवून गेलो होतो या वाटांनाही काही एक अर्थ असतो, हे आपल्याला इथं जाणवून जातं. बरीचशी उतराई केल्यानंतर दगडावरून उड्या मारून विश्रामच्या पाय हळूहळू लागले मग एक झऱ्याजवळ छोटा ब्रेक घेऊन पुढे निघालो तेव्हा ५:३० वाजले होते. 
मोठमोठाल्या शिळा

  दाऱ्या घाट

दाऱ्या घाटातील झरा  
पळू गावाकडील वाट पकडून गावात आलो आम्हांला रामपूर जाण्यासाठी काही वाहन भेटेल का याची चौकशी करत असताना एक बाईकवाला दादा धसई ला जात होता लागलीच त्यांच्या बाईक वर ट्रिपल सीट बसून २० मिनिटात धसई गाठले. त्या दादानेच रामपूर मध्ये जाणाऱ्या दुसऱ्या बाईकवाल्या दादाला थांबवून विश्रामला रामपूरला सोडायला सांगतिले.  
पळू गावाकडे

दाऱ्या घाटाचे दर्शन 
मी धसई मधेच थांबून विश्राम वाट पाहू लागलो तब्बल १ तासाने साहेब आले आणि संध्याकाळी ८ ला घरच्या दिशेने बाईक सुसाट सोडली आम्हां दोघानांही वाटलं नव्हतं कि एकादिवसात आम्ही एवढी चाल करू शकतो वेळेवर भेटलेल्या गावकऱ्यांच्या मदतीमुळे हा ट्रेक पूर्ण झाला.

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...