रात्री स्वारगेट येथून कात्रज घाटाकडे पीएमटीने निघावे.
*कात्रज ते सिंहगड हा मूनलाईट ट्रेक म्हणजे भटक्यांसाठी पर्वणीच! पौर्णिमेच्या दरम्यान चंद्रप्रकाशात अनेक टेकड्या चढउतार करत १५ किलोमीटर चालण्याचा अनुभवघेवू शकता. रात्री डोंगरावरून दिसणारी पुणे शहराची रोषणाई पाहायची; काळोखात, एकांतात, निरव शांततेत अचानक कानावर पडणारे निशाचरांचे निरनिराळे आवाज ऐकायचे; एक-एक टेकडी चढउतार करत निसर्गाचा आनंद घ्यायचा; अध्येमध्ये पठारावर पाठ टेकून रात्रनभाची टेहळणी करायची; असा हा अभूतपूर्व आनंद देणारा भन्नाट ट्रेक कायम स्मरणात राहतो.*
*सोबत काय घ्याल?*
- हेड टॉर्च
- प्रत्येकी 3 लिटर पाणी
- काठी
- चांगले ट्रेकिंग शूज व ट्रेकिंग बॅग
- थंडीसाठी जरकीन/स्वेटर
-जरी जेवण करून आला असाल तरी, सोबत फळे, ड्रायफ्रूट, बिस्कीट हे बरोबर ठेवा, कारण भुक लागतेच
टीप: जर तुम्ही पूर्णपणे फिट असाल तरच या ट्रेक करावा. हा ट्रेक दमछाक करणारा आहे, पण आनंद देणाराही आहे, त्यामुळे आपली शारीरिक क्षमता बघूनच या ट्रेक करावा.
ट्रेकिंगच्या विश्वात काही
स्थळांभोवतीच्या वाटा या रात्री उमलतात. पुण्यातील कात्रज ते सिंहगड ही वाट
अशीच, भटक्यांच्या पावलांना जागवणारी. पौर्णिमेचा चंद्र गाठून या वाटेवर
नित्य ये-जा करणारे अनेक भटके आहेत. या कात्रज-सिंहगड वाटेवरचेच हे
रात्रीचे भ्रमण..
मी आत्तापर्यंत पन्हाळा ते विशाळगड
हरिश्चंद्रगड, रायगड प्रदक्षिणा, राजगड प्रदक्षिणा असे काही ट्रेक केले
आहेत. परंतु रात्रीचे गिर्यारोहण किंवा चालणे झाले नव्हते. याच दरम्यान
शिवशौर्य संस्थेच्या ‘कात्रज ते सिंहगड नाईट ट्रेक’चे समजले आणि जाण्याचे
ठरवले. रात्रीचे चालणे आणि रस्त्यात एकही गाव नसल्यामुळे भरपूर पाणी,
टॉर्च, हेड टार्च, नीकॅप, इलेक्ट्रॉल, ग्लुकोज अशी जय्यत तयारी करून आम्ही
या डोंगरवाटेवर निघालो.
दुपारी १२ वाजता आम्ही एकंदर चोवीसजणांनी मुंबई
सोडली. पुढे पुणे, नाशिक, अलिबागहून आलेले आणखी वीसजण आमच्यात सामील झाले.
आम्ही जुन्या पुणे-सातारा रस्त्याने कात्रजचा जुना बोगदा जिथे संपतो तिथे
उतरलो. इथूनच या ट्रेकला सुरुवात होते. डोंगरधारेवरची ही वाट. झाडीतली.
यामध्ये एकंदर तेरा टेकडय़ा आम्हाला चढायच्या-उतरावयाच्या होत्या. तर यातील
चौदावी टेकडी ही प्रत्यक्ष सिंहगड डोंगर होती.
आम्ही पहिली टेकडी चढून
पठारावर आलो तेव्हा आमच्या नेत्याने सांगितले की, कोणाला परत फिरावयाचे तर
आताच परत जा खाली बस उभी आहे. नंतर पुढे काही पर्याय नाही, पण जसे
सिंहगडावर स्वारी करून गेल्यावर सूर्याजी मालुसरे म्हणाले होते, ‘सर्व दोर
कापले आहेत. तेव्हा आता उडी मारून किंवा लढून मरा!’ तसेच आम्हाला वाटले. पण
आमच्यातील कुणीही माघारी न फिरता या तंगडतोड ट्रेकवर आपली पावले टाकली.
त्यादिवशी
फाल्गुन शुद्ध प्रतिपदा असल्यामुळे चांदणे छान पडले होते, पण फाल्गुनातील
रात्र असल्यामुळे चांदोबामामा उशिरा वर येणार होता. दाट काळोख.. अंगाला गार
वारा झोंबू लागला. चालायला सुरुवात केली. एखादी टेकडी चढणे सोपे होते
परंतु उतरणे खूपच कठीण जात होते. कारण उतारावरील माती सल व कोरडी
असल्यामुळे पाय रोवून उभे राहणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे चक्क घसरगुंडी
करून उतरायला सुरुवात केली. आमच्या लहानपणी काही घसरगुंडी वगरे खेळळी
नव्हते. हा आनंद आता या वयात घेतला.
टेकडी उतरल्यावर मध्ये पठारासारखा
भाग येई तेथे जरा वेग वाढे. परत पुढची चढण आली की तो मंदावे. आम्ही
हेडटॉर्च लावले असल्यामुळे दोन्ही हात रिकामे होते त्यामुळे टेकडी चढताना व
उतरताना हाताने आधार घेणे सोपे जात होते. होता होईतो दहा वाजता चांदोबा
दिसू लागला व त्याच्या प्रकाशामुळे आम्ही टॉर्च बंद करून टेकडीच्या पठारावर
चालू लागलो. गार वारा होता पण चालून एवढा घाम आला होता की थंडपणा जाणवत
नव्हता. चालता चालता पाच टेकडय़ा पार केल्या तेव्हा रात्रीचे साडेबारा वाजले
होते आता थोडा वेळा थांबायचे ठरले. बरोबर आणलेला डबा इथेच खाल्ला.
साधारण
पंधरा ते वीस मिनिटे विश्रांती घेतल्यावर पुन्हा पुढच्या चढाईला सुरुवात
केली. जास्त वेळ थांबलो असतो तर रात्रीच्या गार वाऱ्यात सर्वानाच झोप लागली
असती म्हणून लगेचच चालणे जरुरी होते. मजल दरमजल करीत पहाटे साडेतीनपर्यंत
अकरा टेकडय़ा पार करून झाल्या होता. आता फक्त तीन उरल्या होत्या. परंतु
त्याच टेकडय़ा उंच व दमछाक करणाऱ्या होत्या. त्यात उतारावरील माती सल
असल्यामुळे उभे राहून उतरणे शक्य नव्हते. त्यामुळे आमच्यापकी बहुतेकजणांनी
घसरगुंडीचा मार्ग पत्करला. असे करत करत तेरावी टेकडी पार केली आणि आम्ही
सिंहगडाच्या पक्क्य़ा वाटेला येऊन मिळालो.
आता गडावर जाण्यासाठी
डोंगरातून वा गाडी रस्त्याने असे दोन मार्ग होते. पण डोंगर चढायचे त्राण
कुणामध्येही उरलेले नसल्यामुळे बहुतेकांनी गाडी रस्त्याने जाण्याचा धोपट
मार्ग पसंत केला. अखेरची ही मजल-दरमजल करत गड माथ्यावर पोहोचलो. आता पहाट
उजाडली होती. बरोबर सकाळचे साडेसहा वाजले आणि आम्ही साऱ्यांनीच शिवाजी
महाराजांचा जय जयकार करत सिंहगडावर पाऊल टाकले. सिंहगडाच्या या दरवाजातून
मागे पाहताना रात्रभराचा तो सारा मार्ग आणि त्यावरील थरार डोळय़ांपुढे चमकून
गेला.
वसंत सहस्रबुद्धे
Katraj to Sinhgad Trek (K2S)
- Katraj to Sinhgad fort trek is about of 14 to 16 k.m with 14 hills.
- It takes about 8 hrs to 10 hrs to complete the trek.
- Mostly it is done in night time.
- Its not difficult trek to trek but you need highest stamina to complete it. You have to keep your stamina on for 8 to 10 hrs.
- Full moon nights from October to May are most popular season for the trek.
- Do warm up exercise before starting the trek and stretching after ending the trek.
- Avoid weak persons or beginners. Its not everyone's cup of tea.
- Take rest after regular intervals. Do stretching if you know it.
- Don't show up of your power initially, because trek gets difficult how we progress.
- There about 14 Hills on the trek which has risky descends. Ascending is easier but descending is difficult. Sit and get down if you fill unsafe. Don't be over confident.
- Because of over use of trails, lose soil and stones are found in the paths which makes the path slippery.
- Take rest if you feel. Don't compete or race with others.
- You will fully exhausted after 8/10 hills, so slower down your speed and complete the trek with great sense of en-devour, courage and patience.
- Wear full sleeve and grip shoes.
- Some plants a re thorny on the path. Some of those are height of your head and eye. their branches not clearly visible so your eyes, face, hand may get hurt.
- Carry torch or head lamp, although the full moon gives enough light, but somewhere you need better light.
- Follow the path where most of the people going. Don't take any short cuts.
- There is no facility of food or water on the trek.
- Carry tiffins and at least 4 ltrs of water per head. take light food. Do not eat too much. Keep dry food to eat after regular intervals.
- You will get food and water at the end point of trek i.e. Sinhgad parking.
- Take brush and paste to get fresh in morning.
I did this trek on 28th April 2018 at 10pm and finished it on 29th April 2018 7am with my students.. Pradeep Patil, Dinkar Pathwe, Nitin Kulkarni, Sainath Jagdale, Parshuram Bhangre, Hemant Patil, Sandip Jadhav, Srikar Surywanshi, Naresh Irphale, Khandu Dayal, Kumar Khunte, Sanjay Deshmukhe and Shrirang Gorse.




No comments:
Post a Comment