http://vivektavate.blogspot.com/search/label/%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%87
मातीचा जराही स्पर्श नाही की रस्त्याशी संबंध नाही... मोठमोठ्या दगडांमधून वाट काढत आणि त्यावरून उड्या मारत पुढे जायचं... सोबतीला उंच, उभाच्या उभा काळाकभिन्न कातळ... या कातळभिंतींची उंची इतकी आहे की सूर्यकिरण शेवटपर्यंत पोहोचू शकत नाहीत.
पनवेल - खोपोली मार्गावरुन जाताना दिसणारा हा ईरशाळ गड
ईरशाळला गड म्हणणे अयोग्य आहे, कारण ईरशाळ हा एक सुळका आहे.टेहाळणीसाठी या ठिकाणाच उपयोग केला असेल.
उन्हाळा सुरु होण्या अगोदर हा ट्रेक करुन या सिझनची सांगता करण्याचे ठरल्याने या सिझनचा शेवटचा ट्रेक ईरशाळला करण्याचे ठरले. ईरशाळला जाण्यास वाहतुकीची सोय असल्याने सोपे पडते.
ईरशाळला जाण्यास दोन मार्ग आहेत.पनवेल - खोपोली मार्गावर किंवा कर्जत - पनवेल या मार्गावर बसने प्रवास करीत चौक रेल्वेस्टेशनच्या स्थानकावर (डाक बंगला) उतरावे.रेल्वे मार्ग ओलांडून चौक गावात येता.समोरच मोरबे घरणाची भिंत दिसते.त्या जलाशयाच्या बाजुला गडावर जाण्याची वाट दिसते.
उन्हाळा वाढल्याने खूपच गरम होत होते.घामाच्या घारा सुरु झाल्या.सावळीला थांबून दम खात पुढाचा टप्पा गाठायचो.बाजुने इरशाळवाडीतील माणसे जात येत होती.
गडाच्या पाठीमागून चढण्याची वाट आहे. समोरुन उन्हाचा तडाका होता.पाठीमागे गेल्यावर सावली ळाल्यावर चढाईला वेगे आला.पाण्याच टाक लागते.लगेच पुढे लाकडी शिडी लागते.तेथेच विशाळादेवीचे छोटेसे मंदीर आहे.दर्शन घेऊन पुढच्या चढाईला लागलो.आता परीक्षा घेणारी चढाई होती.
इरशाळ ला नेड्यापर्यत जाणे सोयीचे आहे. नेढ्यातून समोर चढणारी वाट सुळक्यावर जाते. सुळक्यावर जाण्यासाठी प्रस्तारारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यकच आहे.या ठीकाणी अपघात झालेले आहेत.
गडावरील पाण्याच्या टाक्यांचे अत्सित्व पाहाता याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा असे वाटते.
गडमाथ्यावरून समोरच प्रबळगड, माथेरान,म्हैसमाळ, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो.
कितीही त्रास झाला तरी सर्व मित्रांसह केलेला ट्रेक आंनददायीच असतो.त्याची मजा वेगळीच असते.
अलिबागचा किल्ला पाहून उंदेरीकडे आलो. थळच्या सागरात दोन बलदंड सागरी दुर्ग उभे आहेत. खांदेरी आणि उंदेरी अशी त्यांची नावे.भरती
फार जोरात होती, लाटा उंदेरीच्या तटाला जोरदार धडका देत होत्या. तिथे
वस्ती नाही आणि बोट लावायला जागाही नाही. खडकांमुळे बोटवाला बोट जवळ
न्यायलाही राजी नव्हता.
बोट किना-याला लावायला धक्का नसल्याने बाजूने किल्ला पाहिला.बांधकामाचे अवशेष आहेत.त्यातील काही बांधकाम कोसळलेले आहेत.
समोरच्या उंदेरीला मागे टाकून खोल समुद्रात शिरलो आणि खांदेरी दिसू लागला. जवळूनही नजरेत मावेल एवढे आटोपशीर बेट, दक्षिणेला एक टेकाड आणि त्यावर एक दीपगृह. उंचसखल जमिनीवर बांधलेली मजबूत तटबंदी, आणि बाहेरच्या बाजूला तटबंदीचे समुद्रापासून रक्षण करण्यासाठी टाकलेले मोठमोठे दगडधोंडे. आत प्रवेश करण्यासाठी एक पुर्वाभिमुख छोटा धक्का. त्या छोट्या धक्क्याला बोट लावली.
उजव्या बाजुला असलेल्या वेताळाचे दर्शन घेतले. वेताळाचे कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असलेले देऊळ आहे. या देवळात मोठ्या माशांची हाडे जतन केलेली आहेत.नतंर दीपगृहाच्या छोट्या टेकाडावर चढून गेलो. मित्राने आणलेले मच्छीचे जेवण करुन दीपगृह पाहिले. या बेटावरचे हे दीपगृह १८६७ मध्ये पोर्तुगीजांनी बांधलेले आहे. खांदेरीचे एक अद्भुत वैशिष्ट्य अशा धातूचा आवाज येणाऱ्या खडकाच्या शोध घेतला.बराच वेळ दगड बडवल्यावर सर्वांचे समाधान झाले आणि दुर्गप्रदक्षिणा सुरू केली.
खांदेरीच्या तटबंदीवर गाडय़ावर ठेवलेल्या तोफा आहेत. तटबंदीला जागोजाग बुरुज आहेत. तटबंदीचे काम रचीव पद्धतीने केलेले असल्याने दोन चिर्याच्या मधे दर्जा भरलेला नाही. तसेच तटबंदीच्या बाहेरील अंगाला मोकळे चिरे टाकून दिले आहेत.खांदेरीच्या गडफेरीमधे वेताळ मंदिर, हनुमान मंदिर बुद्ध मंदिर, क्रॉस, पीर अशी अनेक श्रद्धास्थाने पहायला मिळतात.
सुधागडावरील पदभ्रमण
सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणाऱ्या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरी. अतिशय प्रशस्त असे पठार असलेला हा किल्ला एक प्राचीन किल्ला आहे.
अष्टविनायक बळालेश्वरांचे दर्शन घेऊन पाच्छापुरच्या पुढे डोंगरवाडीतून गड च्डह्ण्यास सुरुवात केली.उन वाढले होते.थोडे चढल्यावर दम लागु लागला. आता पाउस यावा असे वाटू लागले.आमचे पावसाणे जणू एकले आणि पाउसाने आम्हाला साथ देण्याचे ठरविले.
लोखंडी शिडीशिवाय गड चढणं जरा अवघडच आहे.
राजगडनंतर आणि रायगडापूर्वी सुधागड किल्ला राजधानी म्हणून महाराजांच्या विचाराधीन होता. पालीमधील सरसगडचा उल्लेख स्थानिक लोक सुधागड म्हणूनच करतात.
सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले.
या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. हा गड विस्ताराने फारच मोठा आहे.शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले.रायगड जिल्हयात पाली पासून जवळ आहे.
गडावरून दिसणारा ’ तैल बैला ’
भोराई मातेचं मंदिर
समोरच एक दीपमाळ दिसते आणि त्यावर एक हत्ती कोरला आहे त्याने आपल्या पाठीवर ती दीपमाळ धरून ठेवलेली आहे. अशी दीपमाळ मी पहिल्यांदाच पाहिली. मंदिरात प्रवेश केला,मंदिरात भली मोठी घंटा आहे. देवीच दर्शन घेतले.जागृत देव्स्थान आहे.नवरात्रात खुप मंडळी गडावर देवीच्या दर्शनास येतात.
अगदी रायगड सारखाच तसाच हुबेहूब महादरवाजा किल्ले सुधागडचा हि दिसून आला. आत शिरल्यावर तटबंदीची थोडी पडझड दिसून आली. महादरवाजाच्या वरती चढून आपोआप मुखातून एक शिवगर्जना झाली. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज कि. आणि बाकीच्या सर्वांनी जय असा मोठा आवाज केला.
हनुमानाचे मंदीर
वाटेत हनुमान मंदिर लागले. एका भल्या मोठ्या झाडाखाली एखादा तपस्वी भासावा असा हा मारुतीरायाचा अवतार. बाजूने पडझड झालेला कठडा, भिंती आणि मध्ये हि असणारी मारुती रायांची मूर्ती मनाला खूप शांती आणि चैतन्यदायी शक्ती देवून जाते.
गडावरील तलाव
सुधागड किल्ल्यावर असणारा पंत सचिवांचा सरकारवाडा हा इ.स. १७०५ साली बांधलेला आहे. चौसोपी आकाराच्या या मजबूत व भव्य वाड्याची अर्धीच बाजू राहिली होती. वाड्याला दोन दरवाजे असून ऐसपैस ओटा आहे. दोन बंद खोल्या आणि एक माडी आहे. पैकी एका खोलीत भांडी असून ती आपल्याला स्वयंपाक करण्यास उपयोगी ठरतात.
तानाजी टाके म्हणून एक तानाजी तलाव लागलं. एका भल्या मोठ्या पाषाणी दगडात कोरलेल्या/खोदलेल्या या तलावातले थंड पाणी प्राशन केलं. आणि विसावा घेतला एक नवल वाटलं हे बांधकाम कौशल्य पाहून काय योजना असेल हा किल्ला बांधताना एका दगडात तलाव खोदने हे काय साधेसुदे काम नाहीय.
पंत सचिवांचा वाड्याच्या बाजुला एका छोट्या घरात, वाड्याची देखभाल करणारी मामी राहते. ही वयस्क असली तरी पूर्ण वाड्यात शेण सारावण्याचे आणि वाडा स्वच्छ ठेवण्याचे काम करते. येणाऱ्या दुर्गाप्रेमिनी हा वाडा साफ ठेवणे अध्यारुतच आहे.
टकमक टोक, शिव मंदिर, बांधीव टाकी, पूर्वेकडील बुरुज, गोमुख असलेलेर टोक, विशाल कोठारे संपूर्ण सुधागड एक परिपूर्णतेच प्रतिक वाटतो. सपाट पठार व त्यावरील असणारी तलाव हे पाहून निसर्गाच एक वरदान त्या दुर्ग दुर्गेश्वाराला लाभलेलं दिसून आलं.
गडावरचे सोबती.
गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण म्हणूनच याचे नाव 'गोरखगड'. मोठा सुळका गोरखगड आणि छोटा मच्छिंद्रगड
गोरखगड आणि मच्छिद्रगडाला तसा ऐतिहासिक वारसा नसला तरी त्यांच्या सुळक्यांमुळे प्रस्तरारोहकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहे.
समोर गुहा दिसते. ही गुहा मोठी आहे. पण खालचा भाग खूपच ओबडधोबड आहे. तरी यात २० जण सहज मावतील. गुहेसमोर छोटासा अंगण असावा असा भाग आहे. पण तो भाग तसा खूपच छोटा आहे. इथून थोडा पुढे गेला की चांगल्या पाण्याची टाकी आहेत. खूपच अप्रतिम, गारेगार आणि चविष्ट पाणी या टाक्यात असते.
गडाचा माथा फारच लहान आहे.वर एक महादेवाचे मंदिर आहे आणि समोरच एक नंदी आहे.
माथ्यावरून समोर मच्छिद्रगड, सिध्दगड, नाणेघाटाजवळील जीवधन, आहुपेघाट असा सर्व रमणीय परिसर न्याहाळता येतो.
रॉक पॅचवरून एकएक पाऊल, एकएक पायरी खाली उतरणं जास्त आव्हानात्मक आहे.
दुपारच्या उन्हात गडावरुन उतरताना हात भाजत होते.दगडावर हाताला चटके बसत होते.
मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी, निवा-याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे.
गोरखगडाची किंवा एकूणच सह्याद्रीतल्या सगळ्याच किल्ल्यांची,डोंगररांगांची वेगळीच मज्जा आहे.
गोड आठवणी घेऊन गडावरून सावकाश उतरत थरारक ट्रेक संपला.
नागेश्वराची गुहा ही राहण्यासाठी उत्तम जागा आहे. येथे २० ते २५ जण आरामात राहू शकतात.नागेश्वराच्या गुहेकडे जातांना, पायर्य़ांच्या उजवीकडून जंगलात जाणारी वाट पाण्याच्या विहीरीपाशी घेऊन जाते.
नागेश्वरला भेट दिल्याशिवाय वासोट्याची भेट पूर्ण होऊच शकत नाही. वासोट्यावर जाताना समोरच एक सुळका आपले लक्ष वेधून घेतो, त्यालाच नागेश्वर म्हणतात. या सुळक्याच्या पोटात एक गुहा असून, तेथे महादेवाचे मंदिर आहे.
गुहा गाठली.. बर्यापैंकी मोठी.. फरशी घालून कठडा बांधलेला.. तिथेच मध्यभागी महादेवाचे मंदीर.. वरतून कातळाच्या छतातून झिरपणार्या पाण्याचे नेमके पिंडीवर अभिषेक करणारे थेंब.. बाजूलाच त्रिशूळ.. नि समोरच असलेल्या नंदीच्या पाषाणातील तुटलेल्या अवस्थेतील दोन तीन मुर्त्या आहेत.
गुहेतून पाहिलेला सुर्यास्त
गुहेतून पाहिलेला सुर्योदय
गुहेकडून चोरवणे जाण्य़ाची तयारी
उभी उतरण असल्याने सावधानता बाळगावी लागते.
चोरवण्याच्या दिशेने दिसणारी नागेश्वराची गुहा.
दोन दिवसाचा ट्रेकची मजा घेत आम्ही घरी फिरलो. पुढेची ट्रेकची आखणी करीत.
‘वासोटा’ ट्रेक करायचा असेल तर इथेच वनखात्याकडून रितसर परावनगी घ्यावी लागते
बजरंगाचे छप्पर नसलेले देउळ आहे.. पण मुर्ती छान आहे..
माचीवरुन घनदाट जंगल, कासचं पठार, कोयनेचा विस्तीर्ण जलाशय, महिपतगड, महिमंडनगड, पालगड व सुमारगडाचं विहंगम दृश्य नजरेस पडते.
तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर.
कानदखोऱ्यात हा गड आहे. खूप उंच उंच उंच. तोरण्याइतका उंच गड तोरणाच. डोंगरी किल्ल्यांत त्याचे स्थान वडीलपणाचे. तोरणा जसा उंच तसाच रुंदही आहे. गाडला दोन माच्या आहेत
छत्रपती शिवरायांनी सुरुवातीच्या कालखंडात जिंकलेल्या किल्ल्यापैकी तोरणा किल्ला आहे.
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी निवडक मावळ्यांसह तोरणा किल्ला जिंकून छत्रपतींनी स्वराज्याचे
तोरण उभारले होते.
बिनीव्दार
बाजुचा परिसर पाहण्यात गुंतलो.थोडी विश्रांती घेतल्यानतंर उभी चढाई करीत 'बिनी दरवाजा' शिरलो.
कोठीव्दार
बिनी दरवाजा आणि त्यापाठोपाठच्या कोठी दरवाजातून आपण थेट बालेकिल्ल्यातच शिरतो.
हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुनहा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स.1470 ते 1486 च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात 5 हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स.1704 मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करू न आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.
झुंजार माची
झुंजार माची खरोखरच झुंजार आहे. भक्कम तट आणि खाली खोल खोल कडे आहेत. महाराष्ट्रातल्या अत्यंत बळकट व अत्यंत बिकट किल्ल्यांच्या पंगतीत तोरणाचा मान पहिला .
हनुमान बुरुजाच्या तटावरुन खाली उतरुन दिंडीच्या दाराने झुंजार माचीकडे जाता येते.
तोरणाला बिलगून खालच्या बाजूस असणार्या डोंगराच्या सोंडेवर बांधलेली ही माची निव्वळ अप्रतिम.
झुंजार माचीकडे जाण्याकरिता येथून एक छोटीसी शिडी उतरवून जावे लागते. आणि पुढे एक rock patch आहे तो पार केला कि ( येथून जरा सांभाळून उतरावे लागते नाहीतर थेट खाली पडण्याची शक्यता ) आपण पोहोचतो झुंजार माची वर. झुंजार माचीचा बांधकाम नावाप्रमाणेच शोभून दिसतं. या रस्त्यावर सदरेचे उद्वस्त अवशेष आहेत.
झुंजार माचीवरून गडाचा गड राजगड रुबाबदार पणे उभा दिसला, अस वाटत होत की तो पण आम्हाला बोलवत आहे.
तोरणा वरचा सुर्यास्त
बाजुला बुधला माची
मेंगाई देवीचे मंदीर
बुधला माचीच्या मध्यभागी एक डोंगराचा सुळका उभा आहे व त्या वर एक प्रचंड आकाराचा दगड अनेक शतकांपासून आजही आहे. त्यामुळे तो लांबून एखादया तेलाच्या बुधल्या सारखा म्हणजे रांजणासारखा दिसतो. म्हणून या चिंचोळ्या माचीला बुधला माची म्हणतात.
बुधला माची
बुधला माचीकडचा परिसर बघायचा होता... या माचीकडे जाणार्या वाटेने कोकण दरवाज्यापाशी आलो नि थांबलोच.. इथून तोरणाची एक महत्त्वाची नि वैशिष्ट्यपुर्ण असलेली बुधला माची संपुर्णपणे नजरेत भरत होती.
हा तोरणा अत्यंत बळकट, बिकट गड आहे. काळेकभिन्न, ताठ भिंतीसारखे कडे, अत्यंत अरुंद वाटा, भक्कम दरवाजे, काळ्या सापासारखी वळणे घेत सळसळत जाणारी तटबंदी, अचूक मारा साधणारे बुरुज आणि गडाच्या सर्वोच्च माथ्यावर बालेकिल्ला असे तोरणाचे रांगडे सौंदर्य शिवरायांच्या नजरेत भरले.
कोकण दरवाजा
बुधला माचीला मागे ठेवून खाली उतरण्यास लागलो.
तोरणा किल्ल्याचा नकाशा
तोरणाच्या या कड्यावरून नजरेत दिसतो 'तोरणा-राजगड' या ट्रेकचा मार्ग. बुधला माचीपासून डोंगरांची रांग सुरु होते ती थेट राजगडच्या संजीवनी माचीपर्यंत.एक एक डोंगर पार करीत संजीवनी माचीपर्यत पोहचतो.
दुस्र-याच्या आनंदासाठी आपला आंनद पणाला लावण्याची धडाडी दाखवणा-या आमच्या मित्राना माझा सलाम. ही शोध मोहिम हाती घेणारे मित्र आमचे हीरो ठरले होते.
शिवरायांनी स्थापन केलेल्या राज्याचा गड म्हणजे, किल्ले राजगड
अभेद्यतेचे दुसरे रुप असलेला बालेकिल्ला, चिलखती तटबंदीचे बांधकाम, नेढे अशी वैशिष्ट्ये बाळगणारा एकमेव गड म्हणजे राजगड ! राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले राजकीय केंद्र.
या गडाला उत्तरेस पद्मावती, आग्नेयीस सुवेळा आणि नैर्ॠत्येस संजीवनी अशा तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. याचा तट व बुरूज अनेक ठिकाणी दुहेरी म्हणजे चिलखती आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले राजकीय केंद्र.
राजगडाचे रूप कायम चिरतरुण, लोभस असे. कुठल्याही ऋतूत पाहावे असे. त्याच्या पहिल्या दर्शनातच तो प्रेमात पाडतो.
मावळ खोर्यावर करडी नजर ठेवता येण्यासारख्या जागी असलेला. २६ वर्षे मराठी राज्याची राजधानी असलेला गड. राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली. स्वराज्याची ती राजधानी आपल्या शिवबाजी , इथल्या रयतेची राजधानी, त्या राजधानीत जिथे आपल्या राजाचं २५ वर्ष वास्तव्य होतं , जिथे अनेक सुख दुखाचे प्रसंग स्वतहा ह्या किल्ल्याने पहिले , इथल्या मातीने अनुभवले , इथली प्रत्येक वास्तू त्याची साक्ष देत अजूनही खंबीरपणे उभी आहे , ते पाहूनच उर भरून येतो .
बालेकिल्ल्याच ते रांगड रूप
राजगडाचा बालेकिल्ला जणू किल्ल्यावर किल्ला असल्यासारखा आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. इथेही थोडा शारिरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो.हा बालेकिल्ला चढायला जेवढा अवघड तेवढीच काळजी तो उतरताना घ्यावी लागते अन्यथा केव्हा तुम्ही खाली याल हे कळणार पण नाही .. तीच काळजी घेत घेत आम्ही बालेकिल्ला उतरायला सुरुवात केली.
पद्मावती माचीवर बऱ्यापैकी सपाटी असल्याने शिवकाळात इथे मोठी वहिवाट होती. राजांचा राहता वाडा, हवालदार-किल्लेदाराचे वाडे, शिबंदीची घरे, रत्नशाळा, सदर, पद्मावती-रामेश्वराचे मंदिर, सईबाईंची समाधी, पद्मावती तलाव व अन्य तळी, धान्याची- दारूगोळय़ाची कोठारे, चोरदिंडी, गुंजण दरवाजा या साऱ्यांमधून ही माची बराच इतिहास सांगते.
राजगड अन तोरणागड (प्रचंडगड)………. शिवशाहीतली दोन बलदंड-प्रचंड पुराणपुरुष………
एकानं महाराजांनी उधळलेल्या "स्वराज्याच्या" भंडाऱ्यानं स्वतःचं मळवट पहिल्यांदा भरून घेण्याचा मान
मिळवला……. पोटात लपवलेला खजिना स्वराज्यासाठी राजांच्या पायी रिता केला…… तर दुसऱ्याने पंचवीस वर्ष राजांना निर्धारानं पोलादी पंखाखाली घेतलं…… स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून मरातब मिळवला…….या दोन पुराणपुरुषांचं एकमेकांशी काहीतरी नातं नक्की असणार…… सुवेळा-झुंझार,बुधला-संजीवनी ह्याची नाळ नक्की एकचं असणार……. मेंगाई-पद्मावती नक्कीच बहिणी-बहिणी असणार…… त्याशिवाय काय गेली शेकडो वर्ष झाली सूर्योदयाला राजगडाची सावली प्रचंडगडाच्या भेटीला दौड मारते तर सूर्यास्तावेळी तोरणागडाची सावली राजगडाच्या गळाभेटीला येते.
सुवेळाचा लयबद्ध आविष्कार, उजवीकडचे भाटघर धरणाचे पात्र, नुकतीच उठू पाहणारी छोटी खेडी, धुक्यात उलगडत जाणाऱ्या सहय़ाद्रीच्या रांगा आणि या साऱ्या चित्रावर आपली पावले उमटवत निघालेली पूर्वा!
सुवेळाच्या मधोमध एक कातळ उभा ठाकला आहे. समोरून त्याचा आकार एखाद्या हत्तीसारखा वाटतो. या कातळाच्या पोटात शे-पन्नास माणूस बसू शकेल असे आरपार पडलेले छिद्र आहे. या भौगोलिक आविष्कारास कोणी 'नेढे' म्हणतात.
मुंबईच्या उत्तरेस गुजरातकडे जातांना ठाणे जिल्ह्याचा पालघर हा विभाग लागतो. या परिसरात अनेक लहान मोठे गडकिल्ले अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. यापैकी वाडा पालघर रस्त्यावरचा 'कोहोज ' हा प्रमुख किल्ला.
महाराष्ट्रात घडवण्यासाठी किती लढले किती धारातिर्थी पडले, कितींनी आपले प्राण गमावले याला गणती नाही. अशा या महाराष्ट्राचा इतिहास आजही काही गड कोटांमध्ये दडलेला आहे. असे अनेक गड किल्ले आपल्यासारख्या भटक्यांची वाट पाहत आहे. ज्याप्रमाणे इतिहासाला कित्येक मावळे, कित्येक गुप्तहेर माहीत नाहीत, त्याचप्रमाणे कित्येक किल्ल्यांबद्दलचा इतिहास सांगता येत नाही. त्यापैकीच एक किल्ला आहे ठाणे जिल्ल्ह्यातील कोहोज नावाचा गड होय.
हा गड म्हणजे भोज राजाची निर्मिती आहे असे अनेक अभ्यासकांचे मत आहे पण ठोस पुरावा मात्र कोणाकडेच नाही. गुजरातच्या राजा कडून हा गड पोर्तुगिजानी जिंकला त्यानी ह्या किल्लाला तट व बुरुज उभारून तो बळकट केला. पुढे १८ व्य शतकात पोर्तुगीज अणि मराठे युध्दात हा किल्ला पेशव्यानी जिंकला. त्या नंतर इत्तर किल्ल्या प्रमाणे हां ही किल्ला इंग्रजांनी बळकावला.
मुबंई व ठाण्याहून अकरा जण, दोधे कल्याण हून तर चौघे भांयधर हून वाड्याला भेटलो तेथून नाणे गांवात पोहचलो.
समुदसपाटीपासून १९०० फूट उंच उंचावर हा किल्ला आहे. गडावर जाण्यासाठी वाडा तालुक्याहून थेट गडाच्या पायथ्याशी असलेल्या नाणे गावापर्यंत एसटीनं जाता येतं. गडावर दक्षिणोत्तर प्रवेशद्वार भग्नावस्थेत आहे, तर गडाचे अनेक बुरूज आणि तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहेत.
गडावर कुसुमेश्वराचं मंदिर आहे. मंदिराजवळ दोन पाण्याच्या टाक्या आहेत. थोडं पुढे गेल्यावर एक गुहेसारखं तळघर आहे. या गुहेत पाकोळ्यांची वस्ती असल्यानं आत शिरताच उग्र वास आणि पंखांचा फडफडाट ऐकायला येतो.
गडावर जाण्यासाठी असलेली वाट बरीच वेडीवाकडी आहे. वाटेत अनेक पर्णझाडी वृक्षांचं जंगल आहे. मुंबईपासून जवळ असल्यानं अनेक गिरीमित्र सुट्टीत इथं येताना दिसतात. गडावर पाण्याची चांगली सोय आहे.
कोहोज किल्लाचे मुख्य आकर्षण म्हणजे निसर्गनिर्मित मानवी आकाराचा सुळखा, मात्र काही विकृत लोकानी त्या सुळक्याच्या तोंडा पर्यंत जाउन नावे लिहिण्याचा गलिछ्य प्रकार केला आहे.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या नाणे गावामध्ये समोरच्या चौकात चौथ-यावर ठेवलेली तोफ आपलं स्वागत करते.
गड माथ्यावर गेल्यावर कुसुमेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूने ढाले किल्ल्यावर जाता येतं. वाटेतून वर जाताना मारूतीचं मंदिर दिसतं आणि खडकात खोदलेली पाण्याची कुंडं आपलं लक्ष वेधून घेतात.
काही पर्यटकांनी इथल्या पुरातन वास्तुंवर स्वत:ची नावं लिहून त्याचं सौंदर्य नष्ट केलं आहे. गडाच्या सर्वात वरच्या ठाण्यात एक अष्म रूपातील मानवी शिळा आपलं लक्ष वेधून घेते. त्यामुळे गडावरून कोणी पहारेकरी टेहळणी करत असल्याचा भास होतो.
शंकराचे मंदिर
गडाच्या वाटेवर असताना मध्येच इस्काँनचे भक्तगण भेटले. विचारपूस केल्यावर त्याच्यासह त्याच्या भक्तीगीतावरच्या नाचात आम्ही सहभागी झालो.
गडावर पाण्याची उत्तम सोय असल्यानं इथं तंबू ठोकून राहता येतं. गडावरील वस्तूंचे भग्नावशेष पाहून त्याचं भूतकाळातील वैभव आपल्या लक्षात येतं.
सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्र्वर दरम्यानच्या महादेव डोंगररांगांच्या एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे.केळंजा व मोहनगड ही केंजळगडाचीच उपनावे आहेत.
उघड्यावर असलेल्या देवीच्या मुर्त्त्या
एक चुन्याचा घाणा
छप्पर नसलेल्या या देवळात केंजाई देवीची मूर्ती
गडमाथ्यावर सर्व बाजूला असलेल्या छातीपर्यंत वाढलेल्या गवतामुळे ही बांधकामे शोधणे कठीण होऊन बसते.
या दुर्गानीच औरंगजेबाला २६ वर्ष कडवी झुंज दिली.ह्यांच्याच आश्रयाने मराठे लढले.
एका इंग्रजाने केंजळगडाबाबत लिहिले आहे.
'जरा हा किल्ला दृढनिश्चयाने लढवला,तर तो जिंकणे फार अवघड आहे.'
अमोघ सौंदर्याने नटलेला केंजळगड हा ट्रेकिंगसाठी आकर्षक ठिकाण ठरतो
दारूचे कोठार
केंजळगड हा काही फार नामांकित दुर्ग नव्हे.तो विस्तारानेही विशाल नाही.मात्र,त्याची जागा दोन नद्यांच्या खोरयातील एका पर्वतराजीवर आहे.पलीकडे आहे कृष्णेचे खोरे,तर अलीकडे निरेचे.पलीकडे धोम येथे कृष्णेवर धरण आहे , तर अलीकडे निरेवर देवघर येथे धरण आहे
केंजळगडाचा नकाशा
रोहिड्या हुन नाझरे गावात उतरलो.तसेच पुढे आंबवडे गावात पोहचलो.तेथे नागेश्वराचे मंदीरात जेवण केले.नागेश्वर मंदिराचा परीसर निर्सगरम्य फारच सुंदर आहे.जुना पुरातन झुलता पुल पाहिला.तेथून एसटी बसने कोर्ले गाव गाठले.चहापाणी करून चढाई सुरु केली.उन्हे चढल्याने त्रास जाणवत होता.निलगीरी झाडाची सावली मिळत होती.
सृष्टीच्या नानाविध रूपांचे प्रत्यंतर देणारा निसर्गरम्य रायरेश्वरगड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे.
पाचगणीचे टेबललॅन्ड सर्वांनाच माहितच असते मात्र त्याच्यापेक्षाही उंच आणि लांब असे टेबललॅन्ड म्हणजे रायरीचे पठार.
दाट झाडी, खोल दर्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट. यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.
शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली ती याच रायरेश्र्वराच्या डोंगरावर.
रायरेश्र्वरावर शंभुमहादेवाचे मंदिर
वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. हिंदवी स्वराज्यासाठी मूठभर मावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले
रायरेश्वरसह्याद्रीच्या कडेकपारी, शिवमंदिर एक ।
तिथे रायरेश्वर स्वयंभू शिवलिंग सुरेख ।।
आणाभाका झाल्या आमुच्या, त्याच्या साक्षीने ।
एकजुटीने राहून कोणा अंतर न देणे ।।
देशासाठी, धर्मासाठी झोकून देऊ उडी ।
मावळे आम्ही शिवबाचे सवंगडी ।।
.खिस्ताब्द १६७४ मध्ये त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि हिंदु धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले.बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. सिंहाची छाती असणार्या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची आण घेतली.
सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छ. शिवाजी महाराजांनी २६ एप्रिल १६४५ या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली.
शनिवारी २६ जनेवारीला आम्ही गावातल्या शाळेतील झेंडावदन कार्यक्रामात भाग घेतला.
भोरपासून ८ कि.मी. अंतरावर असणारे हे रायरीचे पठार पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांगः वाई - सातारा जिल्हा : पुणे
श्रेणी : सोपी किल्ल्याची उंची : ४०००फुट

रायरेश्वर येथे राहण्यासाठी व जेवणाची सोय
श्री.शंकर जंगम (९६८९६८८४९७ व ९७६३०१८२७९)
श्री.गोपाळ जंगम (९३७०७१७६३४)
यांच्याकडे होते.
काही वर्षापूर्वी पावसाळ्यात नानेघाटला गेलो होतो.नानेघाटला खुप वर्षानी जाण्याचा योग्य आला.कल्याण- मुरबाड करीत एसटीने (जुन्नर कडे जाणारी)प्रवास केला.मालशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या नानेघाट बसस्थानकावर उतरुन नानाच्या आगंठ्याच्या दिशेने निघालो.
नाणेघाट या नावावरूनच आपल्याला कल्पना येईल की हा घाट फारच पुरातन आहे. नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला. प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी. प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये परकीय लोक विशेषतः रोमन व्यापारी आपला माल घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत. हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई. या व्यापार्यांकडून जकात जमा केली जाई. त्या जकातीचा दगडी रांजण आजही येथे पहावयास मिळतो.
मजेत गप्पागोष्टी करीत दोन तासात गुहेत पोहचलो.
साठ मीटर लांब आणि जागोजागी दोन ते पाच मीटर रूंद अशी ही नाणेघाटाची नळी आहे. या नळीच्या मुखाशी एक दगडी रांजण आहे.
चार फूट व्यासाचा आणि पाच फूट उंचीचा हा रांजण पूर्वी जकातीसाठी वापरला जात असे. जकातकर रुपाने यात तत्कालीन 'कर्षापण' नावाची नाणी टाकली जात असत.
नाणेघाट चढून गेल्यावर प्रथम दर्शनी दृष्टिक्षेपात पडणारी कातळात कोरलेली ऐसपैस आणि सुंदर गुहा हेच येथील महत्वपूर्ण वैशिष्ट होय. या गुहेत साधारणतः ४०-४५ जण राहू शकतात.सध्या वापरण्यात येणा-या गुहेत तिन्ही भिंतीवर लेख आहेत. हा लेख एकूण २० ओळींचा असून मध्य भागातील भिंतीवर १० तर उजवीकडील भागावर दहा ओळी आहेत. हा लेख ब्राम्ही लिपीतला असून या लेखामध्ये अनेक अंकनिर्दिष्ठ संख्या आहेत.
गुहेच्या वर पाहिल्यावर एक प्रचंड कातळ भिंत दिसते, यालाच नानाचा अंगठा असे म्हणतात.घाटमाथ्यावर पोहचल्यावर,उजवीकडे वळल्यावर आपण नानाच्या अंगठावर येऊन पोहोचतो.
येथेच बाजूला एक गणेशाची मूर्तीही दृष्टिक्षेपात येते.
समोर दिसणारे गोरखगड, मच्छिद्रगड , सिध्दगड, हरिश्चंद्रगड, भैरवकडा, कोकणकडा आणि डावीकडे असणारा जीवधन आपले मन मोहून टाकतात.
घाटावरील विस्तीर्ण असे पठार हे नाणेघाटाचे आणखी एक वैशिष्ट म्हणून सांगता येईल.
दोन तीन वर्षानतंर एकदा तरी हा ट्रेक करण्यास योग्य आहे.
जव्हार ला गेल्यावर ' भुपतगडावर ' जाण्य़ाचा योग आला. जव्हार हे ठाणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. याच जव्हारच्या जवळ,एका दिवसात जाऊन पाहून येण्यासारखा किल्ला आहे.त्याचे नाव भूपतगड.
मुंबई जवळ असूनही या दुर्गम भागात सहज जावू याचा विचारही कुणी करू नये असा हा भूपत गड.रस्ता चांगला नाही.जव्हार येथून एसटी या गावात जाते.
रामसीता व लवकुश यांच्या पाउलखुणा
गडावर ज़ाण्याचा रस्ता :जव्हारपासून १७ कि.मी अंतरावर झाप नावाचे गाव आहे. येथे २ फाटे फुटतात ऊजवी कडचा रस्ता झाप गावात जातो आणि सरळ जाणारा रस्ता १ किमी अंतरावर चिंचवाडी गावात जातो. या फाट्यापासून १० मिनिटांवर चिंचवाडी आहे. चिंचवाडीतून कच्च्या रस्त्याने एक टेकाड पार केल्यावर आपण भूपतगडाच्या पायथ्याशी पोहोचतो.गडाचा चिंचवाडीतून गडाचा पायथा गाठण्यास अर्धा तास पुरतो. गडाच्या पायथ्यापासून गड डावीकडे ठेवत वाट तिरपी वर जाते. पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास सुमारे अर्धा तास लागतो.
भूपतगडावर आपला प्रवेश नष्ट झालेल्या दरवाज्याच्या अवशेषामधून होतो. गडाला उत्तरेकडे व दक्षिणेकडे असे एकूण दोन दरवाजे होते. आज हे दोन्ही दरवाजे नष्ट झालेले आढळतात. प्रवेशव्दारापाशी असणारे बुरुज कसेबसे तग धरुन उभे आहेत.
प्रवेशव्दारापाशी एक म्हसोबाची मूर्ती आहे. आत शिरल्यावर समोर हनुमानाची मूर्ती दिसते. गडमाथा बराच विस्तीर्ण आहे. माथ्यावर एका मोठ्या पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. या वाड्याच्या भिंती अजूनही काही ठिकाणी शिल्लक आहेत.
वाड्याच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा हौद आहे. गडाच्या ४ पाण्याची खोदीव टाकी दिसतात. या टाक्यांजवळच एक कोरडा तलाव आहे.
संपूर्ण गडमाथा फिरण्यास अर्धा तास लागतो. गडावरुन त्रिंगलवाडी, हरिहर, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा असा सर्व परिसर दिसतो.
हे गड दुर्ग आज पड झड झालेले आहेत . अंगावर असंख्य तलवारिंचे यांनी घाव झेलले आहेत . तोफांचा मारा यांनी सहन केला आहे . अनेक विरांच्या समिधा यासाठी अर्पण झाल्या आहेत चला तर मग, या मूक साक्षीदारांचे बोलविते होऊ, आपल्या पुढच्या पिढीस काही तरी ठेवा देवू. जेणेकरून ते इतिहासातुन काही तरी बोध घेतील,
भूपतगड हा छोटासा किल्ला पाहुन झाल्यावर, स्वतःचे वाहान असल्यास १) जव्हार मधील राजवाडा , २) हनुमान पॊइंट , ३) दाभोसा धबधबा , ४)शिर्पाचा माळ (सुरतेवर स्वारीला जातांना शिवाजी महाराजांच्या सैन्याने या माळावर मुक्काम केला होता. या ठिकाणी कमान उभारुन स्मारक बनविण्यात आले आहे.) इत्यादी ठिकाण पाहाता येतील.
गडावर जाण्य़ासाठी संपर्क श्री.संदिप कुरबुडे ८६९८६९७३६३ (गडाच्या पायथ्याचे गाव)
श्री गणेश म्हणजे विद्येची देवता. पाली हे अष्टविनायकांपैकी एक ठिकाणे.येथील गणपती'बल्लाळेश्र्वर' म्हणून ओळखला जातो. याच पाली गावाच्या सीमेला लागून उभा असणारा गड म्हणजे सरसगड. पाली गावात जाताच या गडाचे दर्शन होते.गडाचा आकार 'बल्लाळेश्र्वर'या गणपतीसारखा दिसतो.
पाली गावाच्या दक्षिणोत्तर सीमेवर सरसगडाची अजस्त्र भिंत उभी आहे.या गडाचा उपयोग मुख्यतः टेहळणीसाठी करत असत. या गडावरून पाली व जवळच्या संपूर्ण परिसरावर टेहळणी करता येते.
शिवाजी महाराजांनी या गडास आपल्या स्वराज्यादाखल करून घेतले आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी २००० होन मंजूर केले.
नवीन वर्षाच्या ट्रेकींगची सुरुवात गणेशाचे (बल्लाळेश्र्वर) दर्शनाने केली.सोळा जणानी "गणपती बाप्पा मोरया" व 'जय
भवानी जय शिवाजी'या धोषणा देत गड चढायला सुरुवात केली.
हवेत थंडी असल्याने गारवा होता. पटापट चढत गेलो.
गडावर जाण्यासाठी ९६ पाय-या चढावयास लागतात.पावसाळ्यात वाटा खुप निसरड्या असतात.गड छोटासा पण मस्त आहे.
पाली गावाहून दिंडी दरवाजापर्यंत जायला साधारण १ तास लागतो.
गडावर केदारेश्र्वराचे मंदिर आहे.महाशिवरात्रीला केदारेश्र्वराला भाविकांची गर्दी असते. येथे एक तलाव आहे. हळणीसाठी दोन बुरूज आहेत. मात्र या बालेकिल्ल्यावरून समोरच असणारा तीन कावडीचा डोंगर दिसतो.
समोरच उभा असणारा सुधागड, तैलबैला, धनगड आणि कोरीगड दिसतो. तसेच पालीगाव, अंबानदी, उन्हेरीची गरम पाण्याची कुंडे, कोकण, जांभुळपाडा असा सर्व परिसर दिसतो.
गडावर जाण्यासाठी मात्र 'दिंडी' दरवाजाची एकच वाट वापरात आहे. पाली गावात उतरून या दरवाज्याने गडावर जाता येते.
मंदिराच्या मागील बाजूस असणा-या डांबरी रस्त्यावरून डावीकडे वळावे आणि मळलेली वाट पकडावी. ही वाट सरळसोट असून आपणास थेट गडाच्या बुरुजापर्यंत आणून सोडते.
बुरुजाच्या पायथ्याशी एक खोली आहे. या खोलीचा उपयोग पहारेक-यांना रहाण्यासाठी होत असे.
पुढे दरवाज्यापर्यंत जाण्यासाठी ९६ पाय-या चढाव्या लागतात. या पाय-या जरा जपूनच चढाव्यात कारण पाय घसरला तर दरीत पडण्याचा धोका उद्भवतो.
पाय-यांची वाट फार दमछाक करणारी आहे. या पाय-या आपल्याला सरळ दरवाजापर्यंत आणून सोडतात. दरवाजाच्या समोरच पहारेक-यांच्या देवडया आहेत.
गडावर जाण्यासाठी अजून एक वाट असून ती वापरातील नसल्याने या वाटेचा उपयोग कोणी क
कळसूबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई या तीन बहीणी होत्या. या तीन बहीणींचे वास्तव्य या तीन डोंगरांवर होते.
नेढे म्हणजे डोंगराला असलेले आरपार भोक. रतनगड, मदनगड, राजगड, कन्हेरगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांना नेढे आहे. नेढय़ामधून दोन्ही बाजूचा प्रदेश दिसतो.
या नेढय़ातून भन्नाट वाहणार्या वार्याचा थरार अनुभवून आपण पुढे निघतो.
गडावरुन समोर भंडारदरा धरणाचा जलाशय,प्रवरा नदी,पाबरगड आणि महाराष्ट्रातील उंचीने दुसर्या क्रमांकचे पठार असलेले घनचक्करचे पठार उत्तम दिसते.
दोन डोगंराच्या मघुन कातळात कोरलेला त्रंबक दरवाजातुन कातळात कोरलेल्या पाय-या उतरत खाली उतरलो.
दोन दिवसापुर्वी त्रिपुरा पौर्णिमा झाल्यामुळे शुभ्रचांदणे पडल्याने गांवबाहेर फिरुन आलो.हवेत गारवा होता.
टाक्यांच्या
समोरच शंकराची पिंड आहे. श्रावण महिन्याचा पहिला दिवस असल्याने सर्वाना
पिंडीची पुजा केली.आरती केली.प्रसाद वाटला.मन प्रसन्न झाले. धुक्यात झालेली
हि वेग़ळीच पुजा लक्षात राहील.
मुंबई पुणे हमरस्त्यावरुन जातांना अनेक किल्ले आपल्याला दिसतात.प्रबळगड,इरशाळ,चंदेरी,माथेरान,कर्नाळा,लोहगड, विसापूर आणि यांच्या संगतीतच एक किल्ला आहे त्याचे नावं माणिकगङ. कर्नाळा,सांकशी,माणिकगड हे या रांगेतील तीन भाऊ.माणिकगडाच्या आजुबाजुचा सर्व प्रदेश सधन असला तरी येथील लोकांचे राहणीमान मात्र साधेच आहे.
उंची : २५०० फूट
प्रकार : गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी : मध्यम
ठिकाण : रायगड, महाराष्ट्र
जवळचे गाव : वडगाव
डोंगररांग : कर्जत पनवेल
माणिक गडाचा ट्रेक मजेशीर आहे.
पावासानतंरच्या पहिल्या 'माहुली गड' या ट्रेकला मोठी मागणी होती.सर्वानी होकार दिला.मोठी लिस्ट तयार झाली.
तरीपण एकामेकाच्या मदतीने उतरत होते.खाली आल्यावर काहीना धबधब्यावर जाण्याची इच्छा होती.पण उशिर झाल्याने सर्वाना घेउन खाजगी वाहनाने स्टेशन गाठले.ट्रेक मस्त व मजेशीर
पनवेलच्या
ईशान्येला मुंबई पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन - चार किलोमीटर
अंतरावर हा किल्ला आहे. माथेरानसारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या
माणसांच्या गर्दीपासून मोकळीक हवी असल्यास निसर्गप्रेमींनी पेबचा किल्ला
विसरू नये. एरवीदेखील एका दिवसाच्या ट्रेकसाठी व फक्त रेल्वेच्या प्रवासात
'पेब' सारखी जवळची आणि निसर्गरम्य जागा शोधून सापडणार नाही. किल्ला
चढण्यासाठी लागणारा वेळ ,चढण्याची वाट ,वरील गुहेची रचना ,गुहेसमोरील
निसर्गरम्य दृश्य अशा अनेक बाबतीत हा गड 'गोरखगडाशी' साधर्म्य
साधतो.पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे ओळखले जाते.
रिफ्रेश
होण्यासाठी आपल्या इतिहासाची साक्षीदार असलेली... आपल्या कोरीवपणानं अनेक
काळ मागं घेऊन जाणारी... भल्यामोठ्या कातळात कोरलेली लेणी पाहाणे हाही
अत्यंत सुंदर अनुभव आहे. विसापूरच्या पायथ्याशी भाजे लेणी जणू निवांतपणे
भटक्यांची, अभ्यासकांची वाट बघत असल्यासारख्या उभ्या आहेत.पन्नास एक
पायऱ्या पार करत वरती आल्यावर भाजेच्या लेण्यांतील मुख्य चैत्याच्यासमोर
आपण येतो. इ. स. पूर्व दुसरं ते पहिल्या शतकांत भाजे लेणीची बांधणी झाली.
मुख्य चैत्याचा दर्शनी भाग कोसळला असल्यानं तो उध्वस्त आहे. मात्र आतील
अष्टकोनी स्तंभ, त्यावरील कोरीव कामं आणि चैत्यग्रह प्रेक्षणीय आहेत. मुख्य
चैत्याच्या आतमध्ये द्वारपाल आणि ऐरावतारुढ इंद आणि सूर्य यांच्या प्रतिमा
लक्ष आकर्षून घेतात. मुख्य चैत्याच्या दोन्ही बाजूला बौद्ध विहार असून
सर्व चैत्य आणि विहार यांची संख्या १८ भरते. पाण्यासाठी दगडात टाकी कोरून
खास व्यवस्था इथंच करण्यात आली आहे. या पाण्याच्या अनेक टाक्या अजून
सुस्थितीत असल्याचं आश्चर्य वाटत रहातं.चैत्य आणि विहार असे दोन्ही प्रकार
इथे दिसतात. मुख्य चैत्यगृह भव्य आहे. स्तंभावर कलाकुसर आणि दरवाजावरचं
चैत्यतोरण लक्ष वेधून घेतं. अनेक लेणी दुमजली आहेत. पुढची काही लेणी अर्धवट
कोरून सोडून दिलेली दिसतात. दक्षिणेकडे प्रचंड मोठा धबधबा आहे.सूर्यगुंफा
हे भाजे लेण्यांचं खास वैशिष्ट्य. या गुंफेत रथारूढ आणि गजारूढ योद्ध्यांचे
प्रसंग चितारलेत. कार्ले आणि भाजे या दोन्ही ठिकाणी ब्राह्माणी लिपीत
कोरलेले शिलालेख आढळतात.
भाजे लेण्यांवरूनच एक रस्ता लोहगड विसापूर किल्ल्यांकडे जातो. लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांमध्ये थोडं अंतर असलं तरी ते एकमेकांना खेटून असल्यासारखे उभे आहेत.तासभराच्या पायपीटीनंतर लोहगड विसापूरच्या खिंडीत येऊन पोहोचतो. डाव्या हाताला जाणारी वाट विसापूरकडे जाते तर उजव्या हाताने मळलेली वाट थेट लोहगडवर जाते. सह्यादीतल्या मांडवी डोंगररांगेतलं व बोरघाटाचं राखणदार असलेलं लोहगड (स.स.पासून 3412 फूट) व विसापूर (स.स. पासून 3567 फूट) , हे किल्ले मळवलीपासून जवळ आहेत.मोठमोठ्या वृक्षांनी वेढलेल्या या वाटेवरुन जाताना अनोखा आनंद होतो. गड चढण्यास पायऱ्या असल्याने लहान मुलांना बिनधास्त नेता येतं. प्रथम लागतो, तो गणेश दरवाजा. इथून थोडं पुढे गेल्यावर नारायण दरवाजा येतो. इथेच दोन भुयारं दिसतात. या भुयारात भात आणि नाचणीचं धान्य कोठार होतं. पुढे येतो तो हनुमान दरवाजा आणि शेवटी मुख्य महाद्वार. हे चारही दरवाजे सुरळीत आणि कोरीव मूर्त्यांनी नटलेले असल्याने आपल्याला इथेच खिळवून ठेवतात.
इथून गडाच्या पश्चिम दिशेला चालत गेल्यावर विंचवाच्या नांगीसारखा कडा नजरेस पडतो. कड्यावरच पाण्याचे टाके दिसतात. याच कड्यावरून संपूर्ण गडाच्या तटांवर नजर ठेवता येते. लढाईप्रसंगी गडाच्या रक्षणासाठी या कड्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असे. या विंचूकड्याच्या नैऋत्येला उंबरखिंडीत शाहिस्तेखानाचा सरदार करतलब खानाची मराठ्यांनी कोंडी केली आणि त्याला पिटाळून लावलं, असा इतिहास आहे.
नागफणी...ड्यूक्स नोज. या सुळक्यावर शंकराचं एक लहान देऊळ आहे. सुळका माथ्यावर , दगडावर ब-याच
खोबणी तयार झालेल्या आहेत. इथून कळसूबाईची डोंगररांग नजरेत येते. इथे वारा
मात्र भन्नाट असतो. हा अफलातून ट्रेक मात्र वाटाड्या घेऊनच करावा. विशेषत:
पावसाळ्यात. कारण या दिवसांत हा सगळा परिसर ढगांनी वेढलेला असतो. त्यात
दिशा चुकायचाच संभव अधिक. मात्र ही सगळी ठिकाणं गाठायला चालतच जावं लागतं.
वरील कुठल्याही ठिकाणी कसल्याच सोयी नाहीत... त्यामुळे पाणी व खाणं बरोबर
हवंच...
खंडाळा व लोणावळ्याचा मनाला सुखवणारा जो निसर्ग आहे. तो केवळ ट्रेकने चागंला एन्जॉय करायला मिळतो. गवतातून वाहणारा मोकळा उनाड वारा आपल्याला सगळं विसरायला लावणारा आहे. या दिवसात मूळचा राकट... कणखर असलेला सह्यादी मृदू... ओलसर होतो. 'ड्यूक्स नोज'चा सुळका न्याहाळताना ड्यूक ऑफ वेलिंग्टनची आठवण येते.इथल्या डोंगरकड्यांवरच्या टेकिंगचा अनुभव अविस्मरणीय असतो.लोणावळा-खंडाळ्याच्या द-याखो-यांचे सौंदर्य न्याहाळणं हा आगळा अनुभव असतो.
हिरवाई पाहण्यासारखी होती.काही पट्यात पिवळी फुले बहरली होती.हिरव्या रंगात मघ्ये मघ्ये पिवळी शेड दिसत होती. पुढे पुढे वेगवेगळी फुले पाह्ण्यास मिळाल्याने मन प्रन्नस झाले.त्या फुलाना हात न लावता कँमे-यात त्या फुलांच्या छ्ब्या उतरवुन घेतल्या.जसे काय 'व्हँली आँफ फ्लावर'चा नजरा पाहत होतो. वरती पोहचल्यावर उन्हे वाढल्याने गरम झाले.पण दरीतून घुके वर चढत होते.या धुक्याने फोटॉग्राँफीला अडचण होत होती.झाड्याच्या सावलीत बसुन गाणी झाली.आणलेला खाऊ खाल्ला.मंदीरात दर्शन घेऊन खाली उतरलो.
काही नवोदिताना ह्या ट्रेकचा अनुभव चागंला मिळाला.आम्ही मात्र पावसाळा व हिवळ्य़ाच्या मघ्यावरचा वातावरणाचा अनुभव घेत पुढच्या ट्रेकची आखणी करीत परतलो.
विजयदुर्ग
कोकण दौ-यात सिंधुदुर्ग करून आम्ही
विजयदुर्गाकडे कूच केली.दुर्ग व किल्ले इतिहासाची साक्ष तर देताताच तसेच
गिर्यारोहण व पर्यटन यादृष्टीनेही हे किल्ले महत्त्वपूर्ण आहेत.मराठयांच्या
अनेक विजयी लढाया अनुभवलेला जलदुर्ग विजयदुर्ग प्रत्येक इतिहासप्रेमींच्या
हृदयात म्हणूनच मानाचं पान आहे.असाच हा विजयदुर्ग,सिंधुदूर्ग जिल्हयाच्या
उत्तरेला टोकाला आहे. सुमारे ४० किमी. लांबीच्या वाघोटण खाडीच्या आणि अरबी
समुद्राच्या संगमावरच हा किल्ला उभा आहे.पाण्यात पसरलेला, ऐतिहासिक,
वैभवशाली, सामर्थ्यवान, मराठवाडयांच्या आरमारी सामर्थ्याचा तेजबिंदू,
आंग्रे घराण्याचे बलस्थान आणि शिवरायांच्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष
देणारा तरीपण फितुरीला बळी पडलेला विजयदुर्ग किल्ला.किल्ला अजून खूपच
चांगल्या अवस्थेत आहे.
सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला
आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात.
याच्या तीन बाजु पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग
आहेत. एक पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे.
विजयदुर्ग किल्ल्यातील मराठय़ांच्या
पराक्रमात अनेक गोष्टींबरोबर येथील दुर्गरचना, आरमारी गोदी आदींबरोबरच
समुद्रांतर्गत तटबंदीचाही समावेश करता येईल. येथील बलाढय़ आरमार मुंबईस्थित
इंग्रजांच्या डोळ्यांत खुपत असे.
त्यासाठी काळोख्या रात्री अतिशय गुप्तपणे
‘ऑपरेशन विजयदुर्ग’ ही मोहीम त्यांनी आखली. तीन युद्धनौका त्यासाठी
पाठविण्यात आल्या. पण त्यांची ही मोहीम यशस्वी झाली नाही. कारण
विजयदुर्गपासून साधारण दीडशे सागरी मैल अंतरावर या युद्धनौका बुडाल्या. या
भागात ओहोटीच्या वेळीही पाण्याखालीच राहील अशी जाडजूड भिंत समुद्राखाली
उभारलेली आहे. याच अदृश्य तटबंदीला इंग्रजांच्या युद्धनौका धडकल्या आणि
बुडाल्या. त्या काळात शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग किल्ल्याची चिलखती
तटबंदी उभारताना ही पाण्याखालील चौथी तटबंदीही बांधून घेतली होती.
मराठा आरमाराची विजयी गाथा सांगणारा
पूर्वीचा ‘घेरिया’ आणि आताचा ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला म्हणजे कोकण
किनारपट्टीवरील शान! इंग्रजांनाही या किल्ल्याची एवढी आस होती की, केवळ
फितुरीमुळे पेशव्यांच्या मदतीने आंग्रेंचा पाडाव करून हा किल्ला जिंकल्यावर
पेशव्यांबरोबर झालेल्या तहानुसार विजयदुर्ग किल्ल्याच्या बदली बाणकोट
जवळची दहा गावे द्यायला इंग्रज तयार झाले होते. असा हा नावाप्रमाणेच विजयी
झेंडा फडकवणारा विजयदुर्ग म्हणजे जलदुर्गाचा बादशहाच जणू! इंग्रज, पोतुगीज,
डच इ. परकीय शत्रूंच्या तोफांचा महाभयंकर मारा खाऊनही आपल्या वास्तूचा
एकही दगड ज्या किल्ल्याने जागचा हालू दिला नाही, असा मिश्रदुर्ग म्हणजेच
विजयी विजयदुर्ग!…
इ.स. ११९५ ते १२०५ या कालावधीत शिलाहार
घराण्यातील राजा भोज याने कोकण प्रांताचा मुख्य असलेल्या मिर्झा वली बेग
याच्या देखरेखीखाली घेरिया किल्ल्याचे बांधकाम केले. किल्ल्यावर कालांतराने
देवगिरीची यादवसत्ता आली. पुढे विजयनगरचे सम्राट, बहामनी सुलतान आणि
विजापूरच्या आदिलशहाकडे हा किल्ला आला. इ.स. १६५३मध्ये विजय संवत्सर चालू
असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि
पूर्वीच्या घेरियाचा ‘विजयदुर्ग’ झाला.असा इतिहास आहे ह्या किल्ल्याचा.
छत्रपतींनी हा किल्ला जिंकण्याअगोदर तो ५
एकरात वसलेला होता. पण महाराजांनी किल्ल्या ताब्यात घेतल्यावर
किल्ल्याच्या सभोवती चिलखती तटबंदी उभारली आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर
१९ गुंठे झाले. या चिलखती तटबंदीवर महाराजांनी २७ भक्कम बुरूज बांधले.
यामध्ये तीन बुरूज तिमजली आहेत. उत्तरेकडून किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार
आहे. या स्फूर्तिदायक विजयदुर्ग किल्ल्याची सुरुवात होते ती गोमुख
दरवाजापासून! छत्रपती शिवाजी महाराजांनीच या गोमुख दरवाजाची बांधणी केली.
इ.स. ११९५ ते १२०५ या कालावधीत शिलाहार
घराण्यातील राजा भोज याने कोकण प्रांताचा मुख्य असलेल्या मिर्झा वली बेग
याच्या देखरेखीखाली घेरिया किल्ल्याचे बांधकाम केले. किल्ल्यावर कालांतराने
देवगिरीची यादवसत्ता आली. पुढे विजयनगरचे सम्राट, बहामनी सुलतान आणि
विजापूरच्या आदिलशहाकडे हा किल्ला आला. इ.स. १६५३मध्ये विजय संवत्सर चालू
असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि
पूर्वीच्या घेरियाचा ‘विजयदुर्ग’ झाला.
छत्रपतींनी हा किल्ला जिंकण्याअगोदर तो ५
एकरात वसलेला होता. पण महाराजांनी किल्ल्या ताब्यात घेतल्यावर
किल्ल्याच्या सभोवती चिलखती तटबंदी उभारली आणि किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर
१९ गुंठे झाले. या चिलखती तटबंदीवर महाराजांनी २७ भक्कम बुरूज बांधले.
यामध्ये तीन बुरूज तिमजली आहेत. उत्तरेकडून किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार
आहे. या स्फूर्तिदायक विजयदुर्ग किल्ल्याची सुरुवात होते ती गोमुख
दरवाजापासून! छत्रपती शिवाजी महाराजांनीच या गोमुख दरवाजाची बांधणी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादा किल्ला
बांधला किंवा तो जिंकून घेतला हे दोन गोष्टीतून आपल्या लक्षात येतं. एक
म्हणजे किल्ल्याच्या परिसरात असलेलं बलभीम मारुतीचं मंदिर आणि गोमुख
बांधणीचा दरवाजा! या दोन्हीही गोष्टी विजयदुर्ग किल्ल्यामध्ये आहेत. या
किल्ल्यात प्रवेश करायचा मुख्य मार्ग हा खुष्कीचा मार्ग असल्याने त्याला
‘पडकोट खुष्क’ असं नाव आहे. हा मार्ग जांभ्या दगडातील आहे. सुरक्षिततेच्या
दृष्टीने हा दरवाजा वळणावळणाचा आहे.
दरवाजाच्या बाहेर पूर्वी मोठा खंदक होता.
इथून कुणी प्रवेश करू नये म्हणून या दरवाजासमोर डावीकडे
समुद्रकिना-यापर्यंत हा खंदक खणलेला होता. खंदकाने जमिनीच्या बाजूने
किल्ल्याची तटबंदी व्यवस्थित संरक्षित केलेली होती. या खंदकामुळे तटाला
भिडणे शत्रूला कठीण जात होते. आज या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि
एका बाजूने किल्ल्यात जायला जमिनीवरचा रस्ता असला तरी पूर्वी किल्ल्याच्या
चारही बाजूने पाणी होते. या खंदकात समुद्राचे पाणी सोडले जात असे. खंदकावर
लाकडी पूल होता. सायंकाळी हा पूल काढला की गावाचा संपर्क तुटत असे. मातीचा
भराव टाकून हा रस्ता नंतर करण्यात आला. खुष्कीच्या मार्गातून आत गेल्यावर
मारुतीचे मंदिर लागते. त्यानंतर किल्ल्यात प्रवेश करताना सुरुवातीला जिभीचा
दरवाजा लागतो.
१७व्या शतकात या परिसरास जिभी म्हणत.
राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांचे पुत्र शिवाजीराजे यांनी १७०७
मधील पत्रात याला जिभी असे म्हटले आहे. जिभी म्हणजे किल्ल्याच्या मुख्य
दरवाजापुढे बांधलेला चौबुरुजी! तुळाजी आंग्रे यांनी इंग्रज आणि
पेशव्यांविरुद्ध विजयदुर्गच्या संरक्षणासाठी बोलावलेल्या पोर्तुगीज
सैनिकांनी आपल्या ४ पौंडी १६ तोफा या जिभीत रचून ठेवल्या होत्या. जिभीच्या
दरवाजातून पुढे गेल्यावर यशवंत महाद्वाराच्या पाय-या लागतात. हाच दिंडी
दरवाजा!
दिंडी दरवाजाची रचनाच अशी आहे की,
किल्ल्यावर हल्ला करणा-या शत्रूच्या नजरेत हा दरवाजा येत नाही. त्यामुळे
शत्रूंच्या महाभयंकर तोफांचा मारा इथपर्यंत पोहोचत नव्हता. शत्रूने
केलेल्या तोफांच्या मा-याच्या निशाण्या आजही या दरवाजाच्या बाहेर असलेल्या
तटबंदीवर दिसून येतात. त्या काळी सायंकाळी सहानंतर हे मुख्य प्रवेशद्वार
बंद केलं जात असे. त्यानंतर आत येणा-या सैनिकांना मुख्य प्रवेशद्वारावर
असलेल्या दिंडी दरवाजातून प्रवेश दिला जाई. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरचं
बांधकाम हे पेशवेकालीन असल्याच्या खुणा आहेत. या दरवाजावर मोठमोठे खिळे
आहेत.
या दिंडी दरवाजावरील भाग म्हणजे नगारा!
शत्रूचा हल्ला होण्यापूर्वी सैनिकांना सावध करण्यासाठी नगारे वाजविले जात
असत. वर जाण्यासाठी नगारखोलीच्या खाली डावीकडे जिना आहे. दरम्यान,
ध्वजस्तंभाजवळ जाणा-या घाटीच्या पायथ्याशी एक वास्तू आहे. हा खलबतखाना!…
शत्रूच्या हल्ल्याची चाहूल लागली किंवा
महत्त्वाची बोलणी करायची असल्यास ती इथल्या खलबतखान्यात व्हायची.
वास्तुशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास करून या खलबतखान्याची रचना करण्यात आली
आहे. या वास्तूला पूर्वी दरवाजा होता. आता तो अस्तित्वात नाही. आत चाललेली
गुप्त बोलणी बाहेरच्या व्यक्तीला अजिबात ऐकायला येत नसत. अचंबित करणा-या
अशा अनेक वास्तू या किल्ल्यात पाहायला मिळतात.
ज्या ठिकाणी दरबार भरला जात असे, त्याला
‘सदर’ असं नाव आहे. आयताकृती असणा-या या हॉलमध्ये अगदी शेवटच्या सैनिकालाही
स्पष्ट आवाज ऐकू यायचा. याबरोबरच भुयारातून जाणारा ‘खूब लढा तोफा बारा’
बुरूज, पेशवेकालीन वाडय़ाकडे जाणारे भुयार, भवानी मातेचं मंदिर, सैनिकांची
निवासस्थाने आदी अनेक वास्तूंमुळे विजयदुर्ग किल्ला आजही आपल्या ऐतिहासिक
आठवणी सांगत उभा आहे.
या किल्ल्याच्या दुर्गरचनेमुळे केवळ
गनिमी काव्याने मराठय़ांनी जेरीस आणले. पण फितुरीमुळे हा किल्ला
इंग्रजांच्या आणि नंतर पेशव्यांच्या ताब्यात गेला. १७१८पासून झालेल्या
पहिल्या परकीय शक्तीच्या हल्ल्यापासून ते किल्ला इंग्रजांच्या ताब्यात
जाईपर्यंत म्हणजे १७५६पर्यंतचा इतिहास जाणून घेतला तर आजही मराठय़ांच्या
पराक्रमाने, किल्ल्याच्या रचनेमुळे आणि भक्कम बांधकामामुळे आपल्या अंगावर
रोमांच उभे राहतात. शिवरायांच्या मृत्यूनंतर आणि छत्रपती शंभूंच्या काही
कालावधीतील धामधुमीची कारकीर्द संपल्यावर कान्होजी आंग्रे यांनी कोकणात
आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.
जयदुर्गास तिहेरी तटबंदी असून गडाच्या पश्चिम
तटाबाहेर मोठे दगड टाकून लाटांच्या मारापासून तटबंदीचा बचाव करण्याचा
प्रयत्न केला आहे.गडाचा तट सुस्थितीत असून त्यावर चढण्यास जागोजागी
पायर्या असल्यामूळे संपूर्ण गडास व्यवस्थीत तटफेरी मारता येते.
सिंधुदुर्ग किल्ला
हल्लीच कोकण दौरा केला. त्या दौ-यात सिंधुदुर्ग या जलदुर्गात जाण्याची संधी मिळाली. ऐतिहासिक
सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे,
तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे.
किल्ल्याच्या चारही बाजूंनी समुद्र
असल्यामुळे किल्ला अगदी उठून दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा,
शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे, आणि छत्रपतींचे मंदिर ही या
किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत. किल्ल्यात महाराजांचा वाडा, ध्वजस्तंभ, मारुती
व भवानी मंदिर इ. महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या शेजारी भव्य व अजिंक्य जलदुर्ग बांधला तोच सिंधुदुर्ग होय.
चार मच्छिमार लोकांनी सिंधुदुर्ग
बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. भुईकोट
आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून
लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे,हे ओळखून शिवाजी
महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले.
सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे
अर्धा मैल समुद्रात आहे. ४८ एकर क्षेत्रात हा किल्ला आहे.येथे जाण्य़ास
मालवणहून बोटीने प्रवास करावा लागतो.पावसाळ्याचे ४ महिने सोडून वर्षभर मालवण जेटी वरून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी मिळतात .
किल्ल्यापर्यंतचा जलमार्ग दाट खडकांनी भरलेला आहे. जाणकार खलाशीच
किल्ल्यापर्यंत पडाव नेऊ शकतात. नाव किल्ल्याच्या ईशान्य बाजूस असलेल्या
महाद्वाराजवळ येऊन थांबते.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजाची
बांधणी ‘‘गोमुखी‘‘ पध्दतीची आहे. या बांधणीत किल्ल्याचे प्रवेशद्वार दोन
बुरुजांच्या कवेत लपवलेले असते. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या
जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही.पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की
उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महाद्वारात दगडात कोरलेला हनुमान आहे.
तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे.
प्रवेशद्वारातून सिमेंटच्या बनविलेल्या रस्त्याने चालत गेल्यास, उजव्या
हाताला जरीमरीचे मंदिर लागते. ह्या किल्ल्यावर शिवकालिन ३गोड्या पाण्याच्या
दगडी विहीरी आहेत.त्यांची नावे दूध विहीर,साखर विहीर व दही विहीर अशी
आहेत.हे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत
गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे.
तटाच्या आत आले की मुख्य रस्त्यावर
राजाराम महाराजांनी बांधलेल्या श्री शिवराजेश्वराच्या मंदिराकडे जातो.
शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे.श्री शिवराजेश्वरांचे
देवालय व मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी
महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही.
वाड्याच्या अवशेषांच्या पश्चिमेला किल्ल्याच्या
तटबंदीपासून वेगळा व आत असलेला उंच बुरुज आहे. ह्या बुरुजाला दर्याबुरुज
किंवा निशाणकाठी (झेंड्याचा) बुरुज म्हणतात. ह्या बुरुजाचा उपयोग टेहाळणी
करीता केला जात असे.बुरूजाजवळ साचपाण्याचा तलाव आहे.
बुरुजाच्या मागच्या बाजूस थोडे चालत गेल्यावर
तटबंदीत एक छोटा दरवाजा आहे. ह्या दरवाजातून बाहेर आल्यावर एक छोटीशी
चंद्रकोरीच्या आकाराची पुळण लागते. ह्यास ‘‘राणीची वेळा‘‘ म्हणतात.
ताराराणी ह्या ठिकाणी समुद्रस्नानास येत असत.
गाईडने किल्ल्याची माहिती चांगल्या प्रकारे दिली.इतिहास डोळ्यासमोर उभा केला.
गाईडने किल्ल्याची माहिती चांगल्या प्रकारे दिली.इतिहास डोळ्यासमोर उभा केला.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीच्या डागडुजीचे काम सुरु होते.
भवानी मंदिर
सिंधुदुर्गाच्या
इतिहासात डोकावल्यावर असे दिसते की, राजारामांच्या मृत्यूनंतर
कोल्हापूरातून ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहात होती. शाहू आणि ताराबाई
यांच्यात झालेल्या वारणेच्या तहानुसार मालवण परिसराचा ताबा ताराराणींकडे
आला. मालवण समुद्रावर चाचेगिरीला ऊत आला होता. मेजर गॉर्डन व कॅप्टन वॉटसन
यांनी सिंधुदुर्ग २८ जानेवारी १७६५ रोजी ताब्यात घेतला. त्यावेळी
किल्ल्यातील दारुखाना जळून खाक झाला इंग्रजांनी किल्ल्याचे नाव
ठेवले.''फोर्ट ऑगस्टस'' कोल्हापूरच्या राणी जिजाबाई व ईस्ट इंडिया कंपनी
यांच्यातील करारानुसार २ जानेवारी १७६६ रोजी सिंधुदुर्ग मराठ्यांच्या
ताब्यात आला. निपाणिच्या देसाई विरूद्ध इंग्रजांनी करवीरकरांना मदत केली.
त्याच्या मोबदल्यात १७९२ ला हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
हा भव्य जलदुर्ग पाहून आनंद झाला.
हा भव्य जलदुर्ग पाहून आनंद झाला.
निसर्गशिल्प.....सांधण व्हॅली
लाखो-हजारो वर्षे तो ऊनवारा व पावसाचे
तडाखे सह्याद्रीतल्या कातळावर, डोंगरदऱ्यांवर, पठारांवर बसतात. हे तडाखे
वर्षांनुवर्षे झेलल्यावर आकाराला येतात त्या नानाविध रचना. कधी कोकणकडय़ाचे
रौद्र रूप,तर कधी साहसाला साद घालणारे सुळके, तर कधी रांजण खळगे. ही
शिल्पकला घडतेच मुळी डोंगरकपाऱ्यात.निसर्गाची ही अशी अद्भुते पाहायची
असतील, तर मात्र वाट थोडी वाकडी करण्यावाचून पर्याय नसतो.असेच अनोखे
निसर्गशिल्प आपल्या सह्याद्रीत दडलेले आहे. भंडारदरा जवळील ’सांधण व्हॅली’
पाहल्यानंतर निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ शिल्पकार आहे याची प्रचिती येते.
मातीचा जराही स्पर्श नाही की रस्त्याशी संबंध नाही... मोठमोठ्या दगडांमधून वाट काढत आणि त्यावरून उड्या मारत पुढे जायचं... सोबतीला उंच, उभाच्या उभा काळाकभिन्न कातळ... या कातळभिंतींची उंची इतकी आहे की सूर्यकिरण शेवटपर्यंत पोहोचू शकत नाहीत.
त्यामुळेच तिथे सावल्यांच्या विविध छटा
आणि प्रकाशाचे खेळ प्रत्येक वळणावर दिसतात. तसेच डोंगराच्या कुशीत उगम
पावणाऱ्या धबधब्याच्या मार्गाने चालायला सुरूवात करून थेट नदीपर्यंत
जाण्याचा अनुभव हा शब्दांच्या पलीकडचा आहे! हे वर्णन आहे सांधण व्हॅलीचे.
ही व्हॅली म्हणजे चकित करणाऱ्या अनेक गोष्टी,सावल्यांचा खेळ आणि थरार यांचा खजिनाच आहे.
मुंबई - इगतपुरी - घोटी - शेंडी (भंडारदरा) - पांझरे - उडदवणे - साम्रद गाव या मार्गाने सांधण व्हॅली जवळ पोहचता येते.
एकीकडे रतनगड, लांबवर सह्याद्रीतील अतिशय
कठीण अशी कळसूबाईची डोंगररांग,त्यातून थेट लक्ष वेधून घेणारे
अलंग,मदन,कुलंगसारखे अभेद्य किल्ले,चहूकडे जंगल असलेल्या मोठ्या पठारावर
वसलेले इनमीन शंभरेक घरांचे सांधण व्हॅली जवळचे साम्रद हे गाव.सांधण व्हॅली
मुळे हे गाव जगाच्या नकाशावर आले आहे.
गावातून बाहेर पडल्यावर
कातळाच्यासड्यावरून पुढे जात वाट दाट झाडीत शिरते.थोड्याच वेळात आम्ही एका
घळीच्या मुखाशी येतो. सांधण दरीचे वैशिट्य म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली
आहे.
अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब जमिनीला पडलेली भेग आहे.घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे.जो कधीही आटत नाही.
दगडांनी तो बंदिस्त केल्यामुळे अतिशय
निर्मळ व थंडगार पाणी पिण्य़ास योग्य आहे.घळ उतरायला लागलो. सुरुवातीचा सोपा
कातळटप्पा उतरुन आम्ही आत दरीच्या नाळेत प्रवेश केला.
आत दरी सापासारखी लांबच लांब वळण
घेताना दिसते.दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त केलेली
आहे.या धळीच्या प्रथमदर्शनीच आपण प्रेमात पडतो.
त्याचे राकट स्वरूपच भुरळ घालते.आपण
आपसूकच पुढे जात राहतो.वाटेत मात्र जपून पावले टाकावी लागतात,कारण काही
मोठमोठे दगडधोंडे व शिळा ओलांडाव्या लागतात.पहिला कातळटप्पा उतरताच एका
पाणसाठ्याने आमचा मार्ग अडवला जातो.त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून
आपणास कौशल्याने मार्ग काढत पलीकडे जावे लागतो. एव्हाना आपण बऱ्यापैकी आत
गेलेले असतो.नजर उंचावून पाहिली की लक्षात येते,आपण थेट डोंगराच्या मधोमध
खोदलेल्या भेगेत आहोत.ही भेग तर केवढी, ४५०-५०० फूट खोल, फार फार तर २५ फूट
रुंद, कधी कधी १० फूटदेखील आणि एक किलोमीटर लांबीची आहे.परत आपला मार्ग
दुसर्या मोठ्या पाणसाठयाने अडवला जातो.
सुर्याची किरणे येथे कधीही पोहोचू शकत
नसल्याने येथील अतिशय थंडगार अश्या त्या कंबरभर पाण्यातून लांब चालण्याचा
थरार प्रत्यक्ष अनूभवातूनच येतो.काहीवेळा छातीपर्यंत पाणी असल्यमुळे बॅगा
डोक्यावर घेण्यावाचून गत्यंतर नसते.डोंगराच्या पोटातील आपला प्रवास चालूच
ठेवायचा. दोहो बाजूंचे उंच उंच कातळकडे व आकाश्याच्या छोट्या तुकड्यापलीकडे
काहीही दिसत नाही.
आता हा व्हॅली रुंद होत जाते. तसा
त्याचा उतारदेखील वाढत जातो. म्हणजे मग डोंगरकडय़ाजवळ आलो असे समजावे.
तेव्हा समोर पुन्हा सह्याद्रीचे रौद्र स्वरूप आपल्या स्वागताला हजरच
असते.भन्नाट वारा अंगावर झेलत मागे वळून पाहिले की, ती व्हॅली अंगावरच येते
असते वाटते. ह्या व्हॅलीतून पुढे काही अवघड कातळारोहण टप्प्यांवरून जात
करोली घाटाला जावुन मिळतो. व्हॅली उतरून साकुर्ली गावात यायचे.त्या गावातून
दहाएक मिनिटांवर डेहणे गाव आहे.या गावातून आसनगाव बस किंवा खासगी वाहन
मिळते.
अप्रतीम अश्या ह्या
निसर्गचमत्काराने आपण अवाक होतो. ही अरूंद घळ पाणी व ज्वालामुखी यांच्या
एकत्रीत परीणामामुळे बनली असावी. पूर्ण सांधण दरीत कधीही उन पोहोचत नाही
त्यामुळे तेथे कायमच सुखद गारवा असतो.
पावसाळ्यात ह्या व्हॅलीत शिरण्याचा मार्ग
बंदच असतो. पाऊस सरला की नोव्हेंबरच्या दरम्यान हा मार्ग खुला होऊ
लागतो.सांधण व्हॅली चा ट्रेक करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी हमखास
घ्यावी ती म्हणजे, अनुभवी ग्रुपसोबतच इथे जावे.गरज असल्यास एखाद्या
गावकर्याला सोबत घ्यावे.
खडगं, पाणी व जंगलातून वाट काढावी लागत
असल्यामुळे, अनेकदा सरपटणार्या प्राण्यांशी गाठभेट होते, मग पायाच्या
संरक्षासाठी म्हणून चांगले बुट घालणे व कपड्याची एखादी जोडी सोबत असणे
अत्यावश्यकच आहे. धाडस म्हणून चुकून देखील दरीत एकट्याने जाणे टाळावे.
बेलाग ईरशाळ गड
पनवेल - खोपोली मार्गावरुन जाताना दिसणारा हा ईरशाळ गड
ईरशाळला गड म्हणणे अयोग्य आहे, कारण ईरशाळ हा एक सुळका आहे.टेहाळणीसाठी या ठिकाणाच उपयोग केला असेल.
उन्हाळा सुरु होण्या अगोदर हा ट्रेक करुन या सिझनची सांगता करण्याचे ठरल्याने या सिझनचा शेवटचा ट्रेक ईरशाळला करण्याचे ठरले. ईरशाळला जाण्यास वाहतुकीची सोय असल्याने सोपे पडते.
ईरशाळला जाण्यास दोन मार्ग आहेत.पनवेल - खोपोली मार्गावर किंवा कर्जत - पनवेल या मार्गावर बसने प्रवास करीत चौक रेल्वेस्टेशनच्या स्थानकावर (डाक बंगला) उतरावे.रेल्वे मार्ग ओलांडून चौक गावात येता.समोरच मोरबे घरणाची भिंत दिसते.त्या जलाशयाच्या बाजुला गडावर जाण्याची वाट दिसते.
उन्हाळा वाढल्याने खूपच गरम होत होते.घामाच्या घारा सुरु झाल्या.सावळीला थांबून दम खात पुढाचा टप्पा गाठायचो.बाजुने इरशाळवाडीतील माणसे जात येत होती.
पहिला टप्पा इरशाळवडी पर्यतचा आहे. वाडीत दहा पंधरा घरे आहेत छोटीशी शाळा
आहे.पाणी लांबून आणावे.आम्हाला वाडीतील एका घरातून पाणी मिळाले.बाटल्या
भरून घेतल्या. वाडीपासून निघाल्यावर सरळ वाटेने गेल्यास चुकायला होते व
मोठा घेरा पडतो. वाडी सोडल्यावर देवीचे छोटेसे मंदीर दिसते.तेथून थोडेसे
पुढे जाऊन वर चढल्यास एरा वाचतो.आपण लवकर गडावर पोहचू शकतो. चौकहून ईरशाळगडाचा पायथा गाठण्यास अर्धा तास लागतो. पायथ्या पासून ईरशाळवाडी मार्गे गडमाथा गाठण्यास दिड तास लागतो.
गडाच्या पाठीमागून चढण्याची वाट आहे. समोरुन उन्हाचा तडाका होता.पाठीमागे गेल्यावर सावली ळाल्यावर चढाईला वेगे आला.पाण्याच टाक लागते.लगेच पुढे लाकडी शिडी लागते.तेथेच विशाळादेवीचे छोटेसे मंदीर आहे.दर्शन घेऊन पुढच्या चढाईला लागलो.आता परीक्षा घेणारी चढाई होती.
इरशाळ ला नेड्यापर्यत जाणे सोयीचे आहे. नेढ्यातून समोर चढणारी वाट सुळक्यावर जाते. सुळक्यावर जाण्यासाठी प्रस्तारारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यकच आहे.या ठीकाणी अपघात झालेले आहेत.
गडावरील पाण्याच्या टाक्यांचे अत्सित्व पाहाता याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा असे वाटते.
गडमाथ्यावरून समोरच प्रबळगड, माथेरान,म्हैसमाळ, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो.
कितीही त्रास झाला तरी सर्व मित्रांसह केलेला ट्रेक आंनददायीच असतो.त्याची मजा वेगळीच असते.
अलिबाग किल्ला,खांदेरी आणि उंदेरीची सफर
अलिबागच्या जवळ खांदेरी उंदेरी ही दोन
बेटे खोल समुद्रातले सागरी दुर्ग आहेत. अलिबागच्या समुद्रात एक किलोमीटर
अंतरावर असणारा कुलाबा किल्लाही त्यांच्याच दूरदृष्टीची साक्ष देतो.बेत
आखला जात होता पण मोहीमेला मुहर्त मिळत नव्हता.अलिबागच्या कोळी मित्राने
सोय करतो असे सांगितल्यावर आम्ही तयारी केली.अलिबागच्या धक्क्यावरून
मच्छिमार बोटीने कुलाबा किल्ल्याकडे निधालो.

अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गव्दयी उभी आहे.अलिबाग च्या समुद्र किनाऱ्या वरून दृष्टीस पडणारा किल्ला. समुद्रकिनाऱ्यापासून साधारण १ - २ किमी अंतरावर समुद्रात आहे.भरतीच्या वेळी किल्ल्यावर जायचे असल्यास बोट शिवाय पर्याय नाही. ओहोटी असल्यास चालत किंवा घोडागाडीने दुर्गावर जाता येते.

भव्य प्रवेशव्दाराजवळ बोट थांबल्याबरोबर
उड्या मारत उतरलो व किल्ल्यात ’शिवाजी महाराज की जय’ धोषणा देत
शिरलो. गडाच्या मुख्य द्वाराच्या कमानीवर मध्यभागी गणेश मूर्ती कोरलेली
असून, त्याच्या वरच्या भागात दोन हत्तींची झुंज असे चित्रशिल्प कोरल्याचे
दिसते.. दरवाजाच्या वरच्या भागात.. चौकटीच्या वरच्या आडव्या पट्ट्यात
साधारण ८-१० रकाने असून त्यात कमलपुष्प, मोर, हरीण यांची आकर्षक
शिल्पचित्रे कोरल्याचे पाहायला मिळते.. कमानीच्या दोन्ही बाजूस वर
मुक्तहस्त व्याघ्रशिल्प आहे..
सह्याद्रीच्या अनेक गडकोटांच्या प्रवेशव्दारी कोरलेली शिल्पे हा एक संशोधनाचा विषय होवू शकेल.. गडाचा मुख्य द्वार जितके मजबूत तितका गड अजिंक्य आणि सुरक्षित.. कुठलाही गड पहावा तो तटबंदीवरून फेरफटका मारूनच पहावा.. म्हणजे गडाच्या अंतरंगात डोकावता येतं..
तटबंदी वरून चक्कर मारली कि आपसूक लक्षात येतं.. गडावर नेमकं काय पाहायला मिळणार ते .. !! गड कोटाचे गतवैभव अनुभवावे तटबंदिवरून अगदी डोळेभरून.. तीन मंदिरे पहायला मिळातात.. मंदिराच्या कळसावर नजर टाकता कोरीव नक्षीकाम लक्ष वेधून घेते.. पंचायतनात मध्यभागी गणेश व बाजूने शिव, विष्णू, सूर्य आणि देवीच्या मूर्ती ठाण मांडून बसल्याचे दिसले.. मंदिराचे बांधकाम पेशवाईच्या भरभराटीच्या काळात झाले असावे असे दिसते.. पंचायतनासमोर एक तुळशी वृंदावन असून त्यावरील शिल्पकला फार सुरेख आहे.. उजवीकडे अंजनेयाचे म्हणजेच मारुती बाप्पा चे सुंदर मंदिर असून ते शिवकालीन असण्याची शक्यता आहे..
सह्याद्रीच्या अनेक गडकोटांच्या प्रवेशव्दारी कोरलेली शिल्पे हा एक संशोधनाचा विषय होवू शकेल.. गडाचा मुख्य द्वार जितके मजबूत तितका गड अजिंक्य आणि सुरक्षित.. कुठलाही गड पहावा तो तटबंदीवरून फेरफटका मारूनच पहावा.. म्हणजे गडाच्या अंतरंगात डोकावता येतं..
तटबंदी वरून चक्कर मारली कि आपसूक लक्षात येतं.. गडावर नेमकं काय पाहायला मिळणार ते .. !! गड कोटाचे गतवैभव अनुभवावे तटबंदिवरून अगदी डोळेभरून.. तीन मंदिरे पहायला मिळातात.. मंदिराच्या कळसावर नजर टाकता कोरीव नक्षीकाम लक्ष वेधून घेते.. पंचायतनात मध्यभागी गणेश व बाजूने शिव, विष्णू, सूर्य आणि देवीच्या मूर्ती ठाण मांडून बसल्याचे दिसले.. मंदिराचे बांधकाम पेशवाईच्या भरभराटीच्या काळात झाले असावे असे दिसते.. पंचायतनासमोर एक तुळशी वृंदावन असून त्यावरील शिल्पकला फार सुरेख आहे.. उजवीकडे अंजनेयाचे म्हणजेच मारुती बाप्पा चे सुंदर मंदिर असून ते शिवकालीन असण्याची शक्यता आहे..
बोट किना-याला लावायला धक्का नसल्याने बाजूने किल्ला पाहिला.बांधकामाचे अवशेष आहेत.त्यातील काही बांधकाम कोसळलेले आहेत.
समोरच्या उंदेरीला मागे टाकून खोल समुद्रात शिरलो आणि खांदेरी दिसू लागला. जवळूनही नजरेत मावेल एवढे आटोपशीर बेट, दक्षिणेला एक टेकाड आणि त्यावर एक दीपगृह. उंचसखल जमिनीवर बांधलेली मजबूत तटबंदी, आणि बाहेरच्या बाजूला तटबंदीचे समुद्रापासून रक्षण करण्यासाठी टाकलेले मोठमोठे दगडधोंडे. आत प्रवेश करण्यासाठी एक पुर्वाभिमुख छोटा धक्का. त्या छोट्या धक्क्याला बोट लावली.
उजव्या बाजुला असलेल्या वेताळाचे दर्शन घेतले. वेताळाचे कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असलेले देऊळ आहे. या देवळात मोठ्या माशांची हाडे जतन केलेली आहेत.नतंर दीपगृहाच्या छोट्या टेकाडावर चढून गेलो. मित्राने आणलेले मच्छीचे जेवण करुन दीपगृह पाहिले. या बेटावरचे हे दीपगृह १८६७ मध्ये पोर्तुगीजांनी बांधलेले आहे. खांदेरीचे एक अद्भुत वैशिष्ट्य अशा धातूचा आवाज येणाऱ्या खडकाच्या शोध घेतला.बराच वेळ दगड बडवल्यावर सर्वांचे समाधान झाले आणि दुर्गप्रदक्षिणा सुरू केली.
खांदेरीच्या तटबंदीवर गाडय़ावर ठेवलेल्या तोफा आहेत. तटबंदीला जागोजाग बुरुज आहेत. तटबंदीचे काम रचीव पद्धतीने केलेले असल्याने दोन चिर्याच्या मधे दर्जा भरलेला नाही. तसेच तटबंदीच्या बाहेरील अंगाला मोकळे चिरे टाकून दिले आहेत.खांदेरीच्या गडफेरीमधे वेताळ मंदिर, हनुमान मंदिर बुद्ध मंदिर, क्रॉस, पीर अशी अनेक श्रद्धास्थाने पहायला मिळतात.
दुर्गाची तटबंदी अगदी मजबूत अशी पाच सहा
फूट रुंद आहे, मध्ये तेवढेच मजबूत असे साधारण बारा बुरूज आहेत, काही
बुरुजाखालून समुद्रात उतरण्यास दरवाजे बांधून काढले आहेत.
वर्दळीपासून तसा बराच सुरक्षित असल्याने बुरुजांवर तोफा अजूनही आहेत. गडावर एक मोठा गोड्या पाण्याचा तलाव आहे, एक छोटा तलावही आहेत.चार पाच विहिरी दिसल्या पण त्या मात्र कोरड्या आहेत.
खांदेरी उंदेरीची बेटे ही मुंबई आणि
मुरुडचा जंजिरा यांच्या मधे असल्यामुळे अतिशय महत्त्वाची होती. ही बेटे
ताब्यात घेवून त्यावर जलदुर्ग बांधल्यास मुंबईकर इंग्रज आणि जंजिरेकर
सिद्यी यांच्यामधे चांगलीच पाचर मारता येईल हे हेरुन शिवाजीराजांनी
खांदेरीचा किल्ला बांधायला घेतला महाराजांच्या या बेताचा सुगावा लागताच
इंग्रजांनी खांदेरी बेटावर आमचा हक्क असल्याचे कारण पुढे करुन येथे किल्ला
बांधण्याला विरोध केला. इंग्रजांना पोर्तृगिजांकडून मुंबई मिळाली होती.

या बेटांचा इतिहास..... खांदेरी बेटावर १६७२ मध्ये शिवाजीराजांनी किल्ला बांधायला घेतला. तोपर्यंत इंग्रजांनी मुंबई बेटावर आपले बस्तान बऱ्यापैकी बसवलं होतं. त्यांनी या किल्ल्याचा उपयोग त्यांच्यावर वचक बसवण्याकरिता होईल हा धोका ओळखून, या किल्ला बांधणीस जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मराठय़ांनी तात्पुरती माघार घेतली. १६७९ मध्ये महाराजांनी पुन्हा खांदेरीचा ताबा घेऊन किल्ला बांधणीस सुरुवात केली. परत इंग्रजांनी विरोध करण्यास सुरुवात केली. पण मराठय़ांनी दाद तर दिली नाहीच. उलट मराठय़ांच्या आरमारांनी इंग्रजांच्या आरमारावर हल्ला केला. या आरमार युद्धात इंग्रजांचं एक जहाज मराठय़ांना मिळालं. शेवटी इंग्रजांना माघार घ्यावी लागली. जंजिऱ्याच्या सिद्धी कासम या हबशी नवाबालाही शिवाजीराजांचं वर्चस्व मान्य होणार नव्हतं. त्यानं १६७९-८० दरम्यान खांदेरीवर हल्ला करता करता उंदेरी बेटच बळकावलं. लगोलग त्यानं उंदेरीवर किल्लाही बांधला. हा उंदेरी किल्ला घेण्याचा प्रयत्न मराठय़ांनी बऱ्याच वेळा केला, पण त्यांना त्यात यश आलं नाही. पुढे १७६० मध्ये पेशव्यांनी उंदेरी मिळवला. खांदेरी किल्ल्यावर १८९१ सालातील मोठी घंटा पाहावयास मिळते.
‘खांदेरी-उंदेरी दोघी जावामध्ये कुलाबा किल्ला खातो हवा’ अशी ओळ आपण लोकगीतांमधून ऐकत असतो. खांदेरी-उंदेरी हे जलदुर्ग अलिबागजवळच्या समुद्रात आहेत. त्याला वाचविण्याची गरज आहे.
शिवरायांच्या या अद्वितीय स्थापत्यकलेच्या साक्षी आहे जलदुर्ग खांदेरी!
उंदेरी किल्ला सध्या ओसाड आहे.तर खांदेरीवर दिपगृह व वेताळाचे देऊळ असल्याने वहिवाट आहे.पण खांदेरी जलदुर्ग आजही विपन्नावस्थेत आहे.
खांदेरी व उंदेरीला जाण्यासाठी यांना संपर्क केल्यास बोटीची सोय होईल.
अश्विन बुंदके ९७६७ ००८४७२ थळमार्गे
अजिंक्य बांद्री ९२७१ ७५९७९५ अलिबागमार्गे
वर्दळीपासून तसा बराच सुरक्षित असल्याने बुरुजांवर तोफा अजूनही आहेत. गडावर एक मोठा गोड्या पाण्याचा तलाव आहे, एक छोटा तलावही आहेत.चार पाच विहिरी दिसल्या पण त्या मात्र कोरड्या आहेत.
या बेटांचा इतिहास..... खांदेरी बेटावर १६७२ मध्ये शिवाजीराजांनी किल्ला बांधायला घेतला. तोपर्यंत इंग्रजांनी मुंबई बेटावर आपले बस्तान बऱ्यापैकी बसवलं होतं. त्यांनी या किल्ल्याचा उपयोग त्यांच्यावर वचक बसवण्याकरिता होईल हा धोका ओळखून, या किल्ला बांधणीस जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मराठय़ांनी तात्पुरती माघार घेतली. १६७९ मध्ये महाराजांनी पुन्हा खांदेरीचा ताबा घेऊन किल्ला बांधणीस सुरुवात केली. परत इंग्रजांनी विरोध करण्यास सुरुवात केली. पण मराठय़ांनी दाद तर दिली नाहीच. उलट मराठय़ांच्या आरमारांनी इंग्रजांच्या आरमारावर हल्ला केला. या आरमार युद्धात इंग्रजांचं एक जहाज मराठय़ांना मिळालं. शेवटी इंग्रजांना माघार घ्यावी लागली. जंजिऱ्याच्या सिद्धी कासम या हबशी नवाबालाही शिवाजीराजांचं वर्चस्व मान्य होणार नव्हतं. त्यानं १६७९-८० दरम्यान खांदेरीवर हल्ला करता करता उंदेरी बेटच बळकावलं. लगोलग त्यानं उंदेरीवर किल्लाही बांधला. हा उंदेरी किल्ला घेण्याचा प्रयत्न मराठय़ांनी बऱ्याच वेळा केला, पण त्यांना त्यात यश आलं नाही. पुढे १७६० मध्ये पेशव्यांनी उंदेरी मिळवला. खांदेरी किल्ल्यावर १८९१ सालातील मोठी घंटा पाहावयास मिळते.
‘खांदेरी-उंदेरी दोघी जावामध्ये कुलाबा किल्ला खातो हवा’ अशी ओळ आपण लोकगीतांमधून ऐकत असतो. खांदेरी-उंदेरी हे जलदुर्ग अलिबागजवळच्या समुद्रात आहेत. त्याला वाचविण्याची गरज आहे.
शिवरायांच्या या अद्वितीय स्थापत्यकलेच्या साक्षी आहे जलदुर्ग खांदेरी!
उंदेरी किल्ला सध्या ओसाड आहे.तर खांदेरीवर दिपगृह व वेताळाचे देऊळ असल्याने वहिवाट आहे.पण खांदेरी जलदुर्ग आजही विपन्नावस्थेत आहे.
खांदेरी व उंदेरीला जाण्यासाठी यांना संपर्क केल्यास बोटीची सोय होईल.
अश्विन बुंदके ९७६७ ००८४७२ थळमार्गे
अजिंक्य बांद्री ९२७१ ७५९७९५ अलिबागमार्गे
सिध्दगडावर फेरी
सिध्दगडावर फेरी
नाव : सिध्दगड
उंची : ( ३२०० फूट)
प्रकार : गिरीदुर्ग
ठिकाण : ठाणे, महाराष्ट्र
जवळचे गाव : सिध्दवाडी,म्हसा,मुरबाड
डोंगररांग : दमदम्या
गेली सात दशके दरवर्षी २ जानेवारी रोजी मुरबाड (जि.ठाणे) तालुक्यातील सिध्दगड येथे भाई कोतवाल व हिराजी पाटील या दोन हुतात्म्यांना अभिवादन करण्याची, त्यांच्या स्मृती जपण्याची जी परंपरा जोपासली जात आहे.हे विशेष
सिध्दगडावर येण्यासाठी मुंबईकरांनी कल्याणमार्गेमुरबाडला तर पुणेकरांनी कर्जत मार्गेमुरबाडला यावे. मुरबाडहून 'म्हसा' फाटया मार्गे 'नारीवली' गावात यावे लागते.
गोरख व मच्छिंद्रगड
कल्याण,मुरबाड,म्ह्साकरीत नारीवली येथे उततलो. वाटचालीला सुरुवात
गडावरील चढाईचा मार्ग जंगलातून आहे.
‘अहुप्या’ तर ‘दमदम्या’ डोंगरांचे कडे या गडाच्या सोबतीला उभे आहेत.
पाणी भरुन घेतले.
’म्हातारी’ वाट दाखवत होती.
ढासळत असलेले प्रवेशव्दार
पठारावरील छोटेसे दगडी मंदीर
मंदीराशेजारील शिलालेख
मंदीराच्या बाजूचा परिसर
सिध्दगडाची वाडी
काही वर्षे या गुहेत एक बाबा राहत होते.आता ते नाहीत.
वाडीतील कौलारु घरे
बुरुजाकडे जाण्याचा मार्ग
टोकाला असलेला बुरुज
बुरुजाच्या बाजुची दरवाजाची कमान
पिंडी
सुकलेल्या गवताच्या काडीसारखा दिसणारा टोळ
आम्हाला निरोप देण्यासाठी उभी राहिलेली वाडीतील काही मंडळी

शांत परिसरातील सुंदर मंदीर
सिध्दगडाची वाडी
काही वर्षे या गुहेत एक बाबा राहत होते.आता ते नाहीत.
वाडीतील कौलारु घरे
बुरुजाकडे जाण्याचा मार्ग
टोकाला असलेला बुरुज
बुरुजाच्या बाजुची दरवाजाची कमान
पिंडी
सुकलेल्या गवताच्या काडीसारखा दिसणारा टोळ
आम्हाला निरोप देण्यासाठी उभी राहिलेली वाडीतील काही मंडळी
सुधागडावरील पदभ्रमण
सुधागडावरील पदभ्रमण
सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणाऱ्या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरी. अतिशय प्रशस्त असे पठार असलेला हा किल्ला एक प्राचीन किल्ला आहे.
अष्टविनायक बळालेश्वरांचे दर्शन घेऊन पाच्छापुरच्या पुढे डोंगरवाडीतून गड च्डह्ण्यास सुरुवात केली.उन वाढले होते.थोडे चढल्यावर दम लागु लागला. आता पाउस यावा असे वाटू लागले.आमचे पावसाणे जणू एकले आणि पाउसाने आम्हाला साथ देण्याचे ठरविले.
लोखंडी शिडीशिवाय गड चढणं जरा अवघडच आहे.
राजगडनंतर आणि रायगडापूर्वी सुधागड किल्ला राजधानी म्हणून महाराजांच्या विचाराधीन होता. पालीमधील सरसगडचा उल्लेख स्थानिक लोक सुधागड म्हणूनच करतात.
सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले.
या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. हा गड विस्ताराने फारच मोठा आहे.शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले.रायगड जिल्हयात पाली पासून जवळ आहे.
गडावरून दिसणारा ’ तैल बैला ’
भोराई मातेचं मंदिर
समोरच एक दीपमाळ दिसते आणि त्यावर एक हत्ती कोरला आहे त्याने आपल्या पाठीवर ती दीपमाळ धरून ठेवलेली आहे. अशी दीपमाळ मी पहिल्यांदाच पाहिली. मंदिरात प्रवेश केला,मंदिरात भली मोठी घंटा आहे. देवीच दर्शन घेतले.जागृत देव्स्थान आहे.नवरात्रात खुप मंडळी गडावर देवीच्या दर्शनास येतात.
अगदी रायगड सारखाच तसाच हुबेहूब महादरवाजा किल्ले सुधागडचा हि दिसून आला. आत शिरल्यावर तटबंदीची थोडी पडझड दिसून आली. महादरवाजाच्या वरती चढून आपोआप मुखातून एक शिवगर्जना झाली. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज कि. आणि बाकीच्या सर्वांनी जय असा मोठा आवाज केला.
हनुमानाचे मंदीर
वाटेत हनुमान मंदिर लागले. एका भल्या मोठ्या झाडाखाली एखादा तपस्वी भासावा असा हा मारुतीरायाचा अवतार. बाजूने पडझड झालेला कठडा, भिंती आणि मध्ये हि असणारी मारुती रायांची मूर्ती मनाला खूप शांती आणि चैतन्यदायी शक्ती देवून जाते.
गडावरील तलाव
सुधागड किल्ल्यावर असणारा पंत सचिवांचा सरकारवाडा हा इ.स. १७०५ साली बांधलेला आहे. चौसोपी आकाराच्या या मजबूत व भव्य वाड्याची अर्धीच बाजू राहिली होती. वाड्याला दोन दरवाजे असून ऐसपैस ओटा आहे. दोन बंद खोल्या आणि एक माडी आहे. पैकी एका खोलीत भांडी असून ती आपल्याला स्वयंपाक करण्यास उपयोगी ठरतात.
तानाजी टाके म्हणून एक तानाजी तलाव लागलं. एका भल्या मोठ्या पाषाणी दगडात कोरलेल्या/खोदलेल्या या तलावातले थंड पाणी प्राशन केलं. आणि विसावा घेतला एक नवल वाटलं हे बांधकाम कौशल्य पाहून काय योजना असेल हा किल्ला बांधताना एका दगडात तलाव खोदने हे काय साधेसुदे काम नाहीय.
पंत सचिवांचा वाड्याच्या बाजुला एका छोट्या घरात, वाड्याची देखभाल करणारी मामी राहते. ही वयस्क असली तरी पूर्ण वाड्यात शेण सारावण्याचे आणि वाडा स्वच्छ ठेवण्याचे काम करते. येणाऱ्या दुर्गाप्रेमिनी हा वाडा साफ ठेवणे अध्यारुतच आहे.
टकमक टोक, शिव मंदिर, बांधीव टाकी, पूर्वेकडील बुरुज, गोमुख असलेलेर टोक, विशाल कोठारे संपूर्ण सुधागड एक परिपूर्णतेच प्रतिक वाटतो. सपाट पठार व त्यावरील असणारी तलाव हे पाहून निसर्गाच एक वरदान त्या दुर्ग दुर्गेश्वाराला लाभलेलं दिसून आलं.
गडावरचे सोबती.
थरारक गोरखगड..
गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण म्हणूनच याचे नाव 'गोरखगड'. मोठा सुळका गोरखगड आणि छोटा मच्छिंद्रगड
गोरखगड आणि मच्छिद्रगडाला तसा ऐतिहासिक वारसा नसला तरी त्यांच्या सुळक्यांमुळे प्रस्तरारोहकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहे.
डावीकडच्या आपल्या छोट्या भावाला, मच्छिंद्रगडाला सतत साथसोबत करणारा.
पण या दोघांच्या शेजारीच सिध्दगड आणि त्याच्या मागे दमदम्या असे दोघं मल्ल
उभे... त्यामुळे हे दोघं भाऊ त्यांच्यासमोर लांबून तसे खुजेच वाटत होते.
गोरखगडाच्या सुळक्यात खोदलेल्या अतिविशाल गुहेसमोर येऊन पोहचतो. समोरच
प्रांगणाखाली भयाण दरीत झुकलेले दोन चाफ्याचे डेरेदार वृक्ष आणि समोरच
असणारा 'मच्छिद्रगड' निसर्गाच्या भव्य अदाकारिचे असीम दर्शन घडवतो.समोर गुहा दिसते. ही गुहा मोठी आहे. पण खालचा भाग खूपच ओबडधोबड आहे. तरी यात २० जण सहज मावतील. गुहेसमोर छोटासा अंगण असावा असा भाग आहे. पण तो भाग तसा खूपच छोटा आहे. इथून थोडा पुढे गेला की चांगल्या पाण्याची टाकी आहेत. खूपच अप्रतिम, गारेगार आणि चविष्ट पाणी या टाक्यात असते.
गडाचा माथा फारच लहान आहे.वर एक महादेवाचे मंदिर आहे आणि समोरच एक नंदी आहे.
माथ्यावरून समोर मच्छिद्रगड, सिध्दगड, नाणेघाटाजवळील जीवधन, आहुपेघाट असा सर्व रमणीय परिसर न्याहाळता येतो.
रॉक पॅचवरून एकएक पाऊल, एकएक पायरी खाली उतरणं जास्त आव्हानात्मक आहे.
दुपारच्या उन्हात गडावरुन उतरताना हात भाजत होते.दगडावर हाताला चटके बसत होते.
मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी, निवा-याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे.
गोरखगडाची किंवा एकूणच सह्याद्रीतल्या सगळ्याच किल्ल्यांची,डोंगररांगांची वेगळीच मज्जा आहे.
गोड आठवणी घेऊन गडावरून सावकाश उतरत थरारक ट्रेक संपला.
नागेश्वरची गुहा
वासोट्या हुन जेवण करुन आम्ही
नागेश्वराच्या गुहेकडे निधालो.आजचा मुक्काम गुहेत करण्याचे ठरले होते. पण
वनखात्याच्या रक्षकाने तेथे राहण्याची परवाणगी दिली नव्ह्ती. दाट जंगलातील वाटेने तेथील वन्य प्राण्यांना त्रास न देता पुढे निधालो.
नागेश्वर फाट्याजवळ आलो की सुरु होतो घनदाट जंगलातला पायगाडीचा एक सुखद प्रवास आहे.. पुढे आल्यावर धारेवरून व पुरळ असलेल्या मातीच्या वाटेने प्रवास सुरु होतो. घसरण्याची शक्यता असल्याने
सावधतेने या वाटेने गुहेकडे जाताना आपल्याला परिक्ष द्यावी लागते.नागेश्वराची गुहा ही राहण्यासाठी उत्तम जागा आहे. येथे २० ते २५ जण आरामात राहू शकतात.नागेश्वराच्या गुहेकडे जातांना, पायर्य़ांच्या उजवीकडून जंगलात जाणारी वाट पाण्याच्या विहीरीपाशी घेऊन जाते.
नागेश्वरला भेट दिल्याशिवाय वासोट्याची भेट पूर्ण होऊच शकत नाही. वासोट्यावर जाताना समोरच एक सुळका आपले लक्ष वेधून घेतो, त्यालाच नागेश्वर म्हणतात. या सुळक्याच्या पोटात एक गुहा असून, तेथे महादेवाचे मंदिर आहे.
गुहा गाठली.. बर्यापैंकी मोठी.. फरशी घालून कठडा बांधलेला.. तिथेच मध्यभागी महादेवाचे मंदीर.. वरतून कातळाच्या छतातून झिरपणार्या पाण्याचे नेमके पिंडीवर अभिषेक करणारे थेंब.. बाजूलाच त्रिशूळ.. नि समोरच असलेल्या नंदीच्या पाषाणातील तुटलेल्या अवस्थेतील दोन तीन मुर्त्या आहेत.
गुहेतून पाहिलेला सुर्यास्त
गुहेतून पाहिलेला सुर्योदय
गुहेकडून चोरवणे जाण्य़ाची तयारी
उभी उतरण असल्याने सावधानता बाळगावी लागते.
चोरवण्याच्या दिशेने दिसणारी नागेश्वराची गुहा.
दोन दिवसाचा ट्रेकची मजा घेत आम्ही घरी फिरलो. पुढेची ट्रेकची आखणी करीत.
किल्ले वासोटा -अनोखे दुर्गरत्न
नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे.सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात भटकणाऱ्यांवर वासोटा या शब्दाची विलक्षण मोहिनी आहे.
वासोटा किल्ला ४२६७ फूट उंचीचा हा
किल्ला वनदुर्ग प्रकारातील आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कोयना
डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
वासोट्यालाच ‘व्याघ्रगड’ असेही दुसरे नाव आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या
दुर्गमतेमुळेच हा भाग वन्यजीवनाने समृद्ध बनला आहे.महाराष्ट्रातील, कोयना
नदीच्या खोर्य़ात, निबिड अरण्यात वसलेला दुर्ग म्हणजे 'किल्ले
वासोटा'..किल्ले पद-भ्रमण करणाऱ्या हौशी तरुणाचा हा आवडता किल्ला
आहे.अत्यंत पुरातन ,निबिड अरण्याने वेढलेला असा हा दुर्गम दुर्ग आहे.
साता-याहून ‘कास’ नावाच्या पुष्प पठाराला
मागे टाकून त्याच रस्त्याने पुढे गेलो असता दुरवर एक विस्तृत जलाशय
पसरलेला दिसतो.. त्याच्याच दिशेने पुढे खाली उतरलो की बामणोळी हे सुंदर नि
छोटेसे गाव लागते..
तेथून शिवसागर जलाशयातून बोटीने करावा लागणारा प्रवास हाच ट्रेकमधील उच्च आकर्षणबिंदू होता..
‘वासोटा’ ट्रेक करायचा असेल तर इथेच वनखात्याकडून रितसर परावनगी घ्यावी लागते
कोयना जलाशयाचे विलोभनीय दर्शन
बोट हळूहळू खर्या अर्थाने जलाशयाच्या
पोटात घुसू लागली..प्रवाहाच्या दोन्ही बाजूला जंगल नि जंगल.. जिथे चाहूल
कुणाचीच नाही.. आवाज फक्त बोटीतल्या मोटारीचा… नि पाणी कापताना होणार्या
खळखळाटाचा.. ! बोट जितकी पुढे सरकत होती तितके पाणी स्तब्ध होत गेलेले..
मग त्या स्तब्ध पाण्यावर पडलेल्या काठालगतच्या झाडांच्या आकृत्या बघण्यात
मन केव्हा गुरफुटून जाते ते कळतही नाही….
बजरंगाचे छप्पर नसलेले देउळ आहे.. पण मुर्ती छान आहे..
शिवसागर जलाशयाचे पाणी वासोटा
किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते.बोटीतून उतरल्यानंतर वनविभागाचे
कर्मचारी पुन्हा प्रत्येकाची नोंद घेतात.साहित्य तपासतात.विशेषत: प्लास्टिकच्या बाट्ल्या.नेलेल्या परत आणल्या नाहित तर दंड वसूल करतात.
सूर्यकिरणांना जमिनीपर्यंत पोचू देत नाही
असे घनदाट जंगलातून गडचढाई सुरु होते. कोयनेच्या जंगलात झाडांच्या
माहितीसोबतच वेगवेगळ्या वन्य पशूंची माहितीही त्यांच्या चित्रांसकट दिलीय.
ही सर्व श्वापदं या जंगलात आहेत.या अभयारण्याचं वैशिष्ट्य म्हणजे संपन्न
वृक्षवल्लींबरोबर वन्यजीवांमध्येही वैविध्य आहे. वाघ, बिबळ्या, गवा,
अस्वलं, रानकुत्र्यांच्या कळपापासून धनेश, सोनपाठी सुतार, तुर्रेवाला
कोतवाल, सर्प गरुड, समुद गरुड आदी कैक जाती-प्रजातींच्या पशुपक्षींचं
वास्तव्य आहे.
गडावर एक महादेवाचे मंदिर आहे.
माचीवरुन घनदाट जंगल, कासचं पठार, कोयनेचा विस्तीर्ण जलाशय, महिपतगड, महिमंडनगड, पालगड व सुमारगडाचं विहंगम दृश्य नजरेस पडते.
तोरणा ते राजगड ( तोरणा किल्ला ) - भाग १
पावसाळा संपला,दिवाळी संपली आता हिवाळा सुरु होत असल्याने तोरणा ते राजगड या ट्रेकचे आयोजन
केले.मित्रमंडळी जमली दोन दिवसात करण्याचे ठरले. गुरुवारी मुंबईहून निधून
पुण्यात शुक्रवारी पहाटे पोहोचलो. स्वारगेटहून 'वेल्हे' या एसटीने
प्रवास करीत 'वेल्हे ' गावात पोहोचलो.तेथून चहापाणी करून ' शिवाजी महाराज कि जय ' या धोषणा देत मोहीमेला सुरुवात केली. थंड वातावरणा मावळे जोशात चढाई करीत होते.समोर आव्हान उभे आहे.इतिहासाची उजळणी करीत गप्पा गोष्टी
चालल्या होत्या.
चालल्या होत्या.
तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर.
कानदखोऱ्यात हा गड आहे. खूप उंच उंच उंच. तोरण्याइतका उंच गड तोरणाच. डोंगरी किल्ल्यांत त्याचे स्थान वडीलपणाचे. तोरणा जसा उंच तसाच रुंदही आहे. गाडला दोन माच्या आहेत
छत्रपती शिवरायांनी सुरुवातीच्या कालखंडात जिंकलेल्या किल्ल्यापैकी तोरणा किल्ला आहे.
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी निवडक मावळ्यांसह तोरणा किल्ला जिंकून छत्रपतींनी स्वराज्याचे
तोरण उभारले होते.
छत्रपती
शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला
म्हणजे तोरणा. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जिंकलेला हा किल्ला पाहण्याची
उत्सुकता सर्वांनाच असते. गडावर
तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा. महाराजांनी
गडाची पहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे "प्रचंडगड' असे नाव
ठेवले. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या
रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर
तोरणा व राजगड वसलेले आहेत
बिनीव्दार
बाजुचा परिसर पाहण्यात गुंतलो.थोडी विश्रांती घेतल्यानतंर उभी चढाई करीत 'बिनी दरवाजा' शिरलो.
कोठीव्दार
बिनी दरवाजा आणि त्यापाठोपाठच्या कोठी दरवाजातून आपण थेट बालेकिल्ल्यातच शिरतो.
हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुनहा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स.1470 ते 1486 च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात 5 हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स.1704 मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करू न आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.
झुंजार माची
झुंजार माची खरोखरच झुंजार आहे. भक्कम तट आणि खाली खोल खोल कडे आहेत. महाराष्ट्रातल्या अत्यंत बळकट व अत्यंत बिकट किल्ल्यांच्या पंगतीत तोरणाचा मान पहिला .
हनुमान बुरुजाच्या तटावरुन खाली उतरुन दिंडीच्या दाराने झुंजार माचीकडे जाता येते.
मंदीरात राहण्याची सोय आहे.आम्ही गँस नेल्याने खिचडी व जेवण
बनविले.जवळच पाण्याची टाकी आहे.मस्त मजा केली.थंडीत असल्याने शेकोटी व
कँम्प फायरची घेतली.तंबू लावले होते.
आमच्यासह मंदीरात राहण्य़ास पुण्यातून एक ग्रुप आला होता.मस्त आडदांड होते.त्यांची बोंबाबोम व दंगामस्ती सुरु होती.तीन दिवस तेथे मंदीरात राहाणार होते.काय करणार विचारल्यानतंर आम्ही मस्त आराम करणार असे त्यानी सांगितले.मी गडाघून निघताना 'या तरुणांना येथे गडावर कोणतेतरी कामे करण्याचीऐ इच्छा निर्माण व्हावी' अशी प्रार्थना मेंगाई देवी कडे केली.ती मंडळी तेथे राहणार असल्याने गडावर ते कोणतीही काम करु शकले असते.
आमच्यासह मंदीरात राहण्य़ास पुण्यातून एक ग्रुप आला होता.मस्त आडदांड होते.त्यांची बोंबाबोम व दंगामस्ती सुरु होती.तीन दिवस तेथे मंदीरात राहाणार होते.काय करणार विचारल्यानतंर आम्ही मस्त आराम करणार असे त्यानी सांगितले.मी गडाघून निघताना 'या तरुणांना येथे गडावर कोणतेतरी कामे करण्याचीऐ इच्छा निर्माण व्हावी' अशी प्रार्थना मेंगाई देवी कडे केली.ती मंडळी तेथे राहणार असल्याने गडावर ते कोणतीही काम करु शकले असते.
तोरणाला बिलगून खालच्या बाजूस असणार्या डोंगराच्या सोंडेवर बांधलेली ही माची निव्वळ अप्रतिम.
झुंजार माचीकडे जाण्याकरिता येथून एक छोटीसी शिडी उतरवून जावे लागते. आणि पुढे एक rock patch आहे तो पार केला कि ( येथून जरा सांभाळून उतरावे लागते नाहीतर थेट खाली पडण्याची शक्यता ) आपण पोहोचतो झुंजार माची वर. झुंजार माचीचा बांधकाम नावाप्रमाणेच शोभून दिसतं. या रस्त्यावर सदरेचे उद्वस्त अवशेष आहेत.
झुंजार माचीवरून गडाचा गड राजगड रुबाबदार पणे उभा दिसला, अस वाटत होत की तो पण आम्हाला बोलवत आहे.
तोरणा वरचा सुर्यास्त
बाजुला बुधला माची
मेंगाई देवीचे मंदीर
बुधला माचीच्या मध्यभागी एक डोंगराचा सुळका उभा आहे व त्या वर एक प्रचंड आकाराचा दगड अनेक शतकांपासून आजही आहे. त्यामुळे तो लांबून एखादया तेलाच्या बुधल्या सारखा म्हणजे रांजणासारखा दिसतो. म्हणून या चिंचोळ्या माचीला बुधला माची म्हणतात.
बुधला माची
बुधला माचीकडचा परिसर बघायचा होता... या माचीकडे जाणार्या वाटेने कोकण दरवाज्यापाशी आलो नि थांबलोच.. इथून तोरणाची एक महत्त्वाची नि वैशिष्ट्यपुर्ण असलेली बुधला माची संपुर्णपणे नजरेत भरत होती.
हा तोरणा अत्यंत बळकट, बिकट गड आहे. काळेकभिन्न, ताठ भिंतीसारखे कडे, अत्यंत अरुंद वाटा, भक्कम दरवाजे, काळ्या सापासारखी वळणे घेत सळसळत जाणारी तटबंदी, अचूक मारा साधणारे बुरुज आणि गडाच्या सर्वोच्च माथ्यावर बालेकिल्ला असे तोरणाचे रांगडे सौंदर्य शिवरायांच्या नजरेत भरले.
कोकण दरवाजा
बुधला माचीला मागे ठेवून खाली उतरण्यास लागलो.
तोरणा किल्ल्याचा नकाशा
तोरणा ते राजगड - भाग २
पहाटेच्या सुर्योदयाचे दर्शन घेउन सँक पाठीवर चढवली.'मेंगाई देवी'चे आर्शिवाद घेऊन निघालो.
तोरणाच्या या कड्यावरून नजरेत दिसतो 'तोरणा-राजगड' या ट्रेकचा मार्ग. बुधला माचीपासून डोंगरांची रांग सुरु होते ती थेट राजगडच्या संजीवनी माचीपर्यंत.एक एक डोंगर पार करीत संजीवनी माचीपर्यत पोहचतो.
बुधला माचीपर्यतची वाट प्रेक्षणीय आहे.डोंगराच्या सोंडेवर चालत चालत
पुढे बुधला पाहत उतरत जातो.फोटोग्राफ्रीला चांगला वाव येथे आहे. सावधतेने
मजा करीत करीत समोरचा परीसर न्याहाळत खाली उतरलो.
समोर राजगड दिसत असल्याने कधी तेथे पोहचतो असे वाटते.वाट सरळ पुढे जात असते ती वाट पकडून
चालायला सुरुवात केली.मध्ये मध्ये कारवीची बेठे लागतात.त्यातून जाताना थंडगार वाटते.
'तोरणा' गडाला मागे ठेवीत 'राजगडा'च्या दिशेने वाटचाल सुरु होती. मध्ये थोडी विश्रांती घेतली.या मार्गात
फक्त एक घर मिळते.आम्ही तेथे सगळे जमलो.त्या घरातून ताक घेतले.निघणार
इतक्यात आमच्यातल्या एका मित्राने त्याचा किंमती कँमेरा रस्त्यात पडला, अशी
ओरड केली.आमच्या सगळ्यांच्या सँक तपासल्या. आमच्यातले दोघे आलेल्या वाटेने
मागे कँमे-याच्या शोधात निघाले.खुप अंतर मागे गेले तरी त्याना कँमेरा
सापडला नाही.मागे फिरल्यावर वाटेत दो ट्रेकर भेटले ते त्याच वाटेने
'तोरणा' गडाकडे निघाले होते.माझ्या मित्रानी त्या दोघाना कँमे-याची माहिती
दिली व मोबाईल नबंर दिले. कँमेरा मिळाल्यास कळविण्याची विंनती करुन ते मागे
फिरले. ज्याचा कँमेरा हरवला तो निराश झाला होता.त्यानी 'कँमेरा विसरा व
पुढची वाटचाल सुरु करा' अशी विंनती केली.त्याचा कँमेरा हरवल्याने मला खुप
वाईट वाटले.
आम्ही सगळे आता पुढे काय करायचे या विचारात होतो.आमच्यातल्या एकाने
कँमे-याच्या शोधात मागे जाण्याची तयारी दाखवली. त्याच्यासह दुसरा मित्रही
तयार झाला.त्यावेळेला तो ट्रेक अर्धवट टाकून कँमे-याच्या शोधात निघणे ही
आमच्यासाठी मोठी गोष्ट होती. ज्याला ट्रेकला जाण्याची आवड आहे तोच मित्र
मागे फिरण्यास तयार झालेला पाहून आम्हा सर्वाना खुप वाईट
वाटले.फोटोग्रीफीची त्याला मोठी आवड असल्याने कँमेरा हरवल्याचे त्याला दु:ख
झाले होते.या कारणामुळेच तो मागे फिरत होता.आम्ही सर्व गोंधळलेले
होतो.ज्याचा कँमेरा हरवला तो त्या दोघा मित्राना कँमे-याच्या शोधात मागे
पाठविण्यास तयार नव्हता.'माझा कँमेरा विसरा आपण पुढे चला' असा त्याचा आग्रह
होता. 'तोरणा' गडाचा उतारण्याचा पँच असल्याने ज्याचा कँमेरा हरवला होता तो
मगे जाण्यास तयार नव्हता.
शेवटी त्या दोघाना खाण्याचा वस्तू दिल्या.ते लगेच निरोप घेऊन निघाले
आम्ही राजगडाच्या दिशेने निघालो. या गडबडीत आमचा दिड तास वाया गेला.उन्ह
चढल्याने पुढची वाटचाल त्रासाची झाली.कडक उन्हात उभी चढ असल्याने दमछाक
झाली.आमच्या टिममधले दोघेजण नसल्याने आम्ही हताश झालो होतो.सगळेजण शांततेत
चालत होते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
समोर संजीवनी माची हाकेच्या अंतरावर दिसत होती. संजीवनी माचीचा भव्य
बुरुज खालून विलक्षण दिसत होता. व त्यावरील भगवा ध्वजामुळे त्याला वेगळाच
साज चढला होता.
आता चढाईला वेग आला होता.आम्ही माचीवर पोहचलो.धोषणा दिल्या.तेथे ताक
घेऊन लहान मुलीनी आमचे स्वागत केले. ताक पिऊन शांत झाल्यावर पुढे
निघालो.माचीची तटबंदी पाहून थक्क झालो.बाजुचा परीसर पाहिल्यानंतर आमचा
क्षीण नाहिसा झाला.समोर दुरवर 'तोरणा' गड दिसत होता.आम्ही केलेल्या
ट्रेकचे अंतर पाहून आमच्या पायावर आमचा विश्वास बसत नव्हता.
आम्ही मचीवरून बालेकिल्ल्याकडे निघालो.इतक्यात माझा मोबाईल
वाजला.मुंबईहून फोन होता.'आपला हरवलेला कँमेरा मिळाला' हे वाक्य ऐकल्यावर
मी मोठ्याने 'कँमेरा मिळाला' अशी आरोळी ठोकली.सर्वजण ओरडत नाचू लागले.
आनंदाला उधाण आले.ज्याचा कँमेरा हरवला होता त्याला सगळ्यानी शुभेच्छा
दिल्या. तो तर आंनदाने व मित्राने घेतलेल्या परीश्रमाला आलेल्या यशामुळे
रडू लागला होता. जे दो ट्रेकर 'तोरणा गडा' कडे गेले होते त्याना
रस्त्यात कँमेरा पडलेला मिळाला.त्यानी फोन करण्याचा प्रयत्न केला पण
त्याठीकाणी
रेंज नसल्याने आमच्याशी संपर्क साधू शकले नाहीत.आमच्या दोघा मित्रांनी त्या दोघाना 'तोरणा गडा ' वर भेटून ओळख सांगितल्यावर त्यानी कँमेरा दिला. ते दोघे सच्चे ट्रेकर होते.
मी माझ्या कँमे-यासाठी मागे जायाला पाहिजे होते.पण त्या कामासाठी माझे
मित्र मागे गेले आणि त्यानी कँमेरा मिळविला होता.त्या दोघानी माझ्यासाठी
त्रास घेतला होता.याची त्याला सारखी जाणीव होत होती.
रेंज नसल्याने आमच्याशी संपर्क साधू शकले नाहीत.आमच्या दोघा मित्रांनी त्या दोघाना 'तोरणा गडा ' वर भेटून ओळख सांगितल्यावर त्यानी कँमेरा दिला. ते दोघे सच्चे ट्रेकर होते.
दुस्र-याच्या आनंदासाठी आपला आंनद पणाला लावण्याची धडाडी दाखवणा-या आमच्या मित्राना माझा सलाम. ही शोध मोहिम हाती घेणारे मित्र आमचे हीरो ठरले होते.
आम्ही त्या दोघा मित्राना फोन करीत होतो.पण लागत नव्हता.त्यांच्याशी
बोलण्यास आम्ही आतूर झालो होतो.पण ते दोघे तेथून सरळ तोरणा गडावर गेले व
तेथूनच रात्री गड उतरून मुंबईला गेले.
आम्ही संजीवनी माचीवरून आंनदात निघून बालेकिल्याच्या बाजूने
'पद्मवती माची'कडे निघालो. राजगडावर आम्ही राहिलो.रात्री कँमफायरला
कँमेरा मिळाल्याने वेगळीच मजा आली.
तोरणा ते राजगड ( राजगड किल्ला ) - भाग 3
शिवरायांनी स्थापन केलेल्या राज्याचा गड म्हणजे, किल्ले राजगड
अभेद्यतेचे दुसरे रुप असलेला बालेकिल्ला, चिलखती तटबंदीचे बांधकाम, नेढे अशी वैशिष्ट्ये बाळगणारा एकमेव गड म्हणजे राजगड ! राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले राजकीय केंद्र.
या गडाला उत्तरेस पद्मावती, आग्नेयीस सुवेळा आणि नैर्ॠत्येस संजीवनी अशा तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. याचा तट व बुरूज अनेक ठिकाणी दुहेरी म्हणजे चिलखती आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले राजकीय केंद्र.
राजगडाचे रूप कायम चिरतरुण, लोभस असे. कुठल्याही ऋतूत पाहावे असे. त्याच्या पहिल्या दर्शनातच तो प्रेमात पाडतो.
आज राजगडावरचा बालेकिल्ला व सुवेळा माची पाहून आम्ही खाली उतरण्यास सुरुवात करणार,अशाने ट्रेक
संपणार म्हणून वाईट वाटत होते. माझा
आवडता गड असल्याने कधीही या गडावर जाण्यास आनंद होतो.वेगवेगळ्या
मोसमाप्रमाणे वेगवेगळे रुप पाहण्यास मिळते.हा गड पाहण्यासारखा आहे.गडावर
वेगवेगळ्या वाटेने जाता येते.पण पुणे-वाजेघर बसने वाजेघरला उतरुन
वाजेघर-पाली मार्गाने पाली दरवाज्याने गडावर जाणे सोपे आहे.काल आम्ही संजिवनी माचीकडून अळु दरवाजाने चढलो होतो.
थंडी कमी होती.सँक देवळात ठेवून आम्ही सुर्योदय पाहण्यास बालेकिल्ल्याकडे निघालो.दमछाक करणारी उभी चढण चढलो. गडमाथ्यावरील बोच-या ने आमचे स्वागत केले.
मावळ खोर्यावर करडी नजर ठेवता येण्यासारख्या जागी असलेला. २६ वर्षे मराठी राज्याची राजधानी असलेला गड. राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली. स्वराज्याची ती राजधानी आपल्या शिवबाजी , इथल्या रयतेची राजधानी, त्या राजधानीत जिथे आपल्या राजाचं २५ वर्ष वास्तव्य होतं , जिथे अनेक सुख दुखाचे प्रसंग स्वतहा ह्या किल्ल्याने पहिले , इथल्या मातीने अनुभवले , इथली प्रत्येक वास्तू त्याची साक्ष देत अजूनही खंबीरपणे उभी आहे , ते पाहूनच उर भरून येतो .
बालेकिल्ल्याच ते रांगड रूप
राजगडाचा बालेकिल्ला जणू किल्ल्यावर किल्ला असल्यासारखा आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. इथेही थोडा शारिरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो.हा बालेकिल्ला चढायला जेवढा अवघड तेवढीच काळजी तो उतरताना घ्यावी लागते अन्यथा केव्हा तुम्ही खाली याल हे कळणार पण नाही .. तीच काळजी घेत घेत आम्ही बालेकिल्ला उतरायला सुरुवात केली.
गुंजवण्यातून
गुंजण दरवाजाने, साखरमधून चोरदिंडीने, वाजेघर-पालीतून पाली दरवाजाने आणि
भूतोंडेतून अळू दरवाजाने राजगडात शिरता येते. यातली पाली दरवाजाची वाट
तेवढी सामान्यांसाठी अन्य वाटा डोंगरदऱ्यात संसार मांडणाऱ्यांच्या साठी.
संजीवनी
चिलखती बुरुज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची
वैशिष्ट्ये आहेत. चिलखती म्हणजे दुहेरी तटबंदी. शत्रूसैन्याने जीवाचं रान
करून बाहेरील तटबंदी पाडली की त्याला आतली तितकीच भक्कम दुसरी तटबंदी
दिसते. अवसान गळाल्यासारखी अवस्था होते त्याची. शत्रू पुन्हा तयारी
करेपर्यंत मावळे बाहेरील तटबंदी पुन्हा बांधून घ्यायचे.
राजगडावर जाऊन आल्यावर प्रत्येक जण शिवप्रेमी आणि दुर्गाप्रेमी होतो हे नक्कीच आहे. राजगडाचे गडपण अजून टिकून आहे , त्यामुळे गडावर जायला चांगले वाटते.
संजीवनी माची तब्बल दीड ते दोन किलोमीटर लांब पसरलेली आहे. या दरम्यानच्या तटात तब्बल १९ बुरूज येतात.सर्पाकार होत धावणारी दुहेरी तटबंदीची ही माची दूरवरून एखादी सळसळती नागीणच वाटते.
पद्मावती देवी
पद्मावती माची
पद्मावती माचीवर बऱ्यापैकी सपाटी असल्याने शिवकाळात इथे मोठी वहिवाट होती. राजांचा राहता वाडा, हवालदार-किल्लेदाराचे वाडे, शिबंदीची घरे, रत्नशाळा, सदर, पद्मावती-रामेश्वराचे मंदिर, सईबाईंची समाधी, पद्मावती तलाव व अन्य तळी, धान्याची- दारूगोळय़ाची कोठारे, चोरदिंडी, गुंजण दरवाजा या साऱ्यांमधून ही माची बराच इतिहास सांगते.
सुवेळा माची
राजगड अन तोरणागड (प्रचंडगड)………. शिवशाहीतली दोन बलदंड-प्रचंड पुराणपुरुष………
एकानं महाराजांनी उधळलेल्या "स्वराज्याच्या" भंडाऱ्यानं स्वतःचं मळवट पहिल्यांदा भरून घेण्याचा मान
मिळवला……. पोटात लपवलेला खजिना स्वराज्यासाठी राजांच्या पायी रिता केला…… तर दुसऱ्याने पंचवीस वर्ष राजांना निर्धारानं पोलादी पंखाखाली घेतलं…… स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून मरातब मिळवला…….या दोन पुराणपुरुषांचं एकमेकांशी काहीतरी नातं नक्की असणार…… सुवेळा-झुंझार,बुधला-संजीवनी ह्याची नाळ नक्की एकचं असणार……. मेंगाई-पद्मावती नक्कीच बहिणी-बहिणी असणार…… त्याशिवाय काय गेली शेकडो वर्ष झाली सूर्योदयाला राजगडाची सावली प्रचंडगडाच्या भेटीला दौड मारते तर सूर्यास्तावेळी तोरणागडाची सावली राजगडाच्या गळाभेटीला येते.
गडावरुन पाहिलेला सुर्यास्त
पद्मावती तलाव
बालेकिल्ल्याचा महादरवाजा
दरवाजाचे हे शिल्प म्हणजे उभ्या कातळातील एक सुरेख कोंदण!
बालेकिल्ल्याचा महादरवाल्यातून सुवेळा माची
सुर्योदयाने गडाचा परिसर सोनेरी केला.आमच्या कँमे-याने क्लिक क्लिक सुरु
केले. ते द्दश्य नजरेत साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो. बालेकिल्यावर
इतिहासाच्या खुपश्या खुणा अस्तिवात आहेत.
सुवेळाचा लयबद्ध आविष्कार, उजवीकडचे भाटघर धरणाचे पात्र, नुकतीच उठू पाहणारी छोटी खेडी, धुक्यात उलगडत जाणाऱ्या सहय़ाद्रीच्या रांगा आणि या साऱ्या चित्रावर आपली पावले उमटवत निघालेली पूर्वा!
बालेकिल्ल्याहून दिसणारी संजीवनी माची
बालेकिल्ल्यावरून
सिंहगड, रायगड, तोरणा असे अनेक गड दृष्टीस पडतात .. खरच महाराज याच
बालेकिल्ल्यावरून सबंध स्वराज्यावर कशी देखरेख ठेवत असतील याची कल्पना येते
.. बालेकिल्ल्यावर उभे राहिल्यास असे वाटते जणू गरुड भरारी घेण्या साठी हे
आसमंत आपल्याला बोलावत आहे .. एका उत्तुंग शिखरावरती आम्ही पोचलो होतो
याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. बालेकिल्ल्यावर येऊन आमची मोहीम सार्थकी लागल्या सारखे वाटत होते
स्वराज्याचे पहिले पाऊल ते हिंदवी सत्तेचा तो उत्कर्ष, सारे, सारे या गडाने पाहिले.
सुवेळा माची
या
गडाला पद्मावती, संजीवनी आणि सुवेळासारख्या तीन लढाऊ माच्या मिळाल्या. जणू
स्वराज्यासाठी लढणाऱ्या या महिषासुरमर्दिनी, दुर्गा आणि कालीच! स्वराज्याच्या राजधानीचे हे जणू बलदंड बाहू.मुघलांच्या आक्रमणावेळी या माच्यांनीच अगोदर हा गड लढवला.
सुवेळाच्या मधोमध एक कातळ उभा ठाकला आहे. समोरून त्याचा आकार एखाद्या हत्तीसारखा वाटतो. या कातळाच्या पोटात शे-पन्नास माणूस बसू शकेल असे आरपार पडलेले छिद्र आहे. या भौगोलिक आविष्कारास कोणी 'नेढे' म्हणतात.
म्यान दरवाजा
राजदरवाजा
काल गडावर पोहचल्यानतंर वाटेवर बाया ताल विकायला बसलेल्या
दिसतात. आम्हीही ताक घेतले.ताक पिताना गप्पा मारताना त्या ताकवाली बाईने
आमच्या पुढच्या कार्यक्रामाची माहीती घेत आम्हाला उद्याचे जेवण गडावरून
खाली उतरल्यावर गडाच्या पायथ्याशी असलेल्या गांवात देण्य़ाचे प्रस्ताव
मांडला.गडाच्या पायथ्यापासून तिच्या घरापर्यत व घरापासून पूण्यापर्यत
जाण्यास गाडीची (ट्रकस्)करून देण्याचाही प्रस्ताव मांडला.आमच्यातल्या
काहीनी तिचे फोन नंबर घेऊन उद्या कळवतो असे सांगून आम्ही पुढे निघालो.
रात्री आम्ही सर्वानी ताकवालीने दिलेल्या प्रस्तावाचा विचार केला व सोयीचे ठरल्याने उद्या तिला फोन करून
जेवण करण्यास सांगायचे ठरले. दुस-या दिवशी तिला तसा निरोपही
दिला.जेवणाचा प्रश्न सुटलेला असल्याने व पायथ्याशी गाडीची सोय असल्याने
सगळे निर्दास्त झाले होते. बालेकिल्ला व सुवेळा माची पाहून आम्ही पद्मावती
वरील देवळातून सँक उचलल्या व धोषणा देत खाली उतरण्यास सुरुवात केली.फोटो काढीत काढित पाय-याने पाली दरवाज्याने पटापटा खाली उतरत होतो.गडावर जाणा-यांची गर्दी होती.दम टाकीत मंडळी चढत होती.
आम्ही लवकर पायथ्याला पोहचलो.ती ताकवाली व तिचा नवरा आमची वाट पाहत
होता.आम्हाला पाणी देऊन आमचे स्वागत केले. आम्ही गाडीची चौकशी केली. गाडीला
यायला वेळ लागेल .मागच्या गावात आलेली आहे. गाडी येईपर्यत आपण आमच्या घरी जाऊया तेथे तुम्ही जेवा तोपर्यत गाडी पोहचेले.असे तिच्या
नव-याने आम्हाला आश्वासन दिले.दोन दिवस घरचे जेवण न मिळाल्याने वेगळीच भूक लागली होती.आम्ही तिच्या घरी जेवण्यास निघालो.
पाली गांवातून तीचे घर तीन किलोमीटर दूर होते.त्याचवेळी मला तिचा नवरा आम्हाला फसवित असल्याचे कळले. रस्त्यात मी त्याला गाडीबद्द्ल सारखे विचारत होतो. मला काळजी लागलेली जर गाडी आली नाहीतर आपल्याला हे तीन किलोमीटर पुन्हा चालत पाली गांवात यावे लागणार आणि नतंर गाडीची सोय पाहावी लागणार.तो गाडी येण्याचे आस्वासन देत होता.पण मला आपण फसल्याचे कळले होते.यानी आपल्याला गाडीचे आमिश दाखवून जेवणाचे गि-हाईक कापले होते.धापा टाकीत स्वत:लाच शिव्या देत तिच्या घरी पोहचलो.कसेतरी जेवलो.जेवणाकडे लक्ष नव्हते.माझे कान गाडीच्या आवाजाकडे होते.जेवण झाले.ठरल्याप्रमाणे जेवणाचे पैसे दिले.तरीही गाडी आली नव्हती.तिचा नवरा फोन करीत होता.मी त्याच्यावर भडकलो होतो.तू आम्हाला फसविले याबद्द्ल आम्हाला वाईट वाटले. लांबलाबून लोक या गडावर येतात त्यांच्याकडे गाड्या नसतात . सार्वजनिक वाहनानी प्रवास करणा-या मंडळीना असे आड रस्त्याला आणून गाडीचे आमिश दाखवून जेवणाचे पैसे लाटून फसवू नका. असे सांगून मी मित्रासाह तेथून दहा किलोमीटर चालत आलो.तेथून वाहने बदलत पुण्याला साडेसहा पोहचलो.मुंबईला घरी पोहचण्यास रात्रीचे
बारा वाजले.
आपल्या ट्रेकर मित्रानी आमच्या सारखे फसू नये.यासाठी ही माहीती दिली आहे.
असे त्या ताकवालीचे जेवण महागात पडले.ट्रेक मस्त झाला .हरवलेला कँमेरा मिळाला.पण आपण फसलो गेलो याची मात्र खंत लागून राहीली.

नवख्यांसाठी खास सोय
किल्ला कोहोज
मुंबईच्या उत्तरेस गुजरातकडे जातांना ठाणे जिल्ह्याचा पालघर हा विभाग लागतो. या परिसरात अनेक लहान मोठे गडकिल्ले अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. यापैकी वाडा पालघर रस्त्यावरचा 'कोहोज ' हा प्रमुख किल्ला.
महाराष्ट्रात घडवण्यासाठी किती लढले किती धारातिर्थी पडले, कितींनी आपले प्राण गमावले याला गणती नाही. अशा या महाराष्ट्राचा इतिहास आजही काही गड कोटांमध्ये दडलेला आहे. असे अनेक गड किल्ले आपल्यासारख्या भटक्यांची वाट पाहत आहे. ज्याप्रमाणे इतिहासाला कित्येक मावळे, कित्येक गुप्तहेर माहीत नाहीत, त्याचप्रमाणे कित्येक किल्ल्यांबद्दलचा इतिहास सांगता येत नाही. त्यापैकीच एक किल्ला आहे ठाणे जिल्ल्ह्यातील कोहोज नावाचा गड होय.
हा गड म्हणजे भोज राजाची निर्मिती आहे असे अनेक अभ्यासकांचे मत आहे पण ठोस पुरावा मात्र कोणाकडेच नाही. गुजरातच्या राजा कडून हा गड पोर्तुगिजानी जिंकला त्यानी ह्या किल्लाला तट व बुरुज उभारून तो बळकट केला. पुढे १८ व्य शतकात पोर्तुगीज अणि मराठे युध्दात हा किल्ला पेशव्यानी जिंकला. त्या नंतर इत्तर किल्ल्या प्रमाणे हां ही किल्ला इंग्रजांनी बळकावला.
मुबंई व ठाण्याहून अकरा जण, दोधे कल्याण हून तर चौघे भांयधर हून वाड्याला भेटलो तेथून नाणे गांवात पोहचलो.
समुदसपाटीपासून १९०० फूट उंच उंचावर हा किल्ला आहे. गडावर जाण्यासाठी वाडा तालुक्याहून थेट गडाच्या पायथ्याशी असलेल्या नाणे गावापर्यंत एसटीनं जाता येतं. गडावर दक्षिणोत्तर प्रवेशद्वार भग्नावस्थेत आहे, तर गडाचे अनेक बुरूज आणि तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहेत.
गडावर कुसुमेश्वराचं मंदिर आहे. मंदिराजवळ दोन पाण्याच्या टाक्या आहेत. थोडं पुढे गेल्यावर एक गुहेसारखं तळघर आहे. या गुहेत पाकोळ्यांची वस्ती असल्यानं आत शिरताच उग्र वास आणि पंखांचा फडफडाट ऐकायला येतो.
पण
गडावर चढताना आजूबाजूचा निसर्ग आपलं मन मोहून टाकतो. गडाच्या उत्तरेककडून
देहरजा तर दक्षिणेकडून पिंजाळ या तानसा नदीच्या उपनद्या असल्यानं तिथला
परिसर हिरवागार झालेला आहे.
मारुतीचे मंदिर
गडावर जाण्यासाठी असलेली वाट बरीच वेडीवाकडी आहे. वाटेत अनेक पर्णझाडी वृक्षांचं जंगल आहे. मुंबईपासून जवळ असल्यानं अनेक गिरीमित्र सुट्टीत इथं येताना दिसतात. गडावर पाण्याची चांगली सोय आहे.
कोहोज किल्लाचे मुख्य आकर्षण म्हणजे निसर्गनिर्मित मानवी आकाराचा सुळखा, मात्र काही विकृत लोकानी त्या सुळक्याच्या तोंडा पर्यंत जाउन नावे लिहिण्याचा गलिछ्य प्रकार केला आहे.
त्यामुळे
अनेक गावकऱ्यांची इथं सतत ये-जा सुरू असल्याचं पाहायला मिळतं.
गावक-यांकडून समजलं की या कोहोज गडावर पूर्वी अनेक तोफा होत्या. पण काही
उचापतखोर लोकांनी त्या गडावरून खाली ढकलल्या.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या नाणे गावामध्ये समोरच्या चौकात चौथ-यावर ठेवलेली तोफ आपलं स्वागत करते.
गड माथ्यावर गेल्यावर कुसुमेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूने ढाले किल्ल्यावर जाता येतं. वाटेतून वर जाताना मारूतीचं मंदिर दिसतं आणि खडकात खोदलेली पाण्याची कुंडं आपलं लक्ष वेधून घेतात.
काही पर्यटकांनी इथल्या पुरातन वास्तुंवर स्वत:ची नावं लिहून त्याचं सौंदर्य नष्ट केलं आहे. गडाच्या सर्वात वरच्या ठाण्यात एक अष्म रूपातील मानवी शिळा आपलं लक्ष वेधून घेते. त्यामुळे गडावरून कोणी पहारेकरी टेहळणी करत असल्याचा भास होतो.
शंकराचे मंदिर
गडाच्या वाटेवर असताना मध्येच इस्काँनचे भक्तगण भेटले. विचारपूस केल्यावर त्याच्यासह त्याच्या भक्तीगीतावरच्या नाचात आम्ही सहभागी झालो.
गडावर पाण्याची उत्तम सोय असल्यानं इथं तंबू ठोकून राहता येतं. गडावरील वस्तूंचे भग्नावशेष पाहून त्याचं भूतकाळातील वैभव आपल्या लक्षात येतं.
भूतकाळात
जिवंत असलेल्या या वास्तु आज वर्तमानातही आपल्यासारख्या भटक्यांची वाट
पाहत आहेत, असं जाणवत राहतं मग चला तर...कोहोज गडावर!
रांगडा किल्ला केंजळगड
सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्र्वर दरम्यानच्या महादेव डोंगररांगांच्या एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे.केळंजा व मोहनगड ही केंजळगडाचीच उपनावे आहेत.
रोहिडाची डोंगररांग उतरतांना नैऋत्य दिशेला लांबवर
एका भल्या मोठा पहाडाच्या डोक्यावर गांधी
टोपीच्या आकाराचा केंजळगड अधून मधून दर्शन देत असतो.गांधीटोपी सारखा असणारा केंजळगड
रोहिड्यानतंर रायरेश्वरात २६ जानेवारीचा झेंडावंदन करुन केंजळगडावर निघालो.एखाद्या हत्यारबंद शिलेदाराप्रमाणे रायरेश्वराच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेला केंजळगड.
रायरेश्वरच्या पूर्वेला जवळ केंजळगड आहे. येथील अखंड पाषाण मध्ये खोदलेल्या
५२ पायरया प्रेक्षणीय आहेत. केंजळगडाच्या कडाच्या पोटात गुहा, पाण्याची
टाके आहेत.पायरया ह्या दगडातच रेखाटल्या आहेत
केंजळगड हा काही फार नामांकित दुर्ग नव्हे.तो विस्तारानेही विशाल नाही
उघड्यावर असलेल्या देवीच्या मुर्त्त्या
एक चुन्याचा घाणा
छप्पर नसलेल्या या देवळात केंजाई देवीची मूर्ती
गडमाथ्यावर सर्व बाजूला असलेल्या छातीपर्यंत वाढलेल्या गवतामुळे ही बांधकामे शोधणे कठीण होऊन बसते.
या दुर्गानीच औरंगजेबाला २६ वर्ष कडवी झुंज दिली.ह्यांच्याच आश्रयाने मराठे लढले.
एका इंग्रजाने केंजळगडाबाबत लिहिले आहे.
'जरा हा किल्ला दृढनिश्चयाने लढवला,तर तो जिंकणे फार अवघड आहे.'
अमोघ सौंदर्याने नटलेला केंजळगड हा ट्रेकिंगसाठी आकर्षक ठिकाण ठरतो
दारूचे कोठार
गडावरुन तोरणा, राजगड, रोहीडा, पुरंदर, वज्रगड , केंजळगड, पांडवगड, वैराटगड दृष्टीस पडतात.
केंजळगड हा काही फार नामांकित दुर्ग नव्हे.तो विस्तारानेही विशाल नाही.मात्र,त्याची जागा दोन नद्यांच्या खोरयातील एका पर्वतराजीवर आहे.पलीकडे आहे कृष्णेचे खोरे,तर अलीकडे निरेचे.पलीकडे धोम येथे कृष्णेवर धरण आहे , तर अलीकडे निरेवर देवघर येथे धरण आहे
केंजळगडाचा नकाशा
रायरेश्र्वराचे पठार
रोहिड्या हुन नाझरे गावात उतरलो.तसेच पुढे आंबवडे गावात पोहचलो.तेथे नागेश्वराचे मंदीरात जेवण केले.नागेश्वर मंदिराचा परीसर निर्सगरम्य फारच सुंदर आहे.जुना पुरातन झुलता पुल पाहिला.तेथून एसटी बसने कोर्ले गाव गाठले.चहापाणी करून चढाई सुरु केली.उन्हे चढल्याने त्रास जाणवत होता.निलगीरी झाडाची सावली मिळत होती.
सृष्टीच्या नानाविध रूपांचे प्रत्यंतर देणारा निसर्गरम्य रायरेश्वरगड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे.
पाचगणीचे टेबललॅन्ड सर्वांनाच माहितच असते मात्र त्याच्यापेक्षाही उंच आणि लांब असे टेबललॅन्ड म्हणजे रायरीचे पठार.
दाट झाडी, खोल दर्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट. यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.
शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली ती याच रायरेश्र्वराच्या डोंगरावर.
रायरेश्र्वरावर शंभुमहादेवाचे मंदिर
वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. हिंदवी स्वराज्यासाठी मूठभर मावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले
रायरेश्वरसह्याद्रीच्या कडेकपारी, शिवमंदिर एक ।
तिथे रायरेश्वर स्वयंभू शिवलिंग सुरेख ।।
आणाभाका झाल्या आमुच्या, त्याच्या साक्षीने ।
एकजुटीने राहून कोणा अंतर न देणे ।।
देशासाठी, धर्मासाठी झोकून देऊ उडी ।
मावळे आम्ही शिवबाचे सवंगडी ।।
.खिस्ताब्द १६७४ मध्ये त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि हिंदु धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले.बारा मावळातील कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर ही मंडळी भोरच्या वातावरणात वावरणारी होती. सिंहाची छाती असणार्या या मावळ्यांना साथीला घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची आण घेतली.
सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छ. शिवाजी महाराजांनी २६ एप्रिल १६४५ या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली.
शनिवारी २६ जनेवारीला आम्ही गावातल्या शाळेतील झेंडावदन कार्यक्रामात भाग घेतला.
मुलाना झेंडे ,फुगे व खाउ वाटला.मुलानी आमचे स्वागत केले.रायरेश्वरातला झेंडावदनाचा कार्यक्रम कायम स्मरणात राहील.
भोरपासून ८ कि.मी. अंतरावर असणारे हे रायरीचे पठार पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांगः वाई - सातारा जिल्हा : पुणे
श्रेणी : सोपी किल्ल्याची उंची : ४०००फुट

रायरेश्वर येथे राहण्यासाठी व जेवणाची सोय
श्री.शंकर जंगम (९६८९६८८४९७ व ९७६३०१८२७९)
श्री.गोपाळ जंगम (९३७०७१७६३४)
यांच्याकडे होते.
रोहीडा किल्ला
२५,२६ व २७ जानेवारीला जोडून सुट्या आल्याने रोहीडा,रायरेश्वर,केंजळगड व कमळगड असा ट्रेक
ठरविला.मित्रमंडळी जमली.ट्रेकची आखणी झाली.सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर
ते महाबळेश्र्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग असल्याने हा ट्रेक आखला. रोहीडा
किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहीडा किल्ल्याला
विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते.
पुणे ते भोर प्रवास करीत बाजारवाडीत पहाटेच पोहचलो.ओळख परेड खाल्यावर
सुचना देण्यात आल्या.व चढाईला सुरुवात केली.थंड वातावरण असल्याने चढाई
जोरात झाली.प्रसन्न सुर्योदय झाल्यावर गडावर चढण्यास उत्साह वाढला.
डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खो-यात वसलेला किल्ला म्हणजेच 'किल्ले रोहीडा'.
रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खो-याच्या काही भागात वसलेले आहे.
या किल्ल्यावरील तीस-या दरवाजावर असणा-या
शिलालेखावरून मुहम्मद आदिलशहाने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान
निघते.
पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. पुढे १५ ते २०
पायया पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो. येथून आत गेल्यावर समोरच पाण्याचे
भुयारी टाके आहे.याचे पाणी बाराही महिने पुरते.
येथून ५-७ पाय-या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा अतिशय भक्कम
आहे. यावर ब-याच प्रमाणात कोरीव काम आढळते. दोनही बाजूंस हत्तीचे शिर
कोरण्यात आले आहे. तसेच डाव्या बाजूला मराठी व उजव्या बाजूला फारसी शिलालेख
आहे. आजुबाजूच्या तटबंदीची पडझड झाली आहे.
ह्या सर्व दरवाजांची रचना एकमेकांना काटकोनात आहे.
किल्ल्याच्या आग्रेयेस शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज व
पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत.
गडाचे बुरुज शाबूत असल्याने गडावर फिरण्यास मजा येते.
रोहिडमल्ल उर्फ भैराबाचे मंदिर लागते. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. देवळात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत.
संपूर्ण गड फिरण्यास दीड तास लगतो.मग तिन्ही दरवाजे खाली उतरून उजव्या बाजुच्या वाटेने
नाझेरे,आंबवडे करीत कोर्ले गावाकडे वाटचाल सुरु केली.
किल्ल्याची उंची : ३६६० फूट किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांगः महाबळेश्र्वर
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
जिवधन
नानेघाट चढुन गेल्यावर उजवीकडे जिवधन
गडाचे दर्शन होते.शिवजन्माच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या निजामशाहीच्या देणारा
किल्ला म्हणजे जीवधन होय.पायथ्याशी घाटघर हे गाव आहे.माळशेज घाट,
भोरांड्याचे दार, नाणेघाट, गुणाघाट, दर्याघाट, आंबोळीघाट, पिँपरीघाट आदी
घाटावरुन देशावर येता येते. या घाटांच्या माळेत नाणेघाट फार महत्वाचा.
घाटघरला या घाटाचे घर म्हणुन घाटघर असे म्हणतात.
पहाटे थंडीतून कुडकुडत किल्ल्याकडे प्रस्थान केले.मंद प्रकाशात चालताना मजा येत होती.सुरुवाती उभी चढ थंड् वातावरणात पटापट चढलो.पहिल्या पाय-या व नतंर राँकपँच चढण्यास थोडा वेळ गेला.सगळ्या संवगड्याना वर घेत गडावर पोहचलो.
गडाच्या अंतर्भागात एकात-एक अशी पाच
धान्य कोठारे आहेत. कोठारामधील कमलपुष्पांचे कोरीव नक्षीकाम आहे. १८१८ च्या
शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धाता या कोठारांना आग लागली होती, त्यांची राख
आजही या कोठारांमध्ये पहायला मिळते.
गावातून बांधून आणलेले कांदेपोहे खाल्ले.पाण्य़ाच्या टाक्यातले थंडगार पाणी प्यायलो.पुढची वाटचाल सुरु केली.
पाण्य़ाच्या टाक्यातील पाण्यावर उगवलेली सुंदर पानवनस्पती
गडावर फेरी मारली.गडावर खुपश्या गडांचे
दर्शन होते. आजुबाजूला दिमाखात उभ्या असलेल्या शिवनेरी,हडसर,चावंड व जिवधन
या चार किल्ल्यांच्या मिलापाने नाणेघाटाची संरक्षक फ़ळी बनलेली आहे.
गडावरुन नानाचा आंगठा दिसतो.
गडाच्या टोकाला सुमारे २००० फुट
उंचीचा "वानरलिंगी" नावाचा एक सुळका लक्षवेधी आहे. गडावरचे मुख्य आकर्षण
म्हणजे किल्ल्यापासुन सुटावलेला वानरलिंगी उर्फ खडा पारशी सुळका.
जवळपास किल्ल्याच्याच उंचीचा असलेला हा
सुळका अन मुख्य किल्ला यांच्यामध्ये खोल दरी आहे. सुळक्याची उंची एव्हढी
होती की वरुन त्याचा पायथा दिसत नव्हता.
गडाचा महादरवाजा हा कातळकड्यामध्ये कोरलेला आहे. किल्ल्याचा
हा दरवाजा दोन कातळभिंतीच्या मध्ये खुबीने बनवलेला आहे. इंग्रजांनी
केलेल्या नासधुसीमुळे पुर्ण दरवाजा वर पर्यत दगड मातीने चिणुन गेलेला होता.
वाकुन दरवाजा पार केला.
किल्ल्याच्या
दुसर्या बाजुच्या महादरवाज्याने उतरताना दुसरा राँकपँच पार करावा
लागतो.दुसरा ग्रुप तेथे उतरत होता.त्याच्यासह आम्ही पटापट उड्या मार्त खाली
उतरलो. कातळात कोरलेल्या पाय-या उतरत सुळक्याच्या खाली आलो.
किल्ल्याच्या खाली चांगले जंगल आहे.लाड्क़े तोडण्यास आलेली गावकरी मडंळी भेटली.सरळ घाटघर गाठ्ले. झुणका भाकरी खाल्ली व मुंबईला निघालो.
सह्याद्रीच्या डोंगररांगातील
नाणेघाटाजवळच्या जिवधन किल्ल्यावर अडकलेल्या सहा पर्यटकांची 18 तासानंतर
यशस्वी सुटका करण्यात आली. जिवधन दुर्ग चढण्यास प्रारंभ केला होता. जिवधनची
अर्धी चढत चढून गेल्यानंतर रात्री अंधारामुळे हे पर्यटक भरकटले.किल्ल्यावर
जाणारी नेहमीची पायवाट सोडून चुकीच्या बाजूला चालत गेल्याने धोकादायक उंच
कड्यावरच्या टोकावर हे पर्यटक अडकले. त्यातच रात्री पाऊस झाल्याने रस्ता
निसरडा झाला. येण्यास वाट नसल्याने त्यांनी एका कपारीच्या आडोशाने रात्र
काढली. सकाळच्या वेळी जिवधनवर मुक्कामी असलेल्या दुसर्या पर्यटकांच्या
लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पुण्यातील गिर्यारोहकांशी संपर्क साधून
ही माहिती दिली. जुन्नरमधील सहय़ाद्री गिरीभ्रमण संस्थेच्या पथकांनी
दोरांच्या साहाय्याने ‘सेल्फ कटिंग’ करून या अडकलेल्या पर्यटकांची सुटका
केली.
नानेघाट
काही वर्षापूर्वी पावसाळ्यात नानेघाटला गेलो होतो.नानेघाटला खुप वर्षानी जाण्याचा योग्य आला.कल्याण- मुरबाड करीत एसटीने (जुन्नर कडे जाणारी)प्रवास केला.मालशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या नानेघाट बसस्थानकावर उतरुन नानाच्या आगंठ्याच्या दिशेने निघालो.
पावसाळ्यातला
निसर्ग व आताचा वेगळा यात बरेचे वेगळेपण असते.त्यावेळेस डोगंररांगातील
धबधबे जोराने वाहत असतात.पण आता कोठेच पाणी दिसत नाही.जंगलातून पुढे जाताना
एक गोष्ट निर्दशनात आली.मोठी जगंल तोड झालेली दिसली.दाट जगंल पाहिले
होते.हल्ली सगळे उघडे उघडे वाटले.
नाणेघाट या नावावरूनच आपल्याला कल्पना येईल की हा घाट फारच पुरातन आहे. नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला. प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी. प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये परकीय लोक विशेषतः रोमन व्यापारी आपला माल घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत. हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई. या व्यापार्यांकडून जकात जमा केली जाई. त्या जकातीचा दगडी रांजण आजही येथे पहावयास मिळतो.
मजेत गप्पागोष्टी करीत दोन तासात गुहेत पोहचलो.
गावातली मुले तेथे गुहेचे व्यवस्था पाहत होते.गुहेला बाहेरुन जाळी लावुन दरवाजा बसवला.ही गुहा संध्याकाळी बंद करतात.गुहा आतून स्वच्छ ठेवलेली आहे.भिंतीवरील शिलालेख स्पष्ट दिसत आहे.गुहेच्या आत जेवण शिजवणे बंद केले असल्याने आत काजळी होत नाही.कचरा केल्यास तो काढुन लांब नेउन टाकण्यास सांगतात.असेच सर्व गडावरील गुहा स्थानिकानी व ट्रेकरसनी स्वच्छ ठेवल्या पाहिजेत.चाग़ंला उपक्रम आहे.दुस-यानाही घाण करुन देऊ नये.
साठ मीटर लांब आणि जागोजागी दोन ते पाच मीटर रूंद अशी ही नाणेघाटाची नळी आहे. या नळीच्या मुखाशी एक दगडी रांजण आहे.
चार फूट व्यासाचा आणि पाच फूट उंचीचा हा रांजण पूर्वी जकातीसाठी वापरला जात असे. जकातकर रुपाने यात तत्कालीन 'कर्षापण' नावाची नाणी टाकली जात असत.
नाणेघाट चढून गेल्यावर प्रथम दर्शनी दृष्टिक्षेपात पडणारी कातळात कोरलेली ऐसपैस आणि सुंदर गुहा हेच येथील महत्वपूर्ण वैशिष्ट होय. या गुहेत साधारणतः ४०-४५ जण राहू शकतात.सध्या वापरण्यात येणा-या गुहेत तिन्ही भिंतीवर लेख आहेत. हा लेख एकूण २० ओळींचा असून मध्य भागातील भिंतीवर १० तर उजवीकडील भागावर दहा ओळी आहेत. हा लेख ब्राम्ही लिपीतला असून या लेखामध्ये अनेक अंकनिर्दिष्ठ संख्या आहेत.
गुहेच्या वर पाहिल्यावर एक प्रचंड कातळ भिंत दिसते, यालाच नानाचा अंगठा असे म्हणतात.घाटमाथ्यावर पोहचल्यावर,उजवीकडे वळल्यावर आपण नानाच्या अंगठावर येऊन पोहोचतो.
येथेच बाजूला एक गणेशाची मूर्तीही दृष्टिक्षेपात येते.
समोर दिसणारे गोरखगड, मच्छिद्रगड , सिध्दगड, हरिश्चंद्रगड, भैरवकडा, कोकणकडा आणि डावीकडे असणारा जीवधन आपले मन मोहून टाकतात.
घाटावरील विस्तीर्ण असे पठार हे नाणेघाटाचे आणखी एक वैशिष्ट म्हणून सांगता येईल.
दोन तीन वर्षानतंर एकदा तरी हा ट्रेक करण्यास योग्य आहे.
भूपतगड
जव्हार ला गेल्यावर ' भुपतगडावर ' जाण्य़ाचा योग आला. जव्हार हे ठाणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. याच जव्हारच्या जवळ,एका दिवसात जाऊन पाहून येण्यासारखा किल्ला आहे.त्याचे नाव भूपतगड.
मुंबई जवळ असूनही या दुर्गम भागात सहज जावू याचा विचारही कुणी करू नये असा हा भूपत गड.रस्ता चांगला नाही.जव्हार येथून एसटी या गावात जाते.
रामसीता व लवकुश यांच्या पाउलखुणा
गडावर ज़ाण्याचा रस्ता :जव्हारपासून १७ कि.मी अंतरावर झाप नावाचे गाव आहे. येथे २ फाटे फुटतात ऊजवी कडचा रस्ता झाप गावात जातो आणि सरळ जाणारा रस्ता १ किमी अंतरावर चिंचवाडी गावात जातो. या फाट्यापासून १० मिनिटांवर चिंचवाडी आहे. चिंचवाडीतून कच्च्या रस्त्याने एक टेकाड पार केल्यावर आपण भूपतगडाच्या पायथ्याशी पोहोचतो.गडाचा चिंचवाडीतून गडाचा पायथा गाठण्यास अर्धा तास पुरतो. गडाच्या पायथ्यापासून गड डावीकडे ठेवत वाट तिरपी वर जाते. पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास सुमारे अर्धा तास लागतो.
भूपतगडावर आपला प्रवेश नष्ट झालेल्या दरवाज्याच्या अवशेषामधून होतो. गडाला उत्तरेकडे व दक्षिणेकडे असे एकूण दोन दरवाजे होते. आज हे दोन्ही दरवाजे नष्ट झालेले आढळतात. प्रवेशव्दारापाशी असणारे बुरुज कसेबसे तग धरुन उभे आहेत.
प्रवेशव्दारापाशी एक म्हसोबाची मूर्ती आहे. आत शिरल्यावर समोर हनुमानाची मूर्ती दिसते. गडमाथा बराच विस्तीर्ण आहे. माथ्यावर एका मोठ्या पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. या वाड्याच्या भिंती अजूनही काही ठिकाणी शिल्लक आहेत.
वाड्याच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा हौद आहे. गडाच्या ४ पाण्याची खोदीव टाकी दिसतात. या टाक्यांजवळच एक कोरडा तलाव आहे.
संपूर्ण गडमाथा फिरण्यास अर्धा तास लागतो. गडावरुन त्रिंगलवाडी, हरिहर, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा असा सर्व परिसर दिसतो.
हे गड दुर्ग आज पड झड झालेले आहेत . अंगावर असंख्य तलवारिंचे यांनी घाव झेलले आहेत . तोफांचा मारा यांनी सहन केला आहे . अनेक विरांच्या समिधा यासाठी अर्पण झाल्या आहेत चला तर मग, या मूक साक्षीदारांचे बोलविते होऊ, आपल्या पुढच्या पिढीस काही तरी ठेवा देवू. जेणेकरून ते इतिहासातुन काही तरी बोध घेतील,
भूपतगड हा छोटासा किल्ला पाहुन झाल्यावर, स्वतःचे वाहान असल्यास १) जव्हार मधील राजवाडा , २) हनुमान पॊइंट , ३) दाभोसा धबधबा , ४)शिर्पाचा माळ (सुरतेवर स्वारीला जातांना शिवाजी महाराजांच्या सैन्याने या माळावर मुक्काम केला होता. या ठिकाणी कमान उभारुन स्मारक बनविण्यात आले आहे.) इत्यादी ठिकाण पाहाता येतील.
गडावर जाण्य़ासाठी संपर्क श्री.संदिप कुरबुडे ८६९८६९७३६३ (गडाच्या पायथ्याचे गाव)
अवचितगड
दुर्गमित्र संस्थेच्या मावळयांनी दीडशे फूट खोल दरीत अडकलेली तब्बल दोन टनांची शिवकालीन
तोफ अवचितगडावर चढवायल्या बातमी वाचल्यानतंर आम्ही अवचितगडावर रपेट
मारण्यास निधालो.
कोकण
रेल्वेने रोहा स्टेशन गाठले.गाडीत चहापाणी झाल्याने आम्ही तेथे न थांबता
पिंगळसई गावाकडे चालण्यास सुरुवात केली.मस्त हिरवीगार शेतातच्या बाजुने
जाणा-या डांबरी रस्तावरुन चालत चालत गाव गाठले.रोह्याहुन पूर्वेला
'पिगंळसई' गावापर्यत जाण्यास वीस पंचवीस मिनिटे लागतात.
कोकणात कुंडलिका नदीच्या
तीरावर रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या
डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला अवचितगड पाहणे हा एक सुरम्य अनुभव ठरतो.
महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते. रोह्यापासून
५ कि.मी. वर असलेल्या या गडाची उंची तळापासून ३०५ मीटर किंवा १००० फ़ूट आहे.
घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.
घनदाट जंगलामुळे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.
गडाचे प्रवेशद्वार, बालेकिल्ल्याच्या कमानी या काळ्या पाषाणातील असून सुबक व मापात दगड तासून,
भार देऊन एकमेकांवर बसवलेले आहेत.
बांधकामात फार थोड्या ठिकाणी, विशेषत:
उत्तर बुरुजाच्या बांधणीत चुनखडीचा वापर सांधे भरण्यासाठी केलेला आहे. गडावरील तटबंदी,
पाण्याची टाकी, मंदिर, वाडे
हे सर्व
बांधकाम ज्या पाषाणात केले आहे
तो गडावरचाच आहे. गडावरील सात टाकी समूह व द्वादशकोनी तलाव यांच्या खोदाईमधून निघालेले चिरे बांधकामासाठी वापरले गेले आहेत. उत्तर बुरूज, दक्षिण बुरूज, बालेकिल्ला व प्रवेशद्वार यांच्या कमानी द्वादशकोनी, तलाव-वाड्यांचे चौथरे यांच्यासाठी वापरले गेलेले चिरे हे सुबक आकारातले व सफाईदारपणे तासलेले आहेत.
इतर तटबंदीसाठी मात्र चिरे विशेष तासकाम न करता वापरले गेले आहेत. तटबंदीच्या चिर्यांमधील सांधे भरण्यासाठी बारीक बारीक दगडी कपच्या वापरलेल्या आहेत. एकूण गडाची बांधकामशैली ही गरजेपुरते काम या तत्त्वाची आहे. कमीत कमी वेळ आणि पैसा खर्च करून उभारणी झालेला किल्ला याचे उत्तम उदाहरण म्हणजे अवचितगड.

अवचितगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वृषभ शिल्प आहे.
शिलाहारांचे ते प्रतीक म्हणजे साधारण त्या काळापासून गडावर वहिवाट असल्याचा तो पुरावा मानतात.पेशवेकाळात घोसाळा ते पाली- सुधागडपर्यंतच्या महसूल-वसुलीचे काम अवचितगडावर होत असे.
गडाच्या दोन्ही टोकास गोपुराप्रमाणे दिसणारे दोन बुरूज आहेत. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. त्या बुरुजाच्या भिंतीत एक शिलालेख आहे. त्यांतील मजकूर असा : "श्री गणेशाय नमः श्री जयदेव शके १७१८ नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा."
दुसर्या दरवाज्यात पाण्याने भरलेला तलाव आहे. कुंडातील पाणी पिण्यायोग्य आहे.
जवळच खंडोबाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. उत्तरेकडील बुरुजावर एक उध्वस्त वाडा आहे.
वाड्याच्या ईशान्येस आणखी एक बुरुज असून दक्षिणेकडील भिंतीत एक दरवाजा आहे. किल्ल्यात काही तोफा पडलेल्या आहेत.दक्षिण दिशेस एक बालेकिल्ला आहे. त्याची लांबी-रुंदी अनुक्रमे ९०० फूट आणि ३०० फूट आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेस दोन्ही टोकांना दोन दरवाजे आहेत.
आत पाण्याचा एक द्वादशकोनी हौद आहे. पश्चिमेच्या अंगास खडकात कोरलेली पाण्याची सात टाकी आहेत. टाक्यांच्या मध्यभागी एक समाधी असून तिच्यापुढे एक दीपमाळ आहे.

गडावरील
वास्तू-
कलावंतिणीची
विहीर ,. मधला
मोर्चा ,. प्रवेशद्वार, वृषभशिल्प , वाड्यांचे
चौथरे , बालेकिल्ला ,
द्वादशकोनी
तलाव ,. शिवमंदिर , सातटाकी समूह, बाजी पासलकराचे स्थान, दक्षिण बुरुज,
शिलालेख , खंदक , तोफा , टेहळणीचा बुरूज, .
अवचितगडावर दुर्गमित्रांची पराकाष्ठा
पनवेलच्या दुर्गमित्र संस्थेचे मावळयांचे
करावे तितुके कौतुक थोडेच आहे. त्यांच्या ह्या शिवपराक्रमासाठी आम्हां
सर्व मायबोलीकरांचा मानाचा त्रिवार मुजरा. खरोखरच असा विचार मनात आणून
प्रत्यक्षात आणणे ही फार अभिमानास्पद कामगिरी आहे.
अवचितगडावरील तोफ उचलतानाची चित्रफीत युटयूबवर fort conservation the avachit gad या नावाने उपलब्ध आह़े.
प्रबळगड
संवगडी निधाले प्रबळगडावर मी ही निधालो.एक दिवसाचा ट्रेक मजेत झाला.हलकीशी थंडी होती. हायवेवरच्या शेडुंग फाट्यावरुन डावीकडे वळून ठाकुरवाडीच्या वाटेला लागलो.

पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड,इर्शाळ गड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला आहे.
कलावंतीण दुर्ग आणि प्रबळ गडला जायचा मार्ग.साधारणपणे पनवेल पासून १४ किलोमीटर वर ठाकूरवाडी या गावात शिरल्यावर 'ठाकूरवाडी'त समोर 'प्रबळगड' आणि ' कलावंतीण दुर्ग' लक्ष वेधून घेतात.

हा गड इंग्रजानी माथेरान सारखे थंड ठीकाण
करण्याचे ठरविले होते.पण त्याना पाण्याची अडचण असल्याने कळल्यावर त्यानी
'माथेरान' कडे मोर्चा वळवला.
प्रबळमाची या गावात चहापाणी करुन गडावर जाता
येते.गडावरुन ‘कलावंतीण’ हा उभा दुर्ग पाहण्यासारखा आहे. या दुर्गावर
चढण्यासाठी उभ्या पाय-या गडावरुन बधताना भिती वाटते.
उत्तर कोकणातील हा किल्ला पनवेल, कल्याण या प्राचीन बदरांवर नजर ठेवण्यास बाधंला असावा.

माथेरानचा सनसेट पॉइंट, धुरकट दिसणारा हरिश्चंद्रगड, प्रबळमाची गाव, असं सारंच दृश्य दमछाक विसरायला लावते.
पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड,इर्शाळ गड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला आहे.
मुंबई-पुणे हमरस्त्यावर जाताना दिसनारा हा प्रबळगड बलवान असनारा एक दुर्ग चटकन आपले लक्ष वेधुन घेतो. प्रबळगड आणि कलावंती दुर्गाचा 'V' Shape नेहमीच लक्ष वेधून घेतो.
कलावंतीण दुर्ग आणि प्रबळ गडला जायचा मार्ग.साधारणपणे पनवेल पासून १४ किलोमीटर वर ठाकूरवाडी या गावात शिरल्यावर 'ठाकूरवाडी'त समोर 'प्रबळगड' आणि '

माथेरानच्या पश्चिमेला असणारा प्रबळगड हा नावाप्रमाणेच प्रबळ आहे
महामार्गापासून गड जवळच असल्याने पायथ्याच्या गावापर्यंत वाहनाची सोय होते.
या गडावरुन मलंगगड, देवणीचा सुळका, माथेरान,
पेब, म्हसमाळ, इरशाळगड हा परिसर सर्वांचे लक्ष वेधून घेतो. उन्हाळा सुरु
होण्याअगोदर हा शेवटचा ट्रेक होता.
सरसगड
श्री गणेश म्हणजे विद्येची देवता. पाली हे अष्टविनायकांपैकी एक ठिकाणे.येथील गणपती'बल्लाळेश्र्वर' म्हणून ओळखला जातो. याच पाली गावाच्या सीमेला लागून उभा असणारा गड म्हणजे सरसगड. पाली गावात जाताच या गडाचे दर्शन होते.गडाचा आकार 'बल्लाळेश्र्वर'या गणपतीसारखा दिसतो.
पाली गावाच्या दक्षिणोत्तर सीमेवर सरसगडाची अजस्त्र भिंत उभी आहे.या गडाचा उपयोग मुख्यतः टेहळणीसाठी करत असत. या गडावरून पाली व जवळच्या संपूर्ण परिसरावर टेहळणी करता येते.
शिवाजी महाराजांनी या गडास आपल्या स्वराज्यादाखल करून घेतले आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी २००० होन मंजूर केले.
नवीन वर्षाच्या ट्रेकींगची सुरुवात गणेशाचे (बल्लाळेश्र्वर) दर्शनाने केली.सोळा जणानी "गणपती बाप्पा मोरया" व 'जय
भवानी जय शिवाजी'या धोषणा देत गड चढायला सुरुवात केली.
हवेत थंडी असल्याने गारवा होता. पटापट चढत गेलो.
गडावर जाण्यासाठी ९६ पाय-या चढावयास लागतात.पावसाळ्यात वाटा खुप निसरड्या असतात.गड छोटासा पण मस्त आहे.
पाली गावाहून दिंडी दरवाजापर्यंत जायला साधारण १ तास लागतो.
गडावर केदारेश्र्वराचे मंदिर आहे.महाशिवरात्रीला केदारेश्र्वराला भाविकांची गर्दी असते. येथे एक तलाव आहे. हळणीसाठी दोन बुरूज आहेत. मात्र या बालेकिल्ल्यावरून समोरच असणारा तीन कावडीचा डोंगर दिसतो.
समोरच उभा असणारा सुधागड, तैलबैला, धनगड आणि कोरीगड दिसतो. तसेच पालीगाव, अंबानदी, उन्हेरीची गरम पाण्याची कुंडे, कोकण, जांभुळपाडा असा सर्व परिसर दिसतो.
गडावर जाण्यासाठी मात्र 'दिंडी' दरवाजाची एकच वाट वापरात आहे. पाली गावात उतरून या दरवाज्याने गडावर जाता येते.
मंदिराच्या मागील बाजूस असणा-या डांबरी रस्त्यावरून डावीकडे वळावे आणि मळलेली वाट पकडावी. ही वाट सरळसोट असून आपणास थेट गडाच्या बुरुजापर्यंत आणून सोडते.
बुरुजाच्या पायथ्याशी एक खोली आहे. या खोलीचा उपयोग पहारेक-यांना रहाण्यासाठी होत असे.
पुढे दरवाज्यापर्यंत जाण्यासाठी ९६ पाय-या चढाव्या लागतात. या पाय-या जरा जपूनच चढाव्यात कारण पाय घसरला तर दरीत पडण्याचा धोका उद्भवतो.
पाय-यांची वाट फार दमछाक करणारी आहे. या पाय-या आपल्याला सरळ दरवाजापर्यंत आणून सोडतात. दरवाजाच्या समोरच पहारेक-यांच्या देवडया आहेत.
गडावर जाण्यासाठी अजून एक वाट असून ती वापरातील नसल्याने या वाटेचा उपयोग कोणी क
रतनवारी
कळसुबाई
उतरुन रतनगडावर जाण्यासाठी निघालो.सुर्य मावळतीला लागला होता.भंडारदरा
घरणाच्या बाजुने वळसा घालुन रतनवाडी येथे पोहचलो.पुरातन अतिशय सुंदर कोरीव
काम असलेले अमृतेश्वर मंदीराचे दर्शन घेतले.भंडारदरा धरण पूर्ण भरते तेव्हा
या मंदिरातील शंकराची पिंड पूर्णतः पाण्याखाली जाते राहण्याची व खाण्याची
सोय काय होते पाहण्यास सुरुवात केली.श्री.संदीप झडे यांच्या 'हाँटेल
प्रवरा' '7798176499'-'9049318557'येथे राहण्याची व जेवणाची सोय
केली.रात्री जेवलो व शेकोटी केली.थंडी जोरात असल्याने सर्वाना चागंलीच थंडी
लागली.
पहाटे उठुन चहापाणी
करुन गडावर निघालो.'जय भवानी जय शिवाजी' घोष करीत सगळ्यानी सँक
उचलल्या.कोणताही गड असो, कोणाचाही उत्साह कमी होत नाही.
सुरुवातीला साधारण अर्धा पाउण किलोमीटर अंतर नदीकीनारून चालत पुढे गेल्यावर खरी चढण सुरु होते. जंगल सुरु झाल्यावर खरी मजा आली.
चढामुळे थकवा जाणवायला लागला होता. झाडाझुडपातून व तुटलेल्या फांद्यांवरून वाटेतून रस्ता काढत काढत आम्ही वर चढत होतो.थोडा
जंगलातून
बाहेर आल्यासारख वाटल. थोडा मोकळ वातावरण होते.शेवटी आम्हाला गडावर
जाणा-या शिडया दिसल्याने "हर हर महादेव" चा अजून एक गजर झाला.

डुगडुगणारी शिडी, ९० अंशामध्ये हलणारा कठडा, अरुंद पाय-या कशाची परवा न करता आम्ही वर चढलो.
गुहेतील रत्नादेवीचे दर्शन घेतले.भगवा झेंडा लावला.गुहेत थोडा वेळ आराम केला आणि गड बघायला निघालो.
प्रवेशद्वाराने प्रवेश करीत पुढे गेलो.गणेश दरवाजा आहे. गणेश दरवाजाच्या थोडे पुढे हनुमान दरवाजा आहे.
गडाच्या पश्चिमकडील कात्राबाईच्या डोंगराचे कातळकडे भान हरपून टाकतात.
गडाच्या पश्चिमकडील कात्राबाईच्या डोंगराचे कातळकडे भान हरपून टाकतात.
त्याच्या
उजवीकडे आजोबाचा विशाल पर्वत आणि त्याची लिंगी लक्षवेधी आहे. येथून जवळच
एक सुटा टेहाळणी बुरुज आहे.याला राणीचा हुडा म्हणतात.
कळसूबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई या तीन बहीणी होत्या. या तीन बहीणींचे वास्तव्य या तीन डोंगरांवर होते.
रतनगडाच्या
उत्तरभागातून कळसूबाईची रांग आपल्याला खिळवून ठेवते. लंग,
मदन,अलंगडाबरोबर महाराष्ट्राचे उत्तुंग शिखर कळसूबाईचे दर्शन
घेवून आपण रतनगडाच्या नेढय़ाकडे चालू लागतो.
नेढे म्हणजे डोंगराला असलेले आरपार भोक. रतनगड, मदनगड, राजगड, कन्हेरगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांना नेढे आहे. नेढय़ामधून दोन्ही बाजूचा प्रदेश दिसतो.
या नेढय़ातून भन्नाट वाहणार्या वार्याचा थरार अनुभवून आपण पुढे निघतो.
गडावरुन समोर भंडारदरा धरणाचा जलाशय,प्रवरा नदी,पाबरगड आणि महाराष्ट्रातील उंचीने दुसर्या क्रमांकचे पठार असलेले घनचक्करचे पठार उत्तम दिसते.
दोन डोगंराच्या मघुन कातळात कोरलेला त्रंबक दरवाजातुन कातळात कोरलेल्या पाय-या उतरत खाली उतरलो.
कळसूबाई
शिखराची उंची १६४६ मी.
कळसूबाई ह्या सह्याद्रीतल्या सर्वौच्च शिखरावर काही वर्षीपूर्वी गेलो
होतो.मित्रांसह हे शिखर पुन्हा पादाक्रांत करण्याचा योग आला.मागे
पावसाळ्यात गेलो होतो.
ढगात
लपलेल्या ह्या शिखरावरुन जोरात वाहणा-या वा-यात उभे राहणे कठीण
असते.त्यामुळे या शिखराची उंची कळली नव्ह्ती.पण आता हिवाळ्यात गेल्याने
शिखरावरुन बाजुचा परीसर पाहु शकलो.
बारी गांवात कांदेपोहे व चहा घेउन मावळे वाटेला लागले.सर्वजण उत्साहाच्या भरात चढत होते.काही वेळातच
थोरल्या कळसुबाई च्या मंदीरात पोहचलो.ज्या मडंळीना वर चढता येत नाही त्या मडंळीना या थोरल्या कळसुबाई चे दर्शन घेता येते.
थोरल्या कळसुबाई च्या मंदीरात पोहचलो.ज्या मडंळीना वर चढता येत नाही त्या मडंळीना या थोरल्या कळसुबाई चे दर्शन घेता येते.
थोरल्या कळसुबाई
चे दर्शन घेऊन पुढे निघालो.दोन उभ्या शिड्यावरुन चढत पठारावर पोहचलो. खाली
शेती व गावे लहान लहान दिसत होते.छोटीशी विश्रांती घेऊन पुढच्या टप्या
चढ्ण्यास सुरुवात केली.
मघ्ये
एका विहीरीवर पाणी पिऊन व बाजेच्या टपरीवर भजी व चहा घेऊन शेवटची शिडी
चढ्ण्यास निघालो.आता अंतिम शिखर समोर दिसत असल्याने सगळ्याना हुरुप आला
होता.
हवेत गारवा असल्याने चढताना थकवा जाणवत नव्हता.येथून कातळकड्याच्या पायथ्याशी पोचल्यावर कडा चढण्यासाठी लोखंडी शिडी आहे.
शेवटीची शिडी पटकन चढलो व शिखर सर केल्याचा आनंद मित्रांच्या चेह-यावर दिसत होता.
महाराष्ट्राचे एव्हरेस्ट काबीज केल्याने मावळे मडंळी खुष झाली.
गिर्यारोहकांचे आकर्षण असलेले हे शिखर आरोहणास अतिशय अवघड पण
चित्तवृत्तींना सुखावणारे,सह्याद्रीच्या रांगांमधील सर्वात उंच शिखर आहे.
माथ्यावरुन
कळसूबाई मंदिर असून वरून त्रिंबक रांग, कुलंग, अलंग, मदनगड, हरिश्चंद्रगड,
भंडारदरा तलाव आदींचे विलोभनीय दृश्य दिसते.
राजमाची वर भटक़ंती
खुप दिवसानतंर राजमाची वरची भटक़ंती करण्य़ाचा योग आला.सवंगड्याना ट्रेकची
माहीती दिल्यावर जाण्यचे ठरले. थंडीची मजा घेण्यासाठी ट्रेकची तयारी करुन
वेगवेगळ्या दिशेने येऊन लोणावळ्याला जमलो.तुंर्गालीला पोहचल्यानतंर चहा
घेऊन पुढे निघालो.
निसर्गसौंदर्याने
नटलेल्या राजमाची किल्ल्याचे खरे वैशिष्ट म्हणजे या किल्ल्याचे दोन
बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन.पुढे जाताना हे दोन्ही बाल्लेकिल्ले नजरते
आल्याब्ररोबर आमच्यात उत्साह वाढला.थंडी कमी असल्याने उन्हाचा त्रास झाला.
रमतगमत
'उंधेवाडी' गांवात पोहचण्य़ास दोन वांजले.गावात श्री.बबन सावंत यांच्याक़डे
राहण्यासु उत्तम सोय झाली.आणलेले डबे उधडले.थोडासा आराम करुन 'श्रीर्वधन'
या बाल्लेकिल्यावर चढाईला स्रुरुवात केली.भेरवनाथाच्या मदीरात दर्शन
घतले.ह्ल्ली येथे नेव्ही चे ट्रेनींग सुरु आहे.
डाव्या बाजुच्या
बुरुजुवरुन 'ढाकभैरी'दिसत होता व आम्हाला आव्हान देत होता.दुस-या बुरुजाहुन
'मिनी कोकणकडा' व लांबवर 'नागफणी'चे शिखर दिसत होते. गड फिरत फिरत उंच
शिखरावर पोहचलो.तो पर्यत सुर्यास्ताची तयारी सुरु झाली होती.तो नयनरम्य
सोहळा पाहण्यास आम्ही तेथे थांबलो.आकाशात विविध रंगाची उधळण सुरु होती.लाल
रंगाचा तेजस्वी गोळा अस्त होताना अंधार होत गेला.सपुर्ण परीसरावर नजर फिरुन
खाली उतरलो.
रात्री कँमफायर करीत दंगामस्ती केली.भाकरी व ठेच्या सह चविष्ट जेवण केले.
रात्री कँमफायर करीत दंगामस्ती केली.भाकरी व ठेच्या सह चविष्ट जेवण केले.
दोन दिवसापुर्वी त्रिपुरा पौर्णिमा झाल्यामुळे शुभ्रचांदणे पडल्याने गांवबाहेर फिरुन आलो.हवेत गारवा होता.
पहाटे लवक़र उठुन मनरंजन या बाल्लेकिल्यावर सुर्योदय पाहण्यास निघालो.हवा
जोरात वाहत होती पण थंडी नव्ह्ती.गवत डोलत होते.गडावरुन लांबलांबवर लाईट्स
दिसत होत्या.आकाशात गुलाबी छटा दिसायला लागल्या होत्या.
समोरच
श्रीर्वधन किल्ला दिसत होता.त्याचा पाठुन सुर्योदय होण्याची शक्यता
होती.आम्ही पहाटेची गाणी गात होते.ती वेळच प्रसन्न होती.थोड्याच वेळात
सुर्याचा उदय झाले होते. लाल रंगाचा तेजाचा गोळा वर येताना दिसला झाला. खुप
आनंद झाला.आम्ही सर्वजण आनंदाने ओरडत होतो.काही क्षणातच तो लाल गोळा खुप
वरती आला होता. सकाळच्या सुर्याच्या किरणांमघ्ये गड फिरलो.वातावरणात
प्रसन्नता होती.
पटापट खाली
गावात उतरलो व तेथुन सरळ गोवर्धन मंदीर गाठले.पुरातन मंदिर पाहुन कँमे-यात
उतरवण्य़ाचे आव्हान घेतले.समोरच तलावा थोडी डुंबण्याची मजा घेतली.भाकरी व
पिठलाची लज्जत घेतल्यानतंर लगेच बँगा भरल्या.
'जय शिवाजी जय
भवानी' घोषणा देत वाटेला लागलो.सरळ उभा उतार उरण्यास त्रास होत होता.गाणी
गात सावध राहुन उतरत होतो.चढण्यापेक्षा खाली उतरणे कठीण असते याची जाणीव
होते.
'कोंडाणे
लेणी' पाहण्यास थोडी विश्रांती घेतली.काही ठिकाणी पाणी मिळाले ते गार पाणी
भरुन घेत उल्हास नदीच्या पात्राच्या बाजुने शेवटची पट्टा संपवला.शेवटी
शेवटी उन्हाचा त्रास जाणवला.ट्रेकची मजा कायम स्मरणात राहील.
माणिकगड
पावसाळा सुरू होताच मुंबईकरांची पावले शहराबाहेर वळतात. त्यांची विटलेली मने निसर्गाकडे धाव घेतात.
गेल्या काही वर्षांत निसर्गाकडे पळण्याची शहरवासीयांची वृत्ती इतकी वाढली आहे. कणखर काळ्या मातीची आणि ओबडधोबड दगडांची ही भूमी वर्षाऋतूत हिरवाईने नटून जाते आणि तिच्या कडेकपारीतले झरे जिवंत होऊन धबाधब कोसळू लागतात.गडांच्या तटबंदीना हिरवा साज येतो.ट्रेकर गडांच्या दिशेने सुटतात.

गर्दी कमी असलेला माणिक गडावर जाण्याचा योग आला. पनवेल येथुन 'वाशिवली' एसटी पकडुन 'वडगांव' फाट्यावर उतरुन चढाई सुरु होते.
मार्ग मस्त जंगलातुन आहे.गडाला फेरी मारुन
गडावर चढण्यचा मार्ग आहे. पावसाने सपुर्ण ट्रेक मघ्ये झोडपुन काढल्याने
फोटॉ काढता आले नाही.तटबंदीतून पहिल्या सपाटीवर उतरण्यासाठी पाय-या
आहेत.येथून थोडे पुढे गेल्यावर पाण्याची टाकी आढळतात.त्याच्या समोरच
जोत्याचे अवशेष दिसतात.येथून डावीकडे फुटणा-या वाटेने पुढे गेल्यावर आणखी ४
टाक्या दिसतात यात मेंपर्यंत पाणी असते.
मुंबई पुणे हमरस्त्यावरुन जातांना अनेक किल्ले आपल्याला दिसतात.प्रबळगड,इरशाळ,चंदेरी,माथेरान,कर्नाळा,लोहगड, विसापूर आणि यांच्या संगतीतच एक किल्ला आहे त्याचे नावं माणिकगङ. कर्नाळा,सांकशी,माणिकगड हे या रांगेतील तीन भाऊ.माणिकगडाच्या आजुबाजुचा सर्व प्रदेश सधन असला तरी येथील लोकांचे राहणीमान मात्र साधेच आहे.
गडावरील
पहाण्यासारखी ठिकाणे किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटबंदी दिसते ही
तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली आहे. पुढे गेल्यावर दोन चांगले बाधलेले बुरुज
आढळतात.येथून पुन्हा गड जिथून पाहयाला सुरवात केल त्या जागेपाशी येऊन
पोहचतो.किल्ल्यावरून प्रबळगड,इरशाळगड,कर्नाळा आणि सांकशीच किल्ला हा परिसर
दिसतो.धुके असल्याने आम्ही कोणत्याचे गडाचे दर्शन घेऊ शकलो नाही.संपूर्ण
गडफेरीस अर्धा तास पुरतो.
प्रकार : गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी : मध्यम
ठिकाण : रायगड, महाराष्ट्र
जवळचे गाव : वडगाव
डोंगररांग : कर्जत पनवेल
माणिक गडाचा ट्रेक मजेशीर आहे.
माहुली गड
पावासानतंरच्या पहिल्या 'माहुली गड' या ट्रेकला मोठी मागणी होती.सर्वानी होकार दिला.मोठी लिस्ट तयार झाली.
सकाळी
'आसनगांव' स्टेशनावर मोजणी केली.पच्चावन ट्रेकर जमले होते.माहुली गड ढगात
लपले होते.त्या दिशेने प्रस्थान केले.सुरुवातीला वेग होता.गड चढायचा होता व
काही मडंळी नवखी असल्याने पुढे काही अतंर डंपरने प्रवास केला.एका
डंपरमघ्ये सर्वजण चढलो.हेलकावे खात आरडाओरड करीत मजा करीत प्रवास केला.
पायथ्याच्या शंकराच्या मंदिरात थांबुन चहापाणी करुन 'जय महाराष्टृ'व 'जय भवानी' पुकारा करीत जगंलात शिरलो.ट्रेकरना सुचना दिल्या.
हिरवा
रंग डोळ्यात भरत होता.निसर्ग बहरला होता.सर्वाचा उत्साहाच्या भरात पटापट
चढत होते.उन्हाने गरम झाल्याने घाम निथळायला लागला.पावसाची आतुरतेने वाट
पाहत होतो.
माहुली गडाची शिखरे ढगातून मघ्येमघ्ये दर्शन देत होती.
माहुली गडाची शिखरे ढगातून मघ्येमघ्ये दर्शन देत होती.
पावसाच्या मोठ्या सरीने आम्हाला चागलेच झोडपले.
ज्या मजेसाठी आम्ही आलो होतो.ती मजा आम्हा सर्वाना घेता आली.तरुण ट्रेकर पटापट चढत गेले पण वयस्कर दम खात चढत असल्याने चढण्यास वेळ लागत होता. बाराच्या सुमाराला वरती गडावर पोहचलो.
पळ्सगड व भंडारगड पाहिले.ढगातून डोकावत आम्हाला पाहत होते.नवरा,नवरी,करवली चे दर्शन झाले.फॉटॉग्राफी झाली.

आमच्याकडचे
पाणी संपले होते.काही मडंळीना पाण्याच्या शोधात कल्यान दरवाज्याकडे
घाडले.तेथून पुढे सर्वासह कल्यान दरवाज्यापर्यत गेलो.तेथले वातावरण घुद
होते.दाट झाडीत ढगाचे आक्रमण झाल्याने अंधार होता. गडावर फेरी मारली.आणलेले
डबे खाल्ले.गाणी गायली.
उतरायला सुरुवात केली.सर्वाना सावकाश उरतण्याच्या सुचना दिल्या.एवढ्या सर्वाना एकदम उतरताना वाटेवर गर्दी होत होती.तरीपण एकामेकाच्या मदतीने उतरत होते.खाली आल्यावर काहीना धबधब्यावर जाण्याची इच्छा होती.पण उशिर झाल्याने सर्वाना घेउन खाजगी वाहनाने स्टेशन गाठले.ट्रेक मस्त व मजेशीर
'पेब'वर भ्रमंती
यावर्षीचा पहीला
ट्रेक रविवार दिनांक ९ जानेवारी २०११ रोजी 'पेब' या किल्ल्यावर केला.मस्त
वातावरण असल्याने ट्रेकला हजेरी वाढली होती.नवख्या ट्रेकर ना या गडावर
नेल्यास त्यांची ट्रेकींगची आवड वाढु शकते.
पनवेलच्या
ईशान्येला मुंबई पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन - चार किलोमीटर
अंतरावर हा किल्ला आहे. माथेरानसारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या
माणसांच्या गर्दीपासून मोकळीक हवी असल्यास निसर्गप्रेमींनी पेबचा किल्ला
विसरू नये. एरवीदेखील एका दिवसाच्या ट्रेकसाठी व फक्त रेल्वेच्या प्रवासात
'पेब' सारखी जवळची आणि निसर्गरम्य जागा शोधून सापडणार नाही. किल्ला
चढण्यासाठी लागणारा वेळ ,चढण्याची वाट ,वरील गुहेची रचना ,गुहेसमोरील
निसर्गरम्य दृश्य अशा अनेक बाबतीत हा गड 'गोरखगडाशी' साधर्म्य
साधतो.पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे ओळखले जाते.नेरळ
वरून चालत पायथ्याला पोहोचलो आणि "introduction" आटपून घेतलं.पहील्यांदाच
ट्रेक आलेल्यांचे स्वागत केले.समोर पेबचा कडा दिसत होता तर डावीकडे
माथेरान.गाणी गात थट्टा मसस्क्री सगळे एकदाचे पोहोचले त्या टेकाडावर. समोर
एक भलामोठा विद्युतखांब होता. चढल्यावर त्याशेजारी डाव्याबाजूला गर्द झाडी
होती. त्या झादीच्या उंबरठ्यावर असलेल्या सावलीत आम्ही विसावलो. चिवडा
फरसाण खाल्लं आणि पुढची वाट पकडली. आता ठरवला की थांबायचं ते सरळ गडावर
पोहोचूनच.
उन्हं
तापू लागली होती पण हवेत गारवा होता न डोक्यावर सावली. हवेत गारवा
असल्याने सुखद वाटत होते जास्त चढही नव्हता. गप्पा मारत जंगलाची मजा लुटत
आमचे टोळके चालत होते. काहीवेळाने आम्ही त्या झाडीतून बाहेर आलो आणि गडावर
चढणं सुरु झाले.वाटेत एक मोठा झाड दिसले. त्याच्या डोहात ३-४ जण आरामात
राहतील इतकी जागा होती.
या
गडाला बिकटगड का म्हणतात ते आम्हाला चांगलंच कळत होतं.पहिलाच चढ छातीवर
घेऊन आम्ही कुठे थोडा वर पोहोचतोय तोवर एक सुकलेला ओढा खाली आलेला दिसत
होता. त्या ओढ्यातूनच वर चढायचे ठरले.थकून भागून ओरखडे झेलून 'नाखीण' आणि
'पेब'च्या खिडींत पोहोचलो.उन्हामुळे व थडीं कमीझाल्याने खुपच थकवा
आला.खिडींत वर पोहचल्यानतंर पश्र्चिमेचा भाग दिसला आणि थकवा दुर झाला.
छोटासा राँकपँच सर्वाना चढवत काही वेळातच गुहेत पोहोचलो.
इथून समोर म्हसमाळ डोंगर दिसत होतं.लांब धुक्यात मलंड आणि चंदेरी सुद्धा साद घालत होते. हे दृश्य मनोमन पाहून थोडे विसावलो. काही फोटो काढले आणि डबे उघडले. पुलाव, इडली, पोहे, ठेपले, चपात्या, ब्रेंड, मसाले भात,अंडी, लसून चटणी, "garlic rice",आणि विविध प्रकारची लोणची अशी मेजवानी मांडली होती.हे जेवण स्वाहा केलं.गडाची माहितीचे "printouts" मित्राने सगळ्यांना वाचून दाखवले. दमलेल्या मडंळीनी गुहेत आराम करण्याचे ठरविले तर इतर मडंळी शिडीचढुन गडावर फिरायला गेली.तरुण मडंळी भुयार पाहण्यात गुतंले होते.
परतीचा प्रवास मजेत केला व पुढच्या ट्रेकची आखणी केली.इथून समोर म्हसमाळ डोंगर दिसत होतं.लांब धुक्यात मलंड आणि चंदेरी सुद्धा साद घालत होते. हे दृश्य मनोमन पाहून थोडे विसावलो. काही फोटो काढले आणि डबे उघडले. पुलाव, इडली, पोहे, ठेपले, चपात्या, ब्रेंड, मसाले भात,अंडी, लसून चटणी, "garlic rice",आणि विविध प्रकारची लोणची अशी मेजवानी मांडली होती.हे जेवण स्वाहा केलं.गडाची माहितीचे "printouts" मित्राने सगळ्यांना वाचून दाखवले. दमलेल्या मडंळीनी गुहेत आराम करण्याचे ठरविले तर इतर मडंळी शिडीचढुन गडावर फिरायला गेली.तरुण मडंळी भुयार पाहण्यात गुतंले होते.
लोहगडावर स्वारी
आँक़्टोबर
हिट मुळे काही दिवसाच्या विश्रांतीनतंर भटकंतीचे वेध लागलेल्या आमच्या
मावळ्यांनी लोहगडावर स्वारी करण्याचे ठरविले.रविवारी सकाळी निघुन मळवली
गाठली.तेथुन पुढे भाजे लेण्यांकडे प्रथान केले.वातावरण व लोण्यांजवळील
स्वच्छता पाहुन प्रसन्न वाटते.
रिफ्रेश
होण्यासाठी आपल्या इतिहासाची साक्षीदार असलेली... आपल्या कोरीवपणानं अनेक
काळ मागं घेऊन जाणारी... भल्यामोठ्या कातळात कोरलेली लेणी पाहाणे हाही
अत्यंत सुंदर अनुभव आहे. विसापूरच्या पायथ्याशी भाजे लेणी जणू निवांतपणे
भटक्यांची, अभ्यासकांची वाट बघत असल्यासारख्या उभ्या आहेत.पन्नास एक
पायऱ्या पार करत वरती आल्यावर भाजेच्या लेण्यांतील मुख्य चैत्याच्यासमोर
आपण येतो. इ. स. पूर्व दुसरं ते पहिल्या शतकांत भाजे लेणीची बांधणी झाली.
मुख्य चैत्याचा दर्शनी भाग कोसळला असल्यानं तो उध्वस्त आहे. मात्र आतील
अष्टकोनी स्तंभ, त्यावरील कोरीव कामं आणि चैत्यग्रह प्रेक्षणीय आहेत. मुख्य
चैत्याच्या आतमध्ये द्वारपाल आणि ऐरावतारुढ इंद आणि सूर्य यांच्या प्रतिमा
लक्ष आकर्षून घेतात. मुख्य चैत्याच्या दोन्ही बाजूला बौद्ध विहार असून
सर्व चैत्य आणि विहार यांची संख्या १८ भरते. पाण्यासाठी दगडात टाकी कोरून
खास व्यवस्था इथंच करण्यात आली आहे. या पाण्याच्या अनेक टाक्या अजून
सुस्थितीत असल्याचं आश्चर्य वाटत रहातं.चैत्य आणि विहार असे दोन्ही प्रकार
इथे दिसतात. मुख्य चैत्यगृह भव्य आहे. स्तंभावर कलाकुसर आणि दरवाजावरचं
चैत्यतोरण लक्ष वेधून घेतं. अनेक लेणी दुमजली आहेत. पुढची काही लेणी अर्धवट
कोरून सोडून दिलेली दिसतात. दक्षिणेकडे प्रचंड मोठा धबधबा आहे.सूर्यगुंफा
हे भाजे लेण्यांचं खास वैशिष्ट्य. या गुंफेत रथारूढ आणि गजारूढ योद्ध्यांचे
प्रसंग चितारलेत. कार्ले आणि भाजे या दोन्ही ठिकाणी ब्राह्माणी लिपीत
कोरलेले शिलालेख आढळतात.भाजे लेण्यांवरूनच एक रस्ता लोहगड विसापूर किल्ल्यांकडे जातो. लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांमध्ये थोडं अंतर असलं तरी ते एकमेकांना खेटून असल्यासारखे उभे आहेत.तासभराच्या पायपीटीनंतर लोहगड विसापूरच्या खिंडीत येऊन पोहोचतो. डाव्या हाताला जाणारी वाट विसापूरकडे जाते तर उजव्या हाताने मळलेली वाट थेट लोहगडवर जाते. सह्यादीतल्या मांडवी डोंगररांगेतलं व बोरघाटाचं राखणदार असलेलं लोहगड (स.स.पासून 3412 फूट) व विसापूर (स.स. पासून 3567 फूट) , हे किल्ले मळवलीपासून जवळ आहेत.मोठमोठ्या वृक्षांनी वेढलेल्या या वाटेवरुन जाताना अनोखा आनंद होतो. गड चढण्यास पायऱ्या असल्याने लहान मुलांना बिनधास्त नेता येतं. प्रथम लागतो, तो गणेश दरवाजा. इथून थोडं पुढे गेल्यावर नारायण दरवाजा येतो. इथेच दोन भुयारं दिसतात. या भुयारात भात आणि नाचणीचं धान्य कोठार होतं. पुढे येतो तो हनुमान दरवाजा आणि शेवटी मुख्य महाद्वार. हे चारही दरवाजे सुरळीत आणि कोरीव मूर्त्यांनी नटलेले असल्याने आपल्याला इथेच खिळवून ठेवतात.
गडाच्या
पायथ्याला लोहगडवाडी आहे. वाडीच्या वरच्या अंगाला उजवीकडे किल्ला आहे.
किल्ल्याची तटबंदी देखणी असून उत्तम स्थितीत आहे. वाडीतून गेल्यावर गणेश , नारायण , हनुमान असे दरवाजे पार करत आपण शेवटी महादरवाजात पोहोचतो. गडावर एक मोठं तळं आहे. तटबंदीचे
दगड वारा-पावसाच्या मा-यामुळे कमकुवत झालेले असतात. त्यावर पाय पडताच हलून
आपला तोल जाऊ शकतो. कड्यावरची मातीदेखील कधी फसवेल याचा भरवसा नाही.
महादरवाज्यातून
मुख्य गडावर प्रवेश करताच समोर मशिदीसारखी इमारत दिसते. इथून तटाशेजारून
जाताना टेकडीखाली प्रशस्त गुहा दिसते. या गुहेला लोमेश ऋषींची गुहा म्हणून
ओळखलं जातं. ही गुहा मोठी असल्याने मुक्कामासाठी उत्तम आहे. गुहेशेजारीच
पिण्याच्या पाण्याचं तळं आहे. टेकडीवर तळे, वाड्यांचे अवशेष अशा अनेक
ऐतिहासिक वास्तू पहायला मिळतात. तिथलं त्रिंबकेश्वर महादेवाचं मंदिर आपलं
लक्ष वेधून घेतं.
इथून गडाच्या पश्चिम दिशेला चालत गेल्यावर विंचवाच्या नांगीसारखा कडा नजरेस पडतो. कड्यावरच पाण्याचे टाके दिसतात. याच कड्यावरून संपूर्ण गडाच्या तटांवर नजर ठेवता येते. लढाईप्रसंगी गडाच्या रक्षणासाठी या कड्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असे. या विंचूकड्याच्या नैऋत्येला उंबरखिंडीत शाहिस्तेखानाचा सरदार करतलब खानाची मराठ्यांनी कोंडी केली आणि त्याला पिटाळून लावलं, असा इतिहास आहे.
लोहगड
१६५७ च्या सुमारास स्वराज्यात सामील झाला. तर इ. स. १६६४ मध्ये सुरतेहून
आणलेली लूट छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडावर ठेवली होती. तेव्हा या
गडाचं अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येतं. तर पुढे पुरंदरच्या तहात २३ किल्ले
मोघलांना देण्यात आले. त्यात लोहगडही सामील होता. पुढे १३ मे १६७० रोजी हा
किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला.
गडावरुन पवना घरणाचा सुदंर देखावा पाहता येतो. खुपसे गड या गडावरुन दिसतात.
निसर्गाने
परिपूर्ण, रानावनांनी नटलेल्या, वेलीफुलांनी वेढलेल्या लोहगडाला या
पावसाळ्यात आवर्जून भेट देण्यात वेगळीच मजा असते.पाउस,वेगाच्या वा-या व
घुक्यातुन वाट काढीत गडावर स्वारी करणे एक आव्हान असते.
नागफणी...ड्यूक्स नोज.
गणपती
विसर्जनानतंर पावसाळ्यातला शेवटच्या ट्रेकला जाण्याचे अगोदर ठरविले
होते.पण कोठे जायचे ठरत नव्हते. शेवटी 'ड्यूक्स नोज'चा ट्रेक
ठरला.मित्रांचा होक़ार आला.माझे मित्रपरीवार व माझ्या मुलाचा मित्रमडंळ असे
सकाळी इंद्रायणीने निघालो.लोणावला येथे उतरुन कुरवंडे गांव गाठ्ले.प्रन्नस
वातावरण होते. सर्व वातावरण स्वच्छ सुर्यप्रकाशात घुवून निघाले होते.
रात्री पाउस पडुन गेल्याने हवेत गारवा होता.ओळख परेड झाल्यावर चहापाणी करुन
चढण्यास सुरुवात केली.'शिवाजी आयएनएस'ला बाजुला ठेवून चढाई सुरु केली.
खंडाळा व लोणावळ्याचा मनाला सुखवणारा जो निसर्ग आहे. तो केवळ ट्रेकने चागंला एन्जॉय करायला मिळतो. गवतातून वाहणारा मोकळा उनाड वारा आपल्याला सगळं विसरायला लावणारा आहे. या दिवसात मूळचा राकट... कणखर असलेला सह्यादी मृदू... ओलसर होतो. 'ड्यूक्स नोज'चा सुळका न्याहाळताना ड्यूक ऑफ वेलिंग्टनची आठवण येते.इथल्या डोंगरकड्यांवरच्या टेकिंगचा अनुभव अविस्मरणीय असतो.लोणावळा-खंडाळ्याच्या द-याखो-यांचे सौंदर्य न्याहाळणं हा आगळा अनुभव असतो.
हिरवाई पाहण्यासारखी होती.काही पट्यात पिवळी फुले बहरली होती.हिरव्या रंगात मघ्ये मघ्ये पिवळी शेड दिसत होती. पुढे पुढे वेगवेगळी फुले पाह्ण्यास मिळाल्याने मन प्रन्नस झाले.त्या फुलाना हात न लावता कँमे-यात त्या फुलांच्या छ्ब्या उतरवुन घेतल्या.जसे काय 'व्हँली आँफ फ्लावर'चा नजरा पाहत होतो. वरती पोहचल्यावर उन्हे वाढल्याने गरम झाले.पण दरीतून घुके वर चढत होते.या धुक्याने फोटॉग्राँफीला अडचण होत होती.झाड्याच्या सावलीत बसुन गाणी झाली.आणलेला खाऊ खाल्ला.मंदीरात दर्शन घेऊन खाली उतरलो.
आता ढ्गाळ झाल्याने व वारा सुटल्याने थकवा दुर झाला. मग परतताना खंडाळा येथे जाण्याचे ठरले.
आजुबाजुचा परीसर न्याहळत मौजमस्ती करीत पुढचा पदभ्रमण सुरु होते. बाजुच्या डोगंराला वळसा घालुन खंडाळ्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली.पावसाचा अभिषेक सुरु झाला. आम्ही मस्त भिजून घेतले.या मोसमातल्या पावसाचा निरोप घेऊन आम्ही खंडळ्याला उरतलो.
आजुबाजुचा परीसर न्याहळत मौजमस्ती करीत पुढचा पदभ्रमण सुरु होते. बाजुच्या डोगंराला वळसा घालुन खंडाळ्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली.पावसाचा अभिषेक सुरु झाला. आम्ही मस्त भिजून घेतले.या मोसमातल्या पावसाचा निरोप घेऊन आम्ही खंडळ्याला उरतलो.
काही नवोदिताना ह्या ट्रेकचा अनुभव चागंला मिळाला.आम्ही मात्र पावसाळा व हिवळ्य़ाच्या मघ्यावरचा वातावरणाचा अनुभव घेत पुढच्या ट्रेकची आखणी करीत परतलो.
Monday, September 6, 2010
सागरगड
खुप दिवसानी 'सागरगड' (अलिबाग जवळचा) या पावसाळी ट्रेकला जाण्याच्या
माझ्या हाकेला मित्रांची साद मिळाल्यानतंर आम्ही काल रविवारी ५
सप्टेंबर,२०१० गेलो होतो. सागरगडला जाण्यासाठी प्रथम अलिबागची एसटी
पकडायची. तर अलिबागच्या अलीकडेच पाच किमी अंतरावर खंडाळे गाव आहे. या
स्टॉपवर उतरायचे. इथेच गावाच्या नावाची हिरवी पाटी दिसेल. तर डाव्या हाताने
जो रस्ता जातो त्या वाटेने तडक चालत निघायचे. काही
नवखे आले होते तर काही गणपतीच्या तयारीसाठी घरीच राहीले.हिरवाईचा साज
नटलेला निसर्ग पाहुन मन उल्हसित झाले..ऊनपावसाचा खेळ सुरु होता.पाउस येवून
गेल्यावर निसर्ग स्वच्छ घुतल्यासारखा दिसायचा.पावसाने आम्हाला चागंली साथ
दिली.सुरुवातीला उत्साह असल्याने आमचे मावळे जोरात होते.मागच्या आठवड्यात
माझा वाढदिवस होता.मुलाच्या मित्रानी तो (बिलेटेट्)वाढदिवस पुन्हा
माझ्याकडुन केक कापुन साजरा केला. बाजुला वाहणारा वाहल, कातळाचा टेबल,
हिरवा निसर्ग, लाबंवर दिसणारा घबघबा, क्षांची किलबील,पाण्य़ाची खळखळ अशा सजावटीत माझा वाढदिवस साजरा होण्याची ही पहिलीच वेळ होती.खुपच आनंद झाला आणि स्मरणीय ठरला.
डांबरी सडक संपून उजव्या हाताला दगडाचा कच्चा रस्ता निघतो तो थेट गड
पायथ्याशी जातो. पायथ्यालाच दगडाच्या पाय-या आहेत. छोटी चढ चढुन गेल्यावर
सिद्धेश्वर आश्रमाचा शांत निगर्सरम्य परिसर तर धोंडाणे धबधबा आणि गुहा
पहायला मिळतात. नागमोडी चढनीच्या वाटा चढताना चांगलीच दमछाक होते, पण
सिद्धेश्वरच्या या हिरव्यागार परिसरात येऊन सर्व थकवा नाहिसा होतो.
शिवमंदिरात जाउन दर्शन घेतले.मठात फिरलो.मंदिरासमोरच गोड्या पाण्याची विहीर
आहे. इथे बारमाही पाणी असते.तेव्हा थोडं पाणी पिऊन जास्त विश्रांती घेता
मंदिरासमोरच्या वाटेने गडाच्या दिशेला निघावे लागते. आणखी थोडं पुढे
गेल्यावर सागरगड वाडी लागते.गावांत सोलार उर्जेवरची वीज लावली आहे.
या ठाकर वस्तीतून पूवेर्कडे चालत गेल्यावर समोरच सागरगडाचा पाहारेकरी 'वानरलिंगी' सुळका दृष्टीस येतो. पण घुक्यात हरवलेला होता.थोड्याच वेळात थोडे घुके बाजुला सरले आणि आम्हाला 'वनारटोक' दिसले.
डाव्या हाताला घनदाट जंगल आणि उजव्या हाताला खोल दरी, अशा वाटेने सागरड दुरूनही व्यवस्थित न्याहळता येतो. समुदसपाटीपासून साधारण ३५० मीटर उंचावरचा हा गड चांगला प्रशस्त आणि मोक्याचा होता, हे लक्षात येत गडाची तटबंदी बऱ्याच अंशी ढासळलेली आणि खचलेली आहे. तर गड बांधकामासाठी काही ठिकाणी जांभ्याच्या दगडांचा वापर केलेला दिसतो. गडावर फिरण्यासाठी तटबंदीच्या बाजूने जाणा-या मुख्य पायवाटेचा वापर करायचा. प्रथमच डाव्या हाताला पत्र्याचं छप्पर असलेले महादेवाचं मंदिर दिसते. इथूनच पुन्हा खाली उतरून उजव्या हाताला पाण्याचं कुंड दिसते.या कुंडाचं विशेष म्हणजे इथे भर उन्हाळ्यातही गोमुख असलेला पाषाणातून सतत पाणी पडत दिसते. हे पाणी पिण्यायोग्य असल्याने कुंडात कचरा न टाकता पाणी घ्यावे. हीच वाट पुढे वानरटोक सुळक्यासमोर जाते. वाटेत जुन्या वाड्याचे अवशेष आणि पाणी नसलेला छोटा तलावही दिसतो. तर काही समाध्यांचे अवशेष पाहायला मिळतात. गडमाचीवर मात्र दाट जंगल आहे. तर अनेक वाड्याचे चौथारेच पाहायला मिळतात. पठार मोठे आहे.सागरगडावर निसर्गाच्या मोहात पडून इंग्रज अधिक-यांनी इथे वास्तव्यासाठी बंगले बांधले होते.येथुन अलिबागचा समुद्रकिनारा दिसतो. समुद्रातील बेटे पाहण्यास मिळतात.पुर्वेला घरमतरची खाडी आहे.कर्नाळा,मानिकगड दिसतात.
वानरटोकावरुन दिसणारे द्दश्य पाहुन तेथेच जेवण करण्याचे ठरवले.प्रथम फोटोग्राफि झाली.आणलेले डब्बे उघडले आणि वा-यासह पावसाने सुरुवात केली त्यामघ्ये आमचे वनभोजन त्यामघ्ये वाहुन गेले. पण त्या परीस्थितीतही जेवणाची मजा वेगळीच आली.पँकअप करुन आम्ही परतीला सुरुवात केली.घुके वाढल्याने वाट शोघत शोघत वाटचाल सुरु होती.ऐकामेकाला साद घालत उतरत होतो.पावसाचा जोर वाढला होता. पटापट उतरत खाली आल्यावर 'धोंडाणे'धबधब्यावर आलो.शभंर फुटावरुन पडणारा शुभ्र फेसाळ पाण्याचा प्रवाह खाली अंगावर घेत सर्वानी आपला थकवा दुर केला.मित्रमडंळी तेथुन बाहेर येण्यास तयार नव्हती पण पावसाने आपला जोर वाढवल्याने सर्वाना बाहेर काढावे लागले.तेथे फक्त आम्ही असल्याने सर्वानी मनमुराद आनंद घेवुन तेथुनच सागरगडाचा निरोप घेउन खाली आलो.
चारही दिशांनी निसर्गाने परिपूर्ण अशा इतिहासाच्या मूक साक्षीदाराला एकदा तरी आवर्जून भेट द्या.
डांबरी सडक संपून उजव्या हाताला दगडाचा कच्चा रस्ता निघतो तो थेट गड
पायथ्याशी जातो. पायथ्यालाच दगडाच्या पाय-या आहेत. छोटी चढ चढुन गेल्यावर
सिद्धेश्वर आश्रमाचा शांत निगर्सरम्य परिसर तर धोंडाणे धबधबा आणि गुहा
पहायला मिळतात. नागमोडी चढनीच्या वाटा चढताना चांगलीच दमछाक होते, पण
सिद्धेश्वरच्या या हिरव्यागार परिसरात येऊन सर्व थकवा नाहिसा होतो.
शिवमंदिरात जाउन दर्शन घेतले.मठात फिरलो.मंदिरासमोरच गोड्या पाण्याची विहीर
आहे. इथे बारमाही पाणी असते.तेव्हा थोडं पाणी पिऊन जास्त विश्रांती घेता
मंदिरासमोरच्या वाटेने गडाच्या दिशेला निघावे लागते. आणखी थोडं पुढे
गेल्यावर सागरगड वाडी लागते.गावांत सोलार उर्जेवरची वीज लावली आहे.या ठाकर वस्तीतून पूवेर्कडे चालत गेल्यावर समोरच सागरगडाचा पाहारेकरी 'वानरलिंगी' सुळका दृष्टीस येतो. पण घुक्यात हरवलेला होता.थोड्याच वेळात थोडे घुके बाजुला सरले आणि आम्हाला 'वनारटोक' दिसले.
डाव्या हाताला घनदाट जंगल आणि उजव्या हाताला खोल दरी, अशा वाटेने सागरड दुरूनही व्यवस्थित न्याहळता येतो. समुदसपाटीपासून साधारण ३५० मीटर उंचावरचा हा गड चांगला प्रशस्त आणि मोक्याचा होता, हे लक्षात येत गडाची तटबंदी बऱ्याच अंशी ढासळलेली आणि खचलेली आहे. तर गड बांधकामासाठी काही ठिकाणी जांभ्याच्या दगडांचा वापर केलेला दिसतो. गडावर फिरण्यासाठी तटबंदीच्या बाजूने जाणा-या मुख्य पायवाटेचा वापर करायचा. प्रथमच डाव्या हाताला पत्र्याचं छप्पर असलेले महादेवाचं मंदिर दिसते. इथूनच पुन्हा खाली उतरून उजव्या हाताला पाण्याचं कुंड दिसते.या कुंडाचं विशेष म्हणजे इथे भर उन्हाळ्यातही गोमुख असलेला पाषाणातून सतत पाणी पडत दिसते. हे पाणी पिण्यायोग्य असल्याने कुंडात कचरा न टाकता पाणी घ्यावे. हीच वाट पुढे वानरटोक सुळक्यासमोर जाते. वाटेत जुन्या वाड्याचे अवशेष आणि पाणी नसलेला छोटा तलावही दिसतो. तर काही समाध्यांचे अवशेष पाहायला मिळतात. गडमाचीवर मात्र दाट जंगल आहे. तर अनेक वाड्याचे चौथारेच पाहायला मिळतात. पठार मोठे आहे.सागरगडावर निसर्गाच्या मोहात पडून इंग्रज अधिक-यांनी इथे वास्तव्यासाठी बंगले बांधले होते.येथुन अलिबागचा समुद्रकिनारा दिसतो. समुद्रातील बेटे पाहण्यास मिळतात.पुर्वेला घरमतरची खाडी आहे.कर्नाळा,मानिकगड दिसतात.
वानरटोकावरुन दिसणारे द्दश्य पाहुन तेथेच जेवण करण्याचे ठरवले.प्रथम फोटोग्राफि झाली.आणलेले डब्बे उघडले आणि वा-यासह पावसाने सुरुवात केली त्यामघ्ये आमचे वनभोजन त्यामघ्ये वाहुन गेले. पण त्या परीस्थितीतही जेवणाची मजा वेगळीच आली.पँकअप करुन आम्ही परतीला सुरुवात केली.घुके वाढल्याने वाट शोघत शोघत वाटचाल सुरु होती.ऐकामेकाला साद घालत उतरत होतो.पावसाचा जोर वाढला होता. पटापट उतरत खाली आल्यावर 'धोंडाणे'धबधब्यावर आलो.शभंर फुटावरुन पडणारा शुभ्र फेसाळ पाण्याचा प्रवाह खाली अंगावर घेत सर्वानी आपला थकवा दुर केला.मित्रमडंळी तेथुन बाहेर येण्यास तयार नव्हती पण पावसाने आपला जोर वाढवल्याने सर्वाना बाहेर काढावे लागले.तेथे फक्त आम्ही असल्याने सर्वानी मनमुराद आनंद घेवुन तेथुनच सागरगडाचा निरोप घेउन खाली आलो.
चारही दिशांनी निसर्गाने परिपूर्ण अशा इतिहासाच्या मूक साक्षीदाराला एकदा तरी आवर्जून भेट द्या.
Sunday, July 4, 2010
पनवेल(धोधानी') ते माथेरान
पावसाळा सुरु झाल्यानतंरचा पहिलाच ट्रेक काल मित्रमडंळी व मुलाच्या
मित्रासह केला.ट्रेक ठरविल्यापासून मित्रानी पटापट ट्रेकाला येण्याचे
सांगितले पण शनिवारच्या पावसामुळे खुपसे मित्र गळाले.पनवेल येथे जमण्यास
उशीर झाल्याने आम्ही 'धोधानी'ला जाणारी पहिली एसटी पक़डु शकलो नाही.एक तास
एसटी स्टन्डवर गप्पा करीत पट्कन निघाला.पाऊस जोरात पडत होता.पुढ्ची एसटी
पकड्ली.एसटीत आम्ही सतरा जण होतो. निसर्ग पाहत आमचा प्रवास छान झाला.धोधानी
येथे उतरल्यावर न थांबता ट्रेक सुरुवात केली. गावांतून पुढे एका छोट्याशा
पठारावर आल्यावर माझा सहकारी 'श्रीयुत एकनाथ मराठे' याचा वाढदिवस आम्ही
साजरा केला.छोटासा शि-याचा केक घरुन बनवून आणला होता.त्याने आमच्या
आग्रहाला मान देऊन तो केक कापला व सर्वाना वाटला. माझ्या मुलाच्या मित्राना
ही घट्ना वेगळीच वाटली व ते खुष झाले.मराठेला आम्ही त्याचा वाढदिवस साजरा
करणार याची कल्पना नव्ह्ती.पण आम्ही ट्रेकला त्याचा वाढदिवस साजरा केल्याने
ट्रेक तो खुषीत होता. गप्पा करीत, मागील ट्रेकच्या मजा सांगत व निसर्ग
पाहत आमचा ट्रेक होता.पाऊस झुरुमुरु पड्त होता.चढताना चागंला घाम निघत
होता. पाऊस कमी झाल्याने गरम होत होते.ढग चागंलेच खाली उतरले होते.
सह्याद्रीच्या पर्वतावरून धबधबे खाली उतरताना दिसत होते.काय त्या निर्सगाची
किमया.
पाहण्यास
असे ट्रेक करावे लागतात.आम्ही आता चागंलेच वर चढलो होतो.ढग बाजुला
सरकल्यानतंर जो नजरा दिसायची त्याचे वर्णन करणे मला शक्य नाही.सगळे जण फोटो
काढण्यात गुतंले होते. शेवटचा चढ चढुन आम्ही सनसेट पाँईंटला
पोहचलो.तेथुन खालचा परीसर व बाजुच्या पर्वत रांगा पाह्ण्यास आनंद झाला व
तेथुन न हटता निसर्ग पाहत राहवासा वाटत होते.छोटीशी विश्रांती घेऊन
'माथेरान'च्या दिशेने वाटचाल सुरु केली.हवेत चागंला गारवा होता.ढगाची
लपाछपी सुरु होती.त्यामुळे समोरचा नजारा पहताना मन भरत होते. एका पाँईटवर
बसून आम्ही आणलेले खाणे खाल्ले.शाही भोजन झाले. इड्ली चटणी,
ठेपले,कांदेपोहे, घावणे,अप्पे, गुलाबजाम, पुरणपोळी, भाजी चपाती, मसाले
भात,अंडापोळी,ब्रेड बटर आणि केळी असा खाण्याचा मेनु होता. खाल्यानतंर पुढे
लुईझा पाँईंट्वर फिरलो.खुपशी फोटोग्राफ़ी केली. वातावरण आल्हादायक होते.
पुढचा परतण्याचा होता.पण आता पावसाना विश्रांती घेतल्याने उन पडले होते व
गरम होण्यास सुरुवात झाली.काळजी घेत सावकाश खाली उतरत होतो. उतार उतरत एका
धबधब्यावर पोहकलो.जागा निसरडी होती.सुरक्षित जागेवर सगळ्याना जमवून
धबधब्याखाली मजा ट्रेकचा क्षीण घालवला.हा आनंद वेगळाच असतो. मुलाच्या
मित्रानी चांगलीच मजा केली. असा हा आमचा पहीला ट्रेक पावसाने मजेशीर
झाला.पुढेच्या ट्रेक आम्हाला बोलावा अशी विनंती करीत सर्वानी एकामेकांचा
निरोप घेतला.

No comments:
Post a Comment