तथाकथित जगाहून वेगळी, पण त्याच जगाशी आपला मेळ राखीत आपल्याच विश्वात रमणारी जमात म्हणजे ट्रेकर्स. तो कसा असतो? ट्रेक म्हणजे कर्मधर्मसंयोगाने घडलेली किंवा मित्र घेऊन जातात म्हणजे करावयाची चैन नाही, तर तो असतो एक धर्म. श्वासा-श्वासांत, नसानसांत भिनलेली एक ऊर्जा. रात्री झोपेत आणि दिवसा जागतेपणे पाहिलेले स्वप्न. ट्रेकरची खरी ओळख म्हणजे हीच. तर हा प्राणी ओळखायचा कसा? सोप्पं आहे हो. खाली दिलेली काही जंत्री जुळली की त्याला खात्रीने ट्रेकर म्हणा.
- केस अगदी बारीक कापलेले आणि दाढी, कल्ले किंवा मिशा काही तरी हौसेने कोरलेली. पण सोमवारी केलेली दाढी आठवड्यात करण्याचा प्रचंड कंटाळा. त्यामुळे फक्त सोमवारी तुळतुळीत दाढी आणि इतर दिवशी खुंट.
- हाताच्या नखांच्या आजूबाजूचे सालं हमखास निघालेली असतात.
- मान, कानांच्या पाळ्या उन्हाने करपलेल्या असतात.
- चेहरा आणि पावडर-फेसक्रीम यांचा संबंध कधीतरी स्वतःच्याच लग्नाबिग्नात आलेला.
- डॉक्टरने कधीतरी गुडघा दुखतो म्हणून ट्रेक कमी करायला सांगितलेले असतात. पण तो सल्ला या पठ्ठ्याने हमखास धुडकावलेला असणार.
- फॉर्मल कपडे आणि शूज म्हणजे एखाद्या जगात सगळ्यात असह्य गोष्ट मानणारा. त्याऐवजी कार्गो ट्राऊझर आणि टीशर्ट ओवणारा (कपडे परिधान करणे नाही, ओवणेच).
- कळकटलेली जीन्स ही घरात बळेच घेतली तरच धुवायची असते असे मानणारा.
- खरेदी करताना या कपड्याची किंवा शूजची ट्रेकसाठी किती उपयुक्तता आहे या एकाच निकषावर खरेदी करणारा.
- ब्लॅक, ग्रे, ब्राऊन, बिज, ऑलिव्ह ग्रीन यापलीकडे रंग असतात हे गावीही नसते
- ट्रेकसाठी वेगळा बुटांचा जोड असलेला. लेदर ऐवजी कॅनव्हासच्या बुटांना पसंती देणारा.
- वुडलॅंडने कितीही आऊटडोअर म्हणून जाहिरात केली तरी बुटांची निरुपयुक्तता कायम जाणून असणारा. त्याऐवजी ऍक्शन ट्रेकर या स्वस्त बुटांना आपले म्हणणार.
- नियमित ट्रेकर कधीच ट्रेकला हाफ बाह्यांचे टीशर्ट/पॅंट किंवा जीन्स घालणार नाही. त्याऐवजी पूर्ण अंग झाकेल असाच टीशर्ट आणि ढगळ ट्राऊझर घालणार. त्यातही वर दिलेले तीनचार रंगच असणार.
- चष्मा असला तरी फायबरच्या फ्रेमचा घेणार.
- प्रवासात कमीत कमी गरजा असलेला. तीन दिवसांच्या मुक्कामासाठीही फक्त एकच लहान सॅक घेणार.
- बाटलीबंद पाणी म्हणजे निव्वळ चैन असे मानणार (किंबहुना माझ्यासारखा ते पाणी अगदी गरम जरी प्यायले तरी सर्दी होणारा).
- मिळेल ते जेवण आणि मिळेल तशी जागा “किती सही आहे” असे म्हणणार.
- कुणीही सोबत असले आणि कितीही वेळा किल्ला पाहिला तरी पुन्हा पुन्हा भटकणार.
- अंताक्षरी-छाप ट्रिप्स आणि पिकनिक्समध्ये काडीमात्र इंटरेस्ट नसणार.
- सिरियल्स पहायची की सर्व्हायवल स्टोरी यावरुन घरी रिमोटची खेचाखेची होणार.
- टीम गेट टुगेदरसाठीही रिव्हर राफ्टिंग किंवा रॉक क्लाइंबिंग अशा ऍक्टिव्हिटीज सुचवणार.
- टाय-डेला हमखास याच्याकडे घालयला चांगला टाय नसणार, पण पन्नास फुटी रोप नक्की असणार.
- सगळे रस्ते माहित असणार. गोव्यापासून कुत्र्याच्या चाव्यापर्यंत सगळी माहिती असणार. कालवणापासून मालवणापर्यंत आख्खी दुनिया पालथी घालणार. पण ऑफिसात कुणी वीकेंडला फॅमिली घेऊन जायला जवळची जागा विचारली तर विचारात पडणार.
- शहरात बाईकने फिरताना वाहतुकीचे नियम पाळणार, हेल्मेट नियमित वापरणार.
- याच्या कीचेनला बायकोने दिलेल्या बाहुली किंवा बदामात कोरलेल्या नावाच्या आद्याक्षराऐवजी कॅरिबिनर आणि होकायंत्र असणार.
- पाकिटात गणपतीच्या फोटोसोबतच एखादे बॅंडएड नक्की असणार.
- चॉकलेट खाल्ले तरी त्याचे रॅपर खिशातच ठेवणार आणि घरी जाऊन डस्टबिनमधेच टाकणार, त्याच्या गाडीचे पीयुसी अपटूडेट असणार.
- वॉशरुममधले उघडे नळ स्वतः बंद करणार.
- मोबाईल घेताना जीपीएसवाला घेणार. ट्रेकचा एक वेगळा मोबाईल आणि बीएसएनएलचे सिमकार्ड असणार. मोबाईलमध्ये लुनार कॅलेंडर आणि डिजिटल कंपास हमखास इन्स्टॉल केलेले असणार.
- आठवडाभर इंटरनेटवर नवनवीन ठिकाणं आणि त्याची माहिती शोधणार.
- याच्या ब्राऊझर बुकमार्क्समध्ये डेकॅथलॉन, प्लेग्राऊंडॉनलाईन अशा साईट्स असणार. हा सतत त्यावर हेडटॉर्च, कॅरिबिनर, स्लीपिंग बॅग, टेंट यांच्या किंमती पाहणार.
- निम्मे इमेल्स फक्त आणि फक्त ट्रेक्सबद्दलचे असणार.
- दिवसातून किमान तीन मित्रांशी ट्रेकबद्दल चॅट करणार, लिंका पाठवणार.
- पुढली जोडून सुट्टी कधी येतेय हे त्याला माहित असणार.
- शुक्रवारीच ऑफिसला जाताना मोठ्ठी सॅक घेऊन जाणार.
- सोमवारी आल्यावर याचे डोळे लाल होऊन तारवटलेले असणार, थोडेसे पाय दुखत असणार, तरीही मोठा तीर मारुन आल्याचा भाव चेहर्यातवर मिरवणार.
- याच्याकडे एकतरी स्विसनाईफ नक्की असणार आणि आणखी जास्त फंक्शनवाला याला हवाहवासा वाटणार.
- अमेरिकेतून येणार्यास मित्राला (किंवा मित्राच्या मित्राच्या मित्राला) मोठा सर्व्हाववल नाईफ आणता येईल का हे विचारणार.
- अनोळखी व्यक्तीला काका, मामा, भाऊ, मावशी, काकू, ताई म्हणायला अजिबात नाही लाजणार .
- एकवेळ दगडूशेठ आणि सिद्धीविनायक कमी वेळा आठवतील पण रतनवाडीचा अमृतेश्वर, रायरेश्वर, वाघजाई अधिक वेळा आठवणार.
- रायगडावर कितीही वेळा जाऊन येणार.
- दिवसातून एकदा तरी कोकणकड्यावरुन झोपून डोकावण्याचे स्वप्न पाहणार.
- “एएमके”च्या ट्रेक कुणी बजेटमध्ये घेऊन जातोय का त्यावर नजर ठेवणार.
- सह्याद्रीवर मनापासून प्रेम करणार.
- राजांचा इतिहास माहित असणार.
- गडकिल्ला दुरुन पाहिला तरी छाती चार इंच वर येणार.
- कितीही गबाळा असला तरी स्मार्ट असणार.
ट्रेकर्सचे वाक्प्रचार...
आमच्या भटकंतीमध्ये काही वाक्प्रचार सर्रास वापरले जातात, ज्यांमुळे
ट्रेकला रंगत चढते. त्यातले काही जसे आठवले तसे इथे देत आहे. आपल्याला
आवडतील अशी अपेक्षा आहे.
१. भा. स्टॅ. टा. वर पोचणे: नियोजित वेळेपेक्षा पोचायला अर्धा पाऊण तास उशीर होणे
२. गाडी वेळेवर सुटणे: सकाळचे विधी सुरळीत होणे.
३. सकाळी गाडीला उशीर होणे / रद्द होणे: 'गाडी वेळेवर सुटणे' च्या उलट स्थिती होणे.
४. सगळ्या बाजूंनी शिट्ट्या मारणे: गाडी रद्द झाल्यानंतरची स्थिती.
५. बुंगवणे: दुचाकी किंवा चारचाकी ७०-८० च्या वरच्या वेगाने चालवणे.
६. फोटो काढत काढत मिनिटांत वर पोचणे: फारच छोटा गड/किल्ला असणे.
७. ट्रेक ’जरा’ स्पेशल असणे: खूप अवघड ट्रेक असणे.
८. माकड होणे: अति वाईट अवस्था होणे. एखादी गोष्ट बाकीच्यांना जमूनपण आपल्याला न जमणे.
९. शाहरुख खान होणे: अवघड ठिकाणी (सहसा रॉक पॅच उतरताना) बोबडी वळणे.
१०. ड्रायक्लीन होणे / करणे: ओव्हरनाइट ट्रेक नंतर सकाळी फक्त तोंड खंगाळून तयार होणे (दुसरा पर्यायच नसतो).
११. आजारी पडणे: ऑफिसला दांडी मारणे.
१२. विकेट जाणे: लग्न ठरणे / होणे.
१३. हिट विकेट आऊट होणे: प्रेमविवाह / लव्ह मॅरेज करणे.
१४. मश्रूम ब्रेक: २ मिनिटांसाठी आडोशाला जाणे. कुत्र्याची छत्री आठवून पहा, समजेल हा वाक्प्रचार.
१५. वाघ मारायला जाणे: १५-२० मिनिटांसाठी आडोशाला जाणे. ’गाडी सुटणे’चा समानार्थी.
१६. ससा मारायला जाणे: मश्रूम ब्रेकला पर्यायी वाक्प्रचार.
१७. बायोडायव्हर्सिटीला हातभार लावणे: मश्रूम ब्रेक, गाडी सुटणे, वाघ मारायला जाणे यांसाठी एकत्रित वाक्प्रचार.
१८. टोटल ’लागणे’: खूप हाल होणे.
१९. पाय घसरणे: घसरून पडणे. पण पडता पडता सावरणे.
२०. तोंड काळे करणे: घसरून पडून आडवे होणे अथवा बुड जमिनीला टेकणे. साष्टांग नमस्कार घालणे.
(पाय घसरणे आणि तोंड काळे करणे यात एक कोटि आहे.)
२१. भैसटणे: अतिउत्साहाने किंवा खूप थकल्यामुळे वेडे चाळे करणे.
२२. पोटातल्या कावळ्यांचे हत्ती होणे: फार भूक लागणे.
२३. बातम्या खाणे: गडावर किंवा गुहेत पोचल्यावर घरुन किंवा येताना रस्त्यात घेतलेल्या वडे, पोळ्या, पराठे यांवर पेपरची शाई उमटते. पण ते तसेच खाणे.
२४. ढील देणे: जुन्या ट्रेकच्या आठवणी फारच (जरा जास्तच) रंगवून सांगणे.
२५. घरी यायला थोडासा उशीर होणे: घरी पोचायला रात्रीचे १२:०० + होणे.
२६. चटई-उशी मिळणे: बायको खूपच रागावणे (फक्त विवाहितांसाठी).
२७. रोबो होणे: ट्रेकनंतरच्या दुसऱ्या दिवशी पाय फार दुखुन वाकवता न येणे.
तुमच्याकडे आणखी खजिना असेल तर कॉमेंट्समध्ये जरूर लिहा.
१. भा. स्टॅ. टा. वर पोचणे: नियोजित वेळेपेक्षा पोचायला अर्धा पाऊण तास उशीर होणे
२. गाडी वेळेवर सुटणे: सकाळचे विधी सुरळीत होणे.
३. सकाळी गाडीला उशीर होणे / रद्द होणे: 'गाडी वेळेवर सुटणे' च्या उलट स्थिती होणे.
४. सगळ्या बाजूंनी शिट्ट्या मारणे: गाडी रद्द झाल्यानंतरची स्थिती.
५. बुंगवणे: दुचाकी किंवा चारचाकी ७०-८० च्या वरच्या वेगाने चालवणे.
६. फोटो काढत काढत मिनिटांत वर पोचणे: फारच छोटा गड/किल्ला असणे.
७. ट्रेक ’जरा’ स्पेशल असणे: खूप अवघड ट्रेक असणे.
८. माकड होणे: अति वाईट अवस्था होणे. एखादी गोष्ट बाकीच्यांना जमूनपण आपल्याला न जमणे.
९. शाहरुख खान होणे: अवघड ठिकाणी (सहसा रॉक पॅच उतरताना) बोबडी वळणे.
१०. ड्रायक्लीन होणे / करणे: ओव्हरनाइट ट्रेक नंतर सकाळी फक्त तोंड खंगाळून तयार होणे (दुसरा पर्यायच नसतो).
११. आजारी पडणे: ऑफिसला दांडी मारणे.
१२. विकेट जाणे: लग्न ठरणे / होणे.
१३. हिट विकेट आऊट होणे: प्रेमविवाह / लव्ह मॅरेज करणे.
१४. मश्रूम ब्रेक: २ मिनिटांसाठी आडोशाला जाणे. कुत्र्याची छत्री आठवून पहा, समजेल हा वाक्प्रचार.
१५. वाघ मारायला जाणे: १५-२० मिनिटांसाठी आडोशाला जाणे. ’गाडी सुटणे’चा समानार्थी.
१६. ससा मारायला जाणे: मश्रूम ब्रेकला पर्यायी वाक्प्रचार.
१७. बायोडायव्हर्सिटीला हातभार लावणे: मश्रूम ब्रेक, गाडी सुटणे, वाघ मारायला जाणे यांसाठी एकत्रित वाक्प्रचार.
१८. टोटल ’लागणे’: खूप हाल होणे.
१९. पाय घसरणे: घसरून पडणे. पण पडता पडता सावरणे.
२०. तोंड काळे करणे: घसरून पडून आडवे होणे अथवा बुड जमिनीला टेकणे. साष्टांग नमस्कार घालणे.
(पाय घसरणे आणि तोंड काळे करणे यात एक कोटि आहे.)
२१. भैसटणे: अतिउत्साहाने किंवा खूप थकल्यामुळे वेडे चाळे करणे.
२२. पोटातल्या कावळ्यांचे हत्ती होणे: फार भूक लागणे.
२३. बातम्या खाणे: गडावर किंवा गुहेत पोचल्यावर घरुन किंवा येताना रस्त्यात घेतलेल्या वडे, पोळ्या, पराठे यांवर पेपरची शाई उमटते. पण ते तसेच खाणे.
२४. ढील देणे: जुन्या ट्रेकच्या आठवणी फारच (जरा जास्तच) रंगवून सांगणे.
२५. घरी यायला थोडासा उशीर होणे: घरी पोचायला रात्रीचे १२:०० + होणे.
२६. चटई-उशी मिळणे: बायको खूपच रागावणे (फक्त विवाहितांसाठी).
२७. रोबो होणे: ट्रेकनंतरच्या दुसऱ्या दिवशी पाय फार दुखुन वाकवता न येणे.
तुमच्याकडे आणखी खजिना असेल तर कॉमेंट्समध्ये जरूर लिहा.
ट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा...
कुणीतरी ईमेल केले होते... जसेच्या तसे इथे पोस्ट करतोय. ज्याने कुणी लिहिले आहे त्याच्या निरीक्षणशक्तीला दाद द्यायला हवी...
१.चेहरा: बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच काहीना काही कीडे केलेले असतात . त्यातहीकिंवा सैफच्या टशन स्टाइल मिश्या यांच्या फार आवडत्या . काही ट्रेकर्स असेहीअसतात जे दाढ़ी मिश्या ठेवत नाहीत त्यांना मुली असे म्हणतात :)
२.केस: एकतर अतिशय बारीक़ कापलेले किंवा खुप लांब ..मुले मुली दोघांचेही :)
३.वेशभूषा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे
* सोमवार ते गुरुवार: चेक्सचा शर्ट , जीन्स, पायात चप्पल. खांद्याला चिंगुली सैक हीला ट्रेकच्याभाषेत पिट्टूम्हणतात . त्याला एखादा snap किंवा रंगीबेरंगी स्लिंग जरुर अडकवलेली असते.
* शुक्रवार रात्र: निघायची तयारी ...ख़राब फीटिंगची पण प्रचन्ड comfortable ट्रैक पँट , Bombay Natural History Society चे कुठल्या तरी दुर्मिळ पक्ष्याचा फोटो असलेले टी शर्ट , कमरेला वेस्टपाउच (ही एकखासचीज आहे ...हिच्याविषयी विस्ताराने पुढे येईलच ) ,पायात अनुभवी बनचुका ट्रेकरअसल्यास स्लीपर / मध्यम अनुभवी असल्यास फ्लोटर्स / अगदीच नवखा असल्यास भारी बूट :)
* शनिवार दुपार ते रविवार दुपार: वर उघडाबंब , डोक्यात माकडटोपी , खाली ट्रैक पँट ...काही ट्रेकर्सउघडे नसतात त्यांना मुली असे म्हणतात :)
४.सापडण्याची जागा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे
* सोमवार ते शुक्रवार सकाळ: आपापला धंदा नोकरी व्यवसाय ...नाईलाजाने.
* शुक्रवार रात्र: CST स्टेशनच्या मोठया घडयाळाखाली ... ही trek साठी भेटण्याची जागा.
* शनिवार पहाट: कर्जत, मुरबाड, लोणावळा, कसारा, इ. इ. S T stand
* शनिवार दुपार ते रविवार दुपार: कुठल्यातरी गडावरील केव्ह
५.अन्य विशेष लकबी:
* हे कुठल्या ना कुठल्या ट्रेकिंग क्लबचे मेंबर जरुर असतात , पण ९० % वेळा दुसर्या club बरोबरट्रेकला जातात :)
* ट्रेकला वा शहरात कुठेही कोणताही प्लास्टीकचा कचरा टाकत नाहीत .... साधी गोळी जरी खाल्लीतरी कागद व्यवस्थीत खिश्यात ठेवतात . कोणत्याही प्रदूषणाचा यांना तिटकारा असतो . पणकिल्ल्यावर केव्हमध्ये कधी कधी ध्वनी + वायु प्रदुषण जरुर करतात :) त्यातही त्यांची फारशी चूकनसते . रात्री उशिरा निघणे, वेळी- अवेळी खाणे, दगदग यामुळे बिचार्यान्चे पोट थोड़े फार बिघडते :)
* बोलता बोलता मध्येच खालील शब्द फेकतात : आजोबा, अलंग, कुलंग, कोल,केव्ह, traverse , तिकोना, पिंचहोल्ड, हंप इत्यादी इत्यादी
* यांचे एकंदरीत काम अगदी सुबक असते , एखाद्या सराईत गृहिणीसारखे : उदाहरणार्थ सैकमध्येप्लास्टीकची पिशवी, तिच्यात कपडे, कपड्यांच्या घदीत प्लास्टीकची छोटी पिशवी, तिच्यात छोटीडबी , तिच्यात कागदाची पुडी आणि तिच्यात शिट्टी :) यांचा wastepouch ही एक धमाल चीजअसते : यात caluclator , nail कट्टर पासून सुई दोर्यापर्यंत जगातील काहीही अफलातून गोष्ट असतेएका ट्रेकरच्यापाउच मध्ये मी एकदा फॉर्म १६ A बघीतला होता आता बोला :) सैक सुद्धा अशी सुरेखभरतील की पाहत रहावं .
६.खाण्या पिण्याच्या सवयी:
* कशालाही नाही म्हणणार नाहीत :) हवे ते हक्काने मागून घेणार :)
* काहीतरी विचित्र करून दुसरयाचे लक्ष वेधून घेण्याची वाईट खोड . बिस्किटे पाण्यात बुडवून खाणे , श्रीखंड पाव , केळ पाव खाणे इत्यादी :)
* पाणी अतिशय जपून वापरतात . बाटलीतील पाणी ओतायची यांची खास पद्धत असते . बाटलीचेझाकण उघडून बाटलीच्या तोंडावर डाव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट दाबून धरायचे आणिथोडीशी मोकळी जागा ठेवून बाटली हळूवार कलती करायची यामुळे पाणी भस्सकन पडत नाही
७.गडावर असताना यांची करमणुकीची साधने:
* खणखणित आवाजात पोवाडे गाणे
* जुन्या ट्रेकच्या आठवणित रमणे
* बैटिंग ला जाणे :)
८.यांची दैवते:
* offcourse शिवाजी महाराज
* रायगडचा जगदीश्वर
* हरिश्चंद्र गडाचा खिरेश्वर , रतन गडचा अमृतेश्वर इ . इ .
९.यांची तिर्थस्थळे:
* राजमाचीचा तलाव
* बाण चा ब्लू लगून
* नाणे घाटातील केव्ह
* कोंकण कडा इ . इ .
आणि हो ज्याप्रमाणे प्रत्येक आज्जीचं एकदातरी काशीयात्रा करण्याचे स्वप्न असते त्याचप्रमाणेप्रत्येक ट्रेकरचे निम् (नेहरू इंस्टिट्यूट ऑफ़ mountaineering) ला जाऊन बेसिक कोर्स complete करून A ग्रेड घेउन यायचे स्वप्न असते :)
१०.ट्रेकर्स विषयी काही मोठ्ठे गैरसमज
* यांना मुली आवडत नाहीत
काही म्हणी आणि वाक्प्रचार :
* खाईन तर तुपाशी नाहीतर......... adjust करेन :)
* वाट पाहीन पण एस टी नेच जाईन
* केव मध्ये "आला वारा गेला वारा" तो कुणाचा सोयरा :)
* An alive ordinary rock climber is always better than an excellent dead rock climber !!!
No comments:
Post a Comment