https://pravingodse.blogspot.com/2017/12/blog-post.html
सांधण दरी - एक नागमोडी वळण
सांधण दरी
भटकंती महाराष्ट्रची
बॅच - तिसरी
दिनांक - १६ व १७ डिसेंबर, २०१७,
हाईट - ४१०० फूट,
ग्रेड - मध्यम व थ्रिल्लिंग पॅचेस
लोकेशन - भंडारदरा प्रदेश
भेटण्याचे स्थानक - कसारा रेल्वे स्टेशन.
तसे पाहायला गेले तर सांधण दरी हा माझा दुसरा
ट्रेक आहे. खरे सांगावे तर ट्रेकिंग करायचे वेड मला मात्र नव्हतेचे. पहिला
ट्रेक केला तो म्हणजे कलावंतीण दूर्ग तो हि करण्या मागचे कारण म्हणजे रोज
मुंबईच्या फास्ट जीवनातून काही तरी वेगळे करायचे होते बस, अक्षरशः खूप
कंटाळून गेलो होतो. सुशांत मुळे मी कलावंतीण दूर्ग केला. कलावंतीण दूर्ग
जाण्याचं निमित्त म्हणजे मित्र येत होता त्यामुळे मी जात होतो बस येव्हडच.
थोडक्यात सांगावे तर कलावंतीण दूर्ग हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता
कारण या आधी मी असे काही सुद्धा केले नव्हते हा लाभ मी पहिल्यांदाच घेत
होतो. सांगावे तर एक जिवलग मित्र आणि २० ते ४० अनोळखी माणसानं सोबत जाणे
आणि ट्रेकिंगच्या दरम्यान अश्या काही गोष्टी घडतात कि अनोळखी माणसं हे कधी
आपले होऊन जातात ते कळतच नाही. कलावंतीण दूर्ग हा माझ्यासाठी लाईफ टाईम
इक्सपेरिन्स होता. हे सगळे शक्य झाले ते फक्त आणि फक्त सुशांत आणि भटकंती
महाराष्ट्रमुळे आणि जाता जाता मला वेड लावून गेले.
![]() |
| कलावंतीण दूर्ग |
तसे बोलायला गेले तर दर महिन्याला भटकंती महाराष्ट्रची
ट्रेकिंग कुठे ना कुठे असतेच. अशीच एका ट्रेकिंग ची तारीख सुशांत आणि
भटकंती महाराष्ट्राच्या व्हाट्स अँप ग्रुप वर आली होती ती म्हणजे सांधण दरी
(Sandhan Valley)
सांधण दरी या वेळी
मात्र भटकंती माझ्यासाठी साठी नवीन नव्हती नाही मी भटकंती साठी. नाही जीवन धकधकीचे
होते नाही आयुष्याला कंटाळलो होतो बस जाण्याचा आनंद होता. अजून एक आनंद म्हणजे कलावंती
दुर्ग मध्ये कळत नकळत झालेले मित्र.
सांधण दरी ला जाण्याची वेळ हि १५ डिसेंबर म्हणजेच शुक्रवार नाईट ला होती, मी अगोदरच K2S ला काही वयक्तीक कारणामुळे मला जाता आले नव्हते. पण या वेळी मी जाण्याचे ठरवले होते. त्यामुळे मी ऑफिस चे काम हे एक week अगोदरच सुरु केले होते ज्याने करून मला जात येईल. बस जाता जाता काही बॉस ने काम नाही काढले तर बरे. शनिवारी मला सुट्टी नसते आणि मागितली तर देईल कि नाही है मात्र प्रश्न चिन्हच होता. शनिवारी सुट्टी घेने म्हणजे बॉस च्या ताटातला एक घास खाल्यासारखाच आहे कारण रविवारी सुट्टी असते है कधीच बॉस मोजत नाही त्यामुळे मी विचारलेच नाही.
शुक्रवार कुठून माझे नशीब उलघडलं हे देवच जाने त्या दिवशी बॉस हा लवकर निघून गेला. कसे बसे मी काम आवरता घ्येत मी ७ ते ७.३० च्या दरम्यान निघालो. भटकंती ने तसे सांगितले होते कोणत्या गोष्टी असाव्यात आणि कोणत्या नाही त्याप्रमाणे घरी पोहोचल्या पोहोचल्या पॅकिंग करायला घ्येतले. ज्या आवश्यक गोष्टी हवे आहेत ते मात्र सगळे घ्येतले होते विचार केला एकदा परत वाचावी माहिती आणि त्यात प्लेट आणि वाटी राहिली होती. मनात विचार आला घरजेच आहे का, सगळे तर आणणार नाहीत मग उगाच कशाला. भटकंती ने फेसबुक वर या विषयावर माहिती पोस्ट केली होती आणि तसेही ते ट्रेकर्स आणि पर्यावरणा साठी चांगलेच आहे ना. आपण पहिले तर मुंबई च्या या फास्ट जीवनामध्ये आपण किती जण आहोत की कचरा हा जो पर्यंत कचऱ्याचा डबा सापडत नाही तो पर्यंत सांभाळू शकतो ?. भटकंती ने हाती घ्येतलेल हे काम म्हणजे कौतुकास्परदच आहे. मग मी काहीही विचार न करता प्लेट आणि वाटी भरली व बागेची चैन लावली.
भटकंती ने सांगितल्या प्रमाणे ट्रेन पकडायची होती. त्याप्रमाणे घरातून ९.४५ ला निघालो आणि सुशांत ला मी भायखळा रेल्वे स्टेशन ला भेटलो. K2S ला ऍडव्हान्स भरून सुद्धा जाता आले नाही यावेळी दर्शन हा माझ्या सोबत होता. त्याने तसे फोन करून कसाऱ्याची टिकेट्स काढले होते. बस आता आम्हाला कसारा ला जायचे होते. सांधण ट्रेकिंग हि दोन दिवसाची होती विचार केला थोडा वेळ झोप झाली तर बरे होईल. ट्रेन तशी १०.५७ ची होती आणि कसारा पर्यंत चे अंतर २ तास ४० मिनिटाचा होता रात्रीची वेळ असल्यामुळे ट्रेनला तर गर्दी नसेलच मस्त सीट वर पसरून झोपूया पण इकडे तर ट्रेन पकडण्याची धावपळ चालू होती मी आणि माझ्या मित्रांनी कशी तरी ट्रेन पकडली आणि सीट बुक केली आज समझले की रात्री पण एव्हडी गर्दी असते ते असो. आकाराने कमी असल्या कारणामुळे माझ्या सीट वर चारजण बसली आणि सीट वर पसरून झोपायचे स्वप्न होतं ते तसेच राहिले. कसारा ला आम्ही १.२० ला पोहोंचलो ट्रेन मध्ये फक्त भटकंतीचेच मेंबर नसून बाकी ग्रुप चे पण होते. ट्रेन मधून आम्ही जसे उतरलो आम्हाला सत्या (लीडर ऑफ भटकंती) व बाकी मेंबर्स दिसले चार दिवस भटकुन सुद्धा संधान ला हजेरी लावली होती. मग थोडा वेळ भैटण्यामध्ये गेला खूप सारे नवीन होते तर काही जण कलावंतीण दुर्ग चे. भटकंतीने सर्कल करण्यासाठी सांगितले आणि सांधण बद्दल थोडी माहिती दिली व तो आपण कसा पार करणार या बदल सांगितले. भटकंतीला पकडून आम्ही ४६ जण होतो. कसारा पासून आम्हाला मूळ गाव सांधण इथे जायचे होते हा प्रवास २.५ ते ३ तास होता जवळ जवळ ७५ ते ८० किलोमीटर चा होता. सत्याने सांगितले होते झोपायचे असेल तर आताच झोपून घ्या. भटकंती ने ५ जीप कसारा पासून केली होती १ जीप मध्ये १० जण बसा असे सांगितले पण इथे सुद्धा तेच जाले ड्राइवर च्या मागच्या सीट वर आम्ही ४ जण बसलो होतो आणि मला नीट बसता येत नव्हते त्यात झोप लागणे हे कठीणच होते असो.
मूळ गाव ला आम्हाला पोहचता पोहचता ४ ते ४.३० झाले होते. सगळ्यांना थोडा वेळ फ्रेश होण्यामध्ये गेला. मग चहा आणि पोहे चा बेत झाला. थंडी मध्ये गरम गरम चहा आणि चुली वरच्या कांदेपोह्याची चव हि वेगळीच असते काही जण तर पोहे दुपारच्या जेवण्यासारखेच खात होते असो. मस्त चहा आणि पोहे चा बेत झाल्या नंतर आम्ही सगळे सांधण दरी कडे निघालो मध्ये मध्ये पाण्याचे पॅचेस आहेत हे अगोदरच भटकंती ने सांगितले होते.
![]() |
| सांधण दरी कडे जाताना टिपलेले फोटो |
![]() |
| सांधण दरी कडे जाताना टिपलेले फोटो |
सांधण
दरी कडे पोहोंचताच माझ्या मना मध्ये खूप प्रश्न निर्माण होत होते मी काही तरी आज वेगळे
करणार आहे हे मात्र नखी होते. सांधण दरी उतरताच मी २०० फूट खोल दरी मध्ये उभा होतो
आणि दोन्ही बाजूने असलेले रॉक याच्या तळातून चालत जाणे म्हणजे एक भव्य आयुष्याचे अनुभव
असल्यासारखेच होते माझ्यासाठी. निसर्गाच्या कुशीत दडलेलं 'सांधण दरी' हे आश्चर्य आजही
कित्येकांना माहित नाही. वर बघावे तर त्या दोन भिंती आगळ्यावेगळ्या रंग धारण करून आपल्यातल्या
वेगवेगळ्या खनिजाचे दर्शन देत होते मधेच या भिंती अरुंद दिसतात, तर थोड्याच वेळाने
भांडण झाल्यासारखं दोन्हीमधलं अंतर वाढलेले दिसतं आणि नंतर काही क्षणात सर्व विसरून
आलिंगन दिल्यासारखा या भिंती पुन्हा एकमेकांना चिकटलेल्या दिसतात. सांधण दरी - the
valley of shadow का म्हणतात ते मात्र आज समझले होते.
![]() |
| २०० फूट दरी दोनी बाजूने असलेले रॉक (The Valley of Shadow) |
जसे आम्ही पुढे गेलो आम्ही पाण्याच्या पहिल्या पॅच जवळ येऊन पोहचलो. पाणी हे कंबरेच्या वरती होते काहींना तर पाणी छाती पर्यंत लागत होते आणि हा पॅच सांधण च्या बाकी पॅच पेक्षा लांब होता त्यात थंडी असल्या कारणामुळे पाणी हि थंड होते. मला तर पाण्यात उतरण्या आधीच अंगावर काटे आले होते. पण सांगितल्या प्रमाणे आम्हाला साखळी हि तयार करायची होती. मी पाण्यात उतरताच थोडा वेळ स्तब्द उभा राहिलो आणि जशी साखळी तयार झाली आम्ही एक मेकांना बॅग पास करू लागलो. नदीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला पोहचलो पण अंगावरची थरथरी काही जात नव्हती. कसे बसे स्वतःला सावरत आम्ही पुढे निघालो जस जसे आम्ही पुढे जात होतो तस तसे दरीच्या दोन्ही बाजूचे डोंगर जणू काय आमच्या साठी कवाडच उघडत होते. थोडे अंतर जसे पार केलं आम्हाला डोंगरातून निघणारे सूर्याची कवळी किरणे जणू आम्हांला हाकच मारत होते. आणि ते पहाण्यासाठी माजी झालेली धडपड हे म्हणजे असे झाले की "गरम गरम चहा मध्ये पारले जी चा बिस्कीट बुडवताच तो थोंडात गेला पाहिजे नाही तर तो चहामध्येच" ! ते पाहिलेले दृश्य हे माझ्या आयुष्यातले कधी न विसरणारा क्षण होता.
![]() |
कधीही न विसरणार तो क्षण
तो पाहिलेला क्षण हे मी माझ्या मनामध्ये घट्ट आणि आठवणी मध्ये साठवून पुढे निघालो आणि आम्ही पहिल्या रॅपलिंग पॉईंट वर येऊन पोहोंचलो. तिकडे अगोदरच बाकीच्या ग्रुप चे ट्रेकर्स रॅपलिंग करत होते मी त्यांचे निरीक्षण करत होतो. रॅपलिंग करताना दोन गोष्टी सांगत होते ते म्हणजे दोन पायांच्या मध्ये अंतर आणि कंबरेच्या वरचा भाग हा मागे ठेवायचा. मला हे adventure करायचे होते पण भीती सुद्धा तेव्हडीच होती हा जर फिरून मागे जावे ते तर शक्यच नव्हते. भटकंती ने एक वेगळी ओळ सुरु केली आणि रॅपलिंग ला सुरुवात झाली मी तसा सुशांत च्या मागेच होतो मध्ये मध्ये मुलीच्या किंचाळण्याचा आवाज येत होता रॅपलिंग करताना त्या वेळी मला मात्र धडकी भरली होती. सुशांत चा नंबर आला सुशांत ने बऱ्या पैकी ठीक केलं मला सांगितले बस टेकनिक follow कर. मग माझा नंबर आला मला Harness बेल्ट लावण्यात आला. Harness लावल्या मुळे मनात एक भीती होती ती म्हणजे आपण कितीही पर्यंत केले पडणार तर नाहीच हे मात्र डोक्यामध्ये ठाम करून घ्येतले होते. मला जसे सांगितले त्या प्रमाणे रॅपलिंग चा पहिला पॉईंट पूर्ण केला. खाली उत्तरलो तर मला काहीच सुद्धा वाटले नाही करताना मात्र माझ्या आली हो मी काही तरी नवीन आज केले याचे भान झाले होते. सांधण ची दरी आणि त्यात रॅपलिंग याचा मोह मला आवारत नव्हता.
| पहिला रॅपलिंग पॉईंट |
| पहिला रॅपलिंग पॉईंट |
पहिला रॅपलिंग पॉईंट झाल्या नंतर बाकीचे तीन रॅपलिंग पॉईंट तसे सोपे गेले कारण पहिलाच थोडा मोठा आणि करण्यासारखा होता. आम्ही सगळे चवथ्या रॅपलिंग पॉईंट वर आलो. तिकडे रॅपलिंग केल्या नंतर पाण्यातून जायचे होते त्यात काही टवाळकी मुलं मुदामून तिकडेच उडी मारण्यासाठी सांगायचे जिथे पाणी जास्त असेल कारण ते तर अगोदरच भिजत होते आणि आम्हाला पण भिजवायचे ठरवले होते. त्यात मी आणि सुशांत मात्र फसलो आणि छाती एवढ्या पाण्यांत भिजलो. सांधण दरी ची हि तिसरी बॅच होती आणि त्यात आम्ही हा चार वाजताच पूर्ण केला होता आणि हे सत्या व त्यांच्या सोबत असलेले साथी याना गिफ्ट दिल्यासारखेचे होते भले याच्या मागचे कारण काही असो. अगोदरच कोकण ला जाऊन सुद्धा येणे म्हणजे हात जोडल्या सारखेच.
मनात विचार आला सांधण ची वाट हि काही सोपी नाही पाहावे तर हि नागमोडी सारखीच आहे ती कधीही बदलू शकते आणि तसे दरवषी घडते सुद्धा. दरवषी नवीन रस्ता काढणे म्हणजे कोळश्यातून हिरे शोधण्यासारखेचे आहे. सांधण ची वाट व त्यात असलेले छोटे व मोठे दगड हे आपली परीक्षाच घेत होते. आज मात्र मी खूप साऱ्या आठवणी सांधण मधुने साठवून जात आहे.
थोडे अंतर पार केले व आम्ही टेन्ट जवळ येऊन बसलो लवकर झाल्या मुले सगळे खुश होते. थोड्यावेळ आराम करताच प्रकाश याने सांगितले आपण अंघोळीसाठी जाऊया. मग प्रकाश, कैलास, सुशांत, रोहन आणि मी आंगोळीसाठी निघालो त्यात सत्या हा अगोदरच करून येत होता. सत्या आणि त्याच्यांबरोबरचे सोबती हे अगोदरच गेल्या मुले त्या डबक्यातले पाणी हे विस्कळीत झाले होते. प्रकाश ने सांगितले आपण थोडे पुढे जाऊया त्यात आम्हाला वाहत्या पाण्याचे तीन डबके शेजारी शेजारी दिसले. प्रकाश ने मात्र अगोदरच अट सांगितली होती तीन डबके असल्याकारणामुळे एक बाथ, एक साबुन लावण्यासाठी आणि एक Face Wash साठी तो क्षण जणु महाराज्यानं सारखाच होता असो. नंतर विपुल याने जॉईन केले आणि काही फोटो सुद्धा काढले ते त्यालाच ठाहुखं कसे आणि कोणत्या द्वेषामध्ये काढले ते. अंघोळीनंतर आम्ही सगळे टेन्ट जवळ रवाना झालो. भूक खूप लागली होती पण जेवण्यासाठी वेळ होती. जेवणाची वेळ येई पर्यंत मी आणि सुशांत झोपण्यासाठी गेलो. साधारण ७.३० ते ८ च्या दरम्यान भटकंती ने जेवण्यासाठी आमंत्रण दिले जेवणा मध्ये शेव ची आमटी असल्यामुळे जेवण स्वादिष्ट होते. त्यात लपून छपून अश्विनी ने ठेवलेली पुरणाची पोळी, मला तर पुरणाची पोळी हि गरम गरम खाण्याऐवकजी शिळी खाण्यासाठी खूप आवडते. पोळी शिळी असल्या कारणामुळे मी मस्त २.५ फस्त केली. जेवण झाल्यानंतर सत्या आणि काही भटक्या सॊबत आम्ही एका डबक्या जवळ गप्पा मारत बसलो होतो. त्यादिवशी जणु आकाशाला चांदण्यांनी गवसणी घातल्यासारखेच वाटत होते, काही जण तर गप्पा मारत मारत कधी ते स्वतःहा झोपू गेले त्यांनाच कळले नाही. सकाळी लवकर उठायचे आहे असे सागर ने सांगितल्यामुळे आम्ही सगळे टेन्ट कडे निघालो त्या रात्री काही जण कॅम्प फायर करत गाण्याच्या भेंड्या खेळत होते तर काही जण टेन्ट मध्ये गप्पा मारत होते. थोडा वेळ कॅम्प फायर जवळ थांबून मी झोपण्यासाठी गेलो.
सगळी ५.३० ला उठून सकाळच्या विधी आटपून चहा नाश्ता करून सत्या ने एक टीम डेहणे गावाकडे जाण्यासाठी निघाली. मोकळे रान असल्याकारणामुळे सूर्याची किरणे पडण्याआधी आम्हांला पोहोचायचे होते. त्यात भटकंती ने डेहणे गावात मस्त जेवण्याची वेवस्था करून ठेवली होती. डेहणे गावात लवकर आल्यामुळे सगळे आराम करत व खेळत बाकीच्यांची वाट पाहत राहिलो. जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे रिव्ह्यू साठी बसलो सगळ्यांनी रिव्ह्यू दिल्या नंतर आम्ही डेहणे बस स्थानक का जवळ उभा राहिलो. बस मध्ये मात्र रिव्ह्यूमध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टी हे गंगू बाई कडून झालेली सुरुवात ती शिवाजी महाराजांकडे संपत एक मेकांची गाण्याच्या माध्यमातून गंमत करत करत आम्ही सगळे शहापूर मध्ये पोहचलो.
नंतर शहापूर पासून दुसरी बस पकडायची होती ती म्हणजे आसनगाव, अंतर तसे थोडेच होते त्यावेळी मात्र कोणीही गंगू आणि शिवाजी ला विचारत नव्हते कारण मोबाईलला नेटवर्क हे दोन दिवसाने आल्यामुळे, सगळेजण मोबाईल मध्ये रमून गेले.
आसनगाव आल्यानंतर सगळ्यांना टाटा बाय बाय करत वळणावरती पुन्हा भेटू असे सांगत आम्ही सगळे मुंबई च्या फास्ट लाइफ कडे वळलो. मुंबई च्या फास्ट लाईफला सोडुन सह्याद्री चे असे रूप पाहणे माझ्यासाठी कधीही न विसरणारेच क्षण होते. काही तरी मागे राहिले असे जाणीव होतच होते पण पुन्हा सह्याद्रीला भेटू असे सांगत आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करावी.
टीप - ब्लॉग लिहिण्याचा पहिलाच पर्यंत आहे. काही चुकले किंवा कोणाचा उल्लेख करायचा राहिला असेल तर क्षमस्व.
तुमची मत आणि अभिप्राय नक्की कळवा.
लवकरच भेटू पुन्हा...............................
प्रविण गोडसे







No comments:
Post a Comment