किती बर घ्यावं त्या कडून,
किती तरी शिकावं त्या कडून
नुसतंच टकमक पाहावं कधी,
नुसतंच कान टवकारून ऐकावं कधी
शिकवेल तो रंग जीवनाचा
दरवळेल स्नेह हर्षाचा!
- संकु
कलावंतीण दुर्ग, सांधण दरी, अलंग मलंग आणि कुलंग केल्या नंतर
मनामध्ये अजून काहीतरी वेगळे करण्याची इच्छा मात्र रेंगाळत होती. पण यापैकी
केलेला अलंग मलंग आणि कुलंग हा मात्र मला पुन्हा करायचा आहे कारण या मध्ये
मला आलेला अनुभव तो मात्र मला सावरता सावरेना जेव्हा तुम्ही भेट द्याल
तेव्हा तुम्हाला नखीं समझेलच कि पुन्हा का जायचे आहे. तसे
पहिले तर एका हाताचे बोटे मोजण्याइतकेच ट्रेक केले पण सह्याद्रीचे रूप
मात्र मनामध्ये तसेच राहिले त्यामुळे नेहमी सुटीच्या दिवशी मनाची घौडदौड
नेहमी तिकडेच फिरत असते. खूप दिवसापासून पावसाळी ट्रेक करण्याची इच्छा
होती. याचे कारण हि तसेच आहे. पावसाळ्यात सह्याद्रीचं रूप नेहमीचं मनाला
वेड लावतं. तसा सह्याद्री प्रत्येक ऋतुत आपल्याला खुणावत असतो. त्याच
वेगळेपण प्रत्येक ऋतुत वेगळ असतं. पण तरीही पावसाळचं त्याच रूप काही वेगळेच
असते मनाला भुरळं घालणारं. तो अंगअंग झोंबणारा बेभान वारा, उंचच उंच कडे
कपाऱ्यातुनी धोधो बरसणारे शुभ्र धवल धबधबे, सह्याद्री माथ्यावरून दिसणाऱ्या
वेड्या वाकड्या वळणदार नद्यांचा पाट, तो उन- पावसाचा लपाछुपीचा खेळ, अन
हिरवाईने सर्वत्र नव्याने फुललेला हिरवा शालू. पावसाळ्यात हे सह्याद्रीचं रूप खरंच वेड लावतं.
काही दिवसापासून मुंबईमध्ये चांगलाच पावसाने जोर धरला
होता आणि त्यात थोडा गारवा सुद्धा सुटला होता. मी आईला सांगितले थोडीफार
गरमा गरम भजी करशील का आईने करते म्हणून सांगितले आणि त्यातच माझा जिवलग
मित्र सुशांत चा व्हाट्सअप आला तो म्हणजे हरिहर गडाचा त्याने सांगितले
जाऊया आपण, मी टाइम न घ्येता फोटो पाहिला गूगलवर आणि जाऊया करून सांगितले.
मात्र त्यावेळी माझ्या डोळ्याचे पारणं फेडत होता हा हरिहर आता जो पर्यंत
जात नाही त्याची चाहूल अशीच राहणार होती. हरिहर हे नाशिकला असल्यामुळे
सर्वप्रथम डोळ्यासमोर काय येत असेल तर 'सह्याद्रीच्या ह्या' मनाला भुरळ
पाडणाऱ्या विलोभनीय पण अजस्त्र अशा रांगा... मग ती रांग पूर्व पश्चिमला
कलनारी कळसुबाई-त्र्यंबक रांग, वा अंजठा-सातमाळा रांग असो, मनाची घौडदौड
सतत इथे धुमसत घालत राहते. सह्याद्री तसा सदैव साद देतच असतो फक्त आपल्याला
थोडी उसंत हवी असते ह्या रोजच्याच धावपळीतून बस्स ती एकदा मिळाली कि मग
पाउलं फिरकू लागतात.
सुशांत ने सिनेमाची तिकीट बुक करतो तशी हरिहर ची सीट एक
वीक अगोदरच बुक केली. मी मात्र ३० जुनं ची वाट पाहत होतो आणि त्यात पावसाची
साथ असल्यामुळे हरिहरच्या पायऱ्या चढताना मनात येणारी ती भीती आणि
सह्याद्रीने आत्मसात केलेला अवती भवती हिरवा चुडा व त्यात साथ देणारे धुके
याची कल्पना खूपच वेगळी होती माझ्यासाठी. पावसाचे दिवस असल्यामुळे मी
त्याप्रमाणे सगळी तयारी केली होती मात्र जाण्याच्या एक दिवस अगोदर
सुशांतच्या दातचे दुखणे वाढले होते त्याने तर न जाण्याचे ठरवले होते. पण मी
आणि अश्विनी ने फोन करून त्याला मात्र समजवले कि काहीही कर पण चल मग
सुशांत ने डॉक्टर शी बोलून आराम भेटेल अशी वेवस्था केली मात्र त्याने येतो
आहे असे मला तर सांगितले पण अश्विनी साठी हे सरप्राइज़ ठेवले असो.
३० जून २०१८ सांगितल्या वेळा प्रमाणे आम्ही चित्रा
सिनेमाकडे येऊन पोहचलो जवळपास ४० जण येणार होते असे समजले. ज्याला त्याला
जाता जाता पिकअप करायचे होते, मी आणि सुशांत बसच्या शेवटच्या सीट वर जाऊन
बसलो व अश्विनी आणि उत्कर्ष ची सीट आम्ही पकडून ठेवली. तसे पाहिलं तर ७५%
सीट्स तर दादर लाच फुल्ल झाली होती. नंतर ठीक १०.३० च्या आसपास आम्ही हरिहर
च्या वाटेला निघालो..... मात्र हरिहर ला निघताना पावसाने मात्र आम्हाला
साथ दिली नाही म्हंटले तिकडे तर असेलच. नंतर भांडुप ला उत्कर्ष आणि अश्विनी
बसमध्ये चढले आणि मग काय सुशांत ने सरप्राइज़ देत तिला आचार्य केले त्याला
थोडा मार पडला पण हा मार आनंदाचा आणि न सांगितल्या मुळे थोडासा रागाचा
होता असो. नंतर आम्ही सगळे गपा मारत बसलो आणि थोडाच वेळाने प्राची ने
अंताक्षरी सुरू केली प्राची बद्दल संगाचे म्हंटले तर ती एक चालती फिरती
बडबडी बाहुली आहे तिचे मात्र काही ना काही तरी चालूच असते जरी कोणीही नाही
बोलत असेल तरी सुद्धा असो तशी ती खूप चांगली आहे. हळूहळू रात्र वाढत होती
तसा गाडीचा वेग आणि बस मध्ये अन्ताक्षरीला चांगला मोह चढला होता. मध्ये
कसारा घाटाच्या अगोदर बस थांबवुन आम्ही टी-ब्रेक करून पुढे निघालो. थंड
वातावरणामुळे झोप कधी लागली ते समझलचे नाही आणि ठीक सकाळी
४ ते ५ च्या दरम्यान जाग आली ति थेट निरगुडपाडा गावामध्ये सगळेकडे अंधुक
होते मी हळूच बसची खिडकी उघडताच थंड वारा हा अंगावर शहारे निर्माण करत होता
आणि त्यात धुक्याचा पडद्या आड छोट्या छोट्या झोपड्या दिसत होत्या
त्यावेळेचे दृश्य आणि अंगाला जोंबाणारा वारा हा मनामध्येच खूप काही सांगून
जात होता.
 |
| पहाटे पोहचलो तेव्हा |
नंतर सर्व तयारी करून आम्ही गरमा गरम कांद्यापोह्यांवर ताव मारून
हरिहर गडावर जाण्यासाठी तयार झालो सुरवातीला ट्रेक दरम्यान कोणती काळजी
घ्यावी हे सांगण्यात आले या दरम्यान सगळीकडेच उजाडलं होत आणि आमच्या ट्रेक
ला सुरुवात झाली. डांबरी रस्ता ओलांडून मनात उत्साह घेऊन शेताच्या मळ्यातून
हिरवीगार वाट धरून आम्ही पुढे सरकत गेलो.
 |
| डांबरी रस्ता ओलांडून हरिहर कडे जात असताना |


गडाचा इतिहास सांगायचा झाला तर..............
हरिहर किल्ला अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात होता. १६३६
साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला.
मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला.
पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात
मोलाची भर घातली. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा
किल्ला जिंकला.
शेवटी १८१८ मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला.
प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट
मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून
जाणार्या गोंडा
घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर- भास्करगड यांची उभारणी करण्यात आली होती.
सुरवातीला मळलेली पायवाट लागली व नंतर जंगलातून रस्ता
काढत आम्ही एका पठारावर विश्रांती केली त्यावेळी मी स्वर्गरोहनचा आनंद
घ्येत होतो.
'मेल्यावर स्वर्ग दिसतं' अस म्हणतात. पण सह्याद्रीतल्या कुठल्याही गड किल्याच्या वा शिखराच्या माथाय्वर जा......
किंव्हा दर्याखोर्यातुनी भटका.....
स्वर्ग म्हणजे काय अशी अनुभुती आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र आज समजले होते मला.
त्यात सर्वत्र पसरलेली धुक्याची दुलई, आणि त्यातून हे गडकिल्ले डोकावून पाहत असावे जणू,
कडे कपार्यातुनी धो धो वाहणारा धबधबा असे वाटत होत कि
इथेच घर करून राहावं कायम.........
पण घरची वाट पुन्हा पकडावीच लागते.
 |
| स्वर्गरोहनचा आनंद |
 |
| स्वर्गरोहनचा आनंद |
 |
| स्वर्गरोहनचा आनंद |
 |
| तीन सह्याद्री वेडे |
थोड्यावेळ विश्रांती करताच त्याच उत्साही मनाने एक एक पाऊलं पुढे
टाकत पाउलवाटा धुंडाळत आमची वारी पुन्हां निघाली हरिहर ला. फोटोमध्ये
पाहिलेला हरिहर हा प्रत्यक्षात कधी नजरेत दिसतो आहे याची उत्कुसता
सगळ्यांचा होती मात्र हरिहर हा अजूनही धुक्याच्या पुंक्ज्यात स्वस्थ पडून
होता जणू काय त्याने धुक्याची दुलई अंगावर चढवली आहे कुणी तरी आपल्या भेटीस
येत आहे, ह्याची पुसटही कल्पना त्याला नसावी.
 |
| धुक्याची दुलईत अजून हि स्वस्त असलेला हरिहर |
काही अंतर पार करताच आम्ही गडाच्या दुसऱ्या पठारावर येऊन पोहोंचलो
आणि तिथूनच आम्हाला हरिहर ची चढाई नजरेत पडली त्यावेळी मात्र सगळ्यांच्या
चेहऱ्याचे हावभाव बदलले होते सगळेच एक मेकांशी बोलत होते, सरळ उभ्या चढत
जाणार्या त्या पायर्या पाहून मनामध्ये एक भीतीशी निर्माण झाली होती.

मी कितीवेळ तरी एकटक त्या पायऱ्यांकडे फक्त बघतच होतो.
सुबक पाय-यांनी सजलेला हा हरिहर गड माझ्या डोळ्याचे पारणं फेडत होता. काही
किल्ल्यांची गोष्टच न्यारी असते. इतरांपेक्षा ते वेगळे का ठरतात याचे उत्तर
कदाचित वाचण्यापेक्षा अनुभवण्यानेच जास्त विस्ताराने मिळते असाच हा हरिहर
आहे. ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण अगदी जवळ आला,
पाऊस नसल्यामुळे थोडे बरे सुद्धा वाटत होते. सुरुवात करण्या आधी आमच्या
ट्रेक लीडर ने हा अवघड टपा कसा पार करायचा याची सूचना दिली आणि चढाई ला
सुरुवात झाली. ऐंशी अंशामध्ये उभा असलेला सरळ आभाळाकडे जाणारा हा हरिहर,
दोन्ही बाजूने खोल दरी आणि त्यात खोदीव पायऱ्या मनामध्ये चांगले आणि वाईट
दोन्ही विचार येत होते.
 |
| हरिहर चढताना |
 |
| खोबण्या |
हळूहळू वर चढायला सुरूवात झाली खालून प्रचंड अवघड वाटणार्या
पायर्या प्रत्यक्ष चढताना मात्र त्यामानाने सोप्या वाटत होत्या. प्रत्येक
पायरीवर दोन्ही बाजूस खोबण्या असल्यामुळे त्यांच्या आधाराने वर चढायला सोपं
जात होतं. पण त्यातूनही खाली वळून पाहायला भिती वाटत होती. दोन्ही बाजूने
दरी असल्यामुळे प्रचंड गतीने वाहणारा वारा प्रत्येक पाऊलावर आपली पीछेहाट
करत असतो. सरळ उभ्या पायऱ्या सर करताच आम्ही गडाच्या पहिल्या
प्रवेश द्वारा जवळ येउन पोहोंचलो. या प्रवेशद्वाराच्या पुढेच गडाच्या पोटात
खोदलेला रस्ता आहे.
 |
| पहिल्या प्रवेश द्वारा |


 |
| पहिल्या प्रवेश द्वारा जवळ टाईम लॅप्स |
जसा नारळाच्या अर्ध्या करवंटीसारखा इथून दिसणारे दृश्य मनामध्ये भूरळ
पाडते. उजव्या हाताला शेंदूर फासलेली कातळात कोरलेली गणेशाची सुंदर कोरीव
मूर्ती आहे. एखाद्या गुहेतून चालावं तसा अनुभव घेत आम्ही पुढे निघालो. एका
नागमोडी वळण घेत खोदीव पायर्यांच्या संगे गडाच्या अंतिम दरवाजाजवळ येउन
पोहचलो.
 |
| नागमोडी वळण घेत गडाच्या अंतिम दरवाजाजवळ जात असताना. |
येथून पुढे माथ्यावर आल्यावर... घुंगावनारा वारा अन सभोवतालच
दृश्य हा मात्र थकवा क्षणात दूर करत होता. किल्यावर जास्त काही अवशेष
शिल्लक नाही आहेत. गडमाथ्यावर आल्यावर एक मोठा तलाव आहे, काठावरच हनुमानाची
शेंदूर फसलेली सुंदर मूर्ती एका छोट्याशा मंदिरात विराजमान आहे. त्याच्याच
बाजूला महादेवाची पिंड आणि नंदी च दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. पूर्वेला
सुस्थितीत असलेली एक खोली आहे. या खोलीचा वापर पूर्वी दारुगोळा साठा
ठेवण्यासाठी किंवा धान्यसाठा ठेवण्यासाठी होत असावा. गडाचा माथा निमुळता
असल्यामुळे तासाभरात गड फेरी पुर्ण होते.
 |
| हनुमानाची शेंदूर फसलेली सुंदर मूर्ती |
 |
| महादेवाची पिंड |
 |
| पिण्याची टाकी |
 |
| सुस्थितीत खोली |
 |
| गडावरचे काही फोटो |
 |
| गडावरचे काही फोटो |
 |
| गडावरचे काही फोटो |
 |
गडावरचे काही फोटो व
टाइम लॅप्स गडाच्या माथ्यावर (क्रेडिट - उत्कर्ष)
|
मी गडाच्या एका टोकाला बसलो आणि स्वतःचे डोळे बंद केले
त्यावळे कानाच्या अवती भवती होणारे आवाज हे निसर्गाचे वेगळेच रूप मनामध्ये
आत्मसात करत जात होतो, तो सुसाट मंद गतीने वाहणारा वारा, दर्याखोर्यातुन
वाट काढत निघणारा मंजुळ पाण्याचा प्रवाह, पक्षांचा किलबिलाट हे सगळे कानावर
ऐकून मन एकदम तृप्त झाले होते त्यावेळी निसर्गसौंदर्यच डोळ्यामध्ये वेगळेच
संगीत कानावर ऐकू आले होते. मात्र मनामध्ये निसर्गा वितिरिक्त कोणतेच
विचार येत नव्हते, नाही घरचे नाही ऑफिस चे टेंशन. थोड्यावेळ निसर्गाच्या
सानिध्यात राहून एक ग्रुप फोटो काडून ठीक ११ ते ११.३० च्या सुमारास निघायला
सुरुवात केली.
अन गडाच्या माथ्यावरल्या अंतिम दरवाजाजवळ येउन पोचलो.
 |
| ग्रुप फोट |
रविवारी असल्यामुळे किल्ल्यावर जाण्यासाठी तरुणाईची मोठी
वर्दळ दिसून येत होती. जेव्हडी घाई उतरण्यासाठी होती तेवढीच घाई चढण्यासाठी
होती. मात्र आता हरिहरचा खरा थिरल्लिंग येणार होता
एकावेळी एकच चढू आणि उतरू शकतो मात्र ईथे तर एका एका पायरी वर एक जण उभा
होता. तरी हि कित्येक संख्येने अजून त्यांच्या एका पाठोपाठ अश्या रांगा
लागल्या होत्या. जशी शेवटच्या दिवशी लालबागच्या
दर्शनासाठी लाइन असते तशी मात्र हि लाइन ऐंशी अंशामध्ये होती. त्यात काही
नवखी होती. काही धापा टाकत वर येत होती. बहुतेक तर गुज्जू च दिसत होते. एका
वेळेस एकच अश्या पद्धतीने त्या पायर्या चढायच्या अन उतरायच्या असल्याने.
आम्ही वरच खोळंबून राहिलो. कारण ह्या मंडळीचा इंजिनच्या शेवटचा डब्याचा
अजून काही पत्ताच न्हवता. जवळ जवळ अर्धा तास आम्ही वरच अडकलो. भटकंतीच्या
लीडर्स ने वेळीच हस्तक्षेप करून हळू हळू खाली उतरण्यास मदत केली त्यावेळी
उतरताना एक एक पाऊले आम्ही जीव मुठीत घेउन उतरत होतो. जो हरिहर सांगत
असतो एका वेळी एकच जाऊ आणि उतरू शकतो मात्र आम्ही सगळे दोन्ह लाईन करून
उतरलो.
 |
| हरिहरची वर्दळ |
सर्वजण सुखरूप खाली उतरताच आम्ही सगळे गावाकडे निघालो पाऊस नाही
पडला याचे दुःख अजून सुद्धा मनामध्ये होता मी तर जेव्हा पासून हरिहर ला आलो
आहे मनामध्ये एकच गाणे गात होतो ते म्हणजे..........
येरे येरे पावसा, तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा
ये ग ये ग सरी, माझे मडके भरी
सर आली धाउन,
मडके गेले वाहुन!
मात्र पाऊसाने तर साथ नाही दिली. मन थोडेसे दुखावले होते पण
चढताना आणि उतरताना नाही लागला याचा आनंद तर होताच पण पाऊस नाही पडला याची
खंत मनामध्ये तशीच राहिली. एव्हाने सगळीकडेच सूर्याची किरणे पसरली होते अंग
ओले चिंब झाले होते त्यात भूक सुद्धा लागली होती. गावाकडे पोहचताच मी
सुशांत, उत्कर्ष, दर्शन, आणि प्रकाश शेतातल्या एका विहिरी जवळ अंघोळ करून
सगळे आवरून आम्ही जेवायला बसलो. गरमा गरम चपात्या, चवळीची उसळ, वरण भात व
त्यात कांद्याची साथ देत फोटभरुन जेवण केले. ट्रेक संपल्यानंतर आंगोळीची
माझ्या आणि गावाकडचे जेवण याचा आनंद वेगळाच असतो. थोड्यावेळ विश्रांती करत
भटकंती ने ट्रेक कसा झाला याची थोडक्यात एक मुलाखत घ्येतलि आणि सगळे जण बस
मध्ये बसून मुंबई च्या दिशेने जाण्यासाठी निघालो.

काय वर्णन करू तुझे,
शब्द कोणते उतरवू पानावर,
अजूनही तुझी सुंदरता उतरेना डोळ्यातून,
आशय समजून घ्यावा मनातला माझ्या...
सह्याद्री, त्यातल्या डोंगररांगा, त्यावरचे गडकोट किल्ले,
त्यावरच्या अनवट घाट-वाटा, सह्याद्री तुम्हाला अंगाखांद्यावर खेळवत अनेक
चांगल्या वाईट गोष्टी शिकवत असतो. तुमचे अनुभव समृद्ध करत असतो. त्याचा
राकटपणा जितका कणखर तितकीच त्याची माया अपार आहे. काही तरी मागे राहिले असे
जाणीव होतच होते पण पुन्हा सह्याद्रीला भेटू असे सांगत आयुष्याच्या
पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
आणि अजून माझ्या 'आयुष्याच्या सुंदर पुस्तकात नविन अनुभवाच्या पानाची भर झाली होती'
चला तर मग पुन्हा भेटू सह्याद्रीच्या अशाच एका डोंगरवंट्यावर तो पर्यंत बाय बाय.
तुमची मत आणि अभिप्राय नक्की कळवा. लवकरच भेटू पुन्हा...............................
सूचना :- कोणाचा उल्लेख करायचा राहून गेला असेल आणि कोणाचे नकळत मन दुखावले असेल तर क्षमस्व..
प्रविण गोडसे.....
No comments:
Post a Comment