Thursday, July 27, 2023

थरारक पेब

http://ninadgaikwad.blogspot.com/search?updated-max=2011-07-12T12:18:00-07:00&max-results=3&start=15&by-date=false


या सीज़न मधला शेवटचा ट्रेक हा माथेरान नजिक असलेल्या " पेब गडावर" झाला. अणि योगायोग म्हणजे आमच्या कॉलेज ग्रुप बरोबरचा पहिला ट्रेक सुद्धा हाच झाला ! परन्तु खरे सांगायचे झाल्यास पेब ला "विकट गड " का म्हणतात हे आपल्याला समजेल जेव्हा आपण स्वतः तिथे जाल ! असेच आम्ही खुशीत खुशीत आदल्या दिवशी मस्त डोम्बिवलीला भेटून सगळी पुर्वतयारी केलि ! सगळी प्लानिंग चोख पणे पर पडली ! काही चुक होणे शक्य नव्हते ! अणि या खुशीत ती रात्र घालवली ! सकाळी :३१ (मुलुंड) ची ट्रेन पकडून आम्ही साधारण एक :१५ पर्यंत पोहचलो ! ट्रेन डोम्बिवली येताना थोडासा गोंधळ झाला मित्रांचा डबा पकडायला ! या ट्रेक ला नेहमी प्रमाणे "Introduction " काही झाले नहीं ! कारन सगले माझे कॉलेजचे मित्र होते ! आम्ही जन थाबलो होतो नेरल ला आमचा मित्र प्रषिक अणि सिद्धांत ची वाढ बघत ! तरी ट्रेक ला आम्ही असे मित्र होतो सिद्धांत , प्रषिक , सुश्रुत , हेरम्ब , दत्ता, अमित ,सौमित्र ,प्रसाद , निनाद (मी!) आम्हाला रास्ता माहित होता ( निदान मला तरी सुरवात! ) असे करत करत आम्ही विजेच्या खाम्बंचा मागोवा घेत घेत नेरल स्टेशन ला राम राम केला ..अणि चालू लागलो !


रस्त्यात टपरी दिसली ! अणि पावले सहज तिच्या कड़े निघाली ! थोड्या फार चाह पाना नंतर आम्हाला आमचा नेहमीचा पहिला विजेचा खाम्ब लागला..! गेल्या वेळेस च्या अनुभवानुसार आम्ही बरोबर जात होतो ! आता आम्ही अजुन पुढे जात होतो गप्पा गोष्टी मजा मस्ती धमाल करत करत ! विचार करत होतो की कॉलेज मधे आताकाय चालू असेल ? कारन आजच्या ट्रेकिंग चा प्लान हा कॉलेज ला दांडी मारून झाला होता ! आता आम्ही बरोबर जात होतो अणि तेव्हढ्यात आम्हाला आमची दूसरी LANDMARK म्हणजे आमची दरी लागली !


या दरी कडून वाटा जातात ! वाट वर जायला आहे जी धब्ध्ब्याला जाउन मिलते जो पूर्ण पणे ROCK PATCH आहे अणि दुरसी वाट जंगलात आहे ! खुप खोल जंगल ! अणि नेमके इथेच माझ्या स्मरण शक्तिने मला धोका दिला ! आम्ही जंगलात जाण्याचे सोडून कड़क +उंच ( भयानक ??) असलेल्या ROCK PATCH वरून गेलो.. ! ROCK PATCH सुरु झाला होता असे करत करत आम्ही वर चढत होतो.. अणि कठिन म्हणजे एकदम कठिन असा ROCK PATCH आम्हाला लागला होता ! त्यात बहुतेकांचे अवसान गलाले ! सर्वाना वाटत होते की आता नहीं चढू शकणार ! सिद्धांत अणिप्रषिक मात्र जिव तोड़ मेहनत करून आधी स्वतः चढत होते अणि मग सर्वाना चढवत होते ! दत्ता देखिल मस्त चढात होता ! अणि आम्हाला आमचा सर्वात खतरनाक पॉइंट लागला !
माझा स्वताहाचा हात तिथून घसरला अणि मी पडणार एवढ्यात दत्ता ने मला पकडले ! नाहीतर आज मी हा ब्लॉग लिहू शकलो नसतो ! नविन रास्ता शोधण्याचा पराक्रम करू पहाणाऱ्या आम्हाला खुप मोठी कीमत चुकवावी लागली असती ! हे होते न होते तोवर सौमित्राचा हात घसरला अणि तो......... -३० फुट खली जाउन पडला.! त्याहे केवल नशीब होते म्हणून तो काही फूटानवर असलेल्या दरीत पडला नाही ! अणि मग त्याला बाहेर कध्न्य साथी मी अणि दत्ता पुढे सरकलो ! तेव्हा मागे पाहतो तर हेरम्ब अणि सिद्धांत च काहीच पत्ता नाही त्यांच्या फ़ोन लगत नव्हता त्यांचा आमच्या ग्रुप बरोबर च CONTACT तुटलेला ! सौमित्र जीवन मरणशी खेल्तोय अणि दुसर्यांचा कही पत्ता नाही !

एवढे होउनही सौमित्र ला जोक सुचत होता तो म्हणत होता लवकर हेलिकोप्टर बोलवा ! आम्ही मात्र तश्या बेतात नव्हतो ! आता मी काय करू ? जवाब्दारीच्या जाणिवेने मला चिंतेत घेरले ! आशय वेळेस मी अणि दत्ता पुढे होऊं सौमित्र ची मदत करायला गेलो.. त्याचा हात कधीही सुटला असता अणि तो पडला असता ! मी जाउन त्याची बैग पकडली अणि दत्ता ने आपला जिव डोक्यात घालून त्याला आनले वर ! अखेर तो आर आला .. अणि मेन म्हणजे सिद्धांत अणि हेरम्ब शी contact झाला .. दूर जंगला मधून त्यांची हाक ऐकू आली अणि माझ्या जीवत जिव आला ! आता आम्ही उतरायची तयारी केलि ! फ़ोन वरून समजले की शिखर पासून कही अंतरावर असतानाच केवल ख़राब वाटे मुले आम्हाला वर पोहचता आले नाही ! तरी द्त्तगुरुंचे स्मरण करून , त्याना वंदन करून आम्ही उतरायला सुरवात केलि ! एक उत्तम ट्रेकर तेव्हाच बनू शकतो जेव्हा तो नीट उतरु शकतो कारन जास्त अपघात हे उतर्तानाच होतात ! अणि असे करून आम्ही १ -१ करत उतरु लागलो ! अखेर सिद्धांत अणि हेरम्ब येउन मिळाले ! अणि मग पटापट खाली उतरून जेवण केले अणि लवकरात लवकर शाक्य तितक्य लवकर नेरल स्टेशन गाठायचे ठरवले . रस्त्यात १ विहीर लागली तिथे पानी प्यायले अणि स्टेशन वर बसून आराम केला !

(आम्ही इथ पर्यंत पोहचून माघारी फिरलो )
खरेच ट्रेकिंग हा माझा शौक माझ्या स्वतहाच्या जीवा वरही बेतु शकतो हे मी आज पहिल्यांदा अनुभवले ! म्हणून ट्रेक ला जाणार्या लोकानी ही पोस्ट वाचून P.E.B. ला जाताना सावधानता घाय्वी अणि धब्धाब्याच्या रस्त्याने कधीही जाऊ नए ! तो जवळ चा रास्ता असला तरीसुद्धा ! ते तुमच्या जीवा वरही बेतु शकते ! कारण घरी जाता जाता माझ्या अंगावरचा काटा अजुन गेला नव्हता ..! कारन का त्या दिवशी मी स्वः माझ्या मृत्युला माझ्या डोळ्यानी बघितले होते !

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...