( BHIMASHANAKAR- EXPLORING SAHYADRI)

विविध नाना प्रकारचे पक्षी व झाडे – झुडुपांनी समृद्ध असलेला महाराष्ट्रातील एक भाग व भटंकती करण्यासाठी भटक्याला पाहीजे तसा हा प्रदेश व रोप क्लाइंबिंग पदरगड असा हा भीमाशंकर !! हिरवीगार भटंकती !!! १४ जून २०१५ रविवार पकडुन आमचा ग्रुप भीमाशंकरच्या वाटेला निघालो सोबत काही हौशी मित्र ….

ऐन पावसाळ्यात असा प्रवास अनुभवास आला तरच मज्जा ! नाहीतर शहरातल्या आणि सह्राद्रिच्या डोंगर रांगेतला पाउस ह्यात जमीन – आसमानाचा फरक !!मौसम तसा ऐन भरलेला उन – पावसाचा लपंडाव चालु आहेच. घाटकोपर हुन लोकलचा प्रवास करत नेरळ ला उतरून खांडस पर्यत टमटम असा हा आमचा प्रवास. निसर्ग पहावयाचा असेल तर शहराच्या जेमतेम ६०-७० km तुम्ही बाहेर या आणि त्यात मान्सुन म्हणाल तर विचारुच नका. खांडस ला जाताना खुप काही नयनरम्य असे दृश्य तुम्हाला पाहावयास मिळेल आणि असाच एक योग आम्हांस आला. आमच्या दर्शनी रस्त्यातुन एक मोर उडत जाताना दिसला. थोड्या वेळ गाडी थांबवली आणि .कॅमेर्यात क्लिक घेयाचा तोच मोर भर पावसात उडत गेला.तो सुद्धा मान्सूनच्या बरसन्यावर आनंदी असावा.
८ वाजता खांडस ला पोहोचलो आणि पाउस सुरु झाला झिमझिम सर्या पडत होत्या. आमचा हा पहीलाच भीमाशंकर चा ट्रेक होता त्यामुळे गणपती घाटाने जायचे आधीच ठरले होते. खांडस गावातुनच तुम्हाला एक रस्ता लागेल हाच रस्ता गणपती घाटासाठी आहे. पुढे गावकरी लोकांना विचारत -विचारत गावाच्या बाहेर येउन पोहोचलो.

नंतर एक अरुंद पूल लागतो. जिथुन दोन रस्ते निघतात.एक शिडी घाट व दुसरा गणपती घाट !

पाउस ही चालु होता व त्यात भ्रमंती करत करत गणपती घाटचा रस्ता पकडत पुढे प्रवास करत होतो पुढे जेव्हा जंगलात प्रवेश होतोच तेव्हा डाव्या हाताला लागणारी पायवाट पकडावी. आमची भटंकती ह्याच दिशेने करत आम्ही ९ वाजता गणपती मंदिरात पोहोचलो

मान्सुन मध्ये अशी जंगलातुन भटंकती करणे म्हणजे एक वेगळाच अनुभव सर्वांसाठी होता. जेमतेम दोन तासानंतर आमचा ग्रुप पदरगडच्या पायथ्या पासून मोठ्या अश्या पटांगणात पोहोचलो. इथुन तुम्हाला खांडस गावाचा व पदरगडचा क्लिक घेयावयाचा असेल तर उत्तम मोकळी अशी जागा आहे. मोकळ्या जागेत छत्री उघडायची आणि बॅगेतनं कॅमेरा काढायचा नि दोन – चार निसर्गचित्रं क्लिक – क्लिक करायची.

पुढे आम्ही एकदम पदरगडच्या जवळ पोहोचलो जिथुन पदरगडचे दर्शन होते इथे
येण्यासाठी एक चांगली पायवाट आहे इथे सुद्धा एक मोठे पटांगण दिसेल विश्राम
करण्यासाठी उत्तम जागा आहे आणि कॅमेर्यात निसर्गचित्र टिपण्यासाठी सुद्दा
!!

थंड हवा ; पावसाची झिम झिम चालुच होती व डोंगररांगाना धुक्याने वेढुन घेतले होते असे क्लिक्स् कोण बरे कॅमेर्यात घेणार नाही अशा थंड वातावरणात तुम्हाला एवढे चालुन आले असा थकवाच जाणवणार नाही. डोंगर रांगेला उजव्या हातेला धरुन पुढे भ्रमंती करत होतो. नंतर एक ओढा लागला तिथुन सरळ खाली उतरलो.
इथुन पुढे दगडावर निशाणी करुन ठेवलेले चिन्ह दिसेल

आत्ता मात्र सूर्य देवताने दर्शन देउन दिवसा असणारा काळोख दूर केला पण ते थोड्याच वेळे पुरते …. जसे जसे पुढे चालु लागलो तसे तसे पावसाचे रंग दिसु लागले. भीमाशंकरची ही डोंगरराग मात्र धुक्यांनी बहरुन गेली होती. भटंकती करत – करत आम्ही एका प्रसिद्ध अश्या पण नाव नाही वाटत अश्या ह्या पॅांइट् वर येउन पोहोचलो इथुन तुम्हाला जुलै महिन्यात हमखास मोठ्या धुवांधार अश्या धबधब्यांचे दर्शन होइल इथे आम्ही खाण्याचा बेत आखला.

भीमाशंकर ला भटंकती करण्यास येत असाल तर नक्कीच ह्या पॅांइट् वर या. पुढचा प्रवास चालु केला पण एका ठिकाणी रस्ता चुकल्याने नंतर खाली आम्ही पदरवाडी गावात विचारले. बरोबर रस्ता पकडला आणि पुढे पावले गतीने टाकु लागलो. पाउस खुपच जोरदार पडेल अशीच चिन्हे स्पष्ट दिसु लागली.
तिसरा डोंगर असावा हा !!! तो पूर्ण केला आम्ही !!
आत्ता मात्र काळ्या कुट्ट ढगांनी पुरतं वेढुन टाकलं. बचावाचे सर्व प्रयत्न विफल होउ लागले. धुवांधार पावसाचा लोभ वाढू लागला. त्यात धुक्यांचे दर्शन !!
आम्ही गप्प एका झाडाच्या आडोशाला उभे राहीलो. तरी अंगात मस्ती खुप ऐन मुसळधार पावसात छत्री डोक्यावर धरुन कॅमेर्यात निसर्गाचे हे रुप टिपत होतो. कॅमेरा सावरायला ही वेळ नाही चिंब भिजून गेलो होतो. सर्वांचे मोबाइल्स न्हाहुन निघाले. पावसाचे ते रुद्ररुप कॅमेर्यात टिपता येइना ! मान्सुन मध्ये हा ट्रेक चा प्लॅन आखणे म्हणजे आगाउपणाचेच लक्षण. थोडा पाउस कमी दिसला आणि सुटलो तसच पण थोड्याच वेळात परत मुसळधार पाउस चालु झाला. आत्ता मात्र थांबायचे नाही असे ठरले सुदैवाने पुढे घनगर्द जंगल लागले.

गर्द हिरवाइ ; पाउस ; धुके सोबत आणि भटंकती करत चालणारे आम्ही सह्याद्रीप्रेमी ! पावसाचा तडाका वनांमुळे मात्र कमी बसत होता तासभरात शेवटचा डोंगर पार केला आणि भीमाशंकर गावाचा रस्ता पकडला. अजुन सुद्धा धुवांधार पाउस ; दाट धुके व त्यात कडाक्याची थंडी वाजत होती नंतर एका बर्यापैकी हॅाटेल मध्ये जाउन मस्त भजी -चहा ; कणीस व पोटभर असे जेवण केले. परतीचा प्रवास सुरु झाला आणि मनातल्या वहीत एक हिरव पान अलगद लिहल गेल.

No comments:
Post a Comment