http://sskothawade.blogspot.com/2022/02/blog-post.html
"कोळेवाडी-हटकेश्वर-कोळेवाडी
out and back करावा का लेण्याद्री-हटकेश्वर-गोद्रे range करावा?" हे
discussion काही दिवसांपासून group वर चालू होतं.. त्यातून ठरल्याप्रमाणे
(आणि माकडनाळ 🐒 postpone झाल्यामुळे) लेण्याद्री-हटकेश्वरसाठी आजचा रविवार
☀️ ठरला.. दोघांपैकी कुठे जरी गेलो असतो तरी post लिहिणार ✍️ होतोच.. so,
माकडनाळ साठी थोडी वाट ⌚ बघावी लागेल, मला लिहायला आणि तुम्हाला वाचायला..
अष्टविनायक - पुणे जिल्ह्यात पाच, रायगड दोन आणि अहमदनगर जिल्ह्यात एक, असे distribution असलेल्या आठ गणपतीच्या मंदिरांना आपण अष्टविनायक म्हणून ओळखतोच.. तुम्ही कधीतरी ही यात्रा 🚌 केलीपण असेल.. धारणा अशी आहे की मोरगाव हुन चालू करून, एका ठराविक sequence मध्ये ही फेरी ⭕ पूर्ण करायची असते परत मोरगावला येऊन.. पण मग, 'हे protocol आपण follow करतो का?' ठेवणाऱ्याने 🤔 नवविनायक नाव ठेवलं असतं तर कदाचित आपण परत आलो पण असतो 😉.. बरं, आठच का? ५, १०, १२ किंवा इतर आकडा का नाही? महाराष्ट्रातच का? in fact, पुण्याच्या आसपासच का? ह्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरे ठरवलेल्या timebox मध्ये काही भेटली नाही, म्हणून त्या विषयी इथे काही लिहीत नाही 🤫.. मराठी wikipedia वर थोडी माहिती आहे, पण मन भरलं नाही.. असो, ह्या postचा तो विषयही नाही 🙅♂️..
तरी, recommended sequence,
मोरेश्वर - मोरगाव
चिंतामणी - थेऊर
सिध्दीविनायक - सिद्धटेक
महागणपती - रांजणगाव
विघ्नेश्वर - ओझर
गिरीजात्मज - लेण्याद्री
वरदविनायक - महड
बल्लाळेश्वर - पाली
मोरेश्वर - मोरगाव
मोरेश्वर - मोरगाव
चिंतामणी - थेऊर
सिध्दीविनायक - सिद्धटेक
महागणपती - रांजणगाव
विघ्नेश्वर - ओझर
गिरीजात्मज - लेण्याद्री
वरदविनायक - महड
बल्लाळेश्वर - पाली
मोरेश्वर - मोरगाव
लेण्याद्री - ह्या आठ / नऊ पैकी सगळ्यात उत्तरेला आणि समुद्र सपाटी पासून सर्वात उंचीवर, ⛰️ डोंगरावर / लेणी मध्ये असलेला एकमेव अष्टविनायक, अनुक्रमे सहावा - लेण्याद्रीचा गिरिजात्मज..
भारतात
सर्वात जास्त लेण्या जुन्नर तालुक्यात आहेत.. त्यातल्याच साधारण ३० लेण्या
असलेल्या ह्या ठिकाणी पूर्वेपासून जर आपण मोजायला सुरुवात केली तर ७व्या
(सर्वात मोठ्या) लेणीत गणपतीची मूर्ती आहे.. ५१ x ५७ फूट असलेल्या ह्या
लेणीत २० निवासकक्ष आहेत, आजच्या भाषेत bedroom 🛌.. आता तुम्ही लगेच हिशोब
🎲 लावायला सुरु व्हाल - किती area होतोय? आपण राहत असलेल्या location
मध्ये किती किंमत होईल? etc. etc... आपल्या (males specifically) चर्चेच्या
विषयांमध्ये हे दोन विषय, दर रोज / आठवड्याला repeat होत असतातच, अगदी न
चुकता.. एक तर flat / plot ची किंमत काय आणि दुसरा म्हणजे, चहा ☕ टपरीवाला
आपल्यापेक्षा जास्त कमवतो..
०६ फेब्रुवारी २०२२
आकाश 🥘 आणि श्रीराज / बजरंग 🥛 बद्दल प्रत्येक post मध्ये लिहीत नाही आता, गृहीत धरून घ्या..
आजच्या
trekची सुरुवात होती लेण्याद्रीहुन.. ticket counter वर विचारलं तर
"लेण्यांहून वर जायला वाट नाही, खालूनच कुंपणाच्या बाहेरून जावं लागेल" असं
कळलं.. मग मंदिर skip करायचं का? का मंदिरात जाऊन येऊन (४०० पायऱ्या आहेत)
परत बाहेरून trek चालू करायचा?.. हो-नाही करत ticket काढलं आणि gate वर
पहारा देत असलेल्या इसमाने सांगीतलं, "वरूनच वाट आहे" 🙋..
#CannotAskForMore
जुन्नरहून दिसणारा शिवनेरी आणि इथून दिसणारा शिवनेरी, दोन वेगळे किल्ले आहेत, असा भास होतो.. viewला अजून काही नाही / आम्हाला स्पष्ट दिसलं नाही 🙈.. दर्शन घेऊन, उजवीकडून (पूर्व दिशा) 👉 वर जायला व्यवस्थित arrow marking ↖️ आहे, शिवमंदिरापर्यंत.. पण आमचं target पलीकडच्याच्या पलीकडच्या डोंगरावरील शिवमंदिर "हटकेश्वर" होतं.. थोडा चढ चढल्यावर जेव्हा (AllTrails app वरचा trail बघून) traverse घ्यायचा आहे, असं लक्षात आलं, तेव्हा arrow markingशी break-up 💔 करत डोंगराला डावीकडून (अर्धा) 👈 वळसा घालायला सुरुवात झाली.. हो, तुम्ही बरोबर वाचलय.. जरी आम्ही लेण्यांपासून उजवीकडून चढायला सुरुवात केली होती, तरी arrow marking follow करत आम्ही डोंगराच्या डावीकडे आलो होतो..
ह्या डोंगराचा traverse संपला, तेव्हा आम्हाला हटकेश्वर natural bridge दिसायला लागला 🧐, जो थोडं जवळ गेल्यावर परत गायब होणार, हे माहित होतं.. trail flat असल्याने इथपर्यंतची आमची पायपीट 🚶♂️ non-stop होती.. दुसरं डोंगर traverse करत असतांना जेव्हा break साठी थांबलो, तेव्हा गानकोकिळा 🎤 लता मंगेशकर गेल्याचं कळलं 😔 (आज दिवसभर mobileला range होती / 📱 mobile range मधे होता).. त्यांना श्रद्धांजली अर्पण करत माजी सैनिक 💂 रमेश खरमाळे यांनी इथेच cycle 🚲 घेऊन जुन्नर-हटकेश्वर-जुन्नर असा २४ कि.मी. प्रवास (bike-cum-hike) केला (१२ कि.मी. cycle उचलून).. ह्या संदर्भातल्या facebook postची link..
| लेण्याद्री on the left (not in the photo) |
इथे
आणि दुसऱ्या डोंगरानंतर (हटकेश्वर चढायच्या आधी), भरपूर photosession 📸
झालं.. तासकाट्याने अकराचा 🕚 आकडा ओलांडला होता, आणि पुढचा टप्पा आता
भरपूर दम काढणार 😥, ह्या मानसिक तयारी सोबत आम्ही baton शेवटच्या relay
partner कडे देत धाव घेतली, कासवागत 🐢.. साधारण तासभराने आलं हटकेश्वर
मंदिर जिथे भरपूर नंदी 🐂 वाहिलेल्या दिसतात.. समोर दिसत होता पिंपळगाव
जोगाचा पसारा.. शेजारी असून हडसर दिसत नव्हता पण काही अंतरावरचे म्हशेडी,
निमगिरी, देव दोंड्या, वनदेव, वेताळ, घोण्या, उधळ्या, सिंदोळा वगैरे स्पष्ट
ओळख देत होते..
इथून
अजून १५ मिनिटाच्या अंतरावर आहे, the drone material, नैसर्गिक पूल.. अंतर
मिनिटात मोजतात, हे नक्कीच आपल्याला शाळेत शिकवलेलं नाही 📏.. ही संकल्पना
आहे वृत्तपत्रात जाहिरात देणाऱ्या builders / promotersची.. तिथूनच आपल्या
सगळ्यांनाही ही चुकीची सवय लागली आहे.. असो, "इथला trek drone सोबत
असल्यावरच करायचा", हा निर्धार मोडत, जे आम्ही इथपर्यंत आलो होतो, त्यासाठी
परत कधीतरी दुसऱ्या वाटेने (गोद्रे किंवा कोळेवाडीहून) येऊन ती
इच्छापूर्ती करू, हा विचार करत फक्त सावलीचे photo 👥 काढून तेवढ्यापुरतं
समाधानी झालो.. आम्ही होतो ४ - पुलावर ह्याहून जास्त लोक मावू पण शकत
नाही.. ऊन्हात गार वाऱ्याचा 😇 आनंद घेत पाऊण तास गप्पा झाल्या..
| ह्याच साठी केला होता अट्टाहास |
| from the mentioned facebook post |
exact
दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती 🕐.. परत हटकेश्वरच्या मंदिरात येऊन
जेव्हा दिलीपने bag मधून, जुन्नरला घेतलेल्या फळांची एक-एक variety बाहेर
काढली, तेव्हा आम्ही मागच्या वर्षीच्या कांदाटला फस्त केलेल्या कलिंगडच्या
🍉 flashback मधे जाऊन आलो.. चिक्की, अंडी 🥚, biscuit 🍪, पराठे, भाजी,
भाकरी, लोणच्याच्या सोबतीला होते बोरं 🍒, संत्री 🍊, केळी 🍌, सफरचंद 🍎
आणि द्राक्ष 🍇.. म्हणजे अजून तासभर timepass..
गोद्रेला उतरायच्या plan ऐवजी लेण्याद्रीलाच उतरायचा निर्णय घेत आम्ही परत non-stop धाव घेतली.. पुढचं target होतं - राजगुरूनगरची संध्याकाळची traffic ⛔ कशी चुकवायची? अपेक्षेपेक्षा लवकर आल्यामुळे आम्ही थेट पुण्याच्या रस्त्याला लागलो.. थोडा अजून उशीर झाला असता तर आमचा 'नारायणगडहून sunset 🌄 बघूनच निघू' हा विचार सुद्धा करून झाला होता.. पुन्हा ह्या areaत येणं होईलच म्हणून अजून एकदा 'नंतर कधीतरी' म्हणत ह्या postचा होतोय the end.. पण त्याआधी श्रीनिवास जोशींनी लिहिलेल्या काही ओळी 📄..
लता
लता, कुठले ग हिरण्यगर्भ वरदान 🧚♂️ घेऊन आली होतीस?
सरस्वतीने तिच्या वीणेचे 🪕 स्वरतंतू बहाल केले होते तुझ्या कंठामधील संगीतस्मृतींना..
हलवायचे का ग होते तिला हळूवार त्याद्वारे आमच्या निद्रित हृदयांतील 💗 पार्थिव विस्मृतींना?
आज तू गेलीस दिगंताच्या यात्रेला तेव्हापासून आमच्या मनांमध्ये लखलखत राहिल्या आहेत तुझ्या स्वरांच्या असंख्य स्वर्गीय रत्नप्रभा..
आमच्या अस्तित्वांच्या विझलेल्या वातींवर दीप्तीची 🪔 फुंकर घालणाऱ्या या एका क्षणासाठीच करवून घेतली गेली होती का तुझ्याकडून तुझ्या पवित्र कलेची अविरत प्रकाश-तपस्या?
हे कलानिधे, क्षितिज बनून राहील तुझ्या कलेतील सौंदर्य - आमच्या श्रेयार्त आणि त्या जगन्नियंत्याच्या श्रेयसंपूर्ण अस्तित्वांच्या मधले..
सरस्वतीने तिच्या वीणेचे 🪕 स्वरतंतू बहाल केले होते तुझ्या कंठामधील संगीतस्मृतींना..
हलवायचे का ग होते तिला हळूवार त्याद्वारे आमच्या निद्रित हृदयांतील 💗 पार्थिव विस्मृतींना?
आज तू गेलीस दिगंताच्या यात्रेला तेव्हापासून आमच्या मनांमध्ये लखलखत राहिल्या आहेत तुझ्या स्वरांच्या असंख्य स्वर्गीय रत्नप्रभा..
आमच्या अस्तित्वांच्या विझलेल्या वातींवर दीप्तीची 🪔 फुंकर घालणाऱ्या या एका क्षणासाठीच करवून घेतली गेली होती का तुझ्याकडून तुझ्या पवित्र कलेची अविरत प्रकाश-तपस्या?
हे कलानिधे, क्षितिज बनून राहील तुझ्या कलेतील सौंदर्य - आमच्या श्रेयार्त आणि त्या जगन्नियंत्याच्या श्रेयसंपूर्ण अस्तित्वांच्या मधले..
No comments:
Post a Comment