Saturday, June 19, 2021

नाखिंदच्या शोधात..... उलगडले एक गुढ रहस्य


रायरेश्वर मंदिर



यंदाच्या पावसाळ्यात मंगळगड केला तेंव्हा समोर जावळीच्या जंगलातुन रायरेश्वरपर्येंत पसरलेला परिसर नजरेत बसला. सर्व प्रदेश नजरेत समावून घेतला आणि लवकरच या प्रदेशात मोठी स्वारी करायची असे स्वप्न उराशी घेऊन परतलो. महिन्यांनंतर आज (२६//२०१६) संधी चालुन आली होती. डोळ्यासमोर दिसत होते ते रायरेश्वरचे पश्चिम टोक "नाखिंद". रायरेश्वर पठार हे प्रचंड विस्तारात पसरलेले आहे. रायरेश्वर पठारावर जेवढे फिरावे तेवढे कमीच आहे. कारवीने सर्वत्र रान माजलेल, रानडुक्करांचा थैमान, साप, विंचु अन बरच काही. पठारावरून श्वानदरा, गायदरा, गणेशदरा, सांबरदरा, लोहदरा, वाघदरा, खाळ्प्याचा दरा, कुडकी दरा, नाखिंददरा, सोंडदरा, निशिनीचा दरा, वीरदरा, खाकळदरा अशा अनेक दऱ्या चहुबाजूस दिसतात त्यातील नाखिंद टोक हे सगळ्यात उंचीवर आहे. नाखिंद्याचे हे टोक आजपर्येंत फक्त टक्के लोकांनी explore केले आहे हे कळाले होते. तसेच नाखिंद पासून एक वाट थेट अस्वल खिंडीत उतरते पण ती आजपर्येंत कोणीही शोधली नव्हती. आम्ही (Western Trekkers) नाखिंद्याचे टोक आणि अस्वल खिंडीत उतरणारी वाट शोधुन काढायचे असे ठरवले. गेल्या वेळेस आमचा plan अयशस्वी झाला पण या वेळेस पुर्ण करायचंच असं मनाशी ठरवलेलं.



नाखिंद फलक
महिनाभरआधी planning सुरु झाले होते. सगळीकडून माहिती गोळा करू लागलो. जास्त माहिती उपलब्ध नसल्याने आम्ही google map वरून अंदाज घेतला होता. अंदाजे रूट आखला होता. तिथली परिस्थिती काय असेल याची जाणीव कोणालाच नव्हती. दिवस ठरला, २६//२०१६ रोजी संध्याकाळी वाजता निघायचे असे ठरले. सर्व तयारी झाली. २६ च्या संध्याकाळी पवनच्या घरापाशी सर्व जमणार होते. पवन, रोहन, प्रणव, किरण, भुषण, रोहित, आकाश, yms, निखिल आणि मी असे आम्ही १० जण होतो. सर्व जण जमेपर्येंत वाजले. आज संकष्टी, आम्ही अगदी शुभमुहूर्तावर ट्रेक सुरु करत होतो. गाडी वाजताच येऊन थांबलेली.सर्व मंडळी जमेपर्येंत ७.१५ वाजले,.१५ वाजता "गणपती बाप्पा मोरया"म्हणत आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. रात्री .३० वाजता आम्ही रायरेश्वरला पोचलो, काकांचे आभार मानले आणि ट्रेकला सुरुवात केली. सर्वत्र शांतता होती, शिडीचा मार्ग चढत असताना शेजारी असलेल्या जांभळी गावातून टाळाच्या सुरावर सुरु असलेल्या भजनाचा आवाज मन मुग्ध करत होता. त्या भजनाच्या तालावर आम्ही वर वर सरकत होतो. १० वाजता आम्ही वर पोहोचून मागे नजर फिरवली. लालसर चंद्र आणि समोरच गावातील दिवे असे विहंगमय दृश्य दिसले.



Camp Site
साधारण १०.१५ वाजता आम्ही मंदिरात पोचलो, दर्शन घेतले आणि कडकडून भूक लागल्याने जेवणावर ताव मारला. जेवण उरकुन आजच रात्री कावळ्याच्या धारेपाशी मुक्काम करायचा निर्णय घेतला. कावळ्याची धार ही नाखिंदच्या दिशेने जाताना वाटेतच लागते. यामार्गे लोक जांभळी गावात उतरतात. रायरेश्वर मंदिर ते नाखिंद टोक या संपुर्ण प्रवासात असलेला हा एकमेव पाण्याचा स्त्रोत. (जो उन्हाळ्यात संपूर्ण वाळलेला असतो). आम्ही पुन्हा एकदा रायरेश्वराला नमस्कार केला आणि जंगम वस्तीच्या मागून जाणाऱ्या पायवाटेने निघालो. या वाटेवरून जाताना बऱ्याच वाटा इतरत्र फुटतात, पण आपण आपल्या उजव्या बाजूस असलेल्या डोंगराच्या लगतच्या पायवाटेने पुढे सरकत राहायचे. काही ठिकाणी ही वाट नाहीशी होते, तर काही ठिकाणी झुडुपातून जाते. या वाटेवरून जात असताना डावीकडील बाजुस चंद्रप्रकाशात कमळगडाचे उत्तम दर्शन होत होते. माघ पौर्णिमा नुकतीच होऊन गेल्याने, संकष्टी चतुर्थीचा चंद्रप्रकाश आमची साथ देत होता. battery ची तशी गरज पडत नव्हती पण वाटेत असणारे साप, विंचू, कदाचित रानडुकरे आणि एकमेकांना अंदाज यावा म्हणून battery सुरु ठेवुन आम्ही चालत होतो. रात्रीची वेळ असल्याने पाऊले पटपट पडत होती, पाण्याचीही गरज पडत नव्हती. थोड्याच वेळात आम्ही " नाखिंद ७ किमी " असं लिहिलेल्या दगडापाशी पोहोचलो.



धोम आणि धोम बलकवडे धरण



केंजळगड आणि धोम धरण
येथे -१० मिनिटे विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. फार वेळ घालवून चालणार नव्हते कारण अजून कावळ्याची धार गाठायची होती, पाणी शोधायचे होते, तंबू ठोकण्यासाठी योग्य ते पठार शोधायचे होते. काही वेळेतच आम्ही कावळ्याच्या धारेपाशी येऊन पोहोचलो पण येथे बरीच झुडुपे आणि झाडी असल्याने आम्ही पाणी शोधण्याचे धाडस करता थोडस मागच्या बाजूस येऊन एका उघड्या पठारावर आमचा तळ ठोकायचा ठरवले. येथपर्येंत पोहोचायला आम्हाला .३० वाजला होता. तळाच्या एका बाजुलाच छोटीशी शेकोटी पेटवली. शेकोटी पेटवायला आणि तंबू ठोकायला खूपच कसरत करावी लागली. अखेरीस रात्री वाजता सर्व झोपी गेलो. जास्त उशीर करून चालणार नव्हते उद्याची परिस्थिती लक्षात घेता आपली काय अवस्था होणार आहे हे लक्षात आले होते, या विचारातच नाखिंदाच्या स्वप्नात झोपी गेलो.



कावळ्याची धार आणि पाणी
सकाळी .१५ वाजता " सुर निरागस हो" च्या तालावर गजर वाजला आणि साखरझोप उघडली गेली. सकाळी सकळी जोरदार वारा सुटला होता, पहिल्यांदा वाटले पाऊस आला की काय. तिनही तंबू वाऱ्याच्या जोरावर डुलत होते. आम्ही तंबू मधून बाहेर पडलो. तंबू आवरणे हे अजूनच कसरतीचे काम बनले. सर्व bag भरून आम्ही तयार झालो. .४५ वाजता सूर्योदयापूर्वीच्या प्रकाशात समोर धोम धरण, त्याच्या अलीकडे धोम बलकवडे, डावीकडे केंजळगड तर उजवीकडे कमळगड असे सुंदर दृश्य दिसत होते. सर्वत्र लाल प्रकाश पसरला होता, जणु काही सुर्य धोम धरणातून उगवत आहे असे वाटत होते. येथे १५ मिनिटे आराम करून आम्ही पुढे निघालो, कारण पुढे अजून कावळ्याच्या धारेपाशी असलेले पाणी शोधायचे होते. १० मिनिटात आम्ही कावळ्याच्या धारेपाशी पोहोचलो. येथे सर्वांनी आवरून घेतले, रिकाम्या झालेल्या सर्व बाटल्या पटापट भरून घेतल्या आणि सर्व जण नाखिंदीच्या शोधात निघाले.



डावीकडे ढवळे खोरे आणि उजवीकडे कामथे खोरे



चंद्रगड, घुमटी आणि अर्थूर सीट
कावळ्याच्या धारेच्या मागील बाजूस असलेल्या छोटाश्या टेकडावर चालत जायचे. येथून उजवीकडे पाठशीला पठाराचे दर्शन होते, तसेच निरा धरण सुंदर दिसते. पुढील बाजूस कावळ्याची धार संपूर्ण दृष्टीस पडते. या पठाराच्या सुरुवातीपासून कारवी सुरु होते. फेब्रुवारी महिन्यामुळे ही कारवी बऱ्यापैकी वाळलेली आहे पण डिसेंबर महिन्यात मात्र ही हिरवीगार आणि गच्च भरलेली असते. पठारावरून एक वाट डावीकडे तर एक वाट उजवीकडे जाते. कारवीतून वाट काढत समोरच मोठ्या झुडुपांच छोटस जंगल दिसत, ह्या जंगलाच्या दिशेने जायचं. येथे पोहोचायला आम्हाला .३० वाजले होते. ह्या जंगलातून कोयत्याने झाडी कापत आपणास वाट शोधत जावे लागते. पुढे जाताना एवढाच लक्षात ठेवायचं की आपणास उजव्या बाजूने पुढे जायचे आहे. सोबत google map असल्याने  आम्हाला ही वाट शोधणे फार अवघड गेले नाही. या जंगलातून बाहेर पडताच आपण एका टेकडी समोर येऊन पोहोचतो. येथे vodafone, bsnl ला उत्तम range आहे.



Way towards Nal
ह्या टेकड्याच्या सर्वात उजवीकडून एक वाट थेट पाठशीला पठाराकडे जाते जी नंतर कुडली गावात उतरते. ही वाट पकडता टेकडीला उजव्या बाजुस्ने वळसा घालून डावीकडे सरळ टेकडीवर चढायचे. या टेकडीवर कारवी कापत आपण माथा गाठायचा. येथून समोरच नाखिंडचे टोक दिसून येते. येथून डावीकडील बाजुस खोल दरी असल्याने, सावकाश मळलेल्या वाटेने टेकडी उतरायची आणि नाखिंद टोकाच्या दिशेने रवाना व्हायचे. येथे पोहोचे पर्येंत आम्हाला   १०.०० वाजले होते. नाखिंदवरून डाव्या बाजूस ढवळे खोरे तर उजव्या बाजूस कामठे खोरे असे उत्तम दृश्य दिसते. तसेच समोर प्रतापगड, चंद्रगड, बहिरीची घुमटी, अर्थूर सीट, मंगळगड दिसतात. उजव्या बाजूस अस्वलखिंड, वरंध घाट, मोहनगड अथवा दुर्गाडी दिसतात. आम्हाला साफ वातावर मिळाले नाही. साफ वातावरण मिळाल्यास लांबवर राजगड, तोरणा सिंहगड सुद्धा दिसू शकतात. येथे आम्ही अर्धा तास आराम केला, पेटपूजा केली. आता आमच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट पूर्ण झाले होते पण अजून सर्वात महत्वाचे उद्दिष्ट बाकी होते ते म्हणजे थेट अस्वल खिंडीची वाट शोधणे.



अस्वल नळ



Rock patch at Nal
जास्ती वेळ न दवडता आम्ही १०.४५ वाजता नाखिंदवरून निघालो. डावीकडे असलेल्या कारवीतून रस्ता शोधत, कारवी कापत पुढे जाऊ लागलो. थोड्याच वेळात उजव्या बाजूस नळ दिसून येते. प्रथम क्षणी पाहता या नळीतून वाट असेल असे वाटत नाही. समोर प्रचंड मोठी दरी असल्याने वरच्या बाजूने उजवीकडील असलेल्या नळीच्या दिशेने आम्ही कारवी कापत वाट काढत निघालो. थोड्याच वेळात आम्ही नळीपाशी येऊन पोहोचलो. येथ पर्येंत आम्हाला १.३० तास लागला . या नळीच्या दोन्ही बाजूस कारवीने व्यापलेले डोंगर असल्याने या नळीत उतरताना मोठ patch लागला तर काय याची चिंता खात नव्हती. ही नळ उतरायला आम्हाला तब्बल ४.३० तास लागले. ही नळ थेट अस्वलखिंडीच्या पायथ्याशी उतरते. सुरुवातीला थोडस पाणी हाच खुप मोठा आधार होता. २.३० तासांनंतर आम्ही भुषणने आणलेल्या मिरिंडाचा स्वाद घेतला आणि पुढे निघालो. प्रचंड मोठे दगड धोंडे आणि मध्ये मध्ये येणार १५-२० फुटांचे patch पालथे घालत आम्ही पुढे निघालो. मुख्य धारेवरून थेट कोकणात उतरत नसल्याने कदाचित याची उंची हरिश्चंद्र नाळेपेक्षा कमी असावी. नळीच्या पायथ्याशी आम्ही ५ वाजता पोहोचलो आणि मागे वळून बघितले, अस्वल खिंडीच्या थेट पायथ्याशी पोहोचणाऱ्या या नळीला आम्ही "अस्वल नळ" असे नाव दिले. खर बघता निरा नदी येथे येऊन मिळते.



अस्वल नळ
आता आमच्या जवळील पाणी संपत आले होते. अजुन अस्वल खिंड पालथी घालायची होती, त्यापुढे कामठे गावात उतरणारा कामठे घाट. अस्वल खिंडीच्या पायथ्याशी बसून थोडी energy मिळवण्यासाठी जवळ असलेले शेंगदाणे, काकडी, फुटाणे असे पदार्थ खात आम्ही पुढे निघालो. निव्वळ अर्ध्या तासात .४५ वाजता आम्ही अस्वल खिंडीत येऊन उभे राहिलो. थोडीशी पाण्याची शोधा शोध केली पण पाणी काही सापडले नाही. आता पाण्याचा शेवटचा आधार होता तो कामठे घाटातील बाल्टीच्या खडका जवळील पाणी. कोकणात उतरत असल्याने प्रचंड घामाच्या धारा लागत होत्या, पाणी खुपच कमी उरलेले १२ तास पायपीट करून शरीरातील उर्जा कमी होत होती पण आम्ही तसेच स्वतःला ढकलत होतो. मनाला फक्त एकच आधार होता, रवि मोरेने त्याच्या भाचीच्या कार्यक्रमात केलेली जेवणाची सोय. पुढे पुढे सरकू तसा सूर्य अस्ताला जात होता.



अस्वल नळ


वाजता आम्ही बाल्टीच्या खडकाजवळ पोहोचलो पण येथेही पाणी नव्हते. संधी प्रकाश पडलेला येथे आम्ही १०-१५ मिनिटे विश्रांती घेतली, कारण येथून पुढे आम्हाला अंधाराला सामोरे जावे लागणार होते. मजल दरमजल करत आम्ही पुढे सरकत होतो. गावातील दिवे दिसू लागले होते. कार्यक्रमात वाजणाऱ्या वरातीचा आवाज ऐकू येत होता. कोकणात आल्याचे फिलिंग येत होते. थोड्याच वेळात गावातील दिवे गेले. आता गाव किती दूर आहे याचाही पत्ता लागत नव्हता. थोड पुढे एक मोकळ्या जागी आम्ही सर्व जण थांबलो आणि सोबत असलेले tomato बाहेर काढले. सर्वांनी एक एक tomato खाऊन  तहान भागवली आणि पुढे चालायला लागलो. वाजले अजून गाव दिसायचा पत्ता नव्हता. पुन्हा एका मोकळ्या जागी सर्व जण थांबले. सोबत असलेल्या एकमेव पाण्याच्या बाटलीमध्ये एलेक्ट्रल टाकून एक एक घोट पाणी प्यायले आणि पुढे निघालो. .४५ वाजता परत एकदा मोकळ्या जागी आम्ही थांबलो आणि अचानक गावातील दिवे आले. गाव अगदी समोर दिसू लागले. १५ मिनिटे झटपट पाऊले टाकत आम्ही एकदाचे गावात पोहोचते झालो.



अस्वल नळ, नाखिंद टोक, अस्वलखिंडचा रस्ता


गावात पोहोचल्यावर एका घराच्या वरांड्यात सर्व जण पहुडले. काकांनी आतून पटापट पाणी आणून दिले, शेवटी कोकणातील माणसं हो ती. त्यांनी विचारले कुठून आलात एवढ्या रात्रीचे, पटकन एक जण म्हणाला "१४ तास पायपीट करून रायरेश्वर वरून आलोय भाऊ." सर्व जण फ्रेश झाले, गावातच असलेल्या मंदिरात सर्वांनी सामान टाकले आणि कार्यक्रमात गरमागरम आमटी भाताचा आस्वाद घेतला आणि झोपी गेलो. सकाळी .१५ ची बस आवारात उभी होतीच. सकाळी ह्या बसने पोलादपूरला पोहोचलो. येथून वरंधा भोर मार्गे पुण्याची बस पकडली. वाटेत कावळ्या, मोहनगड, राजगड, तोरणा, रायरेश्वर, पाठशीला बघत आनंद लुटत दुपारी १२.१५ वाजता पुण्यात पोहोचून आम्ही sआमच्या प्रवासाची सांगता केली.


Route Map


Summit at Nakhind (Captured by Pranav)


लेखन सौजन्य - साकेत घाणेकर 

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...