https://smaranyatras.blogspot.com/2019/07/blog-post.html
घाटातील
वाट,
काय तिचा
थाट,
मुरकते गिरकते, लवते पाठोपाठ
सरिता पदक याची
कविता वाचता वाचता
माळशेज घाटाची आठवण झाली
खूप वर्षापासून हि
घाटवाट करावी अशी इच्छा
मनात होती ती
यावेळी पूर्ण करावी असे
वाटत होते. माझ्या
ओळखीतील सह्य भटके
ट्रेकवर ट्रेक
करत होते आणि
मी घरी बसून
त्याचे फोटोस चाळत बसलो
होतो. ओळखीतील सर्व
मित्रांना फोन करून
वैताग आला होता सर्व
घरी आराम करणार
असल्याचे सांगत होते मग
काय ट्रेकला जायची
आशाच सोडून दिली.
तेच शनिवारी रात्री
११:४५ ला
अचानक आमच्या मित्र
मंडळातील दया साहेबांचा
फोन आला "कुठे
तरी फिरायला जायचं
का" मी लागलीच
होकार कळवून त्याने
सकाळी ६:३०
ला तयार राहायला
सांगितले. रविवारी सकाळी बरोबर
६:३० तयार
होऊन समोरून साहेबांची
स्वारी आली मग
त्यांच्या घोड्याच्या डबलसीटवर आसनास्थ होऊन गाडी
ठाणे कल्याणच्या दिशने
भरधाव सोडली. कल्याण
मध्ये गाडीची पेटपूजा
करून पुढे निघालो
दया साहेबांचं एक
बरं असतं जास्त
प्रश्न विचारत बसत नाहीत
कुठे जायचं, काय
पाहायचं, किती वेळ
लागणार अशी फालतू
प्रश्नाची यादी ह्या
साहेबांकडे नसते. ह्यांना फक्त
एक माहिती गाडीवर
बसल्यावर गाडी पळवायची
सरळगावच्या नजदिक एका हॉटेल
मध्ये मस्त नास्टा
केला घड्याळात पाहिले
तर सकाळचे ८:१५ वाजले होते.
 |
| माळशेज घाट महामार्ग |
 |
| मोरोशीचा भैरवगड |
परत
एकदा गाडीला किक
मारून टोकावडे पार
करून दिवाणपाडापाशी
आलो खरं पण
सकाळ पासून आता
पर्यंत पाऊसाचा एकहि थेंब
अंगावर पडला नसल्याने
थोडासे निराशच होतो. आता
सह्याद्रीचे उंचच उंच
कडे पाहून दया
साहेबांनी मौनव्रत तोडलं "हा
कुठचा किल्ला" "इथे
काय आहे पाहण्यासारखं"
असे प्रश्नावर प्रश्न
प्रश्नांची सरबत्ती चालू झाली.
एव्हाना गाडी माळशेज
घाटाच्या चढाला लागली सावर्णे
गावाची पाटी पाहताच
दया ला थांबण्यास
सांगितले. गाडी थिटबी
गावात न नेता
सावर्णे गावात एका काकांच्या
दुकानापाशी पार्किंग केली आणि
महामार्गावर येऊन येईल
त्या गाडीला हात
दाखवत होतो. तब्बल
पाऊण तास घाटात
जाणाऱ्या गाडयांना हात दाखवून
कंटाळा आला होता
इतक्यात मुंबईला माल खाली
करून जुन्नरला जाणारी
महिंद्रा पिकअप थांबली. समोरून
प्रश्न "कुठं जाणार
गाववाले" मी बोललो
" माळशेज घाट बोगद्या
जवळ सोडा" असे
बोलताच लगेच गाडीचा
दरवाजा उघडा झाला. परत एकदा गाडीत बसून सरिता पदक याची कविता आठवली
खाली खोल दरी,वर उंच
कडा,
भला मोठा नाग,
जणू वर
काढून फणा.
गाडीतील ड्राइवर काका बरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी
करत माळशेजच्या बोगद्यापाशी आलो. सकाळचे ९:३० वाजले होते घाटात पूर्ण धुकं आणि जोरदार
पावसाचं साम्राज्य गाडीतून उतरून पुढील २सेकंदात ओलाचिंब भिजलो. भोगद्याच्या पलीकडे
पिकनिक छाप लोकांची जत्राच भरली होती जणू तिथून काढता पाय घेऊन धुक्यातून खुबी गावाकडे
वाटचाल सुरु केली. माळशेज घाटाच्या महामार्गावरील शेवटचं लपेटदार वळण घेऊन आम्ही खुबी
अलीकडील पर्यटन महामंडळाच्या विश्रामगृह (mtdc) च्या दिशेने चालू लागलो. महामार्गाजवळील चहाच्या टपरीवर गावकरी दादांना घाटवाटेची माहिती
घेत पुढे निघालो विश्रामगृह रस्त्यावरील रेलिंग पार करून थोडे खाली उतरू लागलो विश्रामगृह
रस्त्यावर उजवीकडे एक देवडी लागते तिथून डावीकडे घाटवाटेची सुरवात होते.
 |
| रेलिंगच्या डावीकडील देवडी |
 |
| रेलिंगच्या उजवीकडे फरसबंद वाट |
माळशेजची जुनी
घाटवाटेची दगड घट्ट बसवून बनवलेली फरसबंदीची वाट तसे या घाटवाटेचा इतिहास
पाहिला तर
मराठ्यांच्या वसई मोहिमेत याच पुरातन घाटाने खाली कोकणात कल्याण भिवंडीकडे
सैन्य गेल्याची
माहिती तसेच इसवी १८२६ मध्ये या घाटाने उंट आणि हत्ती ये जा करीत अशी नोंद
आहे. इसवी
१८५० मध्ये या घाटातून रूळमार्गाचा विचार केला गेला होता. पण अतिकठीण
भोगौलिक परिस्थितीमुळे विचार सोडण्यात आला. याच्या पाहणीसाठी जकात चौकीही
बसवली होती(पुणे गॅझेटियर)
आनंद पाळंदे आणि सुरेश परांजपें यांच्या पुस्तकांत मिळते. टपरीवरील
दादांच्या माहिती
नुसार वनखाते दरवर्षी हि वाट साफसफाई करून मोकळी करतात शिवाय काही वाटसरू,
गावातील
गुराखी शिकारी मंडळी आणि ट्रेकर्स मंडळी या वाटेने थिटबित जातात त्यामुळे
या घाटवाटेचा
राबता अजून तरी चालू आहे.
 |
| फरसबंद वाट |
 |
| ओढ्याच्या दिशेने उतरणारी वाट |
फरसबंद वाट मस्त नागमोडी वळणे घेत खाली ओढ्यात उतरत होती
समोर माळशेजचा महामार्गाचा रस्ता द्रुष्टीशेपात असल्याने निर्धास्त चालत होतो. ५०/१००
मीटरची उतराई झाली एव्हाना घडाळ्यात १०:४५ वाजले होते. वाट ओढ्यात उतरायच्या अलीकडेच
कातळात खोदलेल्या पायऱ्या निदर्शनास आल्या तसे आमचे दया साहेब खुश झाले घाटवाट आता
ओढयाच्या उजवीकडील बाजूने पुढे सरकत होती.
 |
| काताळात कोरलेल्या पायऱ्या |
 |
| डावीकडे ओढा आणि उजिवीकडे वाट |
सततधार पाऊसामुळे वाटेवरील दगड धोंडे निसरडे झाले
होते त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांना सांभाळत ती वाट पार करून ओढ्याच्या उजव्या बाजूने
आरामात खाली उतरत होतो. पाऊस तर काय थांबायचं नाव घेत नव्हता त्यात दया साहेबाणी तर
दोनतीन ठिकाणी घसरून ढुगन लाल केले होते. थोडे अंतर चालत पुढे जाणार तेच परत एकदा कातळात
खोदलेल्या पायऱ्या आणि उजवीकडील कातळात शेंदूर लावलेले गणपती बाप्पा विराजमान झालेले
दिसले. गणपती बाप्पा ना नमस्कार करून वाटेवरून पुढे निघणार तर उजवीकडील कातळात तीन पाण्याच्या
टाकी निर्दशनास आल्या.
 |
| कातळातील पायऱ्या |
 |
| शेंदूर लावलेले गणपती बाप्पा |
मागे उजवीकडे माळशेज घाटातला बोगद्याजवळचा पॉईंट दिसला पिकनिक
छाप घोळक्याचा आवाज स्पस्ट कानावर येत होता पाऊसाने २मिनिटांचा ब्रेक घेतला असताना
आम्ही आमची पोटपूजा करून मोकळे झालो घरून आणलेले पाणी न पिता टाक्यातील थंडगार पाणी
पिऊन मस्त तृप्तीचा ढेकर दिला. परत एकदा पाऊसाने आणि धुक्याने त्याचा जोर कायम ठेवला
तो एवढा होता कि समोरील ४/५ फुटावरील काहीही दिसत नव्हते.
 |
| पाण्याची टांकी |
 |
| पाण्याची टांकी |
 |
| माळशेज गाडीमार्ग |
थंडी अंगात शिरू पाहत होती
फोटोग्राफी न करता पटापट खाली उतरू लागलो अजून ५००/६०० मीटरची उतराई बाकी होती. वाट
सुरेख वळणे घेत खाली उतरत होती. कातळातील पायऱ्या आणि फरसबंद वाटेमुळे हि घाटवाट उतरण्यात
खूपच आनंद येत होता आता शेवटची २००मीटर उतराई बाकी राहणार तेच वाट एका ओढ्याजवळ येऊन
गायब झाली. इकडेतिकडे शोधा शोध केली पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता शेवटी एका ब्लॉगमध्ये
वाचलेल्या माहितीनुसार ओढ्यातून पलीकडे जावं लागते हे आठवलं.
पाऊस काय थांबायचा नाव
घेत नव्हता त्यामुळे ओढ्याला पाणी जास्त होत त्यामुळे जवळील झाडीतून एक जाडजूड काठी
हातात घेतली आणि ओढ्याची खोली बघत ते दिव्य पराक्रम करून पार केला. परत एकदा वाटेला
लागलो एव्हाना घडाळ्यात १२:३० वाजले होते ओढ्यापासून १० ते १५ मिनिटात रानातल्या देवळाजवळ
आलो, पुरातन मुर्तींवर छप्पर घालून बाजुला चौथरा त्याच्या बाजूला वनविभागाने बसण्यासाठी
बाकड्याची सोय केली आहे.
 |
| खाली उतरणारी वाट |
 |
| काळूच्या ओघाकडील उजवीकडे जाणारी वाट |
देवाचं दर्शन घेऊन खाली उतरणार तेच उजवीकडे बैलगाडीच्या रस्त्याएवढी
मोठी वाट काळूच्या ओघाकडे जाताना दिसली पाऊसाने परत एकदा जम्बो ब्रेक घेतला असल्याने
फोटो काढत काळूच्या ओघाकडे निघालो. अर्धा पाऊण तासांच्या चालीनंतर काळूच्या ओघाच्या
अलीकडील ओढ्याजवळ आलो
 |
| काळूचा ओघ |
ओढा पार करून पलीकडील वाटेवर जायचं होतं खरं पण ओढ्याला पाणी
भरपूर असल्याने आम्ही थोडे थांबलो तेच मागून गाड्या येण्याच्या आवाज आला पाह्तोतर मुरबाड
मधील ४/५ बाईकवरून ७/८ मुले येताना दिसली. तेही काळूच्या ओघाकडे जाणार असल्याने मानवी
साखळी करून ओढा पार केला. एक छोटीशी टेकडी पार करून जास्त पुढे न जाता फोटोग्राफी करत
आम्ही सर्व माघारी फिरलो इकडचे तिकडचे विषय निघता त्यामुलानं बरोबर मैत्री झाली. परत
एकदा ओढा पार करून थिटबी गावाच्या वाटेला लागणार तेच त्या मुरबाडच्या मुलांनी आम्ही
तुम्हांला सावर्णेपर्यंत सोडतो म्हणून सांगितलं तसे आम्ही दोघे भलतेच खुश झालो कारण
हि तसेच मोठी पायपीट वाचणार होती.
 |
| रस्त्यावरून जाताना सापडलेले अवशेष |
त्या मुलांनी आम्हांला दोघांना २:३० सुमारास सावर्णे
मध्ये सोडून पुढे निघून गेले दुकानातील काकांचे आभार मानत आम्ही आमची गाडी काढली. मला
वाटलं दया चालून खूप थकला असेल पण साहेब भलतेच खुश होते परत एकदा तुझ्या बरोबर
भटकंतीला घेऊन चल असे आश्वासन घेऊन गाडी मुंबईच्या दिशेने भरधाव सोडली. मग कल्याण ठाणे
ट्रॅफिक पार करून संध्याकाळी ६ला घरात पाय ठेवणार तेच आश्चर्यचकित झाल्यागत घरातील
सर्वांच्या नजारा माझ्याकडे ट्रेकला जाणारा हा माणूस रात्री १०/१२ येतो तो
आज चक्क ६ ला घरात
 |
| घरी परताना हे साहेब सापडले |
No comments:
Post a Comment