Tuesday, April 12, 2022

सुधागडच्या आडवाटा आवळीची वाट डेऱ्या घाट

https://smaranyatras.blogspot.com/2020/01/blog-post_12.html

सह्याद्रीमध्ये एका पाठोपाठ एक घाटवाटा करण्याचा एक वेगळाच ध्यास लागला होता, त्यात हिवाळा आला कि घाटवाटा आणि रेंज ट्रेकचे वारे वाहू लागतात. विश्राम योगेश अहिरे भाऊंचे ब्लॉग वाचता वाचता मला कॉल केला येत्या रविवारी आवळीची वाट आणि डेऱ्या घाट करूया का मी लागलीच होकार देऊन. शनिवारी रात्री विश्रामच्या घरी हजर झालो  तसेच सकाळी .०० ला उठून फ्रेश होऊन विश्रामचे घर सोडले थंडीचे दिवस आणि रविवार असल्याने रस्त्यावर तशी रहदारी कमी पनवेलच्या एसटी स्टॅन्डजवळ गरमागरम चहा डोसून  रिचार्ज झालो. एवढ्या थंडीतून विश्राम गाडी कसा चालवत असेल हे त्याच त्याला माहित तब्बल एक तासांत खोपोली गाठली पठ्याने. इथून आता खरी तारेवरची कसरत सुरु पाली खोपोली मार्गावर काम चालू असल्याने शिवाय धुकं हि खूप असल्याने गाडी जास्त जोरात पळवू शकत नव्हतो. मग जास्त रिस्क न घेता आरामात सकाळचे ७वाजता पालीच्या विघ्णहर्ता गणपती बाप्पाजवळ पोचलो बाहेरील एक टपरीवर मस्त २प्लेट पोहे हादडून पुढील प्रवासाला लागलो. धोंडसे, पाच्छापूर डावीकडील फाटे सोडून सरळ नांदगाव वरील ब्रिज पार करून गोमाशी फाट्यावरून डावीकडे नागशेतकडे वळलो.
नागशेत वरून कच्या रस्त्याने कोंडजाई देवी  मंदिराजवळील धनगरपाडा जवळ आलो गाडीचा आवाज येताच बाजूच्या घरातील एक काका बाहेर आले. बाहेर आल्या आल्या त्यांचा पहिलं प्रश्न "गाढवलोट घाटाने जाणार का" मी काकांना बोललो "तुम्हांला कसं कळलं" तेव्हा ते बोलले "अश्या आडवाटेला तुमच्या सारखिच माणसाचं जातात  फिरायला नाहीतर या जंगलात कोण जाईल जीव देयाला " या गोष्टीवर एकच हशा पिकला. धनगरपाड्यातून सह्याद्रीचं सुरेख दर्शन होत होतं हिरडी ते आसनवाडी वाटेवरील धबधबा आणि मारठाण्याच्या डोंगराच्या खिडीतून येणारा ओढा कोंडजाई मंदिराजवळ एकत्र होऊन पुढे कुंडलिका नदीला भेटतो. नागशेत कोंडजाईच्या धगरपाड्यापासून वाटा घाटांवर जातात त्यांतील पहिली घोणदांड, दुसरी डेऱ्या घाट, तिसरी गाढवलोट तर चौथी आवळीची वाट जी पुढे भिरा वरील येणाऱ्या वाटेला भेटून गाढवलोट घाटाच्या वाटेला मिळते. काकांना आवळीची वाट विचारून पुढील वाटेला लागलो तेव्हा घड्याळात सकाळचे :३० वाजत होते.

झापाकडे जाणारी मळलेली वाट
आता पाय भराभर उठू लागले आवळीची वाट तशी सौम्य चढाची कुठेही चुकवणारी इथून सह्याद्रीचा अफाट नजारा डोळ्यात साठवत पुढे निघत होतो. थोडे पुढे जाताच एक रिकामं झाप दिसलं आजूबाजूला गाई गुरे आरामात चरत होती. झापाजवळ घरून आणलेल्या मेथी पराठ्यावर जोर मारला पेटपूजा झाल्यावर थोडा आराम करत वाटेला लागलो. 

वाट आता खजिना डोंगराच्या डावीकडील डोंगरावरून सौम्य चढाची होत वर चढू लागली वाटेत निम्मी चढाई झाली तेच समोर कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि पॉटहोल निदर्शनास आले यांचा अर्थ हि वाट पुरातन वापरातली असेल पुढे एक वाहता ओढा मिळाला त्यात रिकाम्या बाटल्यामध्ये पाणी भरून पुढे आलो अंदाजे ३००/ ४००मीटर ची चढाई झाली होती वाट घनदाट जंगलातून जात असल्याने उन्हाचा त्रास नव्हता. 
कातळात कोरलेल्या पायऱ्या
पॉटहोल 

उजवीकडील खजिना डोंगर  
शेवटची १००/२०० मीटरची चढाई बाकी असल्याने आम्ही आरामात चाल करत होतो तसेही आम्ही दोघे असल्याने कसलीही फालतू बडबड ना करता जंगलातील शांततेचा आस्वाद घेत शांतपणे वाटचाल करत होतो. वाट आता डावीकडे चढू लागली मस्त बांधलेली वाट चढून वर येतो तेच उजवीकडून भिरातुन हिरडी गावाकडे जाणारी वाट लागली. 
डावीकडे नागशेतकडे आम्ही आलेलो तर सरळ जाणारी वाट हिर्डी गावाकडे  
हिरडी गावाकडील वाट धरून चालू लागलो १०/१५ मिनिटांची शेवटची चढण चढून हिर्डी गावात स्वागत वेगळ्याच प्रकारे झालं तेथील भूभू (कुत्र्या)ने माझी हालत बेक्कार केली. आता ते चावणार तेव्हड्यात विश्रामने प्रसावधतेने त्याला बाजूला केले आणि लागलीच बाजूच्या घरात हाक दिली तसे एक आजोबा घरातून बाहेर येऊन भूभू ला हाकलले. आजोबांशी रामराम श्यामश्याम झाले याआधी आम्ही अंधारबन केला होता तेव्हापासून आजोबांची ओळख मग त्यांच्याकडून ताकाची फर्माइश पुरी करून आसनवाडीच्या रस्त्याला लागलो. 

 वरील सांगितल्या प्रमाणे हा धबधबा नागशेत, नांदगाव वरून कुंडलिका नदीला भेटतो  
मजल दरमजल करत अंधारबनाचा डावीकडील वाट सोडून सरळ आसनवाडीकडील रस्ता पकडला ती तास-दिढ तासाची कंटाळवाणी चाल करत आसनवाडीत आलो तेव्हा दुपारचे १२:३० वाजले होते चला आता डेऱ्या घाट उतरला म्हणजे घरी लवकर जायला मोकळे असा आनंदाचा बार मनात उडाला. गावात शाळेजवळ आलो परत एकदा अबरचबर खाऊन पेटपूजा करून १० मिनिटे पडीक मारली बघता बघता कधी त्या थंड वार्तावरणात डोळा लागला कळला नाही. सुमारे १ तासानंतर बाजूच्या घरातील ताईंनी उठवलं तसे खाडकन जागे झालो ताईंना डेऱ्या घाटाची वाट विचारून वाटेला लागलो. डेऱ्या घाटाची वाट उभ्या उतारावरून डावीकडे धारेवरून जाते वाटेत कारवीची झाडेच झाडे आता उभ्या उतारावरून पाय हुळहुळू लागले होते. वाट वापरातली असली तरी मध्येमध्ये घसारा होताच वाट उजवीकडे वळून माथ्यापासून १००/१५० उतराई करत एका ओढ्याच्या वाटेवर येते. 
 डेऱ्या घाट सुरवात 
 समोरील उजवीकडील झाडाजवळून उजवीकडे ओढ्यात वाट उतरते 
ओहोळातून डावीकडे वाट वळते
ओढ्यातून वाट सरळ न उतरता ६०/७० अंशात डावीकडे कातळात खोदलेल्या पायर्यांच्या वाटेवरून जाते वाह्ह एका पाठोपाठ एक खोदलेल्या पायऱ्या पाहून आनंद व्दिगुणित झाला. पायऱ्या पार करून कातळात खोदलेल्या अक्षरांचा मागोवा घेत असताना विश्रामला ते कातळातील अक्षर सापडले तसेच समोरील घोणदांड पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. 
कातळात कोरलेल्या पायऱ्या 
 कातळात कोरलेलं अक्षर 
आता वाट मळलेली छान जंगल टप्प्यातून १००/१५० मीटर खाली उतरत जाणारी परत एकदा उन्हाचा त्रास वाचला होता एकावर एक झाडी भरलेले टप्पे पार करून मोकळं वनात आलो तर पार मान मोडणारी द्रुशे डोळ्यासमोर उभी राहिली होती. डेऱ्या घाट उतरून अजून बरीच चाल बाकी होती एक पुसटशी वाट डावीकडे जाताना दिसली तीच पकडून खाली उतरू लागलो तर वाट ओढ्याच्या दिशेने घेऊन जाऊ लागली. 

 डेऱ्या घाट 
हिर्डी आसनवाडीकडून येणाऱ्या ओढ्यात उतरून आम्ही ज्या धनगरवाड्यातुन आवळीच्या वाटेला लागलो होतो त्यांच्या पुढील धनगरपाड्यात वाट आली होती. दुपारचे ४:३० वाजता कोंडजाईच्या जवळील धनगरपाड्यात हजर झालो सकाळचे काका घरात नव्हते मग बाजूच्या आजींनकडून गाढवलोट घाटाची वाट आणि दिशा समजून घेतली. 


कोंडजाई देवी 
कोंडजाई मंदिराजवळ जाऊन देवीचे दर्शन घेऊन कोडीजवळ शांत बसलो सह्याद्रीतील अफाट नजारा आणि शांततेतील ते क्षण काहीकेल्या तिथून निघू देईना. सह्याद्रीतील ह्या सर्वांग सुंदर पट्याला कोणाची द्रुस्ट न लागो हीच मनोभावे इच्छा

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...