![]() |
| Khadkona gavatun Asherigad |
अशेरीगड पोहचण्यासाठी पालघर स्थानकातून रिक्शा
स्टँडने प्रथम मनोर मस्तान
नाका व तेथून
१०/१२ किमीवरील खडकोना
गाव गाठावे.गावातील शाळेत
बँग पँककरून व विहीरीतून अथवा
बोअरवेलचे पाणी भरून घ्यावे.येथून उजव्या हाताला
अशेरीगड ऊठून दिसतो तर
डाव्या हाताला अडसूळ
व मेढवणचे सुळके
रांगेत दिसतात.गावातून शेताच्याबांधाच्या कडेने
चालत पाण्याचे दोन ओढे
पार केल्या नंतर
२ फूटी रूंद दगडी
पायवाट न सोडता
हलक्या १ १/२
तासाच्या चढाई मार्गे
बोरीचे झाड गाठावे.येथून उजव्या हाताला
जाणारी वाट धरून
वाघदेवाचे मंदिर गाठावे. येथून एका खडकाला वळसा मारल्या नंतर १५/२० मि. भूयारी खंदक व
दगडी पायरयांची गडावर
जाणारी वाट लागते.येथे सध्या अपघात
होऊ नये म्हणून
छान लोखंडी रेलींग
लावण्यात आली आहे.या गडावर
जाणारया पायरयादेखील इग्रजांच्या कारकिर्दीत तोडल्या आहेत परंतु सध्या लांबलचक सुरक्षीत लोखंडी
शिडीने गडप्रवेश करता
येतो.येथे शिडीवर धावपळ
आणि गर्दी न
करता एक एकाने रांगेत शिडी चढून गडप्रवेश करावा . शिडी मार्गे वर
पोहचल्यावर लगेच राणी वा
राजाच्या टोपीसारखा मुकुट असलेले कोरलेले दगडी
कोरिव शि ल्प
पहावयास मिळते तर वर
एक पाण्याचे खोदिव
टाके लागते. तेथून
पुन्हा थोडेवर चालल्यावर आपण उधवस्त
प्रवेशद्वारापाशी
पोहचतो.डाव्या हाताला
चालत गेल्यावर ३
टाक्यांचा समूह तर सरळ
१०/१५ मि चालल्यावर खोदिव
केव्ह लागते. तसेच उधवस्त अवस्थेतील पडकी
वास्तू व शिल्प
पहावयास मिळते.तसेच केव्ह जवळ
३ तोफा इतस्ततः पसरलेल्या दिसतात.दोन तलाव देखील गडावर आहेत
या गडाचा इतिहास फार जुना आहे. ८०० वर्षांपूर्वी शिलाहार राजाच्या कारकिर्दीत गडाची बांधणी झाली असावी.या गडावर पेशव्यांनी हुकूमत गाजवली व नंतर गड पोर्तुगीज व नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला.
या गडाचा इतिहास फार जुना आहे. ८०० वर्षांपूर्वी शिलाहार राजाच्या कारकिर्दीत गडाची बांधणी झाली असावी.या गडावर पेशव्यांनी हुकूमत गाजवली व नंतर गड पोर्तुगीज व नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला.
पूवीं पालघर स्थानकातून कासा जाणारया एस टी ने खडकोना गाव गाठणे शक्य होते. परंतू हि ST सेवा महामंडळाने सध्या बंद केली आहे.त्यामुळे आम्ही खाजगी जीपने खडकोना
गाव गाठण्याचे ठरवले. सकाळी ठीक ८:४५ वा.आमचा प्रवास खिमजी यांच्या जीपने मनोर मस्तान नाका मार्गे खडकोना असा सुरू झाला.ठीक ९:४५ वाजता आम्ही गाव गाठले व १०:०० दरम्यान गडाच्या दिशेने
मार्गक्रमण चालू केले.आमच्या मागोमाग राजेश
व त्याचे काही मित्र आमच्या सोबत शामिल झाले.
आमच्या चमूने हलक्या चढाई मार्गे ११/२ तासात खिंड पार करून बोरीचे झाड गाठले.खिंडीतील पायवाट हि गर्द झाडीतून गडावर जाते त्यामुळे दुपारी देखील वातावरण गार होते. रिमझिम पाऊस ये जा ये जा करत होता त्यामुळे छान धुक्याची दुलई सर्वत्र पसरली होती.
![]() |
| खिंडीतील पायवाट |
![]() |
| आमचा जुना मित्र राजेश परळीकर व तानाजी |
आमच्या चमूने हलक्या चढाई मार्गे ११/२ तासात खिंड पार करून बोरीचे झाड गाठले.खिंडीतील पायवाट हि गर्द झाडीतून गडावर जाते त्यामुळे दुपारी देखील वातावरण गार होते. रिमझिम पाऊस ये जा ये जा करत होता त्यामुळे छान धुक्याची दुलई सर्वत्र पसरली होती.
![]() |
| बोरीच्या झाडानंतरची चढाई |
![]() |
| वाघदेवाचे मंदिर |
![]() |
| धुक्याची दुलई |
![]() |
| लोखंडी रेलींग |
![]() |
| बंद भुयार |
नंतर भुयारी खंदक पाहून सावधपणे रेलिंग चढून दगडी गणेश शिल्प आणि मोठ्या लोखंडी शिडीजवळ येऊन थांबलो.
![]() |
| लोखंडी शिडी जवळील गणेश शिल्प |
![]() |
| लोखंडी शिडी |
![]() |
| राणीचा दगडी मुकुट |
![]() |
| पाण्याचे पहिले टाके |
![]() |
| मुख्य प्रवेशद्वार |
आम्ही छान छान फोटो आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करून झाल्यावर १२. १५ वाजता गडाच्या उध्वस्त दरवाजातून प्रवेश केला व गङ माथा गाठला.येथून १५ ते २० मी. आम्ही केव्हजवळ पोहचलो.
![]() |
| पडीक वास्तूचे जुने अवशेष |
![]() |
| अशेरीवरील गुहा व तोफा |
नंतर केव्हच्या वरील बाजूने चढाई करून पठारावर आणलेली शिदोरी फलाहार केला.
![]() |
| पठारावरून NH ८ महामार्ग |
![]() |
| मेढवणचे सुळके |
![]() |
| अली ,तानाजी & कौशिक |
सर्वाना आजूबाजूचा परिसर न्याहाळून येण्यासाठी १ तासाचा अवधी देण्यात आला.कारण ठीक ४. ००
दरम्यान
गावात खिमजी परतीच्या प्रवासासाठी जीप घेऊन येणार होते. पठारावरून NH
८ highway व समोर असणारे अडसूळ आणि मेंढवणं सुळक्यांची रांग छान दिसत होती.
आग्नेय दिशेला कोहोजगड डोके वर करून दिसत होता.अशा तऱ्हेने छान भटकंती
उरकून आम्ही १:५५ ला गड उतरण्यास सुरुवात केली व ठीक ४:०५ मि गावातील शाळा
गाठली. गावातील ओढ्यावर थोडावेळ स्वछंद अंग भिजवून सर्व फ्रेश ताजेतवाने
झाले.
लगबगीने पालघर गाठून सायंकाळी ६:०५ च्या लोकलने आम्ही मुंबईसाठी परतीचा प्रवास चालू केला.सर्वानी लोकलमध्ये पहिल्या वर्षा भटकंतीच्या आठवणी व गप्पा मारत ७:३० दरम्यान सुखरूप घर गाठले. http://pftcdahisar.blogspot.com/2016/07/asheri-gad-palghar.html


























No comments:
Post a Comment