Pahine Navra & Navri Expedition (Tryambak Region) - 25th Feb.2017
| डाव्या बाजूचा पहिने नवरा व उजव्या बाजूचा पहिने नवरी.. |
पहिने नवरा सुळका उंची - २६० फूट
आरोहण कालावधी २ तास १०.मि.(Climb started सकाळी ९:१५ ते सकाळी ११:२५)
*Highlight of Expedition - My First Lead Climb as lead Climber - (किरण पात्रे) & Ali 2nd Men. पहिने नवरी सुळका उंची - २४० फूट (Climb started सायंकाळी ४:२५ ते ६:१५) / Note : पाथ फाईंडर्सची टीम वेळे अभावी नवरी सुळक्याच्या चोक stone पर्यंत जाऊन आली.
![]() |
| पहिने नवरा सुळका उंची - २६० फूट |
| पहिने नवरी सुळका उंची - २४० फूट |
पहिने - नवरा आणि नवरी या सुळक्यान पर्यंत पोहोचण्याचा मार्ग :
१.प्रथम मुंबईहून ST ने त्रंबकेश्वर गाठावे. येथून पगेलवाडी फाट्यावरून
पहिने गाव गाठावे.तळ छावणी पहिने गावात करता येते अथवा १ १/२ तास चढाई करून
सुळक्यापर्यंत पोहचून असणारया पठारावर करता येते (आम्ही पठारावर मुक्काम
केला पण वारा भरपूर होता.)
पिण्याच्या पाण्याची सोय: पहिने गावातील शाळेच्या मागिल विहीरीवर.(सुळक्यांच्या आजूबाजूला डोंगरावर पाणी नाही.)
![]() |
| Team PFTC -From left -Ali,Jagruti,Jayraj & Kiran - Photographer Tanaji @ पहिने गाव |
Pahine Navra Navri Climbing Expedition Team of PFTC - पाथ फाईंडर्सचे सहभागी सभासद:१.जयराज जोशी सर Leader,२.तानाजी लांडगे सर co leader,३.किरण पात्रे,४.अली मामूवाला,५.जागृती जैन.
आम्ही पाथफाईंडर्सच्या PFTC चमूने दसरयानंतर २६ नोव्हें.२०१६ ला
गोरखगड व मश्चिंद्रगड सुळके मोहिम आखली होती. पण त्या मोहिमेत संघाला फक्त
मश्चिंद्रगडाच्या पायथ्याला असणारया पेग पर्यंत मजल मारता आली.संघाला
नियोजीत वेळेत सुळक्याच्या माथ्याला गवसणी घालण्याचे यश आले नाही. त्यानंतर
आम्ही नेटाने सराव करत जाने.व फेब्रु़.२०१७ मध्ये १.ढाकभैरी कळकराय,२.
धोडपची शेंडी व ईखारा या मोहिमा यशस्वी केल्या.नंतर जयराजने २४,२५ व २६
फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी नाशिक - त्रंबकेश्वर परिसरातील
पहिनेगावातील नवरा व नवरी सुळके मोहिम आखली.त्या नुसार २४/०२/२०१७ ला
दुपारी २:०० नंतर वसईहून - विरार - वजरेश्वरी - अंबाडी - वाडा मार्गे पहिने
गाव गाठण्याचे ठरविले.पण आम्हाला वसईहून निघायला सायंकाळचे ६:०० वाजले व
मोहिमेचे पुढिल गणित खोळंबले.आम्ही वसईहून जयच्या कारमध्ये पेट्रोल टाकून
घेतल्यावर रात्री ८:३० वा पहिला stop वाडा डेपोजवळील समर्थ हॉटेलमधे जेवण
ऊरकून घेण्यासाठी घेतला.चमु वाड्यानंतर सूर्यमाळ मार्गे जंगलातून जाणारया
सामसूम स्टेट रोडने मार्गक्रमण करु लागला. हा रस्ता रात्री खूपच सामसूम
असल्यामुळे या मार्गे रात्री प्रवास करणे टाळावे.आम्ही रात्रीच्या किर
वातावरणात वाटेत निगुरपाड्याजवळ - हरिहर किल्ल्याजवळील गांवात आकाशदर्शन
star gazing करण्यासाठी गाडी थांबवली.येथून star gazing करून झाल्यावर रात्री
११:१५ दरम्यान पहिने गाव गाठले.आम्ही गावातील शाळेजवळील एका घरातून पाणी
भरून सुळक्यापर्यंत जाण्याचा मार्ग समजून घेतला.नंतर वेळ न दवडता
मोहिमेसाठी लागणाऱ्या सामानाची विभागणी करून सर्वजण रात्री ११:५५ ला (base
camp) तळ छावणी पर्यंत मार्गक्रमण करू लागले.
![]() |
| जागृतीने टिपलेले शुक्रताऱ्याचे द्रुश्य |
आम्ही मध्य रात्री २:३५ दरम्यान विजेरीच्या
प्रकाशात सुळक्याजवळील पठार गाठले.नंतर सुळक्याच्या जवळील पठारावर जोरदार
वारयाचा सामना करत आणलेला टेन्ट कसाबसा उभारून सकाळी ६:०० वाजेपर्यंत आराम
करण्याचे ठरवले.जयने मोहिमेचा आढावा देऊन सर्वांना पहाटे ६:०० वाजता
ऊठण्याचा Wakeup Call दिला.पहाटे ठरल्याप्रमाणे प्रत्येकजण लवकर उठून
आपआपल्या कामाला लागला.
| चहाची तयारी - अली तानाजी & जागृती |
मी व अलीने एका कोपऱ्यात चहासाठी चूल मांडली.मग अली,जागृती आणि तानाजीने
गरमागरम चहा बनवला.आम्ही आणलेले ready to eat food खाऊन सुळका मोहिमेच्या
तयारीला लागलो.
चहाच्या तयारी दरम्यान मी आजूबाजूच्या परिसरातील काही द्रुश्ये कॅमेऱ्यात बंदिस्त केली.
| डांग्या सुळका |
जयराज सरांनी मोहिमेला लागणारे आवश्यक साहित्य प्रत्येकाला विभागून दिले. मी व अली हारनेस,QD,रोप, हँमर व शिरस्त्राण Helmet ई.मोहिमेला लागणारे उपुयक्त सामान घालून तयार झालो.
| PFTC Team ready at Base Camp - पहिने नवरा सुळका |
| हरिहर किल्ला |
| अंजनेरी जवळील हनुमान सुळका |
| चमू एकामागोमाग नवरा सुळक्याच्या base ला पोहोचताना |
आम्ही ठीक ९:०० वाजता नवरा
आणि नवरी सुळक्यांच्या च्या घाळीत पोहचलो. जयराजच्या गुढग्याला झालेल्या
दुखापतीमुळे यावेळी lead climbing ची जबाबदारी माझ्यावर तर 2nd मॅन ची
जबाबदारी अलीवर होती.तानाजीसर 3rd Man ची धुरा सांभाळणार होते तर जयसर
base ला थांबणार होते आणि जागृती कॅमेरयाने फोटो शुट करणार होती.
| पहिल्या स्टेशनवरं पोहचल्यावर अलीला वर येण्याचा call |
मी दरम्यान नीट rope anchor केल्यावर लागलीच अलीला belay देऊन पहिल्या स्टेशनवर घेतले.
| पुढील चढाईची हालचाल |
आम्हा दोघांना सुळका आरोहणावेळी चढाई करताना वाऱ्याचा खूप त्रास होत
होता.तरीदेखील न डग मगता आम्ही टप्या टप्याने चढाई करत होतो.मी व अलीने
सकाळी ९:४५ दरम्यान सुरक्षितरित्या दुसरे स्टेशन गाठले.
![]() |
| मी व अली at 2nd station |
| तानाजी सर पुढील चढाई करताना |
थोडया वेळानंतर आम्ही तानाजी सरांना (3rd) मॅन ला चढाई करून वर येण्याचा
call दिला.नंतर जागृती व जय सर असा सर्व चमू १०:४५ पर्यंत सुरक्षितरित्या
टप्याटप्याने दुसरया स्टेशनवर जमला.
![]() |
| Team at 2nd station - जागृती तानाजी & जयराज |
आता यापुढील थोडा overhang असणारा १२/१५ फुटी अवघड टप्पा मला पार करायचा
होता.पण सर्व चमू सोबत असल्याने माझे मनोबल वाढले. मी ११:०५ दरम्यान हा
टप्पा पार करण्यासाठी attempt केली व २ Quick Draw लावून overhang पार
करण्याचा प्रयत्न केला पण वर धरण्यासाठी होल्ड नसल्याने थोडा पाठी फेकलो
गेलो व दुसऱ्या fixed bolt वर स्थिरावलो.
| Resting on hold - Route चे निरीक्षण |
मग पुन्हा थोडावेळ रेस्ट घेऊन crack,foothold व pressure hold चा वापर करून मी हा टप्पा पार केला.
| QD चा वापर करून स्वतःला सुरक्षित करताना |
मी ११:२० दरम्यान पुन्हा स्वतःला सेफ करून अलीला तिसऱ्या station वर येण्यासाठी सांगितले.
या सुळक्याच्या मोहिमेदरम्यान वारा खूपच त्रास देत होता त्यामुळे जयने
summit जवळ असेल तर चढाई continue करण्याचा संदेश दिला.तानाजीसर ,जयसर व
जागृती २ ऱ्या स्टेशनवर थांबून राहिले.मी आता पुढील चढाईसाठी सावधपणे
सुरुवात केली.तिसऱ्या टप्प्यानंतर थोडा वळसा घेऊन १० फुटी बाहेर
येणारे climb व त्यानंतर स्क्रि patch पार करायचे होते. अली 2nd man ची
भूमिका चोख बजावत होता. तिसऱ्या station वरून Traverse वाला आणि
स्क्रिवाला टप्पा सुरक्षित रित्या पार करून ११:२५ दरम्यान माथ्यावर
पोहचलो.स्वतःला सुरक्षित करून मी अलीला बिले देत ११:४० पर्यंत वर घेतले.
![]() |
| पहिने माथ्यावर विजयी आनंदोत्सव |
अशा तऱ्हेने पाथफाईंडर्सच्या चमूने सुरक्षितपणे पहीने नवरा सुळका सर करून विजयी पताका फडकावली.
यानंतर आमच्या चमूला लवकरात लवकर windup करून नवरी सुळक्याच्या आरोहणासाठी तयारी करायची होती.
| जय सर Windup करताना |
सर्व टिम लवकरात लवकर सुरक्षितरित्या rapell down करून दुपारी २:४५
दरम्यान खाली उतरली. मी व जागृतीने प्रथम basecamp गाठला आणि चहा व
खाण्यासाठी भेळ बनवण्याची तयारी चालू केली.
आता आणलेले Ready to eat food खाऊन - भेळ व चहा ऊरकून टिम पुन्हा सायंकाळी ४:३० दरम्यान नवरी सुळका आरोहणासाठी निघाली.
![]() |
| पहिने नवरी सुळका Climbing Route with stations - फोटो Courtesy from SCI Album |
| अली नवरी सुळका आरोहण करण्यास सज्ज |
यावेळी Firstman - Lead Climb अली करणार होता.तानाजी सर सेकंड मॅनची
भूमिका पार पाडणार होते. अलीने सायंकाळी ४:४० दरम्यान सावधपणे आरोहणासाठी
सुरुवात केली.
त्याने पहिल्या स्टेशन पर्यंत सुरक्षित climb करून belay system तयार केली व तानाजीसरांनी climb करून वर येण्यास सांगितले.
| तानाजीसर चढाई करताना second man |
| जागृती Moving to First Station |
| ट्रॅव्हर्स घेऊन घळीत पोहोचताना तानाजी सर |
आता सर्व टिम एकामागोमाग वर climbing करून सुळक्याला उजव्या बाजुला वळसा घेत नवरी व सासरा डोंगरातील घळीत पोहोचली.
![]() |
| Ali - Started climbing using bridging technique/ system |
अलीला आता bridging पद्धतीने climbing करून chockstone पर्यंतचे स्टेशन
गाठायचे होते.त्याच्या ऊंच बांध्यामुळे हा टप्पा त्याने लिलया पार
पाडला.स्वतः सुरक्षित झाल्यावर त्याने जयसरांना आरोहण करण्यास सांगितले.अली
आणि जय या patch वर सुरक्षित पोहचेस्तोवर सायंकाळचे ६:०० वाजले होते.
![]() |
| अली स्वतःला सुरक्षित करून जयसरांना क्लाइंबिंग call देताना |
![]() |
| दुसऱ्या station वर चढाई मार्गाचे निरीक्षण करताना |
![]() |
| Next Move till Chock Stone |
यापुढील Chock Stone नंतरच्या टप्यात
देखील पुन्हा birdging पध्दतीने चढाई करायची होती व नंतर तिसरे स्टेशन
लागणार होते व माथा गाठण्यासाठी किमान १ ते १ १/२ तास वेळ लागणार होता.वेळे
अभावी टीमला आरोहण थांबवून rapell down करून खाली यावे लागले.
PFTCच्या चमूने निराश न होता पुन्हा basecamp गाठला. सामानाची आवराआवर
करून लगबगीने पाहीने गाव गाठले.आम्ही गावातील शाळेच्या आवारात रात्रीचे
जेवण बनवून मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. जेवण उरकेपर्यन्त रात्रीचे
११:३० वाजले.दुसऱ्यादिवशी पहाटे मुंबईला परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार
होतो.
रविवारी २६ तारखेला पहाटे चहा व मसाले भाताचा बेत उरकून आम्ही परतीच्या
प्रवासाला सुरुवात केली.आम्ही हरिहर किल्याचे व पक्षांचे फोटो काढून वाटेत
खोडाळे गावात चहा आणि भाजी मिसळ खाण्यासाठी break घेतला. नंतर दुपारी ठीक १
वाजता वसई स्टेशन गाठले. पुढील हंगामात पुन्हा एकदा नवरी सुळके मोहिमेसाठी
तयारीने येण्याचा निर्धार करून प्रत्येकाने आप आपले घर गाठले.
*Major timelines*
*24th February 2017*
6:00 pm start from vasai
8:30 pm- dinner @ हॉटेल Shiv Samarth,near Wada bus stop
9:10 pm restart from wada after dinner
11:15 pm Pahine Gaon - Car parked
11:55 pm- start walk upto base of नवरा Pinnacle
2:35 am Reached base,Set up tent.
3:30 am to 6.00 am - sleep
*25th February 2017*
6:00 am wake up
9:15 am start Navra climbing.
Lead by KP, HA- 2nd man,
11:25 am summit KP
11:40 am Ali summit
1:40 pm wind up.
2:00 to 3.30 - lunch Reached base. Prepared bhel for lunch
Half an hour- rest
4:10 pm - start from base camp for Navri
4.35 pm - started navri. HA- 1st man & TL- 2nd man
4.45 all reached chimney
5.00 -ali started bridging.
2nd man- JJ- jumaaring
6:00 pm Βoth at २ nd station of navri
6:30 -return from chimney to base camp
7 to 7:50 pm wind up
8:40 pm down at base village
Stared dinner preparation
10:20 - 11:30 pm dinner
11:30 pm sleep
*26th Feb 2017*
6.00 am wake up
Breakfast at 7.15 am
Pack up by 8:40
Return journey Started from Pahine Village at 8:45 am
Tea Snacks halt at 9:45 am
Vasai stn at 1:00 pm
http://pftcdahisar.blogspot.com/2017/03/pahine-navra-navri-expedition.html



















No comments:
Post a Comment