Friday, August 12, 2022

कळकराय - भैरी सुळका मोहिम - ३१.१२.२०१६ & ०१.०१.२०१७



ढाकचा किल्ला & डाव्याबाजूला कळकराय सुळका 
         पाथ फाईंडर्सच्या चमूने २०१६ या वर्षाची सुरुवात AMK - अलंग,मदन आणि कुलंग या ३ किल्ल्यांच्या मोहिमेने केली.जय आणि तानाजीसरांचे ऊत्तम नेत्रृत्व,मार्गदर्शन व सर्व सहकारयांचा ऊत्तम सराव यामुळे  AMK,मोरोशि - भैरवगड,अशेरीगड,गोरख-मश्चिंद्रगड व वर्षाअखेर ३१ डिसेंबरला ला ढाकचा कळकराय - भैरी (बहिरी देव) सुळका या मोहिमा सफल केल्या.
         कळकराय सुळका आणि ढाक किल्ला भैरीची नैसर्गिक गुहा रायगड जि.व सह्याद्रिच्या कर्जत परिसरात मोडतात.लोणावळ्याच्या उत्तरेला दहा मैलांवर असलेल्या राजमाचीजवळ निबीड अरण्यात ढाकचा किल्ला आहे.तसेच शेजारीच असणारया सुळक्याला ‘कळकरायचा सुळका’असे म्हणतात.या किल्ल्याचे स्थान व रचना पाहाता याचा ऊपयोग टेहळणीसाठी केला जात असावा.ढाकच्या किल्ल्याचे दोन भाग आहेत. १) बहिरीची गुहा व लेण्यांचा समुह,२) ढाकचा किल्ला.
भौगोलिक व ऐतिहासिक माहिती:        
१) बहिरीची गुहा व लेण्यांचा समुह : आजकाल बरेच जण अधर्वट माहितीच्या आधारे किंवा साहस करण्याच्या ऊद्देशाने ढाकच्या किल्ल्यावर जातात. अशा गिरीभ्रमण करणारया आणि सह्याद्रिच्या भटक्यांनी गिर्यार्रोहणाचे साहित्य व गिर्यार्रोहण तंत्राची माहिती असल्याशिवाय "बहिरीची गुहा" व "कळकराय" सुळक्यावर जाणे टाळावे.कारण येथे जाण्यासाठी अवघड कातळ टप्पा पार करावा लागतो.अनेक जणांचा या ठिकाणी भैरीच्या गुहेत चढतेवेळी अथवा ऊतरतेवेळी पडून मत्यृ झालेला आहे.यावर गुहेवर दीडहजार फूटांची कातळभिंत आहे व बहिरीच्या गुहेत बहिरीचा शेंदूरु फासलेला दगड आहे.पाण्याची २ मोठी टाक आहेत.
भैरी लेण्यांवरील कातळ भिंत 
 गुहेच्या समोरच राजमाचीचे श्रीवधर्न आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले दिसतात. येथूनच नागफणीचे टोक , प्रबळगड , कर्नाळा,माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो. दुसरया लेण्यात काहिही अवशेष नाहीत ,तर ३ रे लेणे अधर्वट खोदलेल्या स्थितीत आहे.
२)ढाकचा किल्ला : या किल्ल्यावर केवळ पाण्याच एक टाक आहे. बाकि काहिही अवशेष शिल्लक नाहीत.
पोहोचण्याच्या वाटा :
ढाक किल्ल्यावर व कळकराय सुळक्यापर्यंत पोहोचण्यासाठी २ वाटा आहेत. या वाटांनी प्रथम ‘कळकरायचा सुळका’आणि बहिरीचा डाेंगर यामधील  खिंडीत पोहोचावे लागते.
१)वदप मार्ग:- कजर्त - वदप अंतर ७ कि.मी आहे. वदप गाव संपल्यावर एक वाट
भिवगडा / भीमगडा कडे जाते. या वाटेने १० मिनीटात आपण एका खिंडीत पोहोचतो. येथून
उजव्या बाजूची वाट ढाक किल्ल्याकडे तर डाव्या बाजूचीवाट भिवगडा / भीमगडा कडे जाते.
या वाटेने वदप गाव ते ढाक गाव हे अंतर कापण्यासाठी साधारणतः दिड ते दोन तास
लागतात. येथून ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत पोहोचायला पाऊण तास लागतो.
२)जांभिवली मार्गे:- पुणे - कामशेत मार्गावरील जांभिवली गावात पोहोचावे.तेथून  अर्धा - पाऊण तासात कच्च्या मातीच्या रस्त्याने कोंडेश्वर मंदिर गाठावे. येथून पाण्याच्या डोहांवरून वाटेने कळकरायचा सुळका आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत तासभरात पोहोचता येते.
         आम्ही ३० डिसे.२०१६ ला ठीक ५:०० वा आरोहणासाठी लागणारे साहित्य व २ दिवस पूरेल ईतका शिधासामग्री घेऊन वसईहून कारने निघालो. चहा पाणी वाटेत उरकून वसई - ठाणे - लोणावळा मार्गे आमचा प्रवास कामशेत गाठण्यासाठी चालू केला.तानाजी व विक्रांत बाईकने आम्हाला लोणावळा येथे भेटणार होते. सर्वजण ठरल्याप्रमाणे लोणावळा येथे भेटले. येथील अन्नपूर्णा हॉटेलमध्ये रात्री ११:००/११:३० दरम्यान सर्वांनी भोजन ऊरकून नंतर कामशेत गाठले.आम्ही कामशेत येथे चौकशी करून प्रथम जांभिवली व नंतर कोंडेश्वर मंदिर गाठण्यासाठी मार्गक्रमण करू लागलो.जयने मधेच कार थांबऊन आम्हाला आकाशातील Star Gazing ची माहिती दिली.कारमधून बाहेर आल्यावर वातावरणात चांगला गारठा असल्याचे जाणवत होते.Star Gazing आटोपल्यानंतर मध्यरात्री २:०० दरम्यान आम्ही कोंडेश्वर मंदिर गाठले.काही पर्यटक मंदिराच्या आवारात  निवांत झोपले होते.आम्ही देखिल कारवरून सँक ऊतरवल्या व मंदिराच्या आत पहाटे ६:००/६:३० पर्यंत आराम करण्याच्या नर्णय घेतला.आम्हाला मोहिमेची पुढील तयारी सकाळी ६:३० ला लवकर ऊठून करायची होती.

जयराजसर  - सुळक्याच्या दिशेने चालण्यास ready मागे कोंडेश्वर मंदिर  

         दुसऱ्यादिवशी चमू लवकर उठून Expedition च्या तयारीला लागला.आम्ही चहा व आणलेले खाद्य संपऊन ७:३०/८:०० दरम्यान कळकराय च्या दिशेने पाण्याच्या डोहापलिकडून चालण्यास सुरुवात केली.

कोंडेश्वर मंदिराचे जुने अवशेष 

कोंडेश्वर मंदिराचे जुने अवशेष 

कोंडेश्वर मंदिराजवळील पाण्याचा डोह  
सर्वानी सकाळच्या कोवळ्या ऊनात लोणावळा,राजमाची परिसर,ढाक किल्ला व कळकराय सुळक्याचे फोटो कँमेरयात बंदिस्त करून ९:३० दरम्यान तळ छावणी गाठली.




कोंडेश्वरमंदिरापासून - ढाक & कळकराय सुळक्याची वाट 



डाव्या बाजूने तानाजीसर ,विक्रांत जयसर,दिपंकर किरण आणि अली (Hidden कॅमेरा मन जागृती)  

आम्ही वाटेत एका मोकळ्याजागेवर  Base Camp लावला व आजूबाजूची जागा साफ सफाई करून तंबू ऊभारला.आम्ही या ठिकाणी दोन टिम करून मोहिमेच्या तयारीला लागलो.

मोहिमेची तयारी at Base  Camp 
येथून सुळका व भैरीचा डोंगर अवघ्या १५ ते २० मिनिटांवर होते. जय,तानाजी व अली ही Climbing टिम सुळका मोहिमेच्या तयारीला लागली तर मी,जागृती,विक्रांत व दिपंकर backup टिम न्याहरी / चहा / दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागली.आमच्या क्लाईंबिंग टिमला झटपट Mionize Sand Witch  बनऊन ११/११:१५ दरम्यान मोहिमेसाठी 
रवाना केले.
PFTC  चा चमू basecamp ला मोहिमेसाठी तयार 
ढाक - कळकराय  सुळक्याचा Climbing Route with stations - फोटो Courtesy SCI Album  
आम्ही देखिल दुपारच्या जेवणाची तयारी करून ठिक १२:३० दरम्यान कळकराय व ढाकच्या खिंडीत सूळक्याच्या पायथ्याशी पोहोचलो.

एव्हाना जयने (First Man climbing person) कळकराय सुळक्याचे ३ टप्पे ८० फूटचढाई सुरक्षितरित्या करून पूर्ण केले होते.तानाजी 2nd Man व अली 3rd Man ची भुमिका पार करत चढाई करत होते.त्यांना मी,जागृती आणि दिपंकर ने १:३० वाजता सुरक्षितरित्या चढाई करून 3rd Ledge वर गाठले.


तानाजीसर Traverse टप्पा पार करताना 

  जयने यापुढील अवघड टप्पा Traverse मारून लिलया पार केला.
Tanaji giving Bealy to Climb other Members to cover this Patch


त्यानंतर दुपारी २:१५ दरम्यान सर्वजणांनी एकामागोमाग हा अवघड टप्पा शिडीच्या सहाय्याने  सुरक्षितरित्या चढाई करून पार केला.
अखेरचा अंगावर येणारा Patch 
आता आमच्या समोर अखेरच्या ३० फूंटी अंगावर येणारया कातळ भिंतीचे आव्हान होते.ते देखिल पार करत जयने ठीक ३:०५ वाजता कळकरायच्या माथ्यावर विजयी पताका फडकावली.नंतर माथ्यावर सुरक्षित rope anchor करून झाल्यावर सर्वानी एकामागोमाग चढाई करून माथा गाठला.

कळकराय सुळक्याचा माथा गाठल्याचा आनंद 


अशारितीने पाथ फाईंडर्सच्या ७ सभासदांनी (नेता - जयराज जोशी,ऊपनेता - तानाजी लांडगे,सभासद - किरण पात्रे,विक्रांत,अलि मामूवाला,जागृती जैन व चिरंजीव दिपंकर जोशी) ३१ डिसेंबर या २०१६ च्या शेवटच्या दिवशी १४० फूट कळकराय सुळक्यावर सुरक्षितरित्या चढाई करून विजयी सलामी दिली.या मोहिमेतील चि.दिपंकरचा कारकिर्दितील हा पहिला सुळका (वय १३ वर्षे) ठरला.
PFTC ची टिम - from left अली ,किरण,तानाजीसर,जयराजसर,दिपंकर,जागृती & विक्रांत    
#३१ डिसें.२०१६  ढाकचा कळकराय - भैरी (बहिरी देव) सुळका #परिसर : कर्जत # आरोहण केलेल्या सुळक्याची ऊंची १४० फूट # आरोहणासाठी लागलेला वेळ : २:४० मि.(सर्व सभासदांसाठी)

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...