Friday, August 12, 2022

डांग्या सुळका - अनपेक्षित अपघात !!!

 


जयने नाशिक-त्रंबकेश्र्वर परिसरातील तब्बल ५ सुळके या वर्षीच्या मोहिमेसाठी निवडले होते.रविवारी,२५/११/२०१८ ला सर्वप्रथम आमच्या चमूने पहीने गावातील नवरी सुळक्याच्या माथ्यावर जय &अली यांच्या आरोहण कौशल्यामुळे विजयी सलामी दिली.नंतर २६ & २७ या सलग दोन दिवसात संडे १ चा माथा गाठला. तर बुधवारी २८/११/२०१८ ला तानाजी & किरण यांनी कैरा या सुळक्यास गवसणी घातली.आता पाचव्या दिवशी मुळे गावातील डांग्या सुळका सर करायचा होता.

डांग्या सुळका 
कैरा सुळका आरोहण आटोपल्यानंतर PFTC चा चमू रात्री मार्ग शोधत डांग्या सुळक्यासाठी मुळे गावात दाखल झाला.आम्ही गावातील दुकानांमध्ये चौकशी करून शाळेतील व्हरांडयात मुक्काम करण्याचे ठरवले.मी & तानाजीने रात्रीचे जेवण करण्यासाठी जागृतिला एका कोपऱ्यात चूल मांडून दिली.नंतर तिला थोडीफार मदत करून पाण्याच्या शोधात निघालो.त्यादरम्यान जयची सुरेश नावाच्या युवकासोबत चांगलीच गट्टी जमली.त्याने स्वयंपाकासाठी लागणारे सरपण व इतर कामात आमचा बराच हातभार लावला.
त्याने उद्या सकाळी वेळ काढून डांग्या सुळक्याचा मार्ग दाखवण्याचे देखील कबुल केले.रात्रीचे जेवण आटोपून झाल्यावर उद्याच्या शेवटच्या "डांग्या सुळक्याची" चर्चा चांगली रंगली.आम्ही सर्वजण सलग ४ दिवस मोहिमेकरिता घराबाहेर नाशिक च्या त्र्यम्बक पट्ट्यात होतो. आता मात्र सर्वांना उद्या डांग्या ची मोहिम आटोपल्यावर घरची ओढ जाणवू लागली होती. तसेच उद्या मोहीम आटोपून पुन्हा ऑफीस & तेच रटाळ काम अशी थोडी कुरबुर देखील होती.सर्व आवराआवर झाल्यानंतर प्रत्येकजण हळूहळू आप आपल्या sleeping बॅग मध्ये झोपण्यासाठी शिरला.

दिवस पाचवा : गुरुवार,२९/११/२०१८


मुळे गावातील शाळा - कॅम्प साईट  

तानाजी & गावकरी - मुळे येथील अंगणवाडी 
  आज आम्हाला लवकरात लवकर शाळेच्या आवारातील तळ छावणी सोडायची होती.कारण मूलांचे शाळेचे वर्ग भरण्या आगोदर लवकरात लवकर चहा & अल्पोपहार उरकून घेणे अनिवार्य होते.आज मुळे गावा तून रात्री गट्टी जमलेला एक मित्र सुरेश व त्याचा भाऊ आम्हाला सुळक्याच्या पायथ्याशी मार्ग दाखवण्यास येणार होते.आमचा अल्पोपहार आटोपल्यावर sack गाडीवर लाऊन सुरेश आल्याबरोबर आमचा चमू पुढील पायथ्याच्या छोट्या गावात निघाला.आम्ही गावातील अंगणवाडीच्या शेजारी गाडी पार्क करून
चढाई साठी लागणारे आवश्यक सर्व साहित्य रोप हर्नेस,हेल्मेट आणि पाण्याचा साठा घेऊन पाई चालण्यास सुरुवात केली.


सर्व जणांनी हळूहळू ठीक १०.०० दरम्यान सुळक्याच्या जवळ असणारे पठार आणि नंतर झोपडी गाठली.या अगोदर ३/४ वर्षा पूर्वी डांग्या सुळक्याच्या climbing दरम्यान मधमाश्या चावल्याने दोन युवकांचा अपघात झाला होता.त्यामुळे झोपडीतील मामांनी आम्हाला विडी सिगारेट शिलगाऊ नका अथवा गडबड गोंधळ आरडाओरड करू नका अशी सक्त ताकीद दिली.यानंतर सुरेश & त्याच्यामित्राने सुळक्याला पोहोचणारी वाट दाखवून आमचा निरोप घेतला.या आमच्या नवीन मित्रांचे मोबाईल नंबर मी माझ्या फोन मध्ये save करून घेतले.

आमचा टीम लीडर -तानाजी लांडगे 

      आता यापुढे गवताचे पठार पाई तुडवत ठीक ११:३० दरम्यान आम्ही डांग्या सुळक्याच्या पायथ्याला असणाऱ्या पाण्याच्या साठ्याजवळ पोहचलो.

डांग्या - येथील अनगड देंव 


तेथील असणाऱ्या अन्गड दैवतांना पाया पडून आम्ही आमच्याकडील रीकाम्या बाटलीत थोडे पाणी भरून घेतले.या पाण्याच्या औषधी गुणधर्मामुळे डांग्या खोकला बरा होतो अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे आणि या मुळेच या शेजारच्या सुळक्याला डांग्या नामकरण झाले असावे.


टीम PFTC 






आता उन्हाचा पारा हळूहळू वाढत होता हे जाणवत होते.त्यामुळे वाटेत थोडा वेळ थांबून आम्ही सुका मेवा - संत्री यावर फडशा पाडला व सुळक्याच्या पायथ्याला पोचण्यास निघालो.तरी पायथ्या पर्यंत पोहचायला दुपारचा १ वाजला.आम्ही सुळक्याच्या दोन्ही बाजूने रेकी करून मागील बाजूने चढाई करण्याचे ठरवले.


या सुळक्यासाठी जयने मला हार्नेस & चढाईसाठी लागणारी साहित्य घालून तयार होण्यास सांगितले.मी ठीक दुपारी ३:०५ वाजता सुळक्याची पूजा करून आरोहण करण्यास सुरुवात केली.नंतर पहिल्या स्टेशनवर सुरक्षित पोचल्यावर bealy देत तानाजीला वर घेतले.येथे बसण्यासाठी चांगली ledge असल्यामुळे आम्ही सर्व चमूला bealy देऊन वर घेतले.आता यापुढे पुन्हा एकदा ३०-३५ मिनिटात पुढील दुसरे स्टेशन गाठले.मला दुसऱ्या स्टेशनवर एक लोखंडी जुना पिटॉन ठोकलेला अढळला.त्याचा वापर बिले साठी करून मी अलीला वर घेतले.या संपूर्ण मोहिमेत डिहायड्रेशन मुळे मला प्रचंड थकवा जाणवत होता.त्यामुळे या सुळक्यावर देखील सर्वांचा वेळ जाऊ नये यासाठी पुढील चढाईची सूत्रे मी अलीला सोपवली.
येथून माथा अवघा १०० फूट शिल्लक असावा.अलीने उत्तम रित्या डाव्या हाताला move करत उभे प्रस्तरारोहण केले व थोड्याच वेळात तिसरे स्टेशन गाठले.या ठिकाणी एका झाडाच्या मुळीचा वापर करून त्याने bealy सिस्टिम तयार केली व मला वर येण्याचा कॉल दिला.या पुढे चढाई टप्पा सैल सुटलेल्या दगडांचा & स्क्री सारखा होता.आता अवघे ४० फूट अंतर डांग्याचा माथा गाठण्यासाठी शिल्लक होते.पण अलीने सावध चढाई करत २० फूट उंची - हाईट गाठली व तो ओपन book प्रस्तर रचने पर्यंत पोहचला.मी त्याला खालून bealy देत होतो.त्यादरम्यान तानाजी & जय ने वॉकी वर त्याला ५:०० वाजले आहेत व खाली माघारी येण्याचा संदेश दिला.पण अलीने माथा ओपन book climb नंतर अवघ्या १० ते १५ मिनिटात सर होईल असा संदेश पाठवला व १५ मिनिटे चढाई साठी अधिक अवधी मागितला.यापुढे मात्र काही अनपेक्षित घडले.
या पुढील चढाई दरम्यान अलीने प्रेशर दिलेला एक दगड अचानक सुटावला व काही कळायच्या आत त्याचा तोल जाऊन अनपेक्षित अपघात झाला.अलीचा फॉल व निखळता दगड बघून मी watch आऊट ओरडलो व माझ्या हातातील अलीचा belay सुरक्षा दोर पूर्ण ताकदीने ओढून धरला.तरी देखील अली माझ्यापासून २० फूट खाली दुसऱ्या & तिसऱ्या स्टेशन च्या प्रस्तर भिंतीवर अधांतरी लटकला.मला काही खालील परिस्थिती कळत नव्हती.मी माझा सेल्फ anchor & अलीचा बिले दोर काही केल्या सोडू शकत नव्हतो.या पुढील situation फारच बिकट झाली होती.तेव्हड्यात जय & तानाजी ने सुरक्षा दोर हळू हळू खाली सोडण्यास सांगितले.अलीला त्या परिस्थितीत पहिल्या ledge वर सुरक्षित आणता आले.पण अपघतामुळे त्याच्या कंबरेखालील भागावर इजा व डोक्याला खरचटले होते.अशा परिस्थितीत त्याला हालचाल करणे कठीण झाले होते.
जयने प्रसंगावधान दाखवून सर्वप्रथम नंदूदादाला अपघाताबाबत कळवले व परिस्थितीचा संपूर्ण आढावा दिला.त्याच्या सहकार्याने थोड्याच वेळात नाशिक मधील दयानंद कोळी यांची "वैनतेय संस्थेची" rescue टीम ,मुळे येथील गावकरी,आमचा मित्र सुरेश & काही डॉक्टरांचा ताफा देवदूतासारखा आमच्या मदतीला धावून आला.योग्य वेळी मदत मिळाल्याने मोठा अपघात टळला व अलीला सुरक्षित रित्या रुग्णालयात दाखल करता आले.
           या rescue दरम्यान ज्या ज्या सहकार्यांनी,गावकरर्यांनी आमची मदत केली त्यांचे आम्ही शतश: ऋणी आहोत.या ऑपरेशन दरम्यान सर्वांची नावे  मला काही मिळवता आली नाहीत. पण त्यांचा एखादा फोटो मिळाल्यास मी नक्की या पोस्ट मध्ये टाकिन.

डांग्यांच्या मोहिमेतील अपघातामुळे आम्ही काय शिकलो?

१. कोणत्याही सुळके मोहिमेसाठी सकाळी किमान ८:३० / ९:०० पर्यंत सुळक्याच्या पायथ्याला पोहचणे गरजेचे असते.
२.दुपारी उन्हाचा त्रास होतो म्हणून भरपूर पाणी & ग्लूकोज चे पाणी + काही खाद्य pittu मध्ये तयार असावे.
३. किमान ३ जणांनी तरी सुळक्यासाठी attempt करण्याची तयारी असावी.(त्यातील एक जण देखील माघारी आला तर इतर दोघे उर्वरित चढाई पूर्ण करतील)
४.सुळक्यांचा अंतिम टप्पा वारा & पावसाच्या माऱ्याने सैलसर किंवा मातीच्या घासाऱ्याचां असतो तसेच दगड किंवा भेगा सुटलेल्या असतात.त्यामुळे त्याचे climb सावधपणे चाचपूनच करावे.
५.एखाद्या सुळक्याचे क्लाइंबिंग पूर्ण होत नसेल तर windup ५:०० वाजता असेल त्या टप्प्यावरून सुरू करावे.
६.गावातून निघताना एखाद दुसरा वाटाड्या नक्की घ्यावा अथवा एक दोन जणांचे मोबाईल क्रमांक नोंद करून घ्यावेत.जेणे करून एखादा अपघात घडला तर मदत कार्य लवकर मिळेल.
७.आपण वापरत असलेले climbing साहित्य चांगल्या दर्जाचे असावे.मोहिमेचे दोर & climber चे शिरस्राण चांगल्या दर्जाचे असावे.
८. लीड Climber ने चांगल्या दर्जाचा हार्नेस वापरावा & त्याने कंबरेला extra sling देखील बांधलेली असावी.




http://pftcdahisar.blogspot.com/2019/01/dangya-sulake-mohim-ek-anapekshit.html

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...