पाथ फाईन्डर्स च्या चमूने २०१८ या वर्षात फारच मोजक्या मोहीमा आखल्या होत्या व त्या सर्वच मोहिमांमध्ये आम्ही वेगवेगळ्या कारणांमुळे अपयशी ठरलो.पण आम्हाला त्या सर्वच मोहिमांमुळे बरेच काही शिकावयास मिळाले. या वर्षी च्या मोहिमेकरिता जयराजने - (आमचा टीम लीडर ) नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्र्वर परिसरातील तब्बल ७ सुळके आणि १ हरिहरची कातळभिंत (स्कॉटिश क्रॅक )निवडली.त्यात अंजनेरी गावातील नवरा & नवरी सुळके,पहिने गावातील नवरा & नवरी सुळके,मेटघर किल्ल्याजवळ असणारे संडे १ & २ सुळके,हरिहर किल्ल्याची ३५० फुटांपेक्षा जास्त असणारी क्रॅक (कातळ भिंत) आणि मुळे गावातील डांग्या सुळका अशा आव्हानात्मक सुळक्यांचा समावेश होता. या अशा मोहिमेकरिता यश मिळवायचे असेल तर दररोज व्यायाम,सराव आणि योग्य अद्ययावत साहित्य हे लागणारच होते.पण जराही न डगमगता या आव्हानाला सामोरे जाण्यास PFTC चा छोटासा चमू पूर्व तयारीने दर शनिवार & रविवार जसे जमेल त्या प्रमाणे गोराई येथील मनोरीच्या नैसर्गिक कातळ भिंतीवर - वॉलवर सराव करत होता.अलींने या मोहिमेच्या सरावासाठी चक्क सुरत येथून हजेरी लावली होती.आम्हाला गेल्या मोसमातील तैलबैला ची मोहीम अपुऱ्या साधनानमुळे अर्धवट सोडावी लागली होती. पण यावेळी मोहिमेसाठी लागणारे नवीन साहित्य तानाजी ने नंदू चव्हाण यांच्या Mountain Sports Academy या दुकानातून खरेदी केले.तर काही उपयुक्त साहित्य शैलभ्रमर या टीम कडून मिळवले. या मोहिमेसाठी आम्हाला नंदू चव्हाण,भ्रमंतीच्या कैवल्य वर्मा,शैलभ्रमर च्या हितेंद्र मोरे & सुनील तोतरे या दिग्गज मंडळींचे बरेच सहकार्य & मार्गदर्शन मिळाले.
![]() |
| अंजनेरी,पहिने & मेटघर परिसर - त्रंबक |
या मोहिमेसाठी तानाजी सर - मोहीम प्रमुख (लीडर ),जयराज सर (को लीडर),अली,किरण & जागृती असा ५ जणां चा चमू फायनल झाला.जय & तानाजी ने मोहिमेला लागणारे जरुरी साहित्य - equipment s जमवले.तसेच जयराजने या मोहिमेची इत्यमभूत माहिती आपल्या मित्रांन कडून & पुस्तकातून गोळा केली. तर जागृती ने ५ दिवस लागणारा शिधा - सामग्री व्यवस्थित बॉक्स पॅक करून तयार ठेवली.मी मोहिमेला लागणारे मेडिकल kit + लागणारी भांडी जमा करून जयच्या घरी सोडली.
जय & तानाजीने शनिवारी,२४/११/२०१८ ला दुपारी १२:३० नंतर वसई येथून कारने त्रंबकेश्वरसाठी प्रवास वसई-विरार-डहाणू-कासा मार्गे सुरु केला.तर अली सुरतहून मोटार सायकल ने निघाला होता.मी & जागृती आमच्या या चमूसोबत रविवारी संध्याकाळी त्रंबक येथे सहभागी होणार होतो.आमच्या संघात आमचा जुना सहकारी विशाल औरंगाबादहून फक्त पहिले २ दिवस मदतीसाठी सहभागी झाला हे विशेष.जयने ठरविल्याप्रमाणे सर्व चमू शनिवारी संध्याकाळी पहीने गावात दाखल झाला.या अगोदर २०१७ ला आम्ही पहिने नवरा सुळका सर केला होता & गेल्या मोसमात आम्ही पाहिने नवरा सर करून वेळेअभावी नवरीच्या चोक स्टोन वरून माघार घेतली होती.त्यामुळे आम्हाला पहीने गावरील नवरा & नवरी सुळक्यांचा मार्ग व्यवस्थित माहित होता.हलक्या थंड वातावरणात पहीने गावातून थोडी पायपीट करत सुळक्या जवळ कॅम्प सेट अप करण्यात आला.यानंतर सर्वांनी मोहिमेची सविस्तर चर्चा केली व रविवारी लवकर प्रथम नवरी सुळका व दुपार नंतर नवरा सर करण्याचे ठरवले.या साठी जयसर & अली चढाई ला सुरुवात करतील तर तानाजी & विशाल मार्गदर्शन करणार होते.
![]() |
| पहिने सुळक्याजवळील तळ छावणी |
आमचा BASE कॅम्प हा सुळक्याजवळ असल्याने आज जास्त वेळ जाणार नव्हता. सकाळी लवकर उठून प्रत्येकजण नेमून दिलेल्या कामाला लागला.थंड वातावरणात चहा & अल्पोपहार उरकून सर्व प्रथम नवरीच्या मोहिमेसाठी सज्ज झाले. यावेळी जयने नवरी सुळक्याच्या चढाईची सूत्रे स्वतः हाती घेतली. जयने पायथ्या पासून ठीक ९:३० वाजता चढाई ला सुरुवात केली व नंतर पहिल्या स्टेशनवर पोहचुन उर्वरित अली,तानाजी सर & विशाल यांना बिले देत वर घेतले.त्यानंतरचा टप्पा जयने चढाई साठी सुरुवात केली
![]() |
| ब्रिज क्लाइंबिंग पहिने नवरी चढाई |
येथील हा चढाई टप्पा पार करताना एक पाय नवरीच्या कातळावर तर दुसरा पाय सासरा डोंगराच्या कातळावर जॅम करून १८० च्या कोनात दोन्ही पाय फाकवून हळूहळू सावध चढाई करावी लागते.आता यापुढील bridge पद्धतीचे ३० फुटांचे climb अलीने लीलया पार केले व तो चोक स्टोन पर्यंत पोहचला.स्वतः सुरक्षित झाल्यावर त्याने belay देऊन जय लावर घेतले.
![]() |
| फर्स्ट मॅन जयसर चोक स्टोनवर ,सेकंड मॅन अली चढाई करताना & तानाजीसर खालून गाईड करताना |
![]() |
| सावधपणे सासरा डोंगरावरून नावरीवर मूव्ह करताना -अली |
या पुढील अंतिम ६० फूट चढाई नवरी च्या कातळ भिंतीवरवर सावधतेने move करून नवरीचा माथा गाठावा लागतो.अलीने ठीक १२:०५ ला आपले सर्व कसब पणाला लाऊन नवरी चा माथा गाठला & मग जय सरांना वर आरोहण करण्यास सांगितले.अशा तऱ्हेने पाथ फाईन्डर्स च्या चमूने यावेळी नवरी च्या माथ्याला सुरक्षितपणे गवसणी घातली.
| पहिने नवरीच्या माथ्यावरून नवरा सुळका |
दरम्यान मी & जागृतीने सायंकाळी सीएसटी येथून पंचवटी एक्स्प्रेस ने नाशिक गाठले व आंबेडकर चौकात एका हॉटेल मध्ये चमूला जॉईन झालो.आजच्या रात्रीचे जेवण त्र्यम्बक येथील हॉटेलात उरकून पूर्ण टीम संडे १ सुळक्याच्या पायथ्याशी असणाऱ्या एका तलावा शेजारी दाखल झाली.नंतर आम्ही सोबत आणलेले ⛺ लाऊन तळ छावणी उभारली.उद्याचे वेळापत्रक & Sunday १ सुळक्याच्या चढाई बाबत चर्चा करून सर्वांना सकाळी ५:३० चा wakeup call देण्यात आला व आपापली कामे विभागून दिली.बाहेर बोचरी थंडी जाणवू लागली तसे सर्व निवांत हळूहळू गप्पा मारत कधी निद्राधीन झाले हे कळले नाही.
दिवस दुसरा : सोमवार,२६/११/२०१८
पहीने नवरीच्या कालच्या यशामुळे संघाचा उत्साह बराच दुणावला होता.आम्ही ठरल्याप्रमाणे पहाटे लवकर उठून संडे १ सुळक्याच्या तयारीला लागलो.
जागृतीने छान उपमा & फक्कड चहा असा अल्पोपहार तयार करून तयार ठेवला. तर जय,तानाजी,मी & अली सुळक्याच्या मोहिमेस लागणारे साहित्य जमवण्यात मग्न झालो.आम्ही पटापट अल्पोपहार - चहा उरकून संडे १ सुळक्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी तयार झालो.तळ छावणीपासून गणेश बारीमार्गे हा सुळका तब्बल ४०/४५ मिनिटांवर आहे.
यावेळी जयसरांनी माझ्यावर संडे १ सुळक्याच्या लीड CLIMB ची & सेकंड मन ची जबाबदारी अलीवर सोपवली.उर्वरित चमू जय,तानाजी सर,विशाल & जागृती खालून बॅकअप टीम व इतर मदत करणार होते.मी ठीक ११:२३ दरम्यान सुळक्याची पूजा करून चढाईसाठी सुरुवात चालू केली आणि १५/२० मिनिटात ४ QD च्या सहाय्याने व सुरक्षादोर वापरून पहिले स्टेशन गाठले.
या सुळक्याच्या ६० फुटांच्या चढाई नंतर स्वतःला सुरक्षित anchor झाल्यावर मी अलीला belay देऊन वर घेतले.दुपारच्या उन्हात कातळ चांगलाच तापत चालला होता व त्याचा त्रास आम्हा सर्वांना
जाणऊ लागला.पायातले क्लाइंबिंग शूज गरम झाल्याने पायांना चावत होते.तरी अशा परिस्थितीत मी पुनः पुढील चढाई चालू करण्याचे ठरवले.
| पहिल्या स्टेशनवर bealy सिस्टिम & अली वर येताना |
| फर्स्ट ओव्हरहॅन्ग डिफिकल्ट मूव्ह - पहिल्या पिटॉन चा वापर |
त्याने हा अवघड टप्पा आपले संपूर्ण कसब पणाला लाऊन लीलया पार केला व मला दुसऱ्या स्टेशन वर bealy देऊन मला वर घेतले.
दुपारच्या उन्हात मला डिहायड्रेशन मुळे प्रचंड थकवा जाणवत होता त्यामूळे मी या पुढील climbing अलीला च पुन्हा continue करण्याचे सांगितले.आमच्या दोघांजवळ असलेला पाण्याचा साठा संपला होता & त्यात उन्हाचा त्रास वाढत होता.मला dehydration मुळे पुढील climbing करण्यास शरीर साथ देत नव्हते.माझ्या अंगात जराही त्राण नव्हता. माझ्या हाताची बोटे आखडू लागल्याने तळ छावणीत मी माघारी येण्याचा निर्णय कळवला.मी दुसऱ्या स्टेशन वरून माघारी कसाबसा रॅपलिंग करत खाली आलो.तो पर्यन्त जयराज हार्नेस चढवून अलीपर्यंत पोहचण्यासाठी सज्ज झाला होता.आता पूर्ण चढाई ची धुरा अलीवर व दुसऱ्या सेकंड मनची जबाबदारी जय वर आली होती.जय पोहचेपर्यंत अलीला climbing थांबवून वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हते.या दरम्यान सायंकाळचे ४ वाजले.
.मी खाली आल्यावर पाणी & थोडा खाऊ घेऊन तळ छावणीत रेस्ट घेऊ लागलो.जय & अलीने दुसरे पुढचे स्टेशन गाठले खरे पण सायंकाळचे ५.०० वाजल्यामुळे पुढील चढाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
ह्या हंगामात अंधार लवकर होतो कारण दिवस लहान व रात्र मोठी असते.म्हणून जयराजने उर्वरित चढाई थांबवण्याचा निर्णय घेतला.तोपर्यंत मी आणि तानाजीने गावकऱ्यांच्या मदतीने जंगलातील पाण्याच्या डोहातून २ बाटल्या पाणी भरून आणले.
अली & जय Rappling करत सुळक्याच्या पायथ्याशी आल्यानंतर सर्व चमू सुरक्षित रित्या तळ छावणी साठी निघाला.तळ छावणीत पोहचल्यावर पुन्हा सर्वजण आप आपल्या विभागून दिलेल्या कामात मग्न झाले.जागृती ने सर्वांसाठी कॉर्न सूप शिजवले & पुढील जेवणाची तयारी चालू केली. जागृती ला सर्वांनी मिळून उत्तम सहकार्य केले व त्यामुळेच मिक्स व्हेजटेबल भाजी & भात + पापड सलाड असा मेनू तयार झाला.
दिवस तिसरा : मंगळवार,२७/११/२०१८
आज संडे १ च्या मोहिमेला निघण्या अगोदर टीम ने कालच्या चुका परत होणार नाहीत याची पक्की खबरदारी घेतली.जागृती ने सुळक्याच्या पायथ्याशी पोहचल्यावर पाठी च्या पिट्टूत पाण्याची बाटली,सुका मेवा,चॉकलेट बार तयार करून ठेवले.आज पुन्हा एकदा नव्या उमेदीने आम्ही हा सुळका सर करण्याच्या उद्देशाने भिडलो.मी आज देखील उत्तम सुरुवात केली व First ledge गाठली. काल climbing दरम्यान माझ्या पायाच्या तळव्याला जखम झाली होती व ती जास्त त्रास देत आहे हे जाणवले.म्हणून आज जास्त वेळ न दवडता मी बिले देत अलीला वर घेतले & त्या पाठोपाठ जय ला सेकंड मन ची भूमिका करण्यास सांगितले.
आज वेळेचा अपव्यय नको म्हणून मी लगेच rappling करत माघारी आलो.
मग मी खाली आल्यावर तानाजी कडून लगेच कमेऱ्याचा ताबा घेतला.तो पर्यंत जय ने लगेच फर्स्ट स्टेशन गाठले.पुढील सूत्रे अलीने हाती घेतली व पटापट सावधतेने climbing चालू ठेवले.
आज अली एकेक टप्पा सावधतेने पार करत होता तर जय जुमारिंग करत तो लावत असलेले साहित्य QD,ladder काढून वर येत होता.
| संडे १ सुळका अंतिम टप्पा |
| अली & जय घळीतीळ चढाई |
| जय सर अलीच्या जवळ अंतिम टप्प्याची चढाई |
आज मजल दर मजल अलीने उत्तम रित्या सर्व टप्पे पार केले व ठीक ४:४० वाजता संडे १ सुळक्याच्या माथ्यावर सुखरूप पाय ठेवला.त्यापाठोपाठ जय देखील climb करत त्यापाठोपाठ सामील झाला & PFTC च्या छावणीत आनंदोत्सव चालू झाला.मी खालून कमेऱ्याच्या साहाय्याने अली & जय यांच्या प्रत्येक movement हालचाली चे फोटो कॅमेऱ्यात बंदिस्त करून घेतले.यानंतर तानाजीने जय & अलीला लवकरात लवकर wind उप करण्याचा संदेश पाठवला.
आज देखील अंधार होण्याच्या अगोदर पुन्हा एकदा सर्वांनी सुळक्याचा पायथा सुरक्षित रित्या गाठला आणि सामानाची विभागणी करून तळ छावणी गाठली.जय & तानाजी ने खाली पोहचल्यावर संडे २ सुळका उद्या न करण्याचा व पुढील डांग्या सुळक्याच्या मोहिमेसाठी मुळे गावात निघण्याचे ठरवले.त्यानुसार आम्ही संध्याकाळी फक्त चहा & कॉफी + काही हलका खाऊ खाऊन सर्व सॅक जयच्या गाडीवर चढवल्या.आजचे जेवण वाटेत त्रंबक मधील एका हॉटेलमध्ये उरकून घेतले.जेवण आटोपल्यावर जयने सोबत आणलेले अशोक सरांचे "सुळक्यांकडून सुळक्याकडे पुस्तक" वाचनासाठी बाहेर काढले.मग मुळे गावात जाणाऱ्या मार्गावर असणारा कैरा अथवा किऱयाचा डोंगर करण्याचा मनसुबा जयने सर्वाना सांगितला.त्यास सर्वानी होकार दिला.अलीने & जयने कैऱ्यासाठी आप आपल्या मोबाईलवर GPS लोकेशन सेट केले आणि पायथ्याचे गाव गाठले.आम्ही रात्र भरपूर झाल्याने गावातील एका मारुती मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे ठरवले
दिवस चौथा : बुधवार,२८/११/२०१८
| कैरा सुळका अथवा किरयाचा डोंगर |
आम्ही सुळके चढाई साठी लागणारे आवश्यक & मोजके सामान घेऊन वाटेत भेटलेल्या गुराखी मामाकडे वर जाणारी वाट समजून घेतली.त्या पैकी कुंडलिक मामा आमच्या सोबत वर येण्यास देखील तयार झाले.गुराखी मामा सोबत झाडी झुडपातून वाट काढत १२:१५ दरम्यान एका पठारावरून किरर्याच्या घळीत पोहचलो.एका झाडाखाली बसून मोहिमेदरम्यान दुपारचे जेवण म्हणजे सोबत आणलेले फ्रुटस,खाऊ & पाणी उरकले.जयने तानाजीला & जागृति ला प्रथम तयार केले.
| किरयाच्या पायथ्याशी पोहोचताना तानाजी |
| सुरक्षेसाठी पहिला पिटॉन ठोकताना तानाजी |
एकंदर कैरा हा सुळका सैल प्रस्तर रचनेमुळे सर्वच climbers कडून आरोहणासाठी थोडा उपेक्षित आहे.त्यामुळे याच्या सर्व चढाईत सुरक्षेसाठी पिटॉन्स & पेग चा वापर करत आरोहण पूर्ण करावे लागते.आम्हाला चढाई दरम्यान एकही बोल्ट पिटॉन अथवा पेग या सुळक्यावर आढळला नाही.
| दुसऱ्या स्टेशन वरून तिरपी मूव्ह |
| सुरक्षेसाठी तिसऱ्या पिटॉनचा वापर करताना तानाजी |
या नंतर तानाजीने अजून एक piton ठोकून स्वतःला सुरक्षित anchor केले.आता यापुढे मार्ग उजव्या बाजूला चालत जाऊन ओपन book रचनेचे होता.त्याने या ठिकाणी सुरक्षेसाठी तिसरा piton वापरला.नंतर आपल्या अनुभवाचा पूर्ण उपयोग करून shifing,bodypull & pressure hold पद्धतीचे climb करून हा टप्पा अगदी सुरक्षित रित्या पार केला.
| पिटॉन ठोकून सुरक्षित झाल्यावर body शिफ्ट मूव्ह |
मग लगेच वर belay station तयार करून मला वर येण्याचा call दिला.मी देखील तानाजीने लावलेले सर्व pitons काढून वर वर सुरक्षित climb करत होतो.
| पिटॉन रिलीस करताना - मी (किरण) |
या सुळक्याचा अंतिम टप्पा सोपा पण सैल scree असणाऱ्या वाटेचा होता.तानाजीने तो सहज पार करून अखेर ४:३० वाजता कैरां सुळका सर केला.
![]() |
| सर्वोच माथा गाठला तो क्षण -तानाजी ४:४० मी. |
![]() |
| कैंऱ्यावरून मागे घोडा & अंजनेरी सुळके |
![]() |
| मागील बाजूस डांग्या सुळका |
मी & तानाजीने माथा गाठून चोहो बाजूंची छायाचित्रे आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केली.यानंतर सूर्यास्त लवकर होतो म्हणून दोघेंही windup च्या तयारीला लागलो.तानाजीने माथ्यावर असणाऱ्या एका झुडुपाच्या बुंध्याला सुरक्षा दोर लावला व मला हळू हळू पहिल्या स्टेशनवर rappling करत डाऊन होण्यास सांगितले.या पुढे तो देखील थोड्याच वेळात खाली आला.तानाजीला माथ्यावरील झाडाच्या बुंध्यावर मजबूतपणा जाणवत नव्हता.तसेच येथे पेग ठोकण्यासाठी योग्य कातळ/भेग अथवा चांगला base सापडत नव्हता म्हणून या पुढील उर्वरित रॅपलिंगसाठी आम्ही एक पिटॉन येथेच सोडून येण्याचे ठरवले.
व सुरक्षितरित्या दोघांनी तळछावणी गाठली.खाली सर्व टीम जल्लोष साजरा करत होती कारण आज आम्ही SCI चे bolting नसलेल्या सुळक्याला गवसणी घातली होती.आता गावात पोहचल्यावर आमचे लक्ष मोहिमेच्या शेवटच्या डांग्या सुळक्याकडे लागले होते.............






























No comments:
Post a Comment