रविवार , दिनांक : १७/०७/२०२२
पाथ फाईंडर्स,दहिसर यांची एक दिवसीय वर्षा भटकंती - सोंडाई गड,कर्जत.
पाथ फाईंडर्सच्या चमूने
जुलै च्या तिसऱ्या शनिवारी १६ तारखेला कर्जत जवळील सोंडाई हा गिरिदुर्ग
करण्याचा बेत आखला.पण मेघराज इतके बरसले की आमच्यावर हा ट्रेक रद्द
करण्याची वेळ आली होती.संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला होता.पण
अखेर गुरुवार नंतर त्याने थोडी विश्रांती घेतली आणि आम्ही सुटकेचा श्वास
सोडला.मग आम्ही सर्वानुमते ठरविलेल्या ट्रेकच्या नियोजनाप्रमाणे शनिवार १६
तारखेचा हा ट्रेक फक्त एक दिवस पुढे ढकलून रविवार १७ जुलैला करण्याचे
शिक्कामोर्तब झाले.या अखेरच्या बदलामुळे एडविन & जागृतीचे काही सभासद
मात्र बारगळले.मी अन जयने सोंडाई ट्रेकसाठी वेळापत्रक बनवून ग्रुपवर पोस्ट
केले आणि त्यापुढील पत्रकाला जागृतीने (PDF Circular) आकारणी दिली.अजून एक
आमच्या पठ्ठयाने - कौशिकने PFTC च्या Websitevar गूगल फॉर्म अपलोड
केला.कारण सध्या ट्रेक लीडरकडे येणाऱ्या सभासदांची इत्यंभूत माहिती असणे
गरजेचे झाले आहे.
हो - ना - हो -
ना करत अखेर रविवार १७ तारिख उजाडली.मी पहाटे ०३:०० ला उठून दुपारी
लागणाऱ्या पोटोबासाठी शिदोरी बनवू लागलो.मी बनवलेला मस्त झिंगा फ्राय आणि
बायकोने दिलेल्या भाकऱ्या अशी शिदोरी बांधून दहिसर स्थानक गाठले.आम्ही
पाथफाईंडरच्या सवंगड्यांनी ठरवलेला ट्रेन चा डब्बा अगदी अचूक गाठला आणि
वेळापत्रकानुसार ०४:५४ च्या चर्चगेट लोकलने पश्चिम रेल्वेच्या दादर
पर्यंतचा प्रवास सुरु केला.
![]() |
| पाथ फाईंडर्स,दहिसर चा चमू !!! |
नंतर पुढील प्रवासाची तिकिटे काढून सेंट्रल रेल्वेच्या
दादर स्थानकातून ०५:५९ च्या लोकलने १ तास ४५ मी.चा रटाळ प्रवास करत सकाळी
०७:५० ला कसेबसे कर्जत गाठले.आजच्या या ट्रेक साठी मी
(तानाजी),जयराज,किरण,दिपंकर,कार्तिक,विनय,विक्रम,हितेश,अन सर्वात लहान -
चुळबुळ्या ध्रुव,मेघा,स्मिता & पायल असे १२ जण (३मुली आणि ९ मुले)
विविध परिसरातून एकत्र हजर होते.कर्जत स्थानकातून सोंडाई या दुर्गासाठी
सोंडेवाडी अथवा वावर्ले या पायथ्याच्या गावांसाठी डायरेक्ट ST सेवा उपलब्ध
नाही.कर्जत स्थानकातून सुटणाऱ्या पनवेल अथवा लोणावळा गाड्यांनी बोरवाडी
फाट्यावर उतरावे लागते & पुढील ५ ते ६ किमीचा प्रवास मोर्वे जलाशयाच्या
कडेने टमटम अथवा रिक्षा असे वाहन न मिळाल्यास पायी करावा लागतो.त्याचमुळे
आम्ही श्री भगत & देशपांडे यांच्या खाजगी वाहनाने - मारुती इको गाडीने
पायथ्याचे गाव गाठणार होतो. श्री भगत & देशपांडे या पुढील कर्जत ते
सोंडेवाडी १२ किमीच्या प्रवासासाठी शिवाजी चौकात आमची वाट पाहत होते.मग
त्यांच्याच सांगण्यावरून वाटेतील ठाकरे यांच्या छोटेखानी हॉटेलवर आमची गाडी
थांबली.येथे लगबगीने मिसळपाव,गरमागरम वडा आणि कांदा बटाटा भजी - अन गरम
चहा अशी न्याहरी हादडून कर्जत - वावर्ले - बोरगावखुर्द - मोरबे जलाशयाच्या
कडेने प्रवास करत ठीक ०९:४० दरम्यान आम्ही सोंडेवाडी गाठले.
![]() |
| बोरगाव - मोरबे धरधरणाच्या कडेने प्रवास |
![]() |
| छोटेखानी सोंडेवाडी गाव |
![]() |
सोंडेवाडी गावातच प्रत्येकाची ओळखपरेड उरकून ०९:५५ ला ट्रेक ची खरी सुरुवात झाली. |
तसा हा गड रायगड जिल्ह्यतील माथेरान डोंगर रांगेत मोडत असून
समुद्र सपाटीपासुन तब्ब्ल १२०० फुट उंचीवर आहे.विशेषतः पावसाळ्यात या
दुर्गाच्या आजूबाजूस असणारा माथेरान - पेब चा डोंगर,मोरबे जलाशय परिसर
विलोभनीय दिसतो.तसेच मोरबे जलाशयाच्या पलीकडील इर्शाळ तर धुक्यातून सतत
लपंडाव खेळतो.सोंडाई दुर्ग एकदिवसीय भटकंतीकरीता नवख्या
भटक्यांसाठी तासा दीडतासात गाठता येणारी सर्वांग सुंदर,उत्तम अशी कर्जत
जवळील जागा आहे.या गडाचा इतिहास फारसा कुठे नोंद नाही पण बहुतेक
आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्याकरिता टेहळणीसाठी याचा वापर होत असावा.
![]() |
| सोंडाई देवीच्या दर्शनासाठी जमलेले (ट्रेकर्स) भाविक |
आज
रविवारचा दिवस होता आणि अतिवृष्टीमुळे लोणावळा परिसर पर्यटनासाठी बंद
असल्याकारणाने बहुतेक ट्रेकरस ग्रुपने आपला मोर्चा सोंडाई साठी वळवला
होता.त्याच कारणाने गडाला जत्रेचे स्वरूप आले होते.
![]() |
| गडाच्या मध्यावरून मोरबे जलाशय |
![]() |
| डावीकडून - हितेश तानाजी सर & मी किरण |
आमच्या पाथ फाईंडर्सच्या चमूने ३० मिनिटांत चढाई करत हळूहळू पहिले पठार गाठले.मग ओलसर निसरड्या कातळात कोरलेल्या पायरर्यांच्या वाटेने सावधपणे गर्दीतून
वाट काढत दोन rock patch क्लिअर केले आणि पाण्याचे पहिले जोड टाके
गाठले.या दोन टाक्यात बारा महिने पाणी असते असे गावकरी
सांगतात.उन्हाळ्यातमात्रदोराच्या साहाय्याने टाक्यातून पिण्यासाठी पाणी
काढावे लागते. आम्ही येथील परिसर न्याहाळून झाल्यावरफोटोसेशन उरकून
घेतले.मग हलकी चढाई करून पहिली लोखंडी शिडी गाठली.या शिडीच्या डाव्या बाजूस
अजून एक पाण्याचे टाके आहे.पहिली शिडी पार करून झाल्यावर उजव्या हाताला
थोडी हलकी चढाई करून आम्ही दुसरी मोठी लोखंडी शिडी गाठली.या
शिडीची चढाई आटोपल्यावर डाव्या बाजूस दोन जोड खांबटाके हिरव्या शेवाळाने
माखलेले पाहावयास मिळाले.पण येथील पाणी पिण्यासाठी योग्य नाही.
![]() |
| अंतिम चढाई दरम्यान लागणारी लोखंडी शिडी & कर्जत जवळील गड स्वच्छतेसाठी काम करणारी एक सामाजिक संस्था. |
या
नंतर आंम्ही छोट्या तिसऱ्या शिडीच्या साह्याने गडाचा अतिउच्च माथा
गाठला.येथे पोहचल्यावर झाडाच्या आडोशात शेंदूरलेपीत सोंडाईदेवी च्या शिळा
स्थित आहेत.
![]() |
| गडमाथ्यवर स्थित सोंडाई देवी - कृपया आपली पादत्राणे अंतिम शिडीजवळ काढावी!!! |
![]() |
| मोरबे जलाशयाच्या माँगे दिसणारे इर्शाळगडाचे टोक |
थोडा वेळ आराम झाल्यावर पुन्हा मोबाईल कैमेरयात आजूबाजूचा परिसर
कैद केला आणि गडावरील दर्दी लोकांची गर्दी पाहून आम्ही लवकरात लवकर गड
उतरण्यासाठी काढता पाय घेतला.गडाच्या आजूबाजूला असणाऱ्या धुक्यांमुळे मोरबे
जलाशय इर्शाळ माथेरान व्यतिरिक्त प्रबळ,कर्नाळा,माणिकगड यांचे दर्शन मात्र
काही झाले नाही.आमचा चमू अवघ्या ३० ते ४० मिनिटात सुखरूप खाली उतरला.मग एक
लहानश्या टपरीवर गरमागरम चहा उरकून आम्ही जवळ असणाऱ्या धबधब्याच्या वाटेने
निघालो.
पण
गाड्यांची वर्दळ आणि गर्दी पाहून आम्ही आमचा मोर्चा एका पुलाखालच्या
छोट्या धबधब्यावर वाळवला .येथे देखील डोंगर दर्यातून येणारे पाणी १० ते १२
फुटांवरून खाली वाहत होते आणि पाण्याच्या प्रचंड वेगामुळे ते अंगाला देखील
चांगलेच झोम्बत होते.या छोट्याश्या एकांतात असणाऱ्या धबदब्यात सर्वानी
अंग भिजवून आपला शीण दूर केला.
अंघोळी
नंतर लवकरात लंवकर चमूने आणलेली शिदोरी खाण्यासाठी एक छोटी टपरी
गाठली.सोंडाईचा गडमाथा गाठताना वाटेत गावकऱ्यांच्या लहानसहान टपऱ्या
लागतात.तेथे चहा,कॉफी,मॅगी,अंडाभुर्जी, लिंबू -सरबत, मक्याचे कणीस भाजून
मिळते.सध्या गावात घरगुती चहा - नास्ता आणि जेवणाची सोय उपलब्ध आहे.
![]() |
| परतीचा प्रवास |
![]() |
| परतीचा प्रवास |
![]() |
| मूर्ती महान पण कीर्ती महान - चुळबुळ्या ध्रुव पात्रे |
आम्ही दुपारी ०२:३५ ला आलेल्या वाहनाने सोंडेवाडी गावातून काढता
पाय घेतला आणि कर्जत येथून ०३:२६ च्या CSMT लोकलने घरचा प्रवास सुरु
केला.अशा तऱ्हेने आमच्या PFTC च्या चमूने छान सुखद आठवणी सकट सायंकाळी
०६:३०/०७:०० पर्यंत आपापले घर अगदी सुखरूप गाठले.
लेखन : तानाजी लांडगे सर - पाथ फाईंडर्स,दहिसर.
सोंडाई गड थोडक्यात माहिती
# पायथ्याचे गाव : सोंडेवाडी,जि. रायगड & माथेरान डोंगर रांग.
# कसे जावे : जवळचे स्थानक - मध्य रेल्वे चे कर्जत स्थानक गाठून
कर्जत - बोरगाव - सोंडे वाडी (कर्जत हून अंतर १२ किमी अंदाजे)
# गडावर १ ते १/२ तासात पोहचता येते.
# सध्या उपलब्ध अवशेष :५ पाण्याच्या टाक्या आणि
अन् गड देवता.गडाच्या उच्च माथ्यावर पोहचण्यासाठी ३ लोखंडी शिड्या आहेत.
# मुक्कामाची सोय - गडावर ⛺ टेन्ट लाऊन होऊ शकते.
पायथ्याच्या गावात.
# जेवणाची सोय गावात आहे + गडमाथा गाठताना छोट्या गावकऱ्यांच्या टपऱ्या आहेत...(चहा मॅगी भुर्जी मक्याचे कणीस मिळते...)
# कर्जतहून सोंडेवाडी प्रवासाकरिता खाजगी echo गाडी - संपर्क : Prahlad Bhagat Karjat :
+91 91459 17855. & Karjat Omni Gadi Deshpande : +91 95458 62677
http://pftcdahisar.blogspot.com/





































No comments:
Post a Comment