http://ishwargaikwad.blogspot.com/
बसस्थानकामागील 'देवाच्या माळा'वरुन आम्ही काही मिनिटांतच 'आझराई'त
शिरलो. आज भ्रमंतीला तसा नेहमीपेक्षा चांगलाच ऊशीर झालेला. ऐन ऊन्हाळ्याचे
दिवस, त्यात यावर्षीचा उकाडा तर 'समृद्ध'च होता. पण, ह्या भल्या, थोरल्या
राईनं तो नाहीच जाणवू दिला. भलीच विशाल, ऊंच नि दाट अशी ती वनराई अन ते
मुक्त आणि खेळतं वारं तन-मनाला मस्त गारवा देत आणखी प्रसन्न करीत होतं.
विविध जातींचे, रंगांचे पक्षी, त्यांचं ते गुंजन आणि भिरभिरणंही छान उत्साह
वाढवित होतं. साधारण अर्ध्या तासातच एके ठिकाणी आम्हांला झाडांच्या आडुन
दूरवरच्या 'सिद्धगडा'चं रम्य दर्शन झालं, तर, त्यानंतर आणखी दहा-पंधरा मिनिटांतच, 'पदरगडा'चंही! इथं खऱ्या अर्थी खऱ्या अर्थी 'गणेशघाट' मोहक दिसतो. खाली खोल भागात ती छोटीशी 'पदरवाडी', आजुबाजूने थोडीफार शेती तर उजवीकडे ते डौलदार 'गणपती मंदिर' असा रमणीय देखावा दिसतो. दगड-धोंड्यांची ही घाटवाट आम्ही अगदी सावकाश उतरते झालो. पदरगड तर संपूर्ण पदरकडा उतरेपर्यंत आमची साथ सोडण्यास तयारच नव्हता. अगदी पदरवाडीपर्यंत!
सर्व काही सुखेनेव होतं; पण, रस्त्यात एक मात्र भलतंच वेगळं दिसलं.
रस्त्यात अनेक ठिकाणी अधुन-मधून दृष्टीस पडणाऱ्या त्या भल्या मोठ्या
शिळा-दगड-खडकांवर शुभ्र पांढऱ्या अशा रंगात, कुठं-कुठं रेघोट्याने तर कुठं
अक्षरांत रेखाटलेलं मराठी लेखन केलेलं आढळलं. कुठे ते सुबोध होतं तर कुठं
अगदीच दुर्बोध! बऱ्याच ठिकाणी यातलं फारच कमी अगदीच सुवाच्य असं होतं, तर
काही ठिकाणी सारं अगाधच!
आता साधारण पावणेबारा झालेले असतील. सूर्य डोक्यावर येऊ पाहण्याची वेळ पण
हा पट्टाही चांगलाच उंच नि दाट अशा वनराईने नटलेला होता. त्यामुळे
सुर्यदेवतेचा 'कोप' तथा 'ताप' टळला होता. शिवाय मोकळं
वारंही मघाप्रमाणेच छान गारवा देत होतं. या रम्य अशा वातावरणात हा
गाडीरस्ता, कधी पायवाट झाला, ते कळले देखील नाही. अगदी दहाएक मिनिटांतच!
इथली झाडी तर मस्त अन 'आझराई'सारखीच दाट अन उंच होती. पायवाटेवर साठलेली
प्रचंड पानगळ, तीमधून चालताना होणारा तालबद्ध पायरव, साथीला विविध पक्षांची
किलबिल आणि सवंगड्यांचीही दबल्या आवाजातील किरकोळ कुजबुज इ,च्या साथीतही
इथली ही अत्यंत रम्य अशी शांतता अगदीच लक्षणीय होती. या संपूर्ण 'पट्ट्यात' अगदीच 'श्रीमंत' अशा गारव्याची सुंदरशी अनुभूति घेत, साधारण तासाभरातच, आम्ही 'भोमळवाडी'कडून येत 'भीमाशंकर'ला जाणाऱ्या 'रानशीळ' घाटवाटेला येवून मिळालो. आता आमची सरळ भीमाशंकरच्या दिशेने वाटचाल सुरु झाली.
भीमाशंकर-गणेशघाट-पदरपट्टा-रानशीळ-भीमाशंकर-चोळ-कोंढवळ भटकंती.. :
'भीमाशंकराची छाया नि पदरगडाची माया, रानवाटांनी भोवतीच्या, सारी मजाच मजा न्यारी;
'गणेश'ने 'पदरपट्टा' नि 'रानशीळ'ने वर, भरीला 'चोळ'ने कोंढवळ, सैर ही चौपदरी लई भारी!
भीमाशंकर-गणेशघाट-पदरपट्टा-रानशीळ-भीमाशंकर-चोळ-कोंढवळ भटकंती.. :
'भीमाशंकराची छाया नि पदरगडाची माया, रानवाटांनी भोवतीच्या, सारी मजाच मजा न्यारी;
खिडकीचं तावदान थोडंसं सरकवताच धुंद वाऱ्याची एक छानशी झुळूक आतमध्ये आली.
त्यामुळं तन-मन दोन्हीही चांगलंच मोहरलं. एव्हाना बाहेरही पांढरं चांगलंच
फटफटलं होतं. पक्षी तर आपली 'सुस्वरें आळवणी' संपवून आपापल्या
उद्योगालाही लागलेले होते. थोरल्या काचेतुन मी जरा समोर पाहिलं तर बाहेरचं
जगही हळूहळू गतिमान व्हायला सुरुवात झाली होती. रस्त्यावर अधूनमधून चारचाकी
तर कधी दुचाकी दृष्टीस पडत होती. मध्येच महामंडळाची एखादी लालपरीही बाजूनं
निघून जात होती. रस्ताही वळणावळणाचा आणि त्याच्या दोहोबाजूने प्रचंड
आणि प्रसन्न अशी वृक्षराजी होती. अन त्या मधुन धावणारी ती काळी सडकही अगदी
लगबगीनं धावताना दिसत होती.. जणु भक्ष्याच्या मागे लागलेली एखादी नागीनच!
अरे रे, 'हे रे काय ?हे असं अभद्र काय आलं मनी..?' असा विचार करतो न करतो
तोच, आमची बसही जणू, 'ती काळी सडक, ती काळी नागीण, गिळत निघालीय..' असंही
वाटू लागलं. भल्या पहाटेच असं 'काही-बाही' मनात येऊ लागल्यानं मी
लागलीच थोरल्या काचेतून नजर हटवली अन खिडकीही बरीचशी बंद करून घेतली. पण
तरीही ते अभद्र असं 'काहीबाही' काही डोळ्यांसमोरून जाईना.. मग डोळेही बंद
केले आणि शांत पहुडलो. 'आता आपली ही बस आपल्याच वेगात छान चालली आहे..',
असा नि एवढाच शुभ्र आणि भद्र विचार मनी आणत सैरभैर झालेला मनाचा वारु काबूत
ठेवण्यासाठी मी दीर्घ श्वसन चालू केलं. आणि काय आश्चर्य, हा उपाय मात्र
कामी आला अन थोड्याच वेळात हलकेच एक छानशी डुलकीही लागली.
![]() |
पदरवाडीतून पदरगड
|
काही वेळाने जाग आली ते काहीशा 'कुजबुजी'नेच! पण ती 'काहीशी'च असल्यानं
विशेष झोपमोड नाही झाली. त्यामुळं डुलकी परत लागली. मी पुन्हा आपला भद्र
विचारात मग्न झालो. आता आपलीं बस आपल्याच वेगात छान चालली होती. पुढच्या
दहा-एक मिनिटांत ती 'कुजबुज' चांगलीच गजबजली. हे 'गजबजणं' मघापेक्षा जरा
जास्तच होतं. मग मी सहज थोडे डोळे उघडले. पाहतो ती आख्खी बसच जागी झाली
होती. अनेक खिडक्यांची तावदानंही सरकली होती; अन, मघाचा तो मंद वारा
धुंद-फुंद होवून डोंगरची गाणी गाऊ लागला होता.
एवढ्यात दोन्ही बाजूंची हिरवाई संपून उजवीकडे काही उपहारगृहांची रांग सरकू लागली. दोनेक मिनिटांतच तीही संपली अन गाडीचा वेग आणखी कमी झाला आणि तिनं एक हळुवार वळण घेतलं. भीमाशंकर बसस्थानक आलेलं होतं. पूर्ण गोलाकार वळण झालं तरी बस काही थांबेना. मग कळलं की, तिथल्या त्या एवढ्या मोठया आवारात बस उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध नाहीय्ये! अपरिहार्यपणे, तिथून माघारी फिरत नि रस्त्याकडेलाच थोडी मोकळी जागा पाहून एके ठिकाणी ती स्थिरावली. सारं भ्रमंतीमंडळही हळूहळू खाली उतरलं. अन सूचना वजा परवानगी मिळताच देवदर्शनाला धावलंही. 'भावुक भाविक' पांगल्यानंतर मात्र 'सज्जन' भाविकां'नी त्या 'उघड्या स्वयंपाकओट्या'चा ताबा घेतला नि दर्शनार्थी अवतरेपर्यंत प्रातोपहाराची तयारीही पूर्ण केली.
एवढ्यात दोन्ही बाजूंची हिरवाई संपून उजवीकडे काही उपहारगृहांची रांग सरकू लागली. दोनेक मिनिटांतच तीही संपली अन गाडीचा वेग आणखी कमी झाला आणि तिनं एक हळुवार वळण घेतलं. भीमाशंकर बसस्थानक आलेलं होतं. पूर्ण गोलाकार वळण झालं तरी बस काही थांबेना. मग कळलं की, तिथल्या त्या एवढ्या मोठया आवारात बस उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध नाहीय्ये! अपरिहार्यपणे, तिथून माघारी फिरत नि रस्त्याकडेलाच थोडी मोकळी जागा पाहून एके ठिकाणी ती स्थिरावली. सारं भ्रमंतीमंडळही हळूहळू खाली उतरलं. अन सूचना वजा परवानगी मिळताच देवदर्शनाला धावलंही. 'भावुक भाविक' पांगल्यानंतर मात्र 'सज्जन' भाविकां'नी त्या 'उघड्या स्वयंपाकओट्या'चा ताबा घेतला नि दर्शनार्थी अवतरेपर्यंत प्रातोपहाराची तयारीही पूर्ण केली.
गडात गड जसा हरिश्चंद्रगड माझ्या खूप आवडीचा तसंच घाटवाटांमध्ये मला
भीमाशंकर परिसर जरा अधिकच भावतो. इथं माझं 'ध्यान नि अवसान' हे वेगळ्याच
'मात्रे'त असतंय. बहुदा, लहानपणापासूनच 'शिवा'वर असलेला 'जीव' त्यास
कारणीभूत असावा. असो. माझं घर तथा गाव चऱ्होली बु., हे सुंदर 'शिवा'लय
असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी, सासुरवाडी घोडेगाव, पुणे हेही
'शिवा'लयाच्या बाजूलाच तर कर्मभूमी 'शिरूर'ही 'शिवसान्निध्यातच! केवढा हा
योगायोग! तशी शिवालये प्रत्येक गावांत असतात, पण या तीनही ठिकाणी ती
'ग्रामदैवतं होती. त्या गावांमधील प्रमुख दैवतं होती. जुन्या आठवणीत
रमतच मी तिथूनच ज्योतिर्लिगाला नमन करत मनोमन 'शिवस्तुती 'पठण'ही सुरु
केलं.
एव्हाना साडेआठ झालेले. भटकंतीला निघण्याची सर्व तयारी झालेली. सुरेंद्रभाऊंनी भ्रमंतीमार्गाबाबतची थोडक्यात कल्पना दिली अन आमचा 'भ्रमंतीमेळा' पुन्हा मंदिरदिशेने चालू लागला. आजच्या भ्रमंतीची सुरुवातच मुळी 'आझराई'तुन होणार होती, आणि ही सुरुवात, ही 'आझराई', सुरु होते बसस्थानकाच्या मागे असलेल्या 'देवाच्या माळा'हुन!
आजची भ्रमंती..
सह्याद्री ट्रेकींग फाउंडेशन, पुणेसह
दिनांक : २ एप्रिल २०१७
भीमाशंकर जंगल परिसर.. एक मस्त चौपदरी भटकंती!
![]() |
| गणेश घाट ते पदरवाडी |
साडेदहा होत आलेले, काहीशी भूकही लागलेली. एव्हाना 'चहाच्या आंब्या'जवळ आम्ही आलेलो. मग इथंच थोडी विश्रांती घेतली. थोडी पोटपूजाही केली नि सरळ 'खांडज'कडे जाणारी वाट तशीच डावीकडे सोडत उजवीकडील पांदरस्त्याने आम्ही पदरवाडीकडे निघालो.
२... पदरपट्टा :
या पदरवाडीत असलेल्या एकमेव घरात वाटेची पुनश्च खात्री करून घेत व तिथल्या
एका छोट्या, सिमेंट-खडी-वाळू मिश्रणातुन वर्तुळाकार नि भरभक्कम बांधणी
केलेल्या छोट्या विहिरीमधुन पाण्याचे व्यवस्थापन करून घेत समोरच्याच
गाडीरस्त्याने, अर्थात 'पदरपट्ट्या'ने, पदरवाडी डावीकडे व नंतर मागे सोडत 'रानशीळ' तथा 'बैलघाटा'कडे निघालो.
![]() |
| पदारपट्टा ते रानशीळ |
३... 'रानशीळ घाट' तथा 'बैलघाट' :
घाटवाटच ती! मग दगड-धोंडे, खाचखळगे, अनेक ओहोळ-ओघळ, वळणवाटा ही 'मंडळी'
ओघाने आलीच! मग, कुठे दाट तर कुठं विरळ असं जंगल, मध्येच कुठं सखोल भागात
तेच थोडं अधिक उंचावलेलं आणि विपुल झाडीने व्यापलेलं! आता फरक इतकाच की,
इतका वेळ असलेली उतराई अन सपाटीची चाल आता बरीचशी चढाईत परिवर्तीत झालेली
होती. आणि, अखंड घाटवाटेत आता उंच-दाट अशी झाडी जरी लोपली असली तरी
कुठं-कुठंच थोडंबहुत उघडं-बोडकं रान अन्यथा संपुर्ण वाटेत सगळी हिरवाईच
होती.
घाटमार्गात मध्येच कुठंतरी, चार-दोन ठिकाणी जुन्या पायऱ्यांही दृष्टीस पडल्या. पुढे, मजल दरमजल करीत, दगड-गोटे, झाडी-झुडपे नि ओढ्या-नाल्यांच्या साथीत साधारण चालीनं आम्ही सुमारे दोन तासांतच पुन्हा भीमाशंकर माथ्यावर येवून पोहोचलो.
दुपारचं जेवण तर आपापल्या भुकेच्या सोयीनं ज्यानं-त्यानं मध्येच घाटवाटेत करुन घेतलेलं होतं. त्यामुळे, माथ्यावर आल्यावर सर्वांनी अंदाजे अर्ध्या तासाची विश्रांती घेतली अन आम्ही पुन्हा 'कोंढवळ'ची वाट धरली. कारण, आमची आजची भटकंती कोंढवळ येथेच संपणार होती आणि जणू शिरस्त्यानुसार आमची ज्येष्ठ नि पाककलातज्ञ मंडळी आमच्या आधीच तिकडे रवाना झाली होती नि आम्ही पोहेचेतो तो संपूर्ण 'पाकयज्ञ' पूर्णही होणार होता.
![]() |
| रानशीळ तथा बैलघाट |
घाटमार्गात मध्येच कुठंतरी, चार-दोन ठिकाणी जुन्या पायऱ्यांही दृष्टीस पडल्या. पुढे, मजल दरमजल करीत, दगड-गोटे, झाडी-झुडपे नि ओढ्या-नाल्यांच्या साथीत साधारण चालीनं आम्ही सुमारे दोन तासांतच पुन्हा भीमाशंकर माथ्यावर येवून पोहोचलो.
दुपारचं जेवण तर आपापल्या भुकेच्या सोयीनं ज्यानं-त्यानं मध्येच घाटवाटेत करुन घेतलेलं होतं. त्यामुळे, माथ्यावर आल्यावर सर्वांनी अंदाजे अर्ध्या तासाची विश्रांती घेतली अन आम्ही पुन्हा 'कोंढवळ'ची वाट धरली. कारण, आमची आजची भटकंती कोंढवळ येथेच संपणार होती आणि जणू शिरस्त्यानुसार आमची ज्येष्ठ नि पाककलातज्ञ मंडळी आमच्या आधीच तिकडे रवाना झाली होती नि आम्ही पोहेचेतो तो संपूर्ण 'पाकयज्ञ' पूर्णही होणार होता.
४... भीमाशंकर ते कोंढवळ :
हा आजच्या भ्रमंतीतला चौथा आणि अंतिम टप्पा! भीमाशंकरला यात्राकाळात जिथं
वाहनतळ असतो, त्याच्या थोडंसंच पुढे नि डाव्या हाताने ही वाट आत
कोंढवळकडे निघते. अगदी सुरुवातीलाच पांदीतुन सुरु होणारी ही वाट, दर पाच ते
दहा मिनिटांच्या अंतराने, कधी दाट-विरळ बनातुन तर कधी मोकळवनातुन, तर कधी
कधी रस्त्याच्या दुतर्फ़ा ओळीने लावून ठेवलेल्या, जणू आखून दिलेल्या,
रस्त्याने आम्हांला 'भाकदेवी', 'पोटफुगा', 'शीळ', वाटेतच दुरुनच दृष्टीस पडणारं.. डाव्या बाजुच्या खोल दरीतील जंगल.. 'सांबरशिंग', ज्यातून दोन वर्षांपूर्वी आम्ही 'दाऱ्या' चढून वर आल्यावर 'हिरडीचा दरा' केलेला! त्यापुढे 'वाघुला' हा टप्पा येतो.
अशा पद्धतीने एक एक टप्पा पार करीत आम्ही 'चोळ'बनात येतो. 'वाघूल्या'तुन
उतरून खाली आल्यावर उंच नि दाट झाडीचा हा टप्पाही या वनात रम्य सुख देऊन
जातो. मग तो गर्द झाडीभरला उताराचा टप्पा उतरत काही वेळातच आम्ही 'चोळनाल्या'त
येतो. दुतर्फा, डावी-उजवीकडे पसरलेलं हे जलपात्र बऱ्यापैकी विस्तीर्ण असून
भर पावसाळ्यात वा पाणी खूप असेल तर मार्गदर्शकाशिवाय ते ओलांडणं, हे गंभीर
धोक्याचं ठरू शकतं. आज पाणी विशेष, जवळजवळ, नसल्यानेच, हा नाला सहजच
ओलांडला आणि थेट, अगदी समोरच असलेल्या, डांबरी रस्त्याला येऊन मिळालो. हा
रास्ता पुढे साधारण दहा-पंधरा मिनिटांतच आम्हाला, दुतर्फा झाडीमय
पांदरस्त्याने नि विविध पक्ष्यांच्या सुरेल सुरावटींच्या साथीतच कोंढवळ येथे नेऊन पोहोचवतो.
![]() |
| भीमाशंकर ते कोंढवळ |
कोंढवळ जवळ येताच, नदीवरील तो पुल व उजवा मध्य साधत निघणारा वळणदार काटकोनी
रस्ता नि डावीकडचा तो सुरेख बंधारा, असं सुंदर निसर्गदृश्य आपल्याला
कोंढवळच्या प्रेमातच पाडतं. त्याच्या थोडंसंच पुढे असलेला, 'कोंढवळ'चा प्रसिद्ध धबधबा'ही
दृष्टीस पडतो. कोंढवळच्या प्रेमात पाडणारं हे आणखी एक रम्य ठिकाण!
पावसाळ्यात हे ठिकाण अगदी निश्चितच अतिशय रमणीय असणार आहे आणि अशा
पद्धतीनेच सद्या त्याची वनखात्याकडून आकर्षक अशी बांधकाम रचना करण्यात
आली आहे. शासनाच्या वतीने ही जागा अधिक रमणीय बनवण्याच्या हेतुतून येथे
विहारसदृश काही बांधकामही करण्यात आले आहे आणि सुरक्षिततेसाठी लोखंडी
कठडेही बसवण्यात आलेले आहेत. साहजिकच, याठिकाणी रम्य अशा कौटुंबिक पावसाळी
सहलीचे आयोजनही एक पर्वणीच असणार आहे.
येथेच आमची बस आम्हांला गावात विसाव्याच्या ठिकाणी घेवून जाण्यासाठी आमची
वाट पाहत थांबलेली होती. बस पाहताच अंतिम ठिकाण आल्याचा एक विशेष आनंद
सर्वांच्याच चेहऱ्यावर विराजमान झालेला दिसला. बसचालकाच्या निरोपानुसार
आमचं 'ज्येष्ठ' आणि 'जलद' मंडळ नेहमीप्रमाणेच आधी पोहोचून सुरुची भोजनाची
तयारी करून बसलेलंच होतं. ... बस्सं, आम्ही तिथं पोहोचणं एवढंच बाकी होतं!
एक नेहमीपेक्षा थोडी दीर्घ पल्ल्याची परंतु अतिशय सुंदर अशी भटकंती आता
संपली होती. भोजनपश्चात आवराआवर करून बसगाडीत विराजमान होत आणि ब्रम्हानंदी
टाळी लावत पुण्याकडे प्रस्थानस्थ होणं, एवढंच सुख आता बाकी असतं.
- सह्यभ्रमर
ishwargaikwad.blogspot.com
भ्रमंती सह्यभ्रमराची
![]() |
| कोंढवळकडे जाताना दृष्टीपथात येणारे सांबरशिंग अभयारण्य |
![]() | |
|












No comments:
Post a Comment