यांकन - पहली नजर
इथे आमच्यातील एक मेंबर अचानक मागे राहून
गायब झाल्याने काही जण त्याची शोधाशोध करीत मागे गेले. आम्ही काहीजण जिथे पोहोचलॊ होतो
तिथेच थांबलो.तिकडे मोबाइलला रेंज नसल्याने पुन्हा छावणीपर्यँत जावे लागले. इकडे तिकडे
भटकत रहाण्यापेक्षा आणि आमच्या सगळ्यांच्या परतीची वाट पाहण्यापेक्षा ट्रेक मेम्बर
छावणीवर परत गेला होता. खरे तर असे कोणी अचानक गायब झाले तर खूप काळजी वाटते कारण या
जंगलात अनेक प्राणी आहेत. त्यामुळे एकट्याला टाकून जाणे किंवा गायब झाला तर दुर्लक्ष
करणे हे चुकीचे ठरते. सगळे जण छावणीत सुरक्षितरित्या पोहोचलेच पाहिजेतच. आमच्यातील
वाटाड्याला छावणीमध्ये पाठविण्यात आले तिथे हा मेंबर सुरक्षित आहे हे समजल्यावर सर्वांना
हायसे वाटले. "वो दुसरा तिसरा कोई नहीं था वो तो सूर्या था." कितीही महत्वाचे काम असो ग्रुपलीडर, को-लीडर किंवा ग्रुपमधील इतर कोणालाही किमान एका व्यक्तीला सांगून जाणे हा नियम
सगळ्यांनी पाळला पाहिजे.
मैत्रिणीला जागेकरून तिला जागे रहाण्याचा
आग्रह करून त्रास देऊन मी इतरांच्या घोरण्याच्या तालावर थोडावेळ झोपी गेले. खरंच त्या
चांदण्यांच्या छताखाली दोनतीन तासांची झोपदेखील स्वर्गसुख देऊन गेली. पहाटे नेहमीप्रमाणे
५ला उठून साडेपाचला पहिला बेड टी(आम्हाला तर घरी पण बेड-टी मिळत नाही रे)
मग सामानाची आवराआवर करून सकाळची मुख्य कामे उरकून व्यायाम
करून ओळख परेड करून पुन्हा चहाबिस्कीट खाऊन छावणी लीडर्सचा आणि रांगण्याचा
जड अंतःकरणाने निरोप घेऊन आमचे लीडर्स आदित्य,अनिकेत यांच्या सूचनेवरून
नारायणगडाकडे निघालॊ. सह्यांकनचा दुसरा दिवस लीडर्सच्या उत्तम नियोजनामुळे उत्तमरित्या पार पडला. चक्रम हायकर्स रॉक्स.
सह्यांकन दिवस ४था
सह्यांकन दिवस चौथा, ब्लॉग भाग- ५
सामानगड
सामानगडाची उंची-३००४ फूट
किल्ल्याचा प्रकार - गिरिदुर्ग
डोंगररांग - कोल्हापूर
जिल्हा -कोल्हापूर
श्रेणी - मध्यम
दिनांक २४ डिसेंबर २०१९
अंबाबाई मंदिराच्या पुढे गेल्यावर कमान बावडी लागते. या विहिरीतही उतरण्यासाठी पायऱ्या असून, पायऱ्यांवर सुंदर कमानी आहेत. पायऱ्या संपल्यावर भुयार लागते, त्यापुढे पाणी लागते. या ठिकाणी सात कमानी आहेत. यापुढे जाता येत नाही. या ठिकाणी पूर्वी कैद्यांना ठेवले जात होते. अशा आणखी ३ विहिरी सामानगडावर आहेत. या वैशिष्यपूर्ण विहिरी हे सामानगडाचे भूषण आहे.
(जांभ्या दगडातील कमानी असलेल्या विहिरी )
पुढे एक चोर दरवाजा लागतो. येथून पूर्व दिशेला गडाचा आकार निमुळता होतो व शेवटी चिलखती सोंड्या बुरुज लागतो. सोंड्या बुरुजासमोर मुगल टेकडी दिसते. ती मुगल सैन्याने गडावर हल्ला करण्यासाठी श्रमदानातून उभारली आहे अशी आख्यायिका स्थानिक लोकांत आहे.
सह्यांकन - पहली नजर
भुदरगड उंची- ३,२१२ फूट.
भुदरगडचा थोडक्यात इतिहास -भुदरगड हा अजूनही चांगल्या स्थितीत असलेला गड, शिलाहार राजा भोज (दुसरा) यांने बांधला होता.त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला.इ.स. १६६७ मधे शिवाजी महाराजांनी भुदरगडाची नीट दुरूस्ती केली व त्यावर शिबंदी ठेवून ते एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले. परंतु मुघलांनी हे ठाणे ताब्यात घेण्यास अल्पावधीतच यश मिळवले. पाच वर्षानी मराठ्यांनी भुदरगडावर अचानक ह्ल्ला करून तो जिंकून तर घेतलाच,परंतु मुघलांच्या प्रमुख सरदाराला ठार मारले. मुघलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देऊन टाकली ती अजूनही या देवळात आहेत.१८व्या शतकाच्या उत्तरार्धात परशुरामभाऊ पटवर्धनांनी किल्ल्यातील शिबंदी वश करून त्यावर ताबा मिळवला. दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला.इ.स. १८४४ मध्ये कोल्हापुरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळविले होते. त्यात सामानगड व भुदरगड प्रमुख होते. त्यांचा बिमोड करण्यास जनरल डीलामोटीने ससैन्य कूच केले. १३ऑक्टोबर १८४४ रोजी इंग्रजांच्या सैन्याने भुदरगडावर पूर्ण ताबा प्रस्थापित केला. असे बंडाचे प्रयत्न वारंवार होऊ नयेत म्हणून इंग्रजांनी तेथील तटबंदीची बरीच तोडफोड केली.(माहिती नेटवरून)
भुदरगड उंची- ३,२१२ फूट.
प्रकार- गिरिदुर्ग.
चढाईची श्रेणी-सोपी.
ठिकाण-कोल्हापूर
जवळचे गाव-पेठ शिवापूर (गारगोटी)
माझ्या महाराष्ट्र राज्यात पुण्यापासून सुमारे ३१५ कि.मी. अंतरावर भुदरगड हा दुर्ग आहे. कोल्हापूर शहरापासून साधारणपणे ५०-५५ कि.मी. अंतरावर असलेला हा दुर्ग ३,२१२ फूट उंच असून तेथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. तटाची मात्र खूप ठिकाणी पडझड झाली होती परंतु सध्या गडाची तटबंदी पूर्णपणे जांभ्या दगडामध्ये पुन्हा बांधली गेली आहे. येथे दरवर्षी माघकॄष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरते.
चक्रम हायकर्स मुलुंड ही सह्याद्रीतील ट्रेक आयोजित करणारी संस्था १९८३ साली स्थापन झाली. अनेक लोकांचे योगदान यामागे आहे. माझ्या मते दर दोन वर्षांनी सह्याद्रीतील सलग चारपाच दिवसांचा ट्रेक आयोजित करणारी ही एकमेव संस्था आहे. सह्याद्रीतील या कृतीला "सह्यांकन" असे म्हणतात. "चक्रम हायकर्स" यांचे १९ वे सह्यांकन होते. दिनांक २० डिसेंबर २५ डिसेंबर अशी आमची पहिली बॅच होती याशिवाय एक दिवस पुढे अश्या आणिक दोन बॅचेस होत्या.
मला आणि माझ्या मैत्रिणीला तुषार कोठावदे याच्यामुळे सह्यांकनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती आणि मिळालेल्या त्या संधीचे सोने करायचे हा माझा मूलमंत्र आहे. दिनांक २० डिसेंबर २०१९ या दिवशी रात्री मुलुंडहून साडेआठच्या सुमारास आमची सह्यांकनची पहिली बॅच निघाली. काही ट्रेकर्स पुण्यातले असल्याने ट्रेकबस मुबंई -पुणे -बंगलोर हायवे अशीच जाणार होती. मी पुण्यात माऊंटन एज आडवेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे यांच्यासोबत ट्रेकिंग करते. चक्रम हायकर्स सोबत माझे हे पहिलेच सह्यांकन असल्याने, व नवीन ग्रुप असल्याने, शिवाय सलग पाच दिवसांचा ट्रेक असल्याने थोडीशी धाकधूक होती. परंतु तुषार,प्रशांत, प्राची हे तिघे पाषाणहून वाकडला आम्हाला भेटायला आल्याने माझी अर्धी काळजी तिथेच कमी झाली. आमच्या सह्याद्रीच्या गप्पांच्या नादात रात्री बाराच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आलिशान ऐसपैस बस येऊन थांबली तरी समजले नाही. आमचे ट्रेक लीडर आदित्य आणि व कोलीडर अनिकेत बसमधून खाली उतरून तुषारला भेटल्यावर मलाच फार खास व्यक्ती असल्यासारखे वाटले.
आजच्या युगात निर्मळ आत्म्याची माणसे मिळणे म्हणजे मी आपले भाग्य समजते.
सह्याद्रीमध्ये फिरणारा प्रत्येक व्यक्ती निर्मळ आणि समजूतदार बनतो असे
माझे मत आहे. लीडर आणि कोलीडरच्या प्रेमळ, आदरयुक्त वर्तणुकीतून माझ्या ट्रेकिंग ग्रुपमध्ये माझी एक सीट कायम राखीव असते या गोष्टीची मला प्रकर्षाने आठवण झाली आणि हा माझा पाच दिवसांचा ट्रेक तुफानी होणार याची ग्वाही तिथेच मिळाली. रात्री बाराच्या सुमारास आम्हाला सह्यांकनच्या हस्ते सुपूर्त करण्यास आलेल्यांचा निरोप घेऊन त्याच्याकडून स्लिंगरोप घेऊन मी बसमध्ये बसले. गप्पा मारत मधेच डुलक्या घेत रात्रीचा बसचा प्रवास सुरु होता.
(खालील फोटो पहाटे साडेतीन वाजता एका टोलनाक्यावर टिपला आहे.)
टोल नाका आला की मी पूर्ण जागी होऊन एक तरी फोटो घेण्याचा प्रयत्न करीत असे. सकाळी साडेपाचच्या सुमारास आमची बस गारगोटीच्या हद्दीमध्ये पोहोचली.झोपेतून जागे होऊन थोडीशी आवराआवर करून सातच्या सुमारास हॉटेल वैष्णव रेस्टोरंट येथे फक्कड चहाचा आस्वाद घेऊन पोह्याचा नास्ता करून बसमधून आम्ही भुदरगडकडे निघालो.
(खालील फोटो पहाटे साडेतीन वाजता एका टोलनाक्यावर टिपला आहे.)
आजूबाजूच्या
हिरवळीतून कौलारू घरे, छोटे-छोटे रस्ते न्याहाळीत सूर्यदेवाची कोवळी सूर्यकिरणे डोळ्यांवर झेलीत आमची बस घाटवळने पार करीत साडेआठच्या सुमारास भुदरगडावर पोहोचली.
चक्रम हायकर्सचे १९व्या सह्यांकनचे बॅच आणि कॅप वाटप करून सर्वांची ओळख परेड करून भुदरगडची वारी सुरु केली.किल्ले भुदरगडवरून भुदरगड हे नाव या तालुक्याला दिले आहे. साधारणतः ९६ ते १०० गावांचा हा तालुका आहे. गारगोटी हे येथील मुख्य ठिकाण. भुदरगड हे फक्त तालुक्याचे
नाव आहे, तालुकास्तरीय सर्व कामकाज गारगोटी या शहरातून चालते. गारगोटी पासून १० किलोमीटर
अंतरावर भुदरगड किल्ला आहे. गारगोटी शहर कोल्हापूर शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर आहे.
वेदगंगा नदीचा प्रदेश असणारा हा विभाग शेती आणि शैक्षणिक क्षेत्रात पुढे आहे.
गडावर जाण्याच्या वाटा-गडावर जाण्यासाठी गारगोटी वरून पाल बार्वे मार्गे किंवा गारगोटी वरून पुशपनगर राणेवाडी मार्गे जाता येते. पेठ शिवापूर गावातून डांबरी सडक भुदरगडावर जाते. पूर्वी पेठ शिवापूर ही बाजारपेठ होती. या मार्गाने गडावर पोहचताच उजव्या हाताला भैरवनाथाचे वेगळया धाटणीचे हेमाडपंथी मंदीर दिसते.मंदीराभोवती ओवऱ्या,कमानी व दिपमाळा आहेत.मंदीरासमोरील तटबंदीत असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ व तोफ आहे.देवळामागील वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात बांधलेला भव्य वाडा दिसतो. वाडयात गडसदरेचे अवशेष आहेत. वाडयाच्या पलिकडे करवीरकर छत्रपतींनी जिर्णोध्दार केलेले पुरातन शिवमंदीर आहे. सभा मंडपात छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा स्थापित केला आहे. मंदीर मुक्कामासाठी योग्य आहे.
वाडयाजवळील पायवाटेने पुढे गेल्यावर भुदरगडचे वैभव असलेला बांधीव दुधसागर तलाव लागतो. यातील पाणी मातीच्या गुणधर्मामुळे दुधट रंगाचे झाले आहे. तलावाशेजारी भग्नावस्थेतील भवानी मंदीर मंदीरात आदिशक्ती भवानीची शस्त्रसज्ज देखणी मुर्ती आहे. तलाव उजव्या हाताला ठेवून काठाने पुढे गेल्यास अनेक समाध्या दिसतात. आणखी पुढे गेल्यावर गुहेत असलेले व गुहेच्या बाहेर सभा मंडप असलेले मंदीर लागते. मंदीरात अनेक देवतांच्या मुर्ती दिसतात. तेथुन झाडीतून मळलेल्या वाटेने उत्तरेकडे पुढे गेल्यास, आपण एका छोटया तलावाजवळ येतो. त्या ठिकाणी समाध्या आहेत. या ठिकाणी गडाची उत्तम स्थितीत असलेली उत्तर तटबंदी आहे.
तटातील दगडी जिन्याने तटावर चढले असता, आपणास गड पायथ्याच्या पेठ शिवापूर गावचे सुंदर दर्शन होते.
पुन्हा माघारी दुधसागर तलावाजवळ यायचे तलाव जेथे संपतो, तेथे पुर्वेकडच्या सरळ वाटेने पुढे गेल्यास नामशेष झालेले गडाचे प्रवेशद्वार आहे. दोन्ही बाजूनी दगड लावलेल्या वाटेने खाली उतरल्यावर एक भलीमोठी चौरस शिळा व या शिळेत कोरुन काढलेली १०० चौफूटांची खोली (पोखर धोंडी) दिसते.
येथून पुन्हा माघारी आल्यावर प्रवेशद्वाराच्या बाजूला एक नंदी दिसतो. त्यासमोर जमिनीच्या पोटात खोदून काढलेले भुयार आहे. भुयाराच्या पायर्या उतरुन आत गेल्यावर अन्य मुर्त्यांसोबत जखुबाइची मुर्ती दिसते.
येथून पुन्हा माघारी आल्यावर प्रवेशद्वाराच्या बाजूला एक नंदी दिसतो. त्यासमोर जमिनीच्या पोटात खोदून काढलेले भुयार आहे. भुयाराच्या पायर्या उतरुन आत गेल्यावर अन्य मुर्त्यांसोबत जखुबाइची मुर्ती दिसते.
आपण जागोजागी जिने असलेल्या पश्चिम तटबंदीवर चढायचे व भैरवनाथ मंदीरापर्यंत चालत जायचे. त्या ठिकाणी तटबंदीत आणखी एक बुजलेला दरवाजा दिसतो.गडावर चिर्याच्या कोरडया पडलेल्या २ विहिरी व दोन तलाव आहेत.परंतु त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे.गडावरील सर्वात सुस्थितीतील व प्रे़क्षणीय वास्तू म्हणजे श्री भैरवनाथाचे मंदिर. गडावर एक मोठा तलाव आहे. त्याच्याच काठी शंकराची दोन मंदिरे तसेच भैरवीचे मंदिर आहे. हिलाच जखुबाई म्हणून ओळखतात.
गडावर थोडीशी झाडी आहे. गडावरुन दुधगंगा-वेदगंगा नद्यांची खोरी, राधानगरीचे दाट अरण्य व आंबोली घाटाचा हिरवागार परिसर दृष्टीस पडतो. गडाच्या सर्वबाजूनी वनीकरण केल्यामुळे हा गडाखालील परिसर सदैव हिरवागार दिसतो. गडाखाली पेठ शिवापूर, गडबिद्री, जकींनपेठ, शिंदेवाडी, कदमवाडी, वरेकरवाडी, राणेवाडी, माडेकरवाडी, कालेकरवाडी, घावरेवाडी, चोपडेवाडी, पडखंबे, बारवे अशी छोटी गावे आणि वाड्या आहेत.
गडाच्या
तटबंदीवर अनेक ठिकाणी तोफा लावण्याचे मोठमोठाले कोनाडे, मशाली
लावण्यासाठीचे छोटे खाचे अशा अनेक गोष्टी निरीक्षण करून पहिल्या तर
निदर्शनास येतात. गडावरील कचरा उचलायला जमलं नाही तरी किमान प्लास्टिकसारखा
कचरा करू नये हा आम्हा ट्रेकर्सचा नियम आहे. तरीही न राहवून आम्ही गडावरील
प्लास्टिकचा कचरा गोळा केला.
भुदरगडावरील जांभ्या दगडातील घरे खूपच आकर्षक होती. ते कोंबडीच्या पिल्लांचे लुटूलुटू फिरणे, दुपारच्या वेळी बायकांचे ओसरीवर बसून गप्पा मारणे पाहिले आणि मन क्षणात कोकणात रवाना झाले.
सह्यांकनच्या पाच दिवसांच्या ट्रेकमधील पहिल्या दिवशी सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये भुदरगड पूर्ण फिरून झाल्यावर गडावरील गावातील एका शाळेतील अंगणात आम्ही दुपारचे जेवण आटोपले (चक्रम हायकर्सने आयोजित केलेले दुपारचे जेवण) गप्पाटपा करीत थोडी विश्रांती घेऊन लगेच भटवाडी कॅम्पसाईटकडे रवाना झालो. जाताना मौनी महाराज यांच्या समाधीला आणि वाड्याला भेट दिली.
मौनी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीविषयी येथे लिहिलेले आढळले.मौनी महाराज व छत्रपति शिवाजी महाराज या दोन विभुतिंची भेट जेथे घडली ते पाटगाव.मौनी मठ हा लाकुड व दगडातील बांधकामाचा दुर्मिळ नमुना मनाला भुरळ पाडतो. येथे मौनी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेउन काही वेळ शांत बसलो तर खूप वेगळा शांत अनुभव
येतो.पाटगावची छोटीशी बाजारपेठ आहे. कोकणाच्या तोंडाशी वसलेले हे दुर्गम गाव अतिपर्जन्याचे ठिकाण आहे असे म्हणतात.गावचे वेदगंगेला अडवणारे मौनीसागर धरण वेळ असल्यास पहावे, निसर्ग – इतिहास – संस्कुती यांचा त्रिवेणि संगम अनुभवायचा असेल तर भुदरगड पाटगावला अवश्य भेट द्यावी.
भुदरगडावरील जांभ्या दगडातील घरे खूपच आकर्षक होती. ते कोंबडीच्या पिल्लांचे लुटूलुटू फिरणे, दुपारच्या वेळी बायकांचे ओसरीवर बसून गप्पा मारणे पाहिले आणि मन क्षणात कोकणात रवाना झाले.
सह्यांकनच्या पाच दिवसांच्या ट्रेकमधील पहिल्या दिवशी सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये भुदरगड पूर्ण फिरून झाल्यावर गडावरील गावातील एका शाळेतील अंगणात आम्ही दुपारचे जेवण आटोपले (चक्रम हायकर्सने आयोजित केलेले दुपारचे जेवण) गप्पाटपा करीत थोडी विश्रांती घेऊन लगेच भटवाडी कॅम्पसाईटकडे रवाना झालो. जाताना मौनी महाराज यांच्या समाधीला आणि वाड्याला भेट दिली.
मौनी महाराज समाधीचे दर्शन घेऊन साडेचारच्या सुमारास आम्ही पाटगाव धरणाजवळच्या आमच्या भटवाडी कॅम्पसाईटवर पोहोचलो. पोहोचताच आमचे स्वागत गरमागरम चहा.बिस्किटे व थॊड्या वेळाने हलका नास्ता स्वीट कॉर्न विद चाटमसालाने झाले. तेथील तंबूमध्ये आमच्या सॅक ठेवून आम्ही धरणाच्या जलाशयाच्या दिशेने सूर्यास्ताचा परमानंद घेण्यासाठी रवाना झालो. एकीकडे आमच्यासाठीचा स्वयंपाक बनत असल्याचा सुवास येत होता तर एकीकडे सूर्य अस्तास जात होता. दोन्ही गोष्टी परमानंद देणाऱ्या.
ओळख नसल्याने आम्ही नकळत ग्रुप लीडर्सकडूनदेखील फोटोग्राफी करून घेतली. फोटोग्राफी करून सूर्य अस्ताला गेल्यावर लगेच गरमागरम रस्समचा आस्वाद घेता आला. लगेचच गरमागरम रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेऊ लागलो. जनरेटर लावून लाईटची व्यवस्था छान होती. पिण्याचे पाणी, हात आणि प्लेट धुण्याचे पाणी त्यावर सूचना फलक लावलेले होते. जवळच घनदाट देवराई असल्याने गावकऱ्यांनी तिथे एक नंबर, दोन नंबरला जाण्यास बंदी आणली होती त्यामुळे सह्यांकनच्या लीडर्सने निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता शौचखड्डे खणून माती टाकण्याची सोय केली होती. बाजूला किंतन लावले होते. तंबू लावले होते. मुले व मुलींसाठी वेगळी सोय केली होती. अरे कुठून आणता हा उत्साह आणि ह्या वेगळ्या भन्नाट कल्पना??
सगळे कसे जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे घडत होते.
आम्ही नवीन जागी आहोत याचे भान हरपले होते. कोण कुठून आलाय कशाची चिंता नाही. सगळे एकत्र मिळून सर्व कामे करीत होते. चक्रम हायकर्सच्या
या मेहनतीला माझा सलाम आहे. रात्रीचे जेवण आटोपून थोडा वेळ म्हणता-म्हणता रात्री साडेदहापर्यंत जुन्या-नव्या हिंदी- मराठी गाण्याची महफिल छानच रंगली होती.
त्यानंतर गारवा वाढल्याने आणि ग्रुपच्या नियमानुसार सकाळी लवकर रांगणागड ट्रेक असल्याने सर्वजण आपापल्या तंबूमध्ये रवाना झाले.सह्यांकनचा पहिला दिवस इतक्या आपुलकीने आणि उत्तमरीत्या पार पडला की आम्हाला नवीन ग्रुपमध्ये आहोत याचा विसर पडला. चक्रम हायकर्स रॉक्स.
ओळख नसल्याने आम्ही नकळत ग्रुप लीडर्सकडूनदेखील फोटोग्राफी करून घेतली. फोटोग्राफी करून सूर्य अस्ताला गेल्यावर लगेच गरमागरम रस्समचा आस्वाद घेता आला. लगेचच गरमागरम रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेऊ लागलो. जनरेटर लावून लाईटची व्यवस्था छान होती. पिण्याचे पाणी, हात आणि प्लेट धुण्याचे पाणी त्यावर सूचना फलक लावलेले होते. जवळच घनदाट देवराई असल्याने गावकऱ्यांनी तिथे एक नंबर, दोन नंबरला जाण्यास बंदी आणली होती त्यामुळे सह्यांकनच्या लीडर्सने निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता शौचखड्डे खणून माती टाकण्याची सोय केली होती. बाजूला किंतन लावले होते. तंबू लावले होते. मुले व मुलींसाठी वेगळी सोय केली होती. अरे कुठून आणता हा उत्साह आणि ह्या वेगळ्या भन्नाट कल्पना??
सगळे कसे जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे घडत होते.
त्यानंतर गारवा वाढल्याने आणि ग्रुपच्या नियमानुसार सकाळी लवकर रांगणागड ट्रेक असल्याने सर्वजण आपापल्या तंबूमध्ये रवाना झाले.सह्यांकनचा पहिला दिवस इतक्या आपुलकीने आणि उत्तमरीत्या पार पडला की आम्हाला नवीन ग्रुपमध्ये आहोत याचा विसर पडला. चक्रम हायकर्स रॉक्स.
(या लेखात सह्यांकनच्या पहिल्या दिवसाचा पहिला भाग आहे. बाकीचे लेख दुसऱ्या भागात येतील)
सह्यांकन- चक्रम हायकर्स ,ब्लॉग भाग -२
सह्यांकन- चक्रम हायकर्स
ब्लॉग भाग -२
रांगणागड ट्रेक
उंची - २२२७ फूट
ठिकाण- कोल्हापूर
चढाई श्रेणी - सोपी
दिनांक २२ डिसेंबर २०१९
रांगणादुर्गविषयी थोडक्यात माहिती-भारतातील महाराष्ट्र
राज्याच्या कोल्हापूर जिल्हयातील रांगणा हा एक दुर्ग आहे. रांगणादुर्ग उर्फ प्रसिध्दगड
सहयाद्रीच्या दक्षिणेस पसरलेल्या, परंतु घाटमाथ्यापासून
अलग झालेल्या डोंगरावर तसेच घाट कोकण व गोवा यापासून जवळच अगदी मोक्याच्या ठिकाणी वसलेला
आहे. छत्रपतींच्या आवडत्या दुर्गापैकी एक दूर असा याचा समावेश असे.म्हणूनच १७८१च्या
एका ऐतिहासिक कागदपत्रात, ‘येक रांगणा खबरदार
तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल’ असा उल्लेख आलेला आहे. गडाच्या
रांगडेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हयात असलेल्या १३ दुर्गांपैकी रांगण्याचा पहिला
क्रमांक लागतो.
रांगणादुर्गचा थोडक्यात इतिहास -रांगणा किल्ला बांधण्याचे
श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा याच्याकडे जाते. १४७० मध्ये तो महंमद गवानने जिंकला.
त्यावेळी महंमद गवानने काढलेले उद्गार होते, ‘अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला.
त्यात मर्दमुकीबरोबर संपत्तीही खर्च करावी लागली’.
बहामनी
साम्राज्य लयाला
गेल्यानंतर हा किल्ला अदिलशाहीत आला. शिवकाळात अदिलशाही सरदार सावंतवाडीचे
सावंत यांच्याकडे हा गड होता. सन १६५८ मध्ये विजापूरचा सरदार रुस्तम
जमानने हा गड सावंताकडून घेतला. शिवरायांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित
यांनी रुस्तम
जमानकडून हा किल्ला घेतला. पुढे अदिलशहाने रांगण्याविरुध्द मोहिम उघडली.
त्यावेळी छत्रपती
आगऱ्याला कैदेत होते. स्वराज्याच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले
होते. अशा
बिकट प्रसंगी स्वत:जिजाबाईंनी खास मोहिम काढून दि १५/०८/१६६६ रोजी रांगणा
जिंकला. ही
एक अद्भुत घटना रांगण्याचे स्वराज्यातील महत्व अधोरेखीत करते. दि १७/०८/
१६६६ रोजी
महाराजांनी आगऱ्याच्या कैदेतून पलायन केले. १४ एप्रिल ते १२ मे १६६७ या
काळात रांगण्याला
बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने
येऊन हा
वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी ६००० होन खर्च
केल्याचा पुरावा
सापडतो.
औरंगजेबाला दख्खन मोहिमेत
हा किल्ला जिंकता आला नाही. वारणेच्या तहानुसार रांगण्याचा ताबा करवीरकर छत्रपतींकडे
आला. शाहू - ताराबाई संघर्षात पन्हाळयावरुन निघून ताराबाई या गडावर वास्तव्यास आल्या
होत्या. सन १७०८ मध्ये सातारकरांनी गडास वेढा दिला, त्यावेळी ताराबाईला सिंधुदुर्गावर
पाठवून रामचंद्र पंत अमात्यांनी व पिराजी घोरपडे यांनी किल्ला ३ महिने लढविला. पावसाळा
सुरु झाल्यामुळे छत्रपती शाहूनी वेढा आटोपता घेतला.
सावंतवाडीकरांवर कायम
दबाव ठेवण्यासाठी करवीरकराच्या दृष्टीने रांगण्याला विशेष महत्व होते. सावंतवाडीकरांच्या
वतीने जिव्हाजी विश्राम यांनी फितुरीने रांगणा हस्तगत केला होता. परंतु करवीरकरांचा
निधडया छातीचा वीर सुभान यशवंतराव शिंदे यांनी अडीच महिने झुंज देऊन गड हस्तगत केला.
करवीरकरांचे महास्थल म्हणून या गडाचा उल्लेख त्यावेळच्या कागदपत्रात वारंवार येतो.
पुढे सावंतवाडीकरांनी करवीरकरांशी एकनिष्ठ राहाण्याचे ठरविले व रांगणा इंग्रजाचे राज्य
येईपर्यंत करवीरकरांकडे राहिला.
रांगणा गडावरील पहाण्याची
ठिकाणे-सहयाद्रीतील प्रत्येक गडावर प्रवेश करण्यासाठी चढाई करावीच लागते. परंतु रांगणा हा गड थोडा वेगळा
आहे. रांगण्यात प्रवेश करण्यासाठी चक्क डोंगर उतरुन गडात प्रवेश करावा लागतो. गडाच्या
भव्य बुरुजाच्या डाव्या बाजूने दरीच्या माथ्यावरुन जाणाऱ्या छोटया वाटेने पुढे गेल्यावर
गडाचा पहिला भग्न दरवाजा लागतो. प्रवेशद्वार परिसराची रचना युध्दशास्त्रातील ‘रणमंडळ’
या संज्ञेप्रमाणे आहे. ती घटकाभर थांबून समजून घ्यावी अशी आहे.
पहिल्या
प्रवेशाद्वारातून पुढे गेल्यावर बुरुजाचे
संरक्षण देऊन लपविलेला गडाचा दुसरा दरवाजा लागतो. याच्या आत
पहारेकऱ्यांच्या देवडया
आहेत. या दरवाज्याच्या उजव्या अंगाने जाणाऱ्या पायवाटेने गेल्यावर एक कोरडा
तलाव लागतो.
येथून पुढे जांभ्या दगडात बांधलेली जोती दिसतात. गडाच्या या भागात दोन्ही
बाजूने भक्कम
तट असून त्यावर चढण्यासाठी जिने आहेत. शेवटी भव्य बुरुजात एक हनुमंताचे
शिल्प कोरलेला
चोर दरवाजा आहे. परंतु तो दगडांनी बंद केलेला आहे. येथून पुन्हा माघारी
दुसर्या दरवाज्याजवळ
यायचे. समोरच उजव्या हातास वाडयाची चौकट दिसते. चौकटीतून आत गेल्यावर विहिर
लागते. तिला निंबाळकरांची विहीर म्हणतात. वाडयाच्या भिंतीजवळ फारसी
शिलालेख आहे. वाडा पाहून पुढे गेल्यावर समोरच गडाचा तिसरा
भक्कम दरवाजा लागतो. त्याला चार कमानी आहेत.
दरवाज्यातून आत गेल्यावर सरळ पायवाटेने पुढे
गेल्यास बारमाही भरलेला तलाव लागतो. तलावाच्या दुसर्या बाजूस अनेक समाध्या दिसतात.
एका कोपर्यात शिवमंदिर दिसते. इथेच आमची त्या दिवसाची छावणी होती.यानंतर ओढा पार करुन
आपण रांगणाई मंदिराजवळ येतो. रांगणाई मंदिर आम्ही जेवणाआधी
पाहून झाले होते रांगणाई देवीचे मंदिर प्रशस्त असून, मुक्कामास योग्य आहे. मंदिरात
रांगणाई देवीची ढाल, तलवार, त्रिशूळ इत्यादी आयुधे घेतलेली मूर्ती आहे.रांगणाईच्या
उजव्या हाताला विष्णूची मुर्ती व डाव्या हाताला भैरवाची मूर्ती आहे. या ठिकाणी एक फारसी
शिलालेखाचा दगड आहे. मंदिरासमोरच दीपमाळ आहे. रांगणाई मंदिराच्या उजव्या बाजूला मारुतीचे
मंदिर आहे.
सह्यांकनचा दुसरा दिवस
दिनांक २२ डिसेंबर २०१९. आमच्या तंबूतील आम्ही चौघी पहाटे साडेपाचचा
कॉल व्हायच्या
आधीच उठून आवरून तयार होतो. शिवाय चहा घेऊन धरणाच्या काठाला सकाळचा
व्यायाम करण्यास सर्वच सज्ज होते. भटवाडी छावणीचा उत्तम पाहुणचार घेऊन
तेथील लीडर महेश भालेराव,चेतन,रमेश दादा, रंजन महाजन, मैत्री भट, मंगेश
पंडित,आणि इतरांचा निरोप घेऊन आणि व्यायाम झाल्यावर लगेच नास्ता चहा घेऊन पूर्ण सामानाची मोठी सॅक पाठीवर
अडकवून गोमाजी लाड यांना मार्ग दाखवण्यासाठी सोबत घेऊन रांगणा गडाकडे निघालो.
रांगणागड ट्रेक
सकाळी साडेसात-आठच्या सुमारास सुरु केला. घनदाट जंगल पार करीत, मध्ये आमच्या वाटाड्याचे
गोमा दा चे गाव चिकेवाडी गाव पार करीत जंगलातील अनेक वनस्पतींची, प्राण्यांची माहिती
घेत-घेत तीन तास कसे गेले समजले नाही. हे कडगाव वनक्षेत्र आहे इथे गवा आणि इतर प्राणि पाहावयास मिळतात.जाताना एक ओढा आणि मध्यात गेल्यावर एक ओढा असे दोन ओढे पार करावे लागले.
चिकेवाडीमध्ये काही घरे जांभ्या दगडात बांधलेली तर काही कारवीची कुडाची कौलारू घरे पाहावयास मिळाली. अंगणाला
छानसे कुंपण, दारात मांडव असे सुंदर चित्र या
चिकेवाडीत दृष्टीस पडले.दारात गाई-गुरे तर शहराप्रमाणे पाण्याची टाकी देखील आढळली.
त्यातील पाणी अतिशय चवदार गोड होते.
रांगणाला जाताना जंगलात अर्ध्यापर्यंत वाट दाखवणारे
गोमा दादा यांचे घर याच चिकेवाडीमध्ये आहे. मुबलक पाणी असल्याने शेती हा व्यवसाय इथे
दिसतो. या जंगलात अनेक औषधी वनस्पती आहेत. अर्ध्या वाटेपर्यंत गोमा दाद माहिती द्यायला
होते तर अर्ध्या वाटेत रांगण्यावरील लिडर्स आपटे सर आणि महादेव दादा आम्हाला घ्यायला
आले होते. रांगणा गडावर पोहोचायच्या थोडेसे आधी बांदेश्वर मंदिर आहे परंतु त्याची पडझड
झाली आहे.
परंतु त्यातील मुर्त्या सुबक आणि कोरीव आहेत. थकलेल्या ट्रेकर्सना कोकम सरबताचा
आस्वाद घेता आला. चक्रम हायकर्स किती छान काळजी घेता आणि वेळोवेळी उत्तम सोय उपलब्ध
करता. या ठीकाणाहून रांगणाकडे जाताना खाली उतरून मग पुन्हा मुख्य दरवाज्याकडे चढून
जावे लागते.इथे अगदी जवळ गेल्यावर रांगणाचा बुरुज आणि रांगण्याचे सौन्दर्य खुलून दिसते.
आपटे सर वेळोवेळी गडाची उत्तम माहिती देत होते. प्रत्येक ट्रेकमध्ये इतिहासाची उत्तम
जाण आणि आत्मीयता असलेला असा मेंबर आमच्यासोबत असला तर आमचे अहोभाग्यच. भन्नाट फोटोग्राफी
करीत आपटे सरांचे ऐतिहासिक भाष्य ऐकत रांगणागडाच्या छावणीवर दुपारी १२च्या सुमारास पोहोचलो.
तिथे आमच्या सॅक ठेवून रांगणाई देवीच्या
मंदिरापाशी गेलो. आपटे सरांनी प्रत्येक बुरुजाची, प्रत्येक मंदिराची उत्तम माहिती दिली. छोट्या छोट्या मूर्ती कोरलेल्या देवी देवतांच्या
वाहनावरून कशा ओळखायच्या ते समजून सांगितले.
इतिहासाबद्दलचे ज्ञान आणि लढवय्यांबद्दलची
आत्मीयता सर्वकाही वाखाणण्याजोगे होते. ऐकत राहावेसे वाटत होते. कोकण दरवाजा पाहून
झाल्यावर पुन्हा कॅम्पसाईटवर येऊन पाहतो तर काय. तेथील लीडर अनिकेत आणि विलास दादा
यांनी गरमगरम पुरी भाजीचा बेत केला होता. माहेरवाशिणीला माहेरी आल्यावर जसे आयते जेवण
मिळाले की जे सुख मिळते ते आम्हाला सह्यांकनच्या प्रत्येक छावणीत मिळत होते. “मला सांगा सुख म्हणजे काय असते.”
दमल्या थकल्या जीवाला आयते पाणी आणि दोन घास प्रेमाचे मिळाले की स्वर्गसुखच जणू. जेवण आटोपून मंदिरात थोडीशी विश्रांती घेऊन साडेतीनच्या सुमारास पुन्हा रांगणागड फिरावयास निघालो. विश्रांती घेताना समजले की दुपारचे जेवण इतके चविष्ट झाले होते की बनवणाऱ्या लीडर्सना जेवण शिल्लक राहिले नाही.स्वतः ड्राय स्नॅक्स आणि फळे खाऊन दुपारची वेळ भागवली परंतु थकलेल्या ट्रेकर्सना भरभरून वाढले काहीही कमी पडू दिले नाही. दुपारचे जेवण खरंच एखाद्या लग्न कार्यात बनवावे तसे चविष्ट झाले होते.

छावणी लीडर अनिकेत आणि
विलासदादा तुमचे मनापासून आभार. इतक्या उंच गडावर इतके सगळं सामान नेऊन ते चार-पाच
दिवस पुरवणे आणि प्रत्येक वेळी चहापाण्याची,जेवणाची उत्तम व्यवस्था स्वतः करणे ही खूप
कौतुकास्पद गोष्ट आहे. प्रत्येक छावणीवर पिण्याचे वेगळे पाणी, प्लेट्स धुण्यासाठी व
खरकटे कचरा टाकण्यासाठी खड्डे, हात तोंड धुण्यासाठी पाण्याचे वेगळे भरलेले ड्रम, त्यावर
सूचना फलक, शौचालयासाठी पुन्हा प्रत्येक छावणीवर खड्डे त्याला किंतन आणि तंबूचे आच्छादन
अशी सगळीच व्यवस्था उत्तम केली जाते.
दुपारी
जेवण करून थोडीशी
विश्रांती घेऊन आम्ही रांगणाचे प्रशस्त पठार फिरण्यास निघालो. अवाढव्य
घेऱ्यामुळेच
त्याला रांगणा हे नाव पडले असावे. प्रचंड मोठा विस्तार.असलेला असा हा
रांगणा गड आहे.
इथे एक ओढा आहे तो सध्या कोरडा आहे. काही ठिकाणी अगदी थोडे पाणी इथे आहे.
हा ओढा पावसात
भरून वाहत असतो त्या ओढ्यातील पाण्यामुळे तटबंदी ढासळू नये त्यासाठी मोठी
दगडी कमान बनविली आहे पाणी जाण्यासाठीची ती वाट आहे. अतिशय सुंदर कल्पनेने
गड बांधला गेला आहे.
इथे एक पडझड झालेला जुना राजवाडा आहे तो सोडला की पुढे एक तलाव लागतो. या तलावाच्या काठावर देवळीमध्ये शिवलिंग आहे. त्या पिंडीस
दोन लिंगे आहेत. अशा प्रकारची पिंड मी पहिल्यांदाच पाहिली. तलावाकडे तोंड करून उभे
राहिल्यास डाव्या हाताने जाणार्या पायवाटेने पुढे चालत राहायचे.
आमच्यासोबत असलेल्या महादेव
वाटाड्याने सांगितले की वाटेत छोटेसे गणेशमंदिर आहे. गडाचा पसारा खूपच मोठा असल्याने
गणेश मंदिराला भेट देण्यासाठी आम्ही येताना वळणार होतो त्यामुळे हत्ती सोंडेकडे चालत
राहिलो. इकडे फारसे ट्रेकर्स येत नसल्याने गड खूप शांत आणि स्वच्छ आहे. तसेच वाटा फार
मळलेल्या नाहीत त्यामुळे दगडगोट्यांवर पाय अचानक मुरगळतो.जाणाऱ्यांनी काळजी घावी.
इथे आमच्यातील एक मेंबर अचानक मागे राहून
गायब झाल्याने काही जण त्याची शोधाशोध करीत मागे गेले. आम्ही काहीजण जिथे पोहोचलॊ होतो
तिथेच थांबलो.तिकडे मोबाइलला रेंज नसल्याने पुन्हा छावणीपर्यँत जावे लागले. इकडे तिकडे
भटकत रहाण्यापेक्षा आणि आमच्या सगळ्यांच्या परतीची वाट पाहण्यापेक्षा ट्रेक मेम्बर
छावणीवर परत गेला होता. खरे तर असे कोणी अचानक गायब झाले तर खूप काळजी वाटते कारण या
जंगलात अनेक प्राणी आहेत. त्यामुळे एकट्याला टाकून जाणे किंवा गायब झाला तर दुर्लक्ष
करणे हे चुकीचे ठरते. सगळे जण छावणीत सुरक्षितरित्या पोहोचलेच पाहिजेतच. आमच्यातील
वाटाड्याला छावणीमध्ये पाठविण्यात आले तिथे हा मेंबर सुरक्षित आहे हे समजल्यावर सर्वांना
हायसे वाटले. "वो दुसरा तिसरा कोई नहीं था वो तो सूर्या था." कितीही महत्वाचे काम असो ग्रुपलीडर, को-लीडर किंवा ग्रुपमधील इतर कोणालाही किमान एका व्यक्तीला सांगून जाणे हा नियम
सगळ्यांनी पाळला पाहिजे.
छावणीवर मेंबर सापडल्याने ३५ मिनिटांनी पुन्हा आम्ही त्याला
घेऊनच हत्तीसोंडीच्या कोकण दरवाज्याकडे निघालो.जाताना डाव्या हाताचा आजूबाजूच्या घाटमाथ्यावरचा
परिसर लक्षवेधी होता. ही संपूर्ण माची राजगडाच्या
संजिवनी माचीप्रमाणे तटबंदीने संरक्षित केलेली आहे. तटबंदीला पायऱ्याही आहेत.
संध्याकाळ होत आल्याने पावले जोरात उचलावी
लागत होती.पुढे घनदाट जंगल तर एकीकडे कोकण दिसत असलेली खोल दरी होती. हत्तीसोंड दुरून
रुबाबदार दिसत होती. अंधार होत आल्याने आम्ही फक्त कोकण दरवाज्यापर्यंत जाऊन पुन्हा
पायपीट करून दोनलिंग असलेल्या पिंडीच्या तलावाजवळ आलो आणि तिथून त्या छोट्या गणेशमंदिराला
भेट दिली.
गणेश मंदिराच्या आवारातील भिंतीवर बसून क्षणभर विश्रांती घेतली. त्याठिकाणाहून
आजूबाजूचा घाटमाथा आकर्षित करतो. धरणाच्या विस्तीर्ण जलाशयाप्रमाणे विस्तीर्ण पिवळसर
गवताळ जमीन आणि दूरदूर पसरलेले हिरवे-निळे डोंगर माझ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आशेने
पाहत होते, खुणावत होते. खरंच ट्रेकिंगच आयुष्य किती रम्य बालपणाप्रमाणे आहे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे आणि
पुन्हा पुन्हा या रांगण्यावर यावे.
सदानंद आपटे सर इतिहासाची इतकी सुंदर माहिती
देत होते की पुन्हा पूर्ण गड फिरून पुन्हा-पुन्हा तोच इतिहास ऐकत रहावा वाटत होता.
परंतु अंधार झाल्याने छावणीकडे रवाना झालो. लीडर अनिकेत आणि विलास दादा यांनी ओल्या भेळची
सोय केली होती. त्या संध्याकाळी त्या गडावर
गवतावर बसून ओल्या भेळ खाण्याची मजा काही वेगळीच होती. त्यानंतर गरमागरम चहा आणि कॉफी.
अहाहा शब्दात वर्णन करणे फार कठीण आहे रे. त्यासाठी प्रत्यक्ष सह्यांकनमध्ये सहभागी
व्हावे लागेल. शिवमंदिरात लाईटची व्यवस्था नव्हती परंतु गॅसबत्तीची सोय छान होती. लहानपणी
गावाला लाईट गेली की एकतर गॅसबत्ती अथवा रॉकेलची बत्ती लावून अभ्यास करत असू. त्याची
आठवण प्रकर्षाने झाली. थोडी विश्रांती घेऊन तोंडावर पाणी मारून गरमागरम सूपचा आस्वाद
घेऊन आपटे सरांचे प्रतापराव गुर्जर यांच्या आयुष्यावरचे अनेक प्रसंग आणि इतर सर्वच
ऐतिहासिक युद्ध किस्से ऐकताना भारावून गेलो होतो. आपटे सरांना तर ते प्रसंग कथन करतानादेखील
गहिवरून आले होते. काय तो इतिहासाचा गाढा अभ्यास किती ती शौर्याविषयी आत्मीयता. आपटे
सर तुम्हाला आम्हा सर्वांचा सलाम. तुमचे इतिहासावरील भाष्य पुन्हापुन्हा ऐकायला आवडेल.
टाचणी पडली तरी आवाज यावा इतक्या शांत वातावरणात सुमारे एक तास इतिहासातील किस्से ऐकून लगेचच गरमागरम
खिचडी लोणचे, पापड, कोशिंबीर स्वीटडिश शिरा आणि थोड्या वेळाने गरमगरम मसालादुधाचा आस्वाद
घेतला. छावणीचे लीडर अनिकेत रहाळकर, विलास दादा, प्रकाश पवार, अमोल, कृष्णा खरंच आम्हाला माहेरी आल्याचा आनंद
दिलात तुम्ही. अन्नदाता सुखींभव.
तेथील शिवमंदिरात सर्वांना जागा होणार नसल्याने आम्ही
बरेच मेम्बर्स मंदिराच्या उघड्या प्रांगणात झोपायचे ठरवले. इथे तंबू नसल्याने ज्याने-त्याने
आपापल्या स्लीपिंग बॅगमध्ये घोरण्याच्या वेगवेगळ्या तालावर एकमेकांशी जुगलबंदी सुरु
केली आणि सकाळी उठून जोतो म्हणतो तो मी नव्हेच. जमिनीची गादी, टिपूर चांदण्यांच्या
आकाशाचे पांघरून करून मी आभाळाकडे पाहत बसले होते. मला काही झोप येत नव्हती. मी आपली दुसऱ्याला झोपऊन रात में तारे गिननेवाली.
रात्री १२ नंतर झोप यायला लागली तर रात्रीस वाऱ्याचा खेळ सुरु झाला. स्लीपिंग बॅग मध्ये
वारा घुसून बॅग उघडू पाहत होता. मी आपली डोळे बंद करून माझ्या मैत्रिणीला ढोसकून जागे
केले. तू पहिले जागी हो आणि तुझ्या डोळ्यावरची स्लीपिंग बॅग बाजूला करून तुझे तोंड
मला दिसेल अशी झोप आणि माझी स्लिपिंग बॅग कोण
उचलतंय ते बघ आणि लाईट कोण मारतंय ते बघ. त्या
शिवमंदिराच्या आवारात कोणाची बिशाद आपल्याला त्रास द्यायची ?? विलासदादाच ते रात्री
बऱ्याच उशिरापर्यंत जागे होते आणि पहारा करीत होते. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची
आठवण करून देत होते. हे नीट ठेव, ते नीट ठेव सकाळी सापडणार नाही. किती ती खरी काळजी.
लीडर्सहो. इतकी अफाट,रांगडी माया कुठून आणता ओ??
संदर्भ- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे, दुर्गदर्शन - गो.नी. दांडेकर,
नेटवरून साभार.
सह्यांकन -दिवस ३ रा- लेख भाग - ३
सह्यांकन -दिवस ३ रा
(वरील फोटो नारायणगडावरील सर्वात उंचावरील आहे.)
पारपोली घाटाचे संरक्षण व जकात वसूली केंद्र या किल्ल्यावर होते.कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. यापैकी आंबोली घाटवर व कुडाळ वरून घाटावर जाणाऱ्या हणमंत घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मनोहर- मनसंतोषगड हे किल्ले बांधण्यात आले. मनोहर- मनसंतोषगड हे जोड किल्ले त्यावरील अवशेषांसह आजही दिमाखाने उभे आहेत. या किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे या गडावर १ महिना वास्तव्य होते. तारकर्ली- देवबाग (मालवण) येथे समुद्राला मिळणार्या कर्ली नदीचा उगम याच किल्ल्यांच्या परीसरात होतो. ४८ किमी अंतर कापून ही नदी समुद्राला मिळते.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून
कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटमार्ग असले तरी त्यातील आंबाघाट, बावडाघाट, फोंडाघाट व
पारपोली घाट हे चार महत्वाचे घाटमार्ग होते. यातील पारपोली घाटांचे वैशिष्ट म्हणजे
याच्या माथ्यावर महादेवगड व नारायणगड हे किल्ले आहेत तर पायथ्याशी मनोहर-मनसंतोषगड
ही दुर्गजोडी आहे. कोकणातील बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील
बाजारपेठात जात असे. यातील सावंतवाडी संस्थानाच्या हद्दीत असलेल्या पारपोली घाटावर
लक्ष ठेवण्यासाठी सावंतवाडी संस्थानाचे अण्णासाहेब फोंडसावंत यांनी १७०९ ते १७३८ दरम्यान
नारायणगड हा किल्ला बांधला. पारपोली घाटाचे संरक्षण व जकात वसूली केंद्र या किल्ल्यावर
होते. इ.स. १७७२-७३ दरम्यान सावंतांचे कारभारी जिवाजी विश्राम यांनी महादेवगड व नारायणगड
जिंकुन रांगणा देखील घेतला तेव्हा करवीर राणी जिजाबाई यांनी स्वतः स्वारी करत महादेवगड
व नारायणगड हे किल्ले जिंकुन घेतले पण काही काळातच सावंताना परत केले. यानंतर जानेवारी
१७८८ मध्ये करवीरकरांनी फितुरीने घेतलेला नारायणगड इ.स.१७९३ मध्ये सावंतांना परत केला.
२० नोव्हेंबर १८०४ मधील एका पत्रानुसार करवीरकरांच्या ताब्यात असलेला नारायणगड सावंतानी
हल्ला करून जिंकुन घेतला. इ.स. १८२८ मध्ये फोंडसावंत तांबुळकर यांनी सावंताविरुद्ध
बंड करत गडाचा ताबा घेतला पण इंग्रजांची फौज सावंतांच्या मदतीस येताच त्यांनी पळ काढला.
इ.स.१८३२ पर्यंत नांदता असलेला हा किल्ला नंतरच्या काळात सावंतांची आर्थिक परीस्थिती
डळमळीत झाल्याने ओस पडला तो कायमचाच. (नेटवरून साभार -सुरेश निंबाळकर)
नारायण गडाच्या बाजूला (उत्तरेला) ३ सुळके असलेला डोंगर दिसतो. याला स्थानिक लोक गंगोत्री लगिनवाडा म्हणतात. या सुळक्यांमधील मोठ्या दंडगोलाकार सुळक्याला म्हातारीचा गुंडा (दगड) म्हणतात. त्याहून लहान सुळक्यांना नवरा व नवरी म्हणतात. या ठिकाणी सांगितली जाणारी दंतकथा आणि सह्याद्रीच्या इतर भागात सांगितली जाणारी कथा यात विलक्षण साधर्म्य आहे.
नारायणगड गड एका खिंडीमुळे सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळा झालेले आहे. ती खिंड ओलांडून आलेल्या वाटेने परत न जाता समोरच्या डोंगरावर चढल्यास दाट जंगलात दोन देवस्थान आहेत. एकाला स्थानिक लोक लिंगी म्हणतात. येथे शिवलिंग व नंदी आहे. दुसरे देवस्थान म्हार्ताळ या नावाने ओळखले जाते. येथे उघड्यावर काही मुर्त्या आहेत. स्थानिक वाटाड्या असल्या शिवाय योग्य जागा सापडणे अशक्य आहे.
(नारायणगड ट्रेक सुरु कारण्याआधी सूचना देताना राजनसर आणि सह्यांकनची पहिली बॅच )
आम्ही सह्यांकनची पहिली बॅच
दिनांक २३डिसेंबर २०१९ रोजी सकाळी बॅचलीडर आदित्य आणि अनिकेत यांच्या सूचनेवरून रांगणा
किल्ल्यावरून सकाळी ७च्या सुमारास निघालो आणि तांबेगाव या ठिकाणी मंदिरात छान माझ्या
आवडीचा साबुदाणा खिचडीचा नास्ता करून नारायणगडकडे रवाना झालो. साडेअकराच्या सुमारास
नारायणगडाच्या पायथ्याशी पोहोचून तेथील गावातील पाण्याच्या टाकीतून थंडगार पाणी भरून
घेऊन लगेच लीडर रजन सरांच्या सूचनेनुसार ट्रेकिंग ड्रेसकोडमध्ये ट्रेक सुरु केला.
(साळींदराने केलेली गवतातील छोटी वाट दाखवताना कृष्णा गाईड)
वनविभाग खात्यामध्ये कामाला असलेला गावातील कृष्णा गाईड सोबत घेतल्याने त्याने खूप
महत्वाची उत्तम माहिती या ट्रेकदरम्यान दिली. बिबट्या, वाघ, गवा, तरस, साळींदर, अस्वल, रानडुक्कर
अश्या अनेक प्राण्यांच्या पायाचे थोडे ताजे-ताजे ठसे दाखवले.
तमालपत्र,शिकेकाई आणि अनेक औषधी वनस्पती
प्रत्यक्षात दाखवल्या.
या जंगलात असलेल्या गेळेझाडाच्या फळावरून गेळे हे नाव गेळेगावाला पडले असे
कृष्णा गाईडने
सांगितले. प्राण्यांच्या विष्ठादेखील ओळखून तो सांगत होता. त्याचे फोटो
काढायलादेखील त्या दिवशी मागणी होती. खरंच निसर्गाविषयी जाणून घेण्याच्या
अशा कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत. घनदाट जंगल पार करताना मधेच दरी आणि
दरीतून दिसणारा कोकण भाग रमणीय दिसत
होता. रांगणा गडावर ज्याप्रमाणे संध्याकाळी दरीच्या कडेकडेने पायवाट चालत
होतो अगदी
तशीच वाट इथे होती.
नारायणगडावर दुपारी दीडच्या सुमारास पोहोचल्यावर गडावर जुन्या शिवकालीन
बांधकामाचे राजवाड्याचे वास्तूंचे आणि दगडी वस्तूंचे अवशेष दाखवले. उदा.घराचा चौथरा,वाटणासाठी
वापरण्यात येणारा पाटा, इ. सध्या गडावर तसे बाकी काही पहाण्यासारखे नाही. याशिवाय गडावर
कोरडा पडलेला एक साचपाण्याचा तलाव आहे. गडाच्या काही भागात ढासळलेली तटबंदी पहायला
मिळते. दक्षिणोत्तर पसरलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची जवळपास २३३० फुट आहे.
(गडावरील पुरातन वस्तूंचे अवशेष)
भुकेची वेळ झाल्याने बिस्कीट
चिक्कीसारखे थोडेसे काहीतरी खाऊन गडावरून निघालो.त्या दिवसाचा गाईड कृष्णा म्हणाला
की फॉरेस्ट खात्यातर्फे इथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कोणी प्राण्यांची शिकार करतात
का यावर नजर ठेवली जाते आणि कोणकोणते प्राणी या जंगलात आहेत ते यावरूनच समजते. येताना
गडवाटेच्या मध्यात एका ठिकाणी पुरातन गणपती मंदिर आहे तिथे भेट दिली. मंदिराची पूर्ण
पडझड झाली आहे फक्त मुर्त्या तेवढया शाबूत आहेत.इथे पितळेच्या घंटा बांधलेल्या आहेत
यावरून असे समजले की गावातील मंडळी इथे येत असावीत.
(गडाच्या मध्यात असलेले शिवलिंग)
गडावरून दुरवर पश्चिमेला असलेली
मनोहर-मनसंतोष ही दुर्गजोडी, पुर्वेला कावळेसाद पॉंईंट व खाली लांबवर पसरलेला कोकण
परीसर तसेच पारपोली घाट इतका दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. मनोहर- मनसंतोष हे गड एका खिंडीमुळे एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. यापैकी मनोहर गडावर पूरातन अवशेष आहेत व तो चढण्यासही सोपा आहे. तर मनसंतोष गड हा एक सुळका असून त्यावर चढण्यासाठी प्रस्तरारोहण करावे लागते. ही किल्ल्यांची जोडगोळी आंबोली घाटाच्या परीसरात असल्यामुळे पावसाळ्याचे ४ महीने सोडून वर्षभर गडावर जाता येते.गेळे गावातून संपूर्ण किल्ला
पाहुन परत येण्यास ३ तास पुरेसे होतात. आम्ही माहिती घेत घेत थांबत
थांबत आल्याने आम्हाला सुमारे चार तास लागले. आंबोलीतून एका दिवसात महादेवगड व नारायणगड
हे २ किल्ले सहज पहाता येतात.
नारायणगड गड एका खिंडीमुळे सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळा झालेला आहे. आंबोली घाटाच्या परीसरात असल्यामुळे पावसाळ्याचे ४ महीने सोडून वर्षभर गडावर जाता येते.
नारायण गडाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गेळे गावातून गडावर जातांना फारसा चढ नाही आहे. तर वाट जास्त सरळसोट व काही ठिकाणी चढ -उतार असलेली आहे. माणसांचा या भागात वावर नसल्यामुळे वाटेत व आजूबाजूला घनदाट अरण्य आहे. त्यामुळे नशिबात असेल तर वन्यप्राणी दर्शन देऊ शकतात. आंबोलीला येणाऱ्या आणि वेगळे काही पाहू इच्छीणार्यांसाठी हा तीन तासांचा सुंदर ट्रेक आहे.
पुण्यापासून बसने गेले तर सुमारे सात तासात नारायणगडजवळ पोहोचता येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण पुण्यापासून जवळपास ३६० किमी अंतरावर आहे. मुंबई पासून सावंतवाडी ५२१ किमीवर आहे. सावंतवाडीहून एसटीने आंबोलीला जाता येते. आंबोली पासून गेळे हे नारायण गडाच्या पायथ्याचे गाव ७ किमी अंतरावर आहे. गेळे गावातील मंदिरा पर्यंत गाडी जाते. पुढे सिमेंटच्या रस्त्याने चालत गेल्यावर उजव्या बाजूस शेतात पायवट जाताना दिसते. या पायवाटेने गडावर जाता येते. पण गडावर जाण्यासाठी कृष्णासारखा वाटाड्या सोबत असणे आवश्यकच आहे. गडावर रहाण्याची सोय नाही. जेवणाची सोय आपण स्वत: करावी.गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
(नारायणगडाच्या वाटेतून दिसणारे सुळके)
मनोहर-मनसंतोषगड तेलबैलाच्या भिंतीप्रमाणे दोन गड आहेत.
(वरील फोटो मी काढलेला नाही. मनोहर-मनसंतोषगड कसे आहेत हे समजावे यासाठी नेटवरून घेतला आहे.)
गडावरून परत येताना एका ठिकाणी कृष्णाने बाजूला दिसणारे मनोहर- मनसंतोषगड दाखवले. बघता बघता दुपारी साडेतीनच्या सुमारास ट्रेक संपून चक्रम हायकर्सने आणलेले दुपारचे जेवण ( भाजी पोळी, लोणचे आणि चविष्ट अप्रतिम असा गाजर हलवा)करून घेतले आणि आमची बस पारगडाकडे रवाना झाली.
(पारगडावरील मारुती मंदिर)
घाट फिरून पाचच्या सुमारास पारगडाच्या पायथ्याशी आमची बस पोहोचली. पूर्ण वजनाची सॅक घेऊन ३६०पायऱ्या वर चढून जाताना जीवावर आले होते. परंतु पारगडावरून सूर्यास्त पाहायला मिळेल या आशेने त्या ३६० पायऱ्या कधी चढून गेलो समजले नाही. गेल्या गेल्या फडकत भगवा आणि सुंदर असे मारुती मंदिर स्वागताला होते. गेल्यावर लगेच छावणीवर जड सॅकचे ओझे खाली ठेवून फक्कड चहा घेऊन लगेच लीडर्स आमच्या बॅचला गड फिरायला घेऊन गेले.
(पारगडाची माहिती देताना भाऊ वैशंपायन)
पारगड म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांच्या हद्दीवर वसला आहे. त्यामुळे तिन्ही राज्यांचा परिसर एकावेळी पाहता येईल हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता. गडाची माहिती देता देता आजूबाजूचा परिसर हिंडताना खूप प्रसन्न वाटत होते. गडाचा विस्तार तसा मोठा आहे. ढगाळ वातावरण जरी असले तरी सूर्यास्ताच्यावेळीची ती शांतता अनुभवता आली. गोव्याचा समुद्र दुरून दिसला तर दुरूनच पाय बुडवल्याचा अनुभव घ्यावा असे मनोमन वाटले परंतु ढगाळ वातावरणामुळे सूर्य नीट दिसला नाही आणि गोव्याचा समुद्रदेखील दिसला नाही.आम्ही ज्या रस्त्याने आलो तो डांबरी घाटवळणाचा रस्ता मात्र स्पष्ट दिसला.
तेथील डोंगररांगा मात्र दुरून स्मित हास्य करताना गोड दिसल्या.
सह्याद्रीची मुख्य रांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेत सर्वात दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड किल्ला होय. कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुका आहे.चंदगड या तालुक्याच्या गावापासून साधारण ३० कि.मी. अंतरावर पारगड आहे. पारगड नावाचे गाव किल्ल्यामध्येच वसलेले आहे.याचे मुख्य नाव अजिंक्य पारगड असे आहे. पारगडची उंची २४२०फूट इतकी आहे. हा गिरीदुर्ग प्रकारात हा गड मोडतो. चढाईची श्रेणी सोपी आहे. जवळचे गाव कोल्हापूर असून डोंगररांग कोल्हापूर आहे.
(पारगडावरील स्वच्छ पाण्याचे तळे)
सध्याची अवस्था व्यवस्थित पारगड हा महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर वसलेला नितांत सुंदर किल्ला आहे. गडाचे क्षेत्रफळ अंदाजे ४८ चौरस एकर आहे. गडाला पूर्व,पश्चिम व उत्तरेला नैसर्गिक ताशीव कडयाची तटबंदी आहे. दक्षिणेला थोडया उतारानंतर खोल दरी आहे. सन १६७६ मध्ये पोर्तुगीजावरील स्वारीवरुन परत येताना शिवरायांनी हया डोंगराचे भौगोलिक स्थान व महत्व ओळखले आणि पोर्तुगीज, अदिलशहा व सावंतवाडीचे खेम सावंत यांच्यावर कायमची जरब बसविण्यासाठी हा किल्ला वसविला. शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत किल्ल्याची वास्तुशांत व गडप्रवेश झाला. त्यावेळी किल्लेदार रायबा मालुसरे व त्यांच्या सहकाऱ्यांना राजांनी आज्ञा केली की, ‘चंद्र सुर्य असेतो, गड जागता ठेवा’. राजांच्या या आज्ञेचे पालन या गडावरील मावळर्यांीनी अद्याप पर्यंत केले आहे. स्वराज्यातील पार टोकाचा किल्ला म्हणून याचे नाव "पारगड" ठेवण्यात आले होते.
पारगडचा थोडक्यात इतिहास :गोव्याच्या पोर्तुगिजांवर वचक ठेवण्यासाठी १६७६ मध्ये शिवरायांनी या गडाची निर्मिती केली.या मोक्याच्या किल्ल्यावर त्यांनी तानाजीचा मुलगा,रायबा मालुसरे याला किल्लेदार म्हणून नेमले.गडाची वास्तुशांत व गडप्रवेश यासाठी महाराजांचा या गडावर निवास होता. १६८९ मध्ये शहजादा मुअज्जम व खवासखान र्यांहनी गड जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्या लढाईत तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे र्यांडना वीर मरण आले. त्यांची समाधी गडावर आहे. नंतरच्या काळात पारगड करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात गेला. गडावर उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे ब्रिटीशांनी सुरु केलेला तनखा, गडावरीलमावळ्यांच्या कुटुंब प्रमुखाला १९४९ सालापर्यंत मिळत होता. परंतु भारत सरकारने तो खंडीत केला व तेव्हापासून सर्व गडकरी गडावर कोणतेही उत्पन्नाचे नसल्यामुळे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही गडावर स्वाभिमानाने दिवस काढत आहेत.
(पारगडावरील अस्ताला जाणारा सूर्य)
सन २००२ मध्ये विद्यमान गडवासीयांनी सरकार दरबारी केलेल्या अथक प्रयत्नाने गडावर जाण्यासाठी थेट डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याने गडाचा उत्तरेकडील कडा डावीकडे ठेवून पुढे गेल्यावर डाव्या हाताला गडाचा शिवकालीन पायऱ्यांचा राजमार्ग लागतो. सरळ जाणारी सडक घोड वाटेने सर्जा दरवाजा मार्गे गडावर जाते व उजवीकडून गोव्याला जाते. शिवकालीन ३६० पायऱ्या चढून गेल्यावर सपाटीवर तोफांचे अवशेष व डौलाने फडकणारा भगवा ध्वज आपले स्वागत करतो.
गडावर प्रवेश करताच ३ तोफा आपले स्वागत करतात. डाव्या हातास मारुतीचे मंदिर आहे. मंदिरा समोरच घडीव दगडातील समाधी आहे. पुढे गेल्यावर पारगडवासियांची छोटी वस्ती सुरु होते. परंतु बऱ्याच घरांना कुलूप होते. पायवाटेने पुढे गेल्यावर शाळा व त्यासमोर गडाची सदर आहे. या सदरेवरच शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा आहे. पुढे गेल्यावर उजव्या हातास गडवासीयांनी अत्यंत जिद्दीने जिर्णोध्दार केलेले भवानी मातेचे भव्य मंदिर लागते.
पारगडाचे आणि आजूबाजूचे निसर्गसौन्दर्य लोभस सुंदर आहे. आम्ही पारगडावरील छावणीलीडर महादेव वैशंपायन यांच्याकडून गडाची संपूर्ण माहिती घेऊन सूर्यास्त पाहून मंदिराकडे गेलो तेव्हा अंधार होत आला होता. त्यामुळे मंदिर बंद झालं होतं परंतु आम्ही इतक्या दुरून आलोय आणि पहाटे निघणार असे म्हटल्यावर मंदिराच्या पुजाऱ्यांनी मंदिराचे दार उघडून आम्हाला आत जाण्यास परवानगी दिली त्यामुळे आम्हाला इतके सुंदर मंदिर पाहता आले.
(पारगडावरील भवानी मातेचे मंदिर )
या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवकालीन मूळ दगडी मंदिर आहे. या मंदिरातील भवानी मातेची मूर्ती नेपाळच्या गंडकी शिळेपासून तयार केली असून, ती प्रतापगडावरील भवानी मातेची आठवण करुन देते. भवानी मंदिरापलिकडे प्राचिन गणेश मंदिर आहे. गडाच्या तट फेरीस सुरवात केल्यावर आपणांस गुणजल, महादेव, फाटक व गणेश तलाव लागतात. गडावर शिवकालीन १७ विहिरी आहेत, पैकी ४ चांगल्या अवस्थेत आहेत बाकी बुजलेल्या अवस्थेत आहेत. तटाच्या पश्चिमोत्तर फेरफटक्यात आपणास भालेकर, फडणीस व महादेव असे ३ डौलदार बुरुज दिसतात. याशिवाय माळवे, भांडे, झेंडे बुरुज अशी नावे असलेले आणखी बुरुजही गडास आहेत. गडाच्या उत्तरेकडील बाजूस दरीच्या काठावर महादेव मंदिर आहे. मुलांच्या खेळण्याच्या पटांगणा पलिकडे तुळसाबाई माळवे यांची १६८० मधील समाधी आहे, तर गडाखालील मिरवेल या गावात घोडदळ पथकाचे प्रमुख खंडोजी झेंडे यांच्या पत्नी म्हाळसाबाई यांचे स्मारक आहे.
पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे ११ वे वंशज बाळकृष्ण मालुसरे, शेलार मामांचे वंशज कोंडाजी शेलार, शिवकाळातील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे यांचे वंशज, कान्होबा माळवे इत्यादी वास्तव्यास आहेत. बाळकृष्ण मालुसरे व्यावसायानिमित्त अनगोळ, बेळगावला असतात. त्यांचेकडे तानाजींची तलवार व शिवरायांच्या गळयातील सामुद्री कवड्यांची माळ जतन केलेली आहे. अशा फक्त ५ माळा महाराष्ट्रात उपलब्ध असून, त्या सातारच्या राजवाडयात, प्रतापगडावरील भवानीच्या गळयात, कोल्हापूर महालक्ष्मीच्या गळयात व तुळजापूरच्या भवानीच्या गळयात आहेत. माघी महिन्यातील उत्सवात व दसऱ्याच्या उत्सवात गडावरील मावळे आपल्या पूर्वजांची शस्त्रास्त्रे प्रदर्शित करतात.
गडावर निवासाची व्यवस्था आहे.गडावर जेवणाची सोय नाही. पाण्याची सोय गडावरील तलावात व विहिरीत पिण्यायोग्य पाणी आहे.गड पाहाण्यासाठी अंदाजे २ ते ३ तास लागतात. संपूर्ण गड फिरून झाल्यावर आम्ही छावणीठीकाणी आलो.चिवडा आणि फक्कड चहाचा आस्वाद घेऊन घराच्या एका प्रांगणात बुटातून पाय मोकळे करून गप्पा मारत बसलो. माझ्या फोनची बॅटरी रांगणावरच संपली होती. पारगडावर आमची सह्यांकन छावणी एका घरात असल्याने आणि वरती लाईटची सोय असल्याने फोन चार्जिंगची सोय झाली.
ट्रेकभटकंतीमध्ये मी सहसा फोन विमानमोडवर ठेवते परंतु यावेळी फोन सतत वापरल्याने आणि ५ दिवसांचा ट्रेक असल्याने आपोआप बंद पडला होता. नंबर लावून दोनचार्जरवर आम्ही लेडीज गँगने थोडेथोडे का होईना फोन चार्ज. रात्री छावणीमध्ये उकडीची तांदुळाची भाकरी, चवदार पीठले, वरणभात, पापड असा छान बेत केलेला फस्त करून फ्रेश होऊन आराम करण्यास गेलो. नीलिमाने हाताने भाकरी थापून चुलीवर भाकरी बनवण्याचा आनंद घेतला. अजून एका मेम्बरने आईला दाखवण्यासाठी भाकरी भाजण्याचा व्हिडीओ बनवून घेतला. छावणीवर असे खूप छोटेछोटे किस्से गिरवून ते पुन्हा पुन्हा आठवत बसावेत आणि फोटोज आणि व्हिडीओज पाहत बसावेत. त्यासाठी सह्यांकन जरूर करावे. पारगडावरचा छान अनुभव पदरात घेऊन सकाळी लवकर उठून नास्ता चहा घेऊन तयार होऊन छावणी लीडर्स मनीषा फडके, लांबा सर,महादेव वैशंपायन यांचे आणि जेवण बनवणाऱ्या अन्नपूर्णांचे आभार मानून आम्ही कलानिधीगडाकडे रवाना झालो. सह्यांकनचा तिसरा दिवस उत्तम नियोजनानुसार उत्तमच पार पडला. धन्यवाद लीडर्स. चक्रम हायकर्स रॉक्स.
(नंदकिशोर सरांनी पारगडावर सूर्यास्तावेळी घेतलेला फोटो )
सह्यांकन,कलानिधीगड ब्लॉग भाग ४

कलानिधीगड ऊंची- ३३२९ फूट
किल्ल्याचा प्रकार - गिरीदुर्ग
डोंगररांग- कोल्हापूर
जिल्हा- कोल्हापूर
चढाई श्रेणी- मध्यम
दिनांक २४ डिसेंबर २०१९
कलानिधीगडाचा थोडक्यात इतिहास- सभासद बखर, चित्रगुप्तांची बखर, चिटणिसांची बखर, शिवदिग्विजय, शिवप्रताप, एक्याण्णव कलमी ऊर्फ रायरीची बखर, शेडगावकर बखर, एकशे नऊ कलमी बखर इत्यादी बखरींचा शिवचरित्राच्या अभ्यासासाठी उपयोग केला जातो. परंतु या सर्व बखरींमध्ये ‘सभासदाची बखर’ सर्वांत जुनी आणि अधिक महत्त्वाची मानली जाते. बखरकारांपैकी कृष्णाजी अनंत सभासद हाच बखरकार शिवछत्रपतींचा समकालीन होता. त्याने शिवछत्रपतींच्या जीवनातील काही घटना प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. त्यामुळे अर्थातच ‘सभासद बखर’ ही इतर कोणत्याही बखरीपेक्षा अधिक विश्वसनीय मानली जाते.
कृष्णाजी अनंत सभासदांचे वंशज कोल्हापुरी दरबारात चिटणीसाकडील काम पाहत असावेत, असा इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा तर्क आहे. खुद्द कृष्णाजी अनंत सभासद हे शिवाजी महाराजांपासून ते राजाराम महाराजांच्या अखेरीपर्यंत सभासद (सल्लागार) म्हणून काम पाहत होते.
सभासदाने या बखरीत शिवजन्म, शिवाजी महाराजांची बंगलोर भेट, जुन्नर शहर लूट, राजगड बांधणी, चंद्रराव मोरे प्रकरण, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे तोडणे, मिर्झाराजे यांची भेट, शिवछत्रपतींची औरंगजेबाच्या कैदेतून सुटका, सिद्दी जोहरचा वेढा, तानाजी सिंहगड घेतो, शहाजी महाराजांचा मृत्यू, राज्याभिषेक, दक्षिण विजय, शिवाजी-संभाजी मतभेद, शिवछत्रपतींचा मृत्यू यासारखे प्रसंग मोजक्या आणि नेमक्या शब्दांत लिहिलेले आहेत.सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. हेरेकर सावंत भोसले, तांबूळवाडीकर सावंत यांचा कलानिधीगड किल्ल्याशी प्रामुख्याने संबंध आला. गडाच्या दक्षिण बाजूकडील तटबंदीच्या मजबुतीकरणा संबंधात करवीरकर छत्रपतींच्या कागदपत्रात या गडाचा उल्लेख आलेला आहे. पोर्तुगिज दप्तरातही कलानिधीगडाचा वारंवार उल्लेख येतो.
वाचलेली खास उल्लेखनिय गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु.ल.देशपांडे यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर असे होते. त्यांचे पूर्वज या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचे मूळ गावही चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी हे होते. या गावावरुनही त्यांना जंगमहट्टीकर या नावाने ओळखले जाई, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पु.ल. देशपांडे यांना कलानिधीगडकर या नावाने हाक मारीत असत.
दिनांक २४डिसेंबर २०१९ रोजी सकाळी चहा नास्ता करून छावणीकरांचा निरोप घेऊन पारगडावरील छावणीवरून दुपारच्याजेवणासाठी वांगेबटाटा भाजी आणि चपाती डब्यामध्ये बांधून घेऊन कलानिधीगडाकडे रवाना झालो. जाताना घनदाट जंगलातून आमची ऐसपैस बस ऐटीत राणीसारखी निघाली होती. छोटे डांबरी रस्ते, काही ठिकाणी कच्चे रस्ते मोहवीत होते. हिरवेगार जंगल आणि वळ्णावळणाला येणारी कोवळी सूर्यकिरणे पाहून बसमधून खाली उतरून चालत निघावेसे वाटत होते.
साडेनऊच्या सुमारास कालिवडे गावात पोहोचून लीडर्सने बस लावण्यासाठी जागा शोधली आणि लगेच ट्रेक सूर केला. केव्हाही न पाहिलेल्या गोष्टीचे आपल्याला नवलच असते. कालनिधीगड दुरूनच सुंदर दिसत होता. गडावर जाण्यासाठी मोठा रस्ता बनवण्याचे काम सुरु आहे असे दिसले. जंगलाचा मोठाच्या मोठा भाग खोदलेला पोखरलेला दिसला. किल्ल्यावर जाण्यासाठी चार चाकी वाहन, ट्रॅक्टर, जाईल असा हाच कच्चा दगडी रस्ता सुद्धा काढला आहे. हा गडाला लांबची फेरी मारून वरती येतो.
आम्ही ह्या दगडी रस्त्याने न जाता पायवाट पकडली आणि गड चढायला सुरुवात केली.
अर्ध्या तासावर असलेले एक मंदीर पार करून पुढे जात राहिलो आजूबाजूला दोन-तीन पाण्याचे बंधारे आणि एक प्रशस्त असे जंगमहट्टी धरण जणू थंडी असल्याने अजून कोवळे ऊन खात पहुडले होते. गडावर फडकणारा भगवा त्याच्या फडकण्यातून हात करून हॅलो करीत असताना भासला. सह्याद्री हा असाच आकर्षूण घेणारा आणि सर्वांना सामावून घेणारा आहे. रमतगमत ११च्या सुमारास गडावर पोहोचलो.

कलानिधीगडाचे प्रवेशद्वार लहान असले तरी फारच देखणे आहे. चांगल्या अवस्थेत असणारा हा दरवाजा गडाचा दुसरा दरवाजा आहे. कारण किल्ला फिरताना आम्हाला भग्न झालेला गडाचा मुख्य दरवाजा दुसऱ्या बाजूला दिसला. दरवाजातून आत गेल्यावर आपणास गड दोन भागात विभागल्याचे दिसते. एका भागात दूरसंचार खात्याचा मनोरा आहे तर दुसऱ्या भागात गडाचे अवशेष आहेत. दरवाज्यासमोर डाव्या हातास आपणास अनेक जुनी बांधकामे दिसतात. गडावर दरवाज्याजवळच तोफा आहेत.
मुख्य दरवाज्यातून उजवीकडे आम्ही गडाच्या पश्चिम तटबंदीवर चढून पुढे जाऊन पहिले येथील उतारावरचे जंगल अतिशय घनदाट आहे. आजूबाजूचा नजारा खूपच सुंदर दिसतो. चारी बाजूने जलाशये नजरेस पडतात. या ठिकाणी एक भव्य बुरुज लागतो. यापुढील तटाचा काही भाग पाडून दूरसंचार खात्याने वर येण्यासाठी सडक बनविलेली दिसते. ही गोष्ट वगळता संपूर्ण गडाची तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे. या सडकेने खाली उतरुन गडाकडे पाहिल्यास गडाच्या तटबंदीचे बुरुजांचे फारच विलोभनीय दृष्य दिसते.रुबाबदार व्यक्ती दिमाखाने स्वागताला उभी आहे असा भास होतो.
पुढे गेल्यावर तटबंदीच्या आत एक पायऱ्या असलेली मोठी खोली दिसते ती विहीर होती. येथील विहीर म्हणजे दगडाची प्रचंड मोठी खाण आहे. येथील आयताकृती विहिरीची लांबी अंदाजे चोवीस मीटर, रुंदी अठरा मीटर आणि सरासरी खोली पाच-सहा मीटर आहे. किल्ल्याच्या बांधकामातील दगड ह्याच खाणीतून काढले जायचे वापरलेल्या दगडाचे काम झाल्यावर अश्या खाणींचा उपयोग नंतर विहिरी म्हणून केला गेला. सामानगडसारख्या किल्ल्यांवर ह्या खाणींना पाणी लागले आणि त्या ठिकाणी एकच मोठीच्या मोठी विहीर तयार झाली असे पहिले.
कलानिधीगड या किल्ल्यांवर खाणीमध्ये पाणी लागलेले दिसत नाही. त्यामुळे खाणीच्या तळाशी अजून खोल खणून विहिरी काढण्यात आल्या. कलानिधीगडावर ह्या खाणीत तीन कोपऱ्यात तीन विहिरी खणल्या आहेत. ह्यातील एकच विहीर सध्या वापरात आहे. बाकी दोन बुजलेल्या स्थितीमध्ये आहेत. वापरात असलेली विहीर अंदाजे साठ फूट खोल va ह्यातील पाण्याची पातळी अंदाजे पन्नास फुटांवर असावी. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची ही एकमेव सोय आहे, त्यामुळे किल्ल्यावर येताना सोबत लांब दोर असलेला चांगला. या विहिरीच्या संकुलात अनेक पायऱ्या, देवळया व चौथरे, भुयार, चोरवाट इत्यादी आढळतात. महाराजांच्या दूरदृष्टीला सलाम. कोणतेही गडकिल्ले बांधण्याआधी तिथे पाण्याची सोय करावी त्यासाठी त्याकाळी गडांचे बांधकाम तसे केले गेले त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा किल्ल्यांवर पाण्याची अनेक टाकी बघायला मिळतात.युद्धामध्ये जिथे पाण्याची जागा आहे तिथे विष टाकून ते निरुपयोगी करणे ही सुद्धा एक नीती होती. त्यामुळे अश्या वेळेस गडावर अनेक टाकी, तेही किल्ल्याच्या वेगवेगळ्या भागात असणे केव्हाही सोयीचेच होते.
विहिर संकुल पाहून गडाची तटबंदी पाहून फडकणाऱ्या भगव्याकडे ग्रुप फोटो घेण्यास वळलो. साध्या साडीवरसुद्धा सुहासिनींच्या केसात गजरा जसा शोभून दिसतो तसाच गडावर फडकणारा भगवा गडाची शोभा आणि शान वाढवतो. गडाचा विस्तार लहान असून इतक्या कमी जागेत किल्ल्यावर आवश्यक अश्या सर्व प्रकारच्या इमारती उभारल्या आहेत. कलानिधीगड ज्या डोंगरावर वसला आहे, त्याची रचना वैशिष्टयपूर्ण आहे. गड आटोपशीर असून उत्तम तटबंदीने वेढलेला आहे. गडावर रहाण्याची सोय नाही.जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.गडावरील विहिरीत पिण्यायोग्य पाणी आहे.कलानिधीगडावर पोहोचण्यास कालिवडे गावातून १ ते दीड तास लागतो.
महिपालगड आणि कलानिधीगड एकाच मार्गावर असल्याने ते एकाच वेळी करू शकतो तसेच स्वतःची गाडी असल्यास दोन्ही गड एका दिवसात पाहून होतात.गड किल्ल्यांना परमोच्च महत्व प्राप्त झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच. गड किल्ल्यांचा आधार घेऊन आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. महाराजांनी योग्य जागा हेरल्या. मोक्याच्या जागेच्या आजूबाजूच्या डोंगरावर बुरूज-तटबंदीचा साज चढवून किल्ल्यांची उभारणी केली.

बहुतांश किल्ल्यांवर फक्त दरवाजे, तटबंदी आणि बांधकामाच्या ज्योती शिल्लक राहिल्या आहेत.परंतु काही गडांवर शौचकूप बांधलेली होती ती या गडावर ती पहावयास मिळतात. पूर्वीच्या काळी तटावर चोवीस तास पहारेकरी असायचे ह्या पहारेकऱ्यांसाठी केलेली ही सोय होती जेणेकरून त्यांना नित्यविधींसाठी तटापासून लांब जायची गरज भासू नये. 'शौचकूप' हे एक बांधकाम असं आहे की जे अजूनही आपल्या दैनंदिन जीवनाशी जास्त निगडित आहे शिवाय त्याच्या रचनेत फारसा बदल झालेला दिसत नाही. अशी अजून तीन शौचकूप ठराविक अंतरावर आहेत. येथे गडफेरी पूर्ण झाली.
(गडावरील घरांचे, वाड्यांचे अवशेष )
संपूर्ण किल्ला त्या काळी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य अशा गडकिल्ल्यांची उभारणी करण्यात आली. प्रत्येक किल्ल्यावरील बांधकामाला एक वेगळा अर्थ आहे. हे बांधकाम घडविणारा कारागीर वेगळा आहे, त्यामुळे त्यात विविधता आहे. ह्या बांधकामातच आपल्या इतिहासाची आणि समाजरचनेची पायामुळं आहेत.किल्ल्यांना नुसत्या भेटी देऊन परतण्यापेक्षा,वेळ देऊन जर ते समजून घेतले तर स्वराज्याचा इतिहास अजून चांगल्या प्रकारे लक्षात राहील शिवाय त्या वास्तूबद्दल, आपल्या पूर्वजांबद्दल मनात आदरभाव निर्माण होऊन समाधानाने घरी परतू.
(खालील फोटोमध्ये गडावर लहान मुलांची सहल घेऊन आलेली शिक्षिका- शिक्षक आणि शाळेची मुले आहेत शिक्षिका- शिक्षकखरंच ग्रेट आहेत. आजच्या मुलांना गडांची माहिती देणे आणि इतिहास समजावून सांगणे गरजेचे आहे.)
गडाची फेरी पूर्ण करून तिथे जास्त वेळ न घालवता लगेच गड उतरलो एका छोट्या मंदिरात दुपारचे जेवण करून एक तासाचा प्रवास करून प्रतापराव गुर्जर स्मारकाजवळ आलो. कलानिधीगडावरून सामानगडाकडे जाताना कोणाकोणाच्या फोनला रेंज येत होती त्या व्यक्ती पाच दिवसाचा गप्पांचा वचपा काढून समोरच्याला पार घे शपथ घे शपथ करून हळूच हैराण करीत होती परंतु आमच्या तीक्ष्ण कानाने ऐकले ते ऐकले.
हाहाहा कलानिधीगडाकडून निघताना त्या जंगलात कोल्हा, धनेश आणि मोराने दर्शन
दिले. न दिसणाऱ्या वन्य प्राण्यांनी दर्शन दिल्याने धन्य झालो आम्ही.
(गडावरील घरांचे, वाड्यांचे अवशेष )
संपूर्ण किल्ला त्या काळी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य अशा गडकिल्ल्यांची उभारणी करण्यात आली. प्रत्येक किल्ल्यावरील बांधकामाला एक वेगळा अर्थ आहे. हे बांधकाम घडविणारा कारागीर वेगळा आहे, त्यामुळे त्यात विविधता आहे. ह्या बांधकामातच आपल्या इतिहासाची आणि समाजरचनेची पायामुळं आहेत.किल्ल्यांना नुसत्या भेटी देऊन परतण्यापेक्षा,वेळ देऊन जर ते समजून घेतले तर स्वराज्याचा इतिहास अजून चांगल्या प्रकारे लक्षात राहील शिवाय त्या वास्तूबद्दल, आपल्या पूर्वजांबद्दल मनात आदरभाव निर्माण होऊन समाधानाने घरी परतू.
(खालील फोटोमध्ये गडावर लहान मुलांची सहल घेऊन आलेली शिक्षिका- शिक्षक आणि शाळेची मुले आहेत शिक्षिका- शिक्षकखरंच ग्रेट आहेत. आजच्या मुलांना गडांची माहिती देणे आणि इतिहास समजावून सांगणे गरजेचे आहे.)
स्मारकाचा थोडक्यात इतिहास : कोल्हापूर जिल्ह्यातील एक स्फुर्तीदायक स्मारक म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे स्मारक होय. गडहिंग्लजच्या सुप्रसिध्द सामानगडापासून सुमारे २०कि.मी. अंतरावर महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाच्या परंपरेचे मानकरी, स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानाने पवित्र झालेले धारातीर्थ आणि त्या पावन भूमीवर प्रतापराव गुजर यांच्या शौर्याची साक्ष देणारे स्मारक उभे आहे. नेसरी, दि. २४ फेब्रुवारी १६७४.सेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा शिलेदार(विसोजी बल्लाळ, विठोजी शिंदे, विठ्ठल पिलदेव अत्रे, दीपाजी राऊतराव, सिद्दी हिलाल, कृष्णाजी भास्कर) ह्यांच्या स्वामिनिष्ठेचा,पराक्रमाचा इतिहास हा गहिवरून आणणारा आहे. राज्याभिषेकाच्या सुमारास आदिलशाही सरदार बेहालोल खान स्वराज्यामध्ये धुडगूस घालत होता. महाराजांनी सेनापती प्रतापराव गुजर ह्यांस खानावर धाडले. प्रताप रावांनी खानाला नेसरीच्या मैदानात चारी मुंड्या चित केले. खान शरण आला आणि तह केला. प्रताप रावांनी खानाला क्षमा करून सोडून दिले. परंतु खान पुन्हा मराठी मुलुखात धुडगूस घालू लागला. तेव्हा महाराजांनी सेनापतीस खरमरीत पत्र लिहिले."स्वराज्यावर चालून येणाऱ्या गनिमास गर्दीस मिळवल्याशिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका." प्रतापराव संधी शोधत होते परंतु बेहालोल खान आता २० हजार सुसज्ज फौजेसह होता. परिस्थिती अत्यंत बिकट होती कारण रायगडावर राज्याभिषेकासाठी तर सरसेनापतीस जावेच लागणार! परंतु राजांनी तर "तोंड दाखवू नका" असा इशारा दिला होता. सरनौबत कात्रीत सापडले होते.हेच ते कुड्तोजी गुजर ज्यांनी मिर्झा राजे जयसिंगाच्या छावणीत जाऊन त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला केला होता परंतु मुत्सद्दी जयसिंगाने त्यांना सोडून दिले होते. महाराजांनी त्यांना प्रतापराव हा किताब देऊन सेनापतीपद दिले. अखेर खान पुन्हा एकदा समोर आला. परंतु त्यावेळी प्रतापरावाकडे अवघे १२०० सैन्य होते तर खानाचा सैन्यासागर १५००० प्रताप रावांनी आपल्या फौजेला खानाच्या तोंडी न देता सरळ एकट्याने खानाच्या फौजेवर चालून गेले. अगदी अचानक हल्ला.क्षणमात्र विचार न करता त्यांचे सहा शिलेदार देखील पाठोपाठ आपल्या सेनापतीसह दौडू लागले...सातही जण जाऊन खानाच्या फौजेला भिडले, एकच वीज तळपली आणि क्षणार्धात काळाकुट्ट अंधार! काय ती स्वामीनिष्ठा आणि काय तो पराक्रम! शिवरायांना आपल्या पत्रातील मजकूर प्रतापराव इतका मनाला लाऊन घेतील असे वाटले नव्हते. परंतु प्रतापरावासारखे अस्सल स्वामीनिष्ठ सेवक असेच अनोखे पराक्रम घडवून आणतात. समोर पसरलेल्या गनिमी सैन्य सागरावर आपल्या सेनापती पाठी चालून जाणारे त्यांचे सहा शिलेदार म्हणजे तर स्वमिनिष्ठेचा कळस. प्रतापराव तर सुडाने पेटून उठले होते, विवेकावर वीरश्री स्वार झाली होती. मात्र हे सहा शिलेदार निव्वळ स्वामी निष्ठेने पेटून उठले होते. "धन्य ते शिवराय,धन्य ते सरनौबत,धन्य ते शिलेदार,धन्य ती स्वामीनिष्ठा,आणि धन्य धन्य ते स्वराज्य. धन्य ते शिवाजी महाराज, स्वराज्याची संकल्पना आणि त्यासाठी जीवाची बाजी लावणारे मावळे."
आतमध्ये डाव्या बाजूस शिवाजी महाराजांचा १८/२० फुट उंच सिंहासनारूढ पुतळा आहे. शिवमंदिरदेखील आहे.
जवळच एक मोठा स्तंभ उभारला आहे. त्यावर त्या युद्धाची माहिती लिहून ठेवली आहे. स्तंभासमोर शुरतेचे प्रतिक म्हणून एक ढाल आणि तलवार आहे. ती माहिती वाचुन झाल्यावर स्मारकात समाधीस्थळी क्षणभर विश्रांती घेतली त्यावेळी सारा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. समाधीला वंदन करून, महाराजांना, प्रतापरावांना आणि त्या सहा वीरांना मुजरा करून, आम्ही सामानगडाकडे रवाना झालो.

वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥
“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥
वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥
“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥
ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥
खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥
– कुसुमाग्रज.
कुसुमाग्रजांच्या या कवितेचा प्रत्यय घेत प्रत्येक ट्रेकरने, प्रत्येक मराठी माणसाने, शिवप्रेमींनी आवर्जून पहावे असे हे स्मारक आहे. रांगणा गडावर आपटे सरांना प्रतापराव गुजरांची शूरता सांगताना गहिवरून आलेला प्रसंग आठवला आणि मला देखील गहिवरून आले.
सह्यांकनचा समारोह लेख भाग -५ मध्ये वाचावयास मिळेल
सामानगड
सामानगडाची उंची-३००४ फूट
किल्ल्याचा प्रकार - गिरिदुर्ग
डोंगररांग - कोल्हापूर
जिल्हा -कोल्हापूर
श्रेणी - मध्यम
दिनांक २४ डिसेंबर २०१९
![]() |
| सामानगडावरील सह्यांकनची पहिली बॅच आणि लीडर्स |
नेसरीच्या प्रतापराव गुजर स्मारकातून सव्वातीनच्या सुमारास निघून एका तासात सामानगडावर पोहोचलो. चक्रम हायकर्सची सामानगडावरील छावणी तेथील प्रशस्त हनुमान मंदिरात होती. आमचे तिथे उत्साहात स्वागत झाले. सुरुवातीला नव्याने भेटलेले दोन-तीन दिवसानंतर जुने झालेले सगळे लीडर्स इथे सामानगड छावणीवर भेटले.
मंदिराचे आवार एकदम स्वच्छ होते. मुख्य दरवाज्यासमोरची दीपमाळ संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात रेखीव दिसली. आम्हा पाहुण्यांचे स्वागत चहाने होऊन छावणी लीडर्स आणि पहिल्या बॅचच्या सर्व मेंबर्सची ओळख परेड झाली. सूर्य अस्ताला जाण्याआधी सामानगडावर फिरण्यास निघालो. सूर्यकांत सरांनी प्रत्येक बुरुजाची आणि छोट्या छोट्या जागेची उत्तम प्रकारे माहिती दिली. मोठ्या चौकोनी विहिरीत प्रत्यक्ष आत पायऱ्या उतरून समजून सांगितले.
![]() |
| (छावणीवर पोहोचल्यावर ओळख परेड चालू असताना छावणीलीडर्स विंदा मॅडम, सुशील देसाई सर आणि सूर्यकांत सर आणि मेंबर्स ) |
![]() |
| गड भटकंतीला जाताना सूचना देताना सूर्यकांत सर समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्या संवादादरम्यान एका दगडातून बेडूक निघाला अशी आख्यायिका आहे त्या दगडाची जागा साधारण इथे असावी |
![]() |
| दर्शनी बुरुज |
सामानगडावर जाण्यासाठी वरपर्यंत डांबरी रस्ता आहे. पर्यटकांनी सामानगड आवर्जून पाहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे गडावरील वैशिष्टय़पूर्ण रचनेच्या जांभ्या दगडात कुशलतेने खोदून काढलेल्या विहिरी. अन्य कोणत्याही गडावर इतक्या संख्येने न आढळणारी विहीर संकुले म्हणजे सामानगडाची खरीखुरी संपत्ती आहे.
(खालील
फोटोमध्ये अंधारकोठडीजवळील विहिरीचा फोटो आहे. जवळच कैद्यांना शिक्षा दिली
जात असलेली अंधार कोठडी आहे तिथे अंधार असल्याने फोटो घेता आला नाही )
विहिरीत उतरण्यासाठी खोदलेल्या कातळकोरीव पायऱ्या,पायऱ्यांच्या वरच्या बाजूच्या सुंदर कमानी, विहिरीतील भुयारे, पाण्याची कुंडे सारेच काही अप्रतिम आहे. किल्ल्यातील सोंडय़ा बुरुजासमोर मुघल टेकडी आहे. किल्ल्यावर तोफ डागण्यासाठी मोघलांनी ती निर्माण केल्याचे सांगतात.
गडभटकंतीबरोबरच हनुमान मंदिर, कातळ खोदून काढलेली लेणी, गडाच्या दक्षिणेकडील उतरणीवरील भीमशाप्पा नावाच्या सत्पुरुषाची समाधी व वनभोजनासाठी स्वच्छ पाण्याचे कुंड, 'भीमसासगिरी' हा मंदिर समूह यांच्या भटकंतीमुळे सामानगडाची भटकंती छान होते.
![]() |
| विहीर |
![]() |
| अंधार कोठडी |
![]() |
| मुघल टेकडी |
![]() |
(आमचे पहिल्या बॅचचे लीडर्स आदित्य आणि अनिकेत)
|
सामानगडचा थोडक्यात इतिहास-कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणेच सामानगड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. सन १६६७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला व किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनीस अण्णाजी दत्तो यांचेकडे दिली. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बांधणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या भागाची सबनिशी त्यांच्याकडे होती. सन १६८८ मध्ये सामानगड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१पूर्वी हा गड पुन्हा मराठ्यांकडे आला. शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व शहामीर यास किल्लेदार नेमले. सन १७०४ मध्ये मराठयांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. यानंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. १८४४ मध्ये सामानगडाने इंग्रजाविरुद्ध प्रथम बंडाचे निशाण फडकवले. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली. या बंडात ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदूकबारदार व २०० सैनिक होते. या शिंबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, परंतु शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली.
शिवशाहीचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाची साक्ष देणारा हा किल्ला अनेक वर्षं उपेक्षित राहिला आहे. जेव्हा प्रतापराव बेहलोलखान या शत्रूवर सहा मावळ्यांना घेऊन तुटून पडले होते, त्याच्या अगोदर प्रतापरावांचा तळ याच सामानगडावर होता. या किल्याचे असे एतिहासिक महत्त्व अधोरेखित झाले असतानाही या किल्ल्याचा पर्यटनस्थळ म्हणून म्हणावा तितका विकास झालेला नाही .माजी आमदार बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नांतून किल्याचा थोडाबहुत विकास झाल्याचे आढळते. दुर्लक्षित असलेला पण निसर्गरम्य असा किल्ला पहायचा असल्यास सुरुवातीला कोल्हापुरात यावे लागते. पुणे-बेंगलोर महामार्गावरील संकेश्वर या गावावरूनही येथे जाता येते.
गडहिंग्लजवरुन भडगाव चिंचेवाडीमार्गे गडाच्या पठारावर पायउतार झाल्यावर चिंचेवाडी गावातील भल्यामोठया विहिरीच्या बाजूला असलेल्या २ फिरंगी तोफा गावाच्या ऐतिहासिकतेची साक्ष देतात. डाव्या हाताची डांबरी सडक गडावर जाते. तर उजव्या हाताची सडक मारुती मंदिराकडे जाते. डाव्या बाजूच्या सडकेने गडावर प्रवेश करता येतो. या ठिकाणी पूर्वी दरवाजा होता, परंतु तो काळाच्या ओघात नामशेष झालेला आहे. सामानगडाच्या सर्व बाजूंनी कातळ तासून काढलेला आहे. त्यावर तटबंदी असून जागोजागी बुरूज बांधलेले आहेत.
![]() |
| सामानगडावर जाताना बसमधून टिपलेला फोटो |
![]() |
| (गडावरील भवानीमातेच्या मंदिरातील सजवलेली देवीची मूर्ती ) |
(जांभ्या दगडातील कमानी असलेल्या विहिरी )
![]() |
| (जांभ्या दगडातील कमानी असलेल्या विहिरी ) |
चोरखिंडीकडे जाताना एक विहीर आहे तिला साखर विहीर म्हणतात. अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात.
चोर दरवाज्यामध्ये आम्ही सर्वांनी प्रत्यक्ष जाऊन दुसऱ्या बाजून निघून
दरवाज्याची पाहणी करून पुन्हा या बाजूने आलो. प्रत्येक वास्तूची बांधणी
सुव्यवस्थित अशी आढळते.
जे जे शक्य ते ते पाहून झाल्यावर अंधार पडत आल्याने छावणीकडे रवाना होऊन तोंडावर पाणी मारून ताजे होऊन चहाचा आस्वाद घेतला. पहिल्या बॅचचा सह्यांकनचा शेवटचा दिवस असल्याने चक्रम हायकर्सचे संस्थापक मेंबर किरण देशमुख हजर होते.सिनिअर मेंबर महेश केंदूरकर आणि पराग ओक हे देखील उपस्थित होते. शमांगी देशपांडे हजर होत्या. पाच दिवसांच्या आम्हा मेंबर्सचा ट्रेकचा अनुभव आणि एकंदरीत आढावा घेऊन प्रत्येक मेंबरला लीडर्सच्या हस्ते सह्यांकनचे सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. त्यादिवशी दुबे सरांच्या वाढदिवसाच्या केकचे देखील आयोजन केले गेले.
सह्यांकन मध्ये एकूण एकाची व्यक्तिशः काळजी घेतली जाते. प्रत्येकाकडे जातीने लक्ष दिले जाते ही गोष्ट मला फार आवडली. समारोपाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्रीच्या जेवणाची मेजवानी तेवढी बाकी होती. रात्रीच्या जेवणात गरमागरम पुरी, छोले, व्हेज पुलाव, पापड, सलाड, आणि गुलाबजामून असा झकास मेनू होता. सर्व लीडर्स अगदी अगत्याने प्रेमाने जेवण वाढत होते.
आम्हा माहेरवाशिणींचा शेवटचा दिवस असल्याने आम्हाला दुसऱ्या दिवशी असे आयते जेवण मिळणार नव्हते याचे मनोमन वाईट वाटत होते आणि घरी जाण्याचा आनंददेखील होता. पंचपक्वान्नांचा आस्वाद घेऊन त्या गुलाबी थंडीत अंताक्षरी नाही झाली तर मग काय केलं आम्ही. रात्री साडेअकरा पर्यंत वेगवेगळ्या हिंदी मराठी ट्रेकची गाणी आणि इतर भन्नाट गाण्यांची महफिल रंगल्यावर सर्वजण मंदिराच्या प्रांगणात आपापल्या बॅग पॅक करून स्वतः सुखाने झोपून दुसऱ्याला घोरून त्रास देऊन गुडूप झाले.
सकाळी पहाटे ५ला उठून रोजचा बेड टी झाल्यावर भराभर आवरून रोजचा सकाळचा व्यायाम करून सामानगडावरील राहिलेली ठिकाणे पाहावयास निघालो. रामायणकालीन भूयारी शिवमंदिराला भेट दिली तेथील सामानगडावर वास्तव्यास असलेले आणि अध्यात्माची प्रचंड आस असणारे गोखले सर रात्रीपासूनच आमच्याजवळ अध्यात्माचे व्याख्यान देऊन गेले होते आणि आमची सकाळीदेखील वाट पाहत होते. आम्ही गेल्यावर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
६४ शिवलिंगे एकत्र असलेली पिंडी तिथे पाहावयास मिळाली. प्रत्येक कोनाड्यात पिंडीची स्थापना केली होती. त्यामुळे महालिंगेश्वर मंदिर नाव पडले असावे. मंदिरात अनेक समाधीस्थळेदेखील आढळली. आतमध्ये हनुमानाचे मंदिर शनी मंदिरदेखील होते. मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ होता.
सूर्यदेव उगवला होता ते मनोहारी दृश्य प्रत्यक्ष पाहण्यातच सुख आहे. सूर्याचे तेजस्वी रूप मोहक होते. तिथे जवळच प्रभू रामचंद्रांनी वनवासात असताना वास्तव्य केलेल्या लेण्या आहेत. त्यात विविध देव देवतांची मंदिरे आहेत.या ठिकाणी प्रभू रामचंद्र वास्तव्यास होते असे स्थानिक म्हणतात. सूर्याच्या सकाळच्या किरणांतून मिळणारी ऊर्जा येथे एका शिळेजवळ ध्यान लावून बसून अनुभवावी अशी आख्यायिका आहे.
त्याठिकाणाहून आम्ही पायऱ्या उतरून भीमाशप्पा सत्पुरुषाची समाधी पाहावयास निघालो. २किमी गेलो तरी ते समाधीस्थळ सापडेना. त्यानंतर आम्ही छावणीवर परत आलो. मात्र खडा चढ चढून छान वॉर्मअप झाला.
छावणीवर आल्यावर गरमगरम बटाटावडा आणि चटणीवर ताव मारून चहाचा आस्वाद देऊन बॅनर फोटो ग्रुप फोटो घेऊन पाचदिवसांच्या सामानाची सॅक पुन्हा पाठीवर घेतली. सामानगड छावणीचे मुख्य लीडर सुशील देसाई सर,सूर्यकांत सर, विंदा मॅडम यांचे खूप-खूप आभार मानून जड अंतःकरणाने परतीच्या वाटेला निघालो तरीही लास्ट सेल्फी करीत-करीत पुन्हा-पुन्हा हजारो सेल्फ्या घेत बसलो.
ना आमची पावले छावणीतून निघत होती ना लीडर्सची पावले आम्हाला सोडून छावणीकडे जात होती. तिथून निघताना डोळ्यात आलेले पाणी कोणाला दाखवले नाही परंतु लेख लिहिताना खरंच रडू आवरेना झाले.
जे जे शक्य ते ते पाहून झाल्यावर अंधार पडत आल्याने छावणीकडे रवाना होऊन तोंडावर पाणी मारून ताजे होऊन चहाचा आस्वाद घेतला. पहिल्या बॅचचा सह्यांकनचा शेवटचा दिवस असल्याने चक्रम हायकर्सचे संस्थापक मेंबर किरण देशमुख हजर होते.सिनिअर मेंबर महेश केंदूरकर आणि पराग ओक हे देखील उपस्थित होते. शमांगी देशपांडे हजर होत्या. पाच दिवसांच्या आम्हा मेंबर्सचा ट्रेकचा अनुभव आणि एकंदरीत आढावा घेऊन प्रत्येक मेंबरला लीडर्सच्या हस्ते सह्यांकनचे सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. त्यादिवशी दुबे सरांच्या वाढदिवसाच्या केकचे देखील आयोजन केले गेले.
![]() |
| सह्यांकनचे प्रमाणपत्र देताना लीडर्स |
![]() |
| जेवण वाढताना लीडर्स |
![]() |
| छावणी ज्या ठिकाणी होती त्या मंदिरातील हनुमानाची मूर्ती |
![]() |
| भुयारी शिवमंदिर |
![]() |
| ६४लिंगी शिवलिंग |
![]() |
| सूर्योदय |
![]() |
| प्रभू रामचंद्र वनवासात असताना ज्या ठिकाणी वास्तव्यास होते त्या ह्या गुहा आहेत असे स्थानिक म्हणतात. |
![]() |
| सकाळचा भन्नाट नास्ता वडा पाव आणि झणझणीत चटणी |
![]() |
| निघताना छावणी लीडर सूर्यकांत सर आणि बॅच लीडर आदित्य यांच्यासोबत सेल्फी |
![]() |
| चक्रम हायकर्सचे लीडर्स, लाईफ मेंबर्स यांच्यासोबत एक फोटो तो बनता है बॉस |
इतके ट्रेक करतो आम्ही परंतु माहित असते पुन्हा दुसऱ्या महिन्यात ट्रेकला जाणार आहोत. परंतु सह्यांकन दोन वर्षातून एकदाच असते त्यामुळे पुन्हा येणे होईल न होईल या आठवणीने खरंच सासरी जाताना जसे वाटते अगदी तशीच भावना त्या दिवशी होती. आमच्या पहिल्या बॅचचे लीडर्स आदित्य आणि अनिकेत तुमचे विशेष कौतुक करतो आम्ही. आमची मस्तीखोर बॅच असूनदेखील तुम्ही आम्हाला उत्तमरीत्या झेललेत शिवाय सह्यांकनच्या बॅचची पहिलीच लीडरशिप असूनसुद्धा ती जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडलीत. आमची अगदी घरच्या व्यक्तिसारखी काळजी घेतलीत. मनापासून खूप खूप कौतुक.
तुमच्या आयुष्यात अशी अनेक सह्यांकने उत्साहात जोशात सुखरूपपणे अतिशय शिस्तबद्द नियोजनबद्धरीत्या पाड पडोत. चक्रम हायकर्सशी तुमचे नाते असेच घट्ट राहो.
आमची बस मंदिराच्या गेटबाहेर जणू आमची वाट पहात उभी होती. महामंडळाचे बस चालक श्री उबाळे यांनी प्रवासात उत्तम साथ दिली. मुंबई कोल्हापूर मुंबई प्रवास खूपच सोपा केलात. सर्वांना टाटा करून नऊच्या सुमारास आमची बस मुंबईच्या दिशेने निघाली. आमच्यातील लीडर आदित्य यांना सामानगड छावणीवर रहावे लागले.त्यामुळे एकटे अनिकेत आमच्या सोबत बसमध्ये होते.
एका ठिकाणी मनसोक्त उसाचा रस, एका ठिकाणी भरपेट उत्तम जेवणाचा आस्वाद घेऊन केदार दिघे यांनी न मागता दिलेल्या आईस्क्रीमचा स्वाद काही आगळाच होता.
आम्ही काही मेंबर्सने बसमध्ये तीन-चार तास अंताक्षरीचा मनमुराद आनंद घेतला. सोनेवाले सोते गये गानेवाले गाते गये. जिंदगी एक सफर है सुहाना यहा कल क्या हो किसने जाना?. सह्यांकनच्या पहिल्या बॅचचे मेंबर्स- ब्रिजेश, पंकज, नंदिता, मनीष, केदार, गुरुदत्त, हर्षद, अथर्व, पूर्वेश, अनिकेत, सुजाता, सायली, विद्या, कौस्तुभ, अमिता,नंदकिशोर, वीणा, अजय, नीलिमा, प्रकाश, विक्रम इ. सर्व मेम्बर्सचा उत्साह, सहभाग, उत्तम होता. लहान मेंबर गुरु आणि अथर्वने न थकता सगळे ट्रेक हसत हसत माहिती घेत पूर्ण केलेत.डीएसएलआर
फोटोग्राफर नंदकिशोर सर, अनिकेत सगळे फोटोज तूम्ही दिलेत तर तुम्हाला खूप धन्यवाद. हाहाहा बँगलोरहून विमानाने आलेला ब्रिजेश, जाताना बडोदराला गेला. हा बापुडा कुठून कुठे सह्यांकनसाठी आला सलाम तुला. अनिकेत, आदित्य, सूर्यकांतसर लीडरशिपमध्ये बिझी असूनदेखील चांगले फोटो काढता आले तुम्हाला. सगळ्यात
महत्वाचे म्हणजे आमचे बंधुराज परममित्र तुषार कोठावदे प्रशांत कोठावदे
यांच्यामुळेच आम्हाला चक्रम हायकर्सच्या ह्या सह्यांकन नावाच्या जादुई
इव्हेंटमध्ये सहभागी होण्याचे भाग्य लाभले. हे तुषार भावा, वनिता आणि
मी मनापासून तुझे खूप-खूप ऋणी आहोत. जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे पाच दिवस
आम्हाला जादूच्या दुनियेची सफर करविलीस. एकूणच काय तर २०१९ चे १९ वे सह्यांकन तुफानी होते. चक्रम हायकर्स रॉक्स.
तुमच्या आयुष्यात अशी अनेक सह्यांकने उत्साहात जोशात सुखरूपपणे अतिशय शिस्तबद्द नियोजनबद्धरीत्या पाड पडोत. चक्रम हायकर्सशी तुमचे नाते असेच घट्ट राहो.
![]() |
| वाट पहात असलेली आमची बसराणी |
![]() |
| उसाच्या रसाच्या प्रतीक्षेत असणारे आमचे मेंबर्स |
![]() |
| दिघे सरांनी खाऊ घातलेले आयस्क्रीम |
![]() |
| उत्तम फोटोग्राफी करून लवकरात लवकर ग्रुपवर अपलोड करणारे नंदकिशोर सर |
![]() |
| लीडर्ससोबत ग्रुप फोटो |

No comments:
Post a Comment