https://devilshiva3.blogspot.com/
मी, पावूस नी
पाऊस मनजे माझ्यासाठीतर स्वर्गच. पावसात भिजायला मला मी बारका आसताना लहान होतो तवापासून आवडत. गेली दोन वर्षे पन्हाळा म्हंटल की माझ घरच झालय. NSS, कँप सपला की कुठ जायच, तर 'पन्हाळा'. नी शेवाळे भेटल्यापासूनतर पन्हाळा नी पावनगड हे माझ्यासाठी पर्ड्यात(परस) गेल्यासारखच. आणि एकटाच जाणार, बाकीचे सगळे कस का येईनात मी नी माझी गाडी आणि पाऊस, भिजतच जायच. खुप दिवसांपासून मला खरा नी पुर्ण पन्हाळा पाहायचा होता. पण योगच जमत न्हवता, शेवटी आम्हाला मुडागडावर परिचित झालेले आमचे काही मित्र मंडळी, त्यांना पन्हाळा पाहायचा होता नी त्यामुळेच शेवाळेच आनंत्रण मलाबी आलं. मग काय घरातली पाऊस, पाऊस करत आसतानाही, जरासा कमी आल्या निघलो बाहेर. मग काय बाहेर पडतोय तवरकाच, पावूस सुरू, आम्हाला कुठ फरक पडतुय. गेलो भिजत. नी माझी गाणी compulsary, पाऊस आसो वा आणि काही. काँड बाद झाल तरी चालल. एक वेगळाच उत्साह येतो, पावसात भिजत, गाणी ऐकच, एकटच गाडीवन फिरण्यात. मी तर खुप फिरलोय, तुमच तुम्हालाच माहित. शेवटी पोहचलो राव, पावसात भिजताना destonation येवूच नये आस वाटतय. पण नाईलाज आल तर उतराव लागत..... बुधवार पेढेतूनच धुक्यात प्रवेश. Feeling एकदम ढगात. ते पुढ गेलते, मी सांगितलेल मी आल्याशिवाय सुरू नाय करायच म्हणून मी पाहिलेलच ठिकाण ते पाहायला गेले. मग काली बुरजाजवळ मी त्यांना join झालो. गाडी शिवा काशीदांच्या समाधी जवळ. मग तिथन चालत काली बुरजाकडं. भिजलेलो पुर्ण.
मग आम्ही एकत्र आलो. त्यांनी सकाळी 10 : 45 ला चार दरवाज्यातून उतरून गड पहायला सुरुवात केली . शिवा काशीद समाधी पासून रेडेघाटी , मग येथे मी त्यांना join झालो. तिथनं भुयारातन पडकोटात आलो . तो सगळा भाग धुक्यात बघितला. किल्ल्याची ठेवण नी किल्ल्याचा इतिहास संदर्भांची देवाण - घेवाण करत अंधारबावला यायला अडीच वाजलं. तिथ न भिजलेली मुल-मुली आमच्याकड मनगाड्यावानी बघत हुतीत. जणू यांना आमच्यासोबत हिंडाचच हाय. पण प्रत्येकाच्या नशीबात स्वर्ग थोडाच येतो. मग अंबरखान्याजवळ झुणका भाकरीवर ताव मारून सोमेश्वर तलाव , छत्रपतींची स्मशानभूमी परिसर पाहत, छत्रपती शिवाजी (दुसरे) यांचीही समाधी पाहिली, कोण बोलनारच नाही की ही त्यांची समाधी आहे. खरच स्थानिक झोपलेत पन्हाळ्यावरचे. मागच्या वर्षी तर तिथे कचराच टाकायला सुरूवात केलती, मग शेवाळेन स्वत:लक्ष घालून ते थांबवल. आमची एक संस्था आहे, पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा. शेवाळे त्याचा संस्थापक अध्यक्ष आहे. तर पुढे संभाजी महाराज मंदिर , धर्मकोठी , नायकणीच्या सज्जा (इथही पुरातत्व खात्यान वाट लावलेय, नायकीनीच्या सज्याला माडी होती (पायऱ्या) त्या तुटल्यावर, पुप्ण पाडून तिथ भिंतच घेतलीय) पाहून तटावरून शिवा काशीद पुतळ्याकडे चाललो . काही ठिकाणी तटबंधी ढासळत चालली आहे . खालच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. शेवाळे म्हणतोय, 'लवकरच पन्हाळ्याचे स्थानिक जाणकार , अभ्यासक आणि प . इ .स. चे कार्यकर्ते या सर्वांची मिळून एकत्रित भटकंती मोहीम आखू. यातून माहितीची देवाणघेवाण आणि त्यावर चर्चा होईल.' सकाळी 10 : 45 ते 04 : 30 या वेळेत फक्त आम्हाला पन्हाळा एक चतुर्थांश भाग पाहता आला. मग मीही कपडे बदलून (मी कायम एक जोड कपडे जास्त घेतो भटकंतीला जाताना, फायदाच होतो) गाडी आमोलदांच्या घरी नेली नी जरा चर्चा केली, मग शेवाळेला घरी सोडून मी माझ्या घरी भिजतच...
@insta - https://www.instagram.com/p/CA1z-skJIMp/?igshid=14q4k7ins1ogh
@youtube - https://www.youtube.com/channel/UCZkFHCtx-JL9pPQYrYO1ppA
पन्हाळगड का ढासळतोय ? भाग- १ Downfall of panhala fort
पन्हाळगड का ढासळतोय ?Downfall of panhala fort.
- शिवप्रसाद शेवाळे
“Off all the hill forts I have seen in India Panhallaghur is the most complete both by nature and art.”
इ.स. १८२७ मध्ये पन्हाळगडाला सर कर्नल वेल्स यांनी भेट दिली. त्याने लिहिलेल्या प्रवासवर्णनात पन्हाळगडाबाबत काढलेले हे उद्गार यावरून आपल्याला पन्हाळगडाचे महत्त्व लक्षात येते. कोकण आणि देश यावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला अत्यंत महत्वाचा आहे. हा किल्ला ताब्यात ठेवण्यासाठी अनेक शक्तींनी आपली शक्ती पणाला लावली. या गडाच्या आश्रयाने अनेक राजवटी भरभराटीला आल्या. या गडासाठी अनेक राजकीय खेळी, डाव-प्रतिडाव, कुटनीती व रणनीती जशी आखली गेली तशीच प्रत्यक्ष चकमकी, लढाया व युद्ध पण या परिसराने अनुभवलीत. इतिहासाची पान, इथल्या वास्तू, निखळले दगड आजही रक्तरंजित इतिहासाची साक्ष देत उभी आहेत. ह्या फक्त दगडमाती अन तटाबुरुजांच्या वास्तू नाहीत तर आपली स्फूर्तिस्थाने आहेत. पराभवाच्या मनांना नवसंजिवनी देणारी प्रेरणास्रोत आहेत.
चहूबाजूंनी संकटाच्या विळख्यात सापडला अन पुरते निराश झालात तर पन्हाळ्यावर येऊन पुसाटी बुरुजावर मावळतीला बसा अन फक्त १६६० साल आठवा तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी नक्की मार्ग गवसेल. भूतकाळाच्या घटना वर्तमानात देखील दिशा देत असतात. आपल्याला इतिहासाची सोनेरी पान ह्या घटना सांगतील पण त्या घटनेचा साक्षीदार पन्हाळाच नसेल तर ? पन्हाळ्याच्या ऐतिहासिक वास्तू नसतील तर ? अंबरखाना, सज्जाकोठी, धर्मकोठी, कलावंतीण महाल, कोकण दरवाजा, वाघ दरवाजा, राजदिंडी ह्या कोणत्याच वास्तू नसतील तर दरवर्षी भेट देणारे लाखो पर्यटक फक्त झुणका भाकर खायला येतील का ? प्रवासी कर कोठून मिळणार ? झुणका भाकरी वर चालणारी कुटुंब कशी चालणार? ५ हजार लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणाचा नगरपालिका अन तालुक्याचा दर्जा कोणत्या आधारावर टिकणार ? पन्हाळ्याचा झपाट्याने होणारा विकास कसा होणार ? पन्हाळा व गडाच्या घेऱ्यातील हॉटेल्स व्यवसाय कसे चालणार ? पन्हाळा डोंगरच राहिला नाही तर गड व घेऱ्यातील गावांच काय ? भूस्खलन असच होत राहील तर पन्हाळा नकाशावर तर राहील का ? या व अशा विविध प्रश्नांनी गेली तीन चार वर्षे मला जंगजंग पछाडले आहे. जेव्हापासून पन्हाळा अन पावनगडावर काम करतो तेव्हा पासून हे प्रश्न नेहमी पडत आले आहेत. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी ह्यावर बोलत आलो आहे. सतत परिसरातील लोकांशी संपर्क साधत आहे. तसा मी इतिहासाचा विद्यार्थी परंतू या ब्लॉगच्या माध्यमातून इतिहासाबरोबर पन्हाळा पठाराचे होणारे क्षरण यांवर गेल्या काही वर्षातील निरीक्षणावरून बोलायचे ठरवले आहे. मी प्रथमच अगदी नम्रपणे हे मान्य करतो मी पर्यावरण, भूगर्भशास्त्र आदी विषयांचा जाणकार नाही. इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी पन्हाळा अन परिसरात फिरत असताना मानवाने आपल्या हव्यासापोटी करत असलेली निसर्गाची हानी जाणवू लागली. यामुळे भूस्खलन आदी संकट ओढवत असावीत हा माझा प्राथमिक समज आहे. कदाचित याव्यतिरिक्त हि अनेक शास्त्रीय कारणे असू शकतात. जी मला माहित नसतील. पन्हाळा डोळ्यासमोर ढासळताना – खचताना पाहवत नाही. कदाचित माझी मत आपणास पटो अगर न पटो ? फक्त प्रश्नचिन्ह किंवा आरोप करत आहे असे वाटेलही तरीही मनातील कोलाहल शांत करण्यासाठी ऐतिहासिक वास्तूंच्या बरोबर पर्यावरणावर लिहित आहे. पन्हाळा असाच सूर्यचंद्र असे पर्यंत अक्षय रहावा असे वाटत असेल तर या ब्लॉगवर नक्की विचार कराल ही अपेक्षा !
इतिहास हा माझा अभ्यास विषय असल्याने प्रथम पन्हाळ्यावरील ऐतिहासिक वास्तूंना अपाय करणारे घटक पाहू. पन्हाळ्याच्या इतिहासावर पुढील ब्लॉग मध्ये लिहिणार आहे त्यामुळे येथे त्याचा उल्लेख टाळत आहे.
कोकण दरवाजा किंवा तीन दरवाजा :
पन्हाळगडाचा हा मुख्य दरवाजा आहे. भव्य , मजबूत तसेच कलात्मकदृष्ट्या वैविध्यपूर्ण अशी हि वास्तू ! एकाच ठिकाणी तीन दरवाज्यांची शृंखला आहे. पन्हाळ्यावर येणारे पर्यटक १००% भेट देणाऱ्या ठिकाणापैकी हि एक वास्तू होय. आपल्याला मुस्लीम राजवटीमध्ये तिन्ही दरवाजे व त्यावर असणारा नगारखाना यांचे बांधकाम झाले असावे असे वाटते परंतू सध्या अस्तित्वात असणाऱ्या दरवाजांची काही ठिकाणी पुर्नबांधणी केली गेली. याचा अर्थ हा आधीच ढासळलेला असल्यामुळे एकसंध नाही हे आपण बारकाईने पाहिले तर नक्की दिसून येईन. अस असताना आज या वास्तू मधून वाहतूक होत आहे. येथे प्रचंड प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर या वास्तूला धोका निर्माण झाला आहे. या दरवाज्याच्या शेजारील बुरुजही सतत ढासळतो . त्याची पुरातत्व विभागामार्फत पुर्नबांधणी केली गेली आहे. हा बुरुज आणि दरवाजाच्या शेजारी एक सांडपाणी जाण्यासाठी मार्ग आहे. याव्यतिरिक्त आपत्कालीन परस्थितीत या मार्गाचा वेगळ्या अनुषंगाने उपयोग होत असणार. या मार्गातून गोपाळतीर्थ बाग व काही हॉस्टेल्स यामधून होणारा सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होतो का हे पहायला हवं ! तसेच सर्वप्रकारची वाहतूक त्वरित बंद करायला हवी. अन्यथा दुदैवाने ही वास्तू चित्रात किंवा जुन्या चित्रपटगीतात पहावी लागेल.
नायकिणीचा सज्जा उर्फ कलावंतीनीचा महाल :
पन्हाळगडावरील आणखी एक सुंदर वास्तू ! तीन मजली असणाऱ्या ह्या इमारतीचे वरचे दोन मजले ढासळले आहेत. खालच्या भागही पूर्णतः खिळखिळा झाला आहे. याचा ब्रिटीशकाळातील एक फोटो उपलब्ध आहे यावरून आपल्याला याच्या वैभवाची कल्पना आपल्याला येईल. कड्याच्या कडेवर ही वास्तू असल्याने याकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
कालीबुरुज व पडकोट :
पन्हाळा हा अपवाद वगळता असा किल्ला आहे जिथे किल्यावरील सर्व प्रकारच्या स्थापत्याची बांधकामे आपल्याला पहायला मिळतात. पन्हाळ्याचा दुर्गस्थापत्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे कालीबुरुज आणि पडकोट परिसर होय. ह्या भागात भूस्खलनाचा धोका आहे. काही भाग सुटलेला आहे. तो कधीही ढासळू शकतो. कोल्हापूरच्या मुक्ता नार्वेकर यांच्या कोल्हापूर दर्शन मधील पन्हाळ्याच्या काही एपिसोडमध्ये माझा सहभाग आहे त्यातील अपरिचित पन्हाळा भाग - 5 हा एपिसोड नक्की बघा .( https://youtu.be/9_GeMpg3F88 ) यामध्ये या परिसराची ऐतिहासिक आणि स्थापत्याच्या दृष्टीने चर्चा केली आहे. मी त्यांच्याशी गप्पा मारताना म्हटलं होत “ह्या परिसरातील नागफणी दरवाजाचा सरंक्षक बुरुज कदाचित कसातरी एखादा पावसाळा काढतील.” अन गेल्या पावसाळ्यात तो ढासळला. त्यात बुरुजात करंजीचे भलेमोठे झाड होते. वृक्षारोपण करताना आपण कोणती झाडे कोठे लावतो याचेही भान असणे अत्यंत गरजेचे आहे. या पडकोटात दोन बुरुजांच्या मध्ये अनेक दरवाजे आहेत. नागफणी दरवाज्याच्या व्यतिरिक्त इतर दरवाजे छीनून घेतले आहेत. रणमंडळाची रचना समजून घेण्यासाठी हा परिसर जपणे गरजेचे आहे.
रेडेमहाल :
पन्हाळ्याची आणखी एक सुंदर वास्तू ! सध्या इथे जनता बाजार हे सरकार मान्य धान्यवाटप केंद्र आहे. या वास्तूच्या पाठीमागची बाजू अत्यंत कमकुवत झालीय. काही प्रमाणात ढासळली ही आहे. आत मध्ये घुशींनी मोठ्या प्रमाणात पोखरले आहे. या वास्तूकडेही लक्ष देणे गरजचे आहे.
राजदिंडी :
दुतोंडी बुरुजावरून पुसाटीकडे जाताना तबक उद्यान मध्ये जाणारा मार्ग म्हणजे राजदिंडी मार्ग होय. ह्या इथे एक दोन संरक्षण बुरुजांच्यामध्ये गोमुखी बांधणीचा दिंडी दरवाजा होता. याची साक्ष देणारे गेल्यावर्षी पर्यंत अवशेष होते.
मागच्या अतिवृष्टीच्या काळात या भागाची पडझड झाली. अशा प्रकारची पडझड होत राहिली तर गडाचे गडपण कसे शाबूत राहणार ? याचा संरक्षक बुरुज खाजगी मालकीत आहे. {कोल्हापूर दर्शन चे या परिसरावरील एपिसोड नक्की पहा.}संभाजीमहाराज मंदिर :
कोल्हापुरचे पहिले छ. संभाजी महाराज यांचे समाधी मंदिर त्यांच्या महाराणी जिजाबाई यांनी बांधले. या मंदिराच्या ओवऱ्या, समोरील बुरुज ढासळत आहे. या मंदिराच्या मागे सुंदर अष्टकोनी विहीर आहे. या मंदिरासमोर करवीर चे राज्य पेशवे , इंचलकरंजीचे घोरपडे, पटवर्धन, पंतप्रतिनिधी, बावडेकर अमात्य , सावंतवाडीचे सावंत, आंग्रे, पोर्तुगीज , इंग्रज आदी पासून ४७ वर्षे संरक्षण करणाऱ्या करवीरकर जिजाबाई यांची समाधी आहे. या समाधीच्या शिळेस घासून गटर आहे. यावर काय बोलावे ?
तटबंधी व बुरुजांवरील अतिक्रमण :
पन्हाळा किल्ला केंद्रशासनाच्या अखत्यारीत आहे. पुरातत्व चे सक्षम कायदे आहेत परंतू कायदे फक्त कागदावरच आहेत का अशी शंका येते ? पन्हाळ्याचे काही बुरुज आता खाजगी मालकीत आहेत. कोणत्याही संरक्षित स्मारकापासून ठराविक अंतरावर किंवा त्या वास्तूस धोका निर्माण होईल असे बांधकाम करण्यास कायद्यानुसार परवानगी नाही. या ऐतिहासिक वास्तू राष्ट्राची संपत्ती आहे. काही अंतरावर राहू द्या कोल्हापूरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मोठमोठ्या हस्तीची घरे तटांवर आहेत. पन्हाळ्याच्या तटावरून मुक्तपणे इतिहासप्रेमी फिरूही शकत नाही. पन्हाळ्याच्या काही भागाचे ब्रिटीश कालीन छायाचित्रे उपलब्ध आहेत. आता ती ठिकाणे ओळखून देखील येत नाहीत. ही सर्व काही दशकांत बांधकामे झाले आहेत. कशाला या मोठ्या लोकांचा रोष ओढवून घ्यायचा म्हणून कोणीच काहीच बोलत नाही. ही तटबंधी शेकडो वर्षे ऊनवारा , तोफांच्या माऱ्यातून तग धरून कशीबशी राहिलेत त्यावर तुमचे टुमदार बंगले किती काळ तग धरणार ?
गडावरील वाढते वसाहतीकरण :
छ. शाहू महाराज यांनी गडावरून सगळ्या कचेऱ्या पाताळनगरीला नेल्या होत्या. परंतू त्या परत पन्हाळगडावर नेल्या. त्या तशाच गडाखाली असत्या तर गडाचे गडपण अधिक शाबूत राहिले असते. तेव्हा त्यांना गडावर अतिरिक्त वस्ती वाटत होती . त्यानंतर १०० वर्षात वसाहतीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने अनेक शासकीय कार्यालये, त्यांचा स्टाफ , पर्यटकांसाठी हॉटेल आदी प्रचंड प्रमाणात वाढले आहे. खर तर पन्हाळा पठाराची आता क्षमता संपली आहे असे वाटते. अनेक भूभाग पठारापासून वेगळे होत आहेत. याचे सुंदर उदाहरण म्हणजे पडकोट परिसर
आता प्रशासने गांभीर्याने पाहिले नाही तर येत्या ५०/६० वर्षात पन्हाळ्याचे तालुक्याचे ठिकाण गडाखाली हालवावे लागेल. तालुक्याचे ठिकाण असल्या कारणाने सभोवतालच्या गावांचा जो विकास होत आहे. तो हि खुंटेल. गेल्या पावसाळ्यात अनेक कुटुंबे कोल्हापूर सारख्या ठिकाणी कायमस्वरूपी राहण्यास गेली. असे अल्प प्रमाणात होणारे स्थलांतर सामूहिकपणे करायला लागू नये इतकेच ! शहराच्या आधुनिकीकरणाच्या शर्यतीत हे भूमीपुत्र किती टिकतील माहित नाही मग उदयास येतील झोपडपट्ट्या ! नवे प्रश्न घेऊन !
जलव्यवस्थापन :
पन्हाळा किल्ला जलव्यवस्थापन दृष्टीने महत्त्वाचा आहे . गडावर सोमेश्वर , साधोबा, खोकड तलाव आदी सारखे मोठी तळी तर अनेक छोट्या मोठ्या विहिरी ,आड , बाब आहेत. गोपाळतीर्थ बागे सारख्या ठिकाणी येन उन्हाळ्यात पाणी वाहत असत. पन्हाळ्यावर मोठ्या प्रमाणावर जांभा दगड आहे. हा दगड पावसाळ्यात आपल्या क्षमतेनुसार पाणी शोषून घेतो. अन उन्हाळ्यात याचा विसर्ग करत असतो. गडावर जी बेसाल्ट दगडात तळी आहेत त्यांचे अतिरिक्त पाणी गडाबाहेर सोडण्याची व्यवस्था त्याच्या निर्मितीवेळी केली आहे. हे अतिरिक्त पाणी गडाखालील नैसर्गिक तळ्यात साठते तेथून झिरपून त्या खालील दुसऱ्या तळ्यात अशी चैन आहे. याद्वारे गडावरील अतिरिक्त पाण्याचे सुनियोजन लावले गेले. हि साखळी आपण विकासकामाच्या नावाखाली तोडली आहे. त्याच्या परिणाम गेल्या पावसाळ्यात आपण पाहीले आहेत.
अशाप्रकारे मानवाच्या हस्तक्षेपामुळे ऐतिहासिक अवशेषांना धोखा पोहचला आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे पन्हाळ्याची पहिली ओळख हि गड म्हणून आहे. ती ओळख जपणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. मला ज्या गोष्टी दिसल्या त्यातील काहीच निवडक गोष्टी यामध्ये मांडल्या आहेत परस्थिती याही पेक्षा भयावह आहे. माझ्याही मर्यादा आहेत. कोणाच्या घराखाली कोणते अवशेष गाडले गेले हे हि सांगू शकतो. निदान जें अवशेष आहेत ते तरी जपले जावे हि इच्छा !
आपण ऐतिहासिक वास्तूंना निर्माण झालेला धोका पाहिला. आता आपण पन्हाळा परिसरात मानवाच्या हव्यासामुळे होणारे परिणाम आणि त्याला निसर्गाने दिलेले उत्तर यावर चर्चा करणार आहोत. पन्हाळा सारख्या ठिकाणी कलम १४४ प्रशासनाला लावावे लागले यावरून परस्थिती आपल्याला समजून येईल. आता तरी थोड गांभीर्याने घेऊया. सुरुवातीला गेल्या पावसाळ्यात झालेले नैसर्गिक बदल पाहू.
पन्हाळ्याचा मुख्य मार्ग बंद :
प्रत्येक वर्षी पावसाळा आला कि बुधवारपेठ ते पन्हाळा हा रस्ता सगळ्यांची धाकधूक वाढवतो. बेसाल्टच्या दगडी शिळा उघड्या पडल्या आहेत. त्या कधीही कोसळू शकतात. त्या दगडाच्या सभोवतालची माहिती पाऊस, धूप यामुळे मोकळी झाली आहे. दरड कोसळण्याचा धोखा ओळखून गेल्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण वाढल्यावर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता परंतू पावसाचा जोर वाढत केला अन रस्ता खचला काही ठिकाणी दरड हि कोसळली.
आपटीतील भूस्खलन:
आपटीमध्ये गावामधून ५ फुट जमीन काही ठिकाणी खचली आहे . याची लांबी साधारणता दीड किलोमीटर आहे. येत्या पावसाळ्यात हा भाग सुटण्याची दाट शक्यता आहे. तसेच याच गावातील काही घरे १५ फुट एका रात्रीत खचली आहेत. या ठिकाणी सहकाऱ्यांच्या सोबत पत्रकार घेऊन जावून स्टोरी बनवून सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला होता.
बादेवाडी:
पन्हाळा परिसरात काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे तर बादेवाडी येथे जमीन वर आली आहे. बादेवाडी येथील लोहार कुटुंबीयांची सात घरे आहेत. त्यातील काही घरे जमिनीस फुगवटा येवून कोसळली आहे. जमिनीस फुगवटा येण्यास सुरुवात जेव्हा झाली होती तेव्हा त्याचा व्हिडिओ बनवला होता तो हि येथे शेअर करत आहे. परस्थितीचे गांभीर्य समजेल. माझे एक पत्रकार मित्र त्यांनी एक किस्सा सांगितला. सुरुवातीला एकच घर पडले होते ते पाहण्यासाठी प्रशासकीय अधिकारी अन ते गेले होते तेव्हा त्यांच्यासमोर काही घर उचलली गेलीत.
पुसाटी व मसाई पठारास जोडणारी सोंड-
मसाई पठार व पुसाटी बुरुज यांच्या दरम्यान एक सोंड गेली आहे. ही सोड बेसाल्ट च्या शिळामुळे आपले लक्ष वेधून घेते. या ठिकाणी फरसबंदी वाट खूप सुंदर आहे नव्हे थोडी शिल्लक आहे म्हणावी लागेल. असो येथेही मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे.
पन्हाळ्याच्या सभोवतालचे भूस्खलन :
बांबरवाडी , बुधवारपेठ, नेबापूर, आपटी, वेखंडवाडी , बादेवाडी ,राक्षी, निकमवाडी , धबधबेवाडी , सोमवारपेठ , इंजोळे आदी ठिकाणी घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. घरे खचणे, तडे जाणे या गोष्टी आपल्याला दिसून येतात परंतू या परिसरात डोंगर खचलेत . जंगल परिसरात जास्त कोणी जात नसल्याने या परिसरात घडामोडी समोर येत नाही. वरच्या सर्व गावातील अनिवासी ठिकाणे पाहिली आहेत. त्याचे फोटोग्राफ माझ्या संग्रही आहेत. मसाईपठारास जाणारा रस्ता खचला हि गोष्ट आपल्या लगेच लक्षात आली. परंतू याच्या शेजारील ऑस्ट्रेलियन बाभळ असणारी कुरणे किती खचलीत याकडे आपल किती लक्ष गेले ?
पन्हाळगडाच्या घेऱ्यातील भूस्खलन होण्याची संभाव्य कारणे :
पन्हाळा परिसरामध्ये डोंगरउतार , सपाट भूभाग येथे मोठ्या प्रमाणावर विदेशी झाडे लावली आहेत. यावर कोणतीच जैवपरिसंस्था निर्माण होत नाही. याची मूळे खोलवर रुजत नाहीत. ही झाडे अल्पायुषी असल्याने मूळ कुजली जातात .त्यात पाणी शिरल्याने ती उन्मळून पडतात. पन्हाळ्याच्या सभोवताली लावलेली झाडे भूस्खलनाच्या दृशिकोनातून खूपच धोकादायक आहेत. जिथे वर्षानुवर्षे कोणती झाडे उगवली नाहीत. अशा ठिकाणी ही झाडे प्रशासनाने विचार न करता लावली आहेत. या परिसरात जमीन खूपच खचली आहे या ठिकाणी देशी झाडे लावली गेली पाहिजेत.
श्री. दिनकर चौगुले
पर्यावरण अभ्यासक , पन्हाळा
वृक्षारोपण :
पन्हाळा परिसरात काही हिरवीगार ऑस्ट्रेलियन बाभळीची झाड असणारी कुरणे मोठ्या प्रमाणत दिसतात. पण आम्हाला एक गोष्ट जाणवली पन्हाळ्याच्या सभोवताली असणारी हि सगळी कुरणे खचली आहेत. सपाटीवर असणारी पण झाडे उन्मळून पडली आहेत. त्याबाबत पन्हाळा परिसरात परिचित असणारे पर्यावरण अभ्यासक श्री. दिनकर चौगुले यांना विचारले असता ही झाडे किती धोकादायक आहे हे सप्रमाण सांगितले. या झाडावर सुरुवातीला पक्षी पण घरटी करत नव्हते पण आता या परिसरातील सगळ्या बाभळी संपल्या सुगरणी समोर पर्याय नसल्याने या झाडावर त्या घरटे करू पाहत आहेत. घरटीहि झाडावर टिकत नाहीत. इतकी ती कमकुवत आहेत. पन्हाळ्यावर मोठ्या प्रमाणावर अशी झाड दुर्गप्रेमींनी लावली आहेत. अन सभोवताली वनविभागाने लाविली आहेत.
नैसर्गिक जलस्त्रोत नष्ट केले.
समाजमाध्यमांवर पन्हाळ्यातील आम्ही काही युवक एकत्र येऊन "सेव्ह पन्हाळा" नावाचे जनजागृती अभियान राबवत होतो . यामध्ये पन्हाळा परिसरातील ऐतिहासिक अवशेष व जैवविविधता यांचे अतिवृष्टीनंतर चित्रण केले होते. यामध्ये पन्हाळ्याच्या जैवविविधतेवर काम करणारे सत्पाल गंगनमाले व मी फिरत असताना आम्हाला एक गोष्ट जाणवली. जे नैसर्गिक पाणवठे होते ते बुजवून त्यावर विकासकामाचा रथ भरधाव वेगाने धावत आहे . डोंगर उतारावरील पाणी पायथ्याच्या तळ्यात साठत तेथून खालच्या तळ्यात अशी निसर्गाने कलेले पाण्याचे जलव्यवस्थापन आम्ही मोडले याचा परिणाम गेल्या पावसाळ्यात जाणवला. नेबापूर येथे एक तळ होत ते कोणी मुजवल माहित नाही. परंतू अतिरिक्त पाण्याचे विघटन झाले नसल्याले पाण्याच्या दाबामुळे रस्ताखालची जमीन वाहून गेली त्याचबरोबर जवळील शाळेची इमारत पण ढासळली असावी. शेजारील कुंभार वस्तीमध्ये घरात पाणी शिरले. नेबापूरच्या दलित वस्तीतही अशा समस्यांना तोंड द्यावे लागले. या तळयाव्यतिरिक्त अनेक ठिकाणचे नैसर्गिक डोह मुजवले त्याच्या जवळच भूस्खलन झाले आहे.
शेतजमीनीमध्ये बांधकाम व खाणकाम:
पन्हाळ्याच्या कुशीमध्ये अनेक शतके वेगवेगळी आव्हाने झेलत भूमीपुत्र राहत आहेत. गावठाण सोडून फारच कमी लोकांनी घर बांधली असतील. परंतु यांच एकच चुकले यांनी शेतजमीनी विकल्या. या ठिकाणी विकएंड ला येणाऱ्या गडगंज लोकांनी या शेतजमिनीत टुमदार बंगले बांधले. डोंगर उतारावरील जमीनीचे सपाटीकरण केले. बांधकामा आड येणारी मोठमोठी झाडे तोडली. त्या ठिकाणी शोभिवंत झुडप लावली. पन्हाळ्याच्या सभोवतालचे डोंगर जितके पोखरता येतील तितके पोखरले. प्राण्यांच्या आदिवासात जितका हस्तक्षेप करता येईल तितका केला . अन बिबट्या लोकवस्तीत आला म्हणायला आम्ही मोकळे ? असो ! गेल्या पावसाळ्यात पन्हाळ्याचा रस्ता खचला होता यामुळे प्रशासनाला , स्थानिकांना खूप त्रास करावा लागेल. हे माहित असून देखील बुधवारपेठेजवळ पावनगडाचा डोंगर मुख्य रस्ता या दरम्यान सपाटीकरण किती झाले ? हे एका रात्रीत तर झाले नाही मग हे कोणालाच कसे दिसले नाही ? पावनगडाच्या बुरूजापासून अवघ्या १०० मीटर परिसरात दगडाची खाण सुरु आहे. असेल खाजगी जागेत पण याचे परिणाम किती भयानक होतील याची काही प्रशासनाला कल्पना नाही का ? पावनगडाची काही ठिकाणी दरड कोसळली आहेच . या पावसाळ्यात यामुळे आणखी काही ठिकाणी कोसळेल ! माय बाप सरकार राहू दे गडाचे संर्वधन करायचे जें शिल्लक आहे त्याचे तर रक्षण करूया. फॉर्महाउस बांधून राहणाऱ्या लोकांची ही मौज करण्याची ठिकाण असतील परंतू शेकडो वर्षे राहणारी लोकांचे हीच एकमेव कर्मभूमी आहे. हीच मायमाउली आहे. हिच्या रक्षणासाठी आता स्थानिकांनी सज्ज झाले पाहिजे.
आता यावर उपाय काय ?
पन्हाळ्याचे क्षरण वेगाने होत आहे हे आपण पूर्णतः थांबवू नाही शकत परंतू थोडा वेग नक्कीच कमी करू शकतो. जेव्हा अशा समस्या निर्माण होण्यास सुरुवात झाली तेव्हाच ठोस पाऊले उचलायला हवी होती परंतू दुर्दैवाने उचलली गेली नाही. परंतू अजूनही वेळ गेली नाही . पन्हाळा व आसपासच्या घेऱ्यातील गावात कोणत्याही प्रकारची जमीन विकण्यास परवानगी नाकारली पाहिजे. गावठाण सोडून कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही तसेच खाणकाम उदा. स्टोन क्रेशर आदींवर बंदी आणली पाहिजे. शेतजमिनीमध्ये डेव्हलपमेंटच्या नावाखाली निसर्गाला हानी पोहचतील असे कोणतेही बदल करता येणार नाही. स्वतःच्या मलिकीची ही देशी झाडे तोडता येणार नाहीत. पाण्याचे डोह , तळी मुजवनाऱ्यावर कठोर कारवाही केली गेली पाहिजे.
पन्हाळ्याचे ऐतिहासिक वास्तू संवर्धित करायच्या असतील तर त्याची डागडुजी पुरातत्व विभागाने केली पाहिजे . अशास्त्रीय व विना परवाना संवर्धन करणाऱ्या संस्थावर कारवाही केली पाहिजे . तटबंधी किंवा कोणत्याही ऐतिहासिक वास्तू जवळ मोठी वाढणारी देशी व कोणत्याही प्रकारची विदेशी झाडे ऊसलागवड केल्यासारखी लावू नयेत. यामुळे संवर्धन राहू द्या उरलेसुरले अवशेष तरी राहतील . तीन दरवाजा मधील वाहतूक पूर्णपणे बंद केली पाहिजे. तेथील सांडपाण्याचे हि व्यवस्थित सुनियोजन केले पाहिजे.
मला गेल्या काही वर्षात जाणवले ते मी मांडले . पण यावर विचार मात्र
नक्की करा . छ. शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पन्हाळा व
परिसर अबाधित राहिला पाहिजे हीच भाबडी अपेक्षा . बहुत काय लिहिणे !
न्हाळगड का ढासळतोय ? भाग २ Downfall of panhala fort
पन्हाळगड का ढासळतोय ? भाग २ Downfall of panhala fort.
मागच्या ब्लॉग मध्ये आपण ऐतिहासिक वास्तूंना निर्माण झालेला धोका पाहिला. आता आपण पन्हाळा परिसरात मानवाच्या हव्यासामुळे होणारे परिणाम आणि त्याला निसर्गाने दिलेले उत्तर यावर चर्चा करणार आहोत. पन्हाळा सारख्या ठिकाणी कलम १४४ प्रशासनाला लावावे लागले यावरून परस्थिती आपल्याला समजून येईल. आता तरी थोड गांभीर्याने घेऊया. सुरुवातीला गेल्या पावसाळ्यात झालेले नैसर्गिक बदल पाहू.

नक्की करा . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला
पन्हाळा व परिसर अबाधित राहिला पाहिजे हीच भाबडी अपेक्षा . बहुत काय लिहिणे
!

No comments:
Post a Comment