https://www.bankapure.com/2015/12/JananichiNaal-Bhiknaal.html
मंडळ :
![]() |
| जननी नाळ आणि दुर्गदुर्गेश्वर रायगड... |
१. निनाद
बारटक्के
२. नितीन
तिडके
३.उत्तमराव
४. राकेश काका
५. केदार
नरवाडकर
६. विक्रम
पेठे
७. निरंजन
भावे
८. कौस्तुभ
दातार
९. शार्दुल
देशमुख
१०. दत्तू तुपे
दिनांक : ११ डिसेंबर २०१५ :
ऑक्टोबर २०१३ ला फडताडच्या
रेकी दरम्यान भोर्डी मधल्या मामाने आम्हाला जननीनाळेच्या तोंडापाशी आणले
होते… आणि डिसेंबर २०१३ मध्ये सलग २ वेळा फडताड नाळ केल्यावर फडताडच्या
खोऱ्यातल्या जननीच्या नाळे विषयीची उत्सुकता लागली होती… पण बाकीच्या इतर
अनेक नाळा करण्याच्या नादात, ह्या नाळेबरोबर काही नाळ जुळत नव्हती… अखेरीस
येत्या डिसेंबर मध्ये हा योग जुळून आला… शुक्रवारी रात्री कौस्तुभ च्या
गाडीमधून केदार, कौस्तुभ, भावे ,निनादराव आणि पेठे हे "पाच पांडव" कुसुरपेठला शाळेच्या ओसरीवर जाउन झोपले…
![]() |
| तोरणा आणि राजगड... |
दिनांक : १२ डिसेंबर २०१५ :
उत्तमरावांच्या बलाढ्य रणगाड्यातून (TATA ARIA) शार्दुल, तिडके, उत्तमराव, राकेश काका आणि दत्तू(अस्मादिक)
ही मंडळी पुण्याहून भल्या पहाटे ०४:३५AM च्या विकृत वेळी पुण्यातून
निघाली… गप्पा-टप्पा करत पहाटे ०६:००च्या सुमारास कुसुरपेठ ला पोचलो…
आधीच्या मंडळींना उठवून, घरातून आणलेल्या थर्मास मधल्या वाफाळत्या चहाचा
आस्वाद घेतला… चहा पिताना सभोवताल नजर टाकल्यावर एकसेएक किल्ले नजरेसपडू
लागले… उत्तरेला खणखणीत राजगड आणि तोरणा दिसत होते, पूर्वेला रायरेश्वर,
खाली अस्वलखिंड, शेजारी कोळेश्वर, पलीकडे महाबळेश्वर, मध्येच मोहनगड
उठवलेला दिसला… समोर दक्षिणेला मंगळगड, प्रतापगड, मधु-मकरंदगड, महीपतगड,
शेवत्या घाटाचे तोंड, गाढवलोट कडा, भिकनाळच्यावरचा डोंगर दिसत होता…
पश्चिमेला पोटला डोंगर, रायगड, तवली डोंगर, कणा डोंगर, लिंगाणा, कोकणदिवा,
खानुचा डिग्गा असे एकसेएक खतरनाक व्युज मिळाले…
![]() |
| जननीदेवी... मामा आणि मामी... |
आवरा-आवरी करून निघायला सकाळचे ०७:०० वाजले… कुसूरपेठेतून मामांना सोबतीसाठी घेतलं… तर मामांनी मामींना-ही
(त्यांच्या मंडळींना) सोबतीला घेतलं… जिमीन प्रकल्पाच्या अलीकडे गाड्या
लावल्या… एका पोपटाच्या शिकारीसाठी घुबड आणि घारीची हाणामारी चालू होती…
जिमीनप्रकल्पांच्या तारांमध्ये अडकल्यामुळे तिघेही जखमी झाले होते, त्यातच
पोपटासाठी मारामारी करून दोघेही दमलेले होते, आणि बिचारे पोपट तर अगदीच
बिथरलेल्या अवस्थेत एका झुडपाच्या बाजूला बसलेले आढळले… एकंदरीत
पोपटाच्या शिकारीच्या नादात घुबडाचा आणि घारीचा "पोपट" झालेला बघायला
मिळाला... भरपूर फोटोग्राफी झाली… हवामान चांगले असल्यामुळे समोर
दुर्गदुर्गेश्वर रायगडावरचे जगदीश्वर मंदिर अतिशय स्पष्ट दिसत होते…
अर्ध्यातासात जननीच्या ठाण्यापाशी पोचलो… थोडी वस्पटी करत जननी नाळेच्या
तोंडापाशी पोचलो…
वेळ सकाळची ०८:१२ AM…
![]() |
| जननी नाळ... |
जननीची नाळ :
५० फुटी रोप घेतला होताच… जननीनाळेच्या तोंडापाशी एक मजबूत झाड लागले… कौस्तुभ ने मानवी बिले देऊन सर्वात प्रथम निनाद्रावांना खाली
उतरवले… २० फुटांच्या छोट्याश्या Rock Patch वर थोडाफार घसारा होता… पण एक
एक करून सुमारे दीड तासांत सगळ्यांना नाळेच्या तोंडापाशी खाली उतरवले… आता
भिकनाळ 'पष्ट' दिसत होती… नाळेच्याआत ठिसुळ दगडांमुळे खाली गेलेला
प्रत्येकजण नाळेच्या कोपऱ्यात लपून बसत होता… न जाणो एखादा दगड वरून
डोक्यावर पडला तर "एक टप्पा आउट" होऊन एखाद्याची Vertical Journey झालीच
समजायची…मामांबरोबर आलेल्या मामी तर अतिशय तयारीच्या होत्या… "जननीची नाळ" उतरताना आयुष्यात पहिल्यांदा एका "जननीबरोबर" ट्रेक अनुभव मिळाला... राकेश काका, कौस्तुभ आणि तिडके नाळेपाशी थांबले … सर्वात शेवटी कौस्तुभ खाली
येत असताना ५०फुटी रोप कुठेतरी झाडांत अडकली… तो बिचारा पुन्हा वर गेला…
"पुन्हा" रोप सोडवून खाली यायला लागल्यावर "पुन्हा" रोप कुठेतरी
झाडाझुडपांत अडकली…"उन्हातान्हातून" पुन्हा वर गेला आणि राकेशकाकांनी खालून बिले देऊन कौस्तुभ ला
सुखरूप खाली आणले… ह्या सगळ्या प्रकरणांत दीड तास हकनाक वाया गेला…
एव्हाना बाकीची मंडळी बऱ्यापैकी खाली जाऊन आमची वाट बघत बसली होती… एकंदरीत जननीची नाळ चढायला उतरायला बऱ्यापैकी सोपी आहे फक्त जोडीला टेक्निकल पूर्वानुभव हवा…
वेळ दुपारची ११:४७ PM…
जननी नाळ (उजवीकडे) आणि समोर दुर्गदुर्गेश्वर रायगड, भिकनाळ (डावीकडे)...
वरील फोटोस्फियर मध्ये माऊस च्या लेफ्ट क्लिक ने फोटो ३६०° अंशात फिरवा ...
सगळे खाली आल्यावर सगळ्यांनी पौष्टिक लाडू
खाल्ले… पुढच्या अर्ध्या तासात खाली पदरातल्या जंगलात पोचलो… फडताड-भिकनाळ
खोऱ्यातल्या पदरातलं जंगल मस्त करकरीत आणि घनदाट आहे… कोकणातून काही मंडळी
"डूकार" च्या शिकारीसाठी ह्या जंगलात आली होती… सोबतीला ५-६ कुत्री देखील
होती… भिकनाळेच्या तोंडापाशी आल्यावर साठलेल्या पाण्यापाशी दुपारचं जेवण
उरकण्यासाठी थांबलो… पोळी-भाजी, ठेपले, उकडलेली अंडी, केळी एवढाच आहार
घेतला… कौस्तुभ ने आणलेलं लेमन-बार्ले वॉटरचं सरबत प्यायल्यावर सगळ्यांना तरतरी आली… १० मिनिटं आराम केला…
वेळ दुपारची ०१:०० PM…
![]() |
| भिकनाळ... |
भिकनाळ :
भिकनाळ च्या तोंडापाशी चढायला सुरवात केली…
भिकनाळ आधीही फडताड सोबत केली असल्यामुळे तिच्याविषयीचा अंदाज होताच…
तासाभरात एका २० फुटी Rock Patch पाशी पोचलो… मागच्या वेळेस जसे उतरलो होतो
तसेच ह्यावेळेस चढायचा बेत आखला… खाली तिडके, दत्तू आणि कौस्तुभ
उभे होते आणि त्यांच्या खांद्यावर पाय ठेवून प्रत्येकाने वर चढायचे…
सुरवातीला निनादराव वर गेले, त्यांच्यापाठोपाठ रोप आणि प्रत्येकच्या बॅगा
पाठवून दिल्या… मग एका पाठोपाठ प्रत्येकाला वर पाठवण्यात आले… शेवटी दत्तूला (अस्मादिक) ला दोराच्या सहाय्याने खेचून घेण्यात आले… ह्या सगळ्या प्रकरणांत एक तास गेला… पुन्हा कौस्तुभ ने
आणलेलं लेमनबार्ले वॉटरचं सरबत प्यायल्यावर सगळ्यांना तरतरी आली… पुढच्या
अर्ध्या तासात भिकनाळेच्या तोंडापाशी पोचलो… डावीकडे वर चढून माथ्यावर आलो…
वेळ संध्याकाळची ०५:३५PM…
![]() |
| संध्याकाळचा सूर्यास्त - रायगड, जननीची राई, लिंगाणा, कणा डोंगर, गायनाळ, तवी नाळ, आग्या नाळेचं खोरं... |
संध्याकाळच्या सूर्यास्ताने आकाशात चांगलेच रंग
भरले होते… रायगडाच्या किनाऱ्यावरचा सूर्यास्त तर बघण्यासारखा होता…
सूर्यास्तानंतर गोल्डन लाईट मुळे लिंगाणा, कणा डोंगर, तवली डोंगर,
कोकणदिवा, एकलगावचं खोरं जबरदस्त दिसत होतं… तासाभराच्या चालीने जिमीन
प्रकल्पापाशी जिथे गाड्या लावल्या होत्या तिकडे पोचलो… पोचण्यापूर्वी
आमच्या सोबत आलेल्या मामांनी एक पूर्ण वाढ झालेल्या घोणस (Russel's Viper)
चा बांबूने मारून हकनाक जीव घेतला… आमच्यापैकी प्रत्येकाने त्यांना समजावून
सांगितले कि मारू नका, तर त्याचं म्हणणं एकंच कि हा शेळ्या मारतो (!)(?)… आमच्या लहान पोरांना ह्याच्यापासून धोका आहे… भयंकर वाईट वाटलं पण पर्याय नव्हता… केवढा हा सापांविषयी गैरसमज...
तर असा हा छोटेखानी एकदिवसीय ट्रेक यशस्वी सफल संपूर्ण झाला… येताना नेहमीप्रमाणे हेमंतदादाच्या हॉटेल
तोरणा-विहार मध्ये हिरवा रस्सा - आळणी आणि भाकरी असं यथेच्छ जेवण
हादडल्यावर ३.५ सेकंदांचा तृप्तीचा ढेकर देण्यात आला…पान खाऊन
आणि आल्यामार्गी पाबे घाटातून पुण्यात परतलो…
वेळ रात्रीची १०:३५PM…
धनुर्वाद,
ट्रेकळावे,
दत्तू तुपे.
ठळक वैशिष्ठ्ये :
१. जननीची नाळ' उतरताना… आयुष्यात पहिल्यांदा एका 'जननीबरोबर' केलेला ट्रेक...
२. कौस्तुभ ने व्यवस्थित दिलेला मानवी बिले, ज्याच्यामुळे सगळे व्यवस्थित नाळ उतरू शकले…
३. एका पोपटाच्या शिकारीच्या नादात जिमीन प्रकल्पांच्या तारेच्या कुंपणात अडकल्यामुळे, घुबड आणि घार जखमी… पोपट भेदरलेले…
४. ३ वेळा रोप अडकूनही यशस्वीपणे रोप सकट उतराई केलेल्या कौस्तुभ चे मनापासून धनुर्वाद… अर्थात राकेश काका आणि तिडके ह्यांची साथ हि तितकीच मोलाची… सोप्या असलेल्या जननीच्या नाळेची उतराई…
५. भिकनाळेची पुन्हा एकदा यशस्वी चढाई…
६. स्वच्छ हवामानामुळे दूरदूरपर्यंतच्या किल्ल्यांचे लोभस-डोळस दर्शन…
७. मामांनी उगीचंच हकनाक मारलेली घोणस (Russels Viper)
८. नेहमीप्रमाणे तोरणाविहार मधलं उत्कृष्ठ जेवण…
९. बऱ्याच वर्षांनी हलका-फुलका आणि "गुल-छबू" प्रकारचा केलेला ट्रेक… गुल-छबू चा अर्थ सहज सोपा ट्रेक ... गुल-छबू लोकांना घेऊन ट्रेक करण्यासारखा नाही.... ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी...
११. नुसता ब्लॉग वाचून जर का हा ट्रेक कोणी करणार असेल तर स्वतःच्या जबाबदारीवर करावा... डायरेक्ट लेखकाच्या नावावर खापर फोडू नये...






No comments:
Post a Comment