Tuesday, November 22, 2022

पन्हाळा

 

आज १२/१२/१२ …आता तो दिवस जवळ येतोय …. हो तोच तो महाप्रलयाचा दिवस…कयामतका दिन…डूम्स-डे….दि जजमेंट डे…२१ डिसेंबर २०१२….

तर प्राचीन माया संस्कृतीच्या कालगणनेमध्ये २१ डिसेंबर २०१२ हा दिवस शेवटचा दिवस आहे. हजारो वर्षांच्या या कालगणनेमध्ये २१ डिसेंबर २०१२ नंतरची कालगणना दाखविलेली नाही.हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन अश्या जगातल्या जवळपास सर्वच धर्मात जगाचा अंत निश्चित मानलेला आहे.वैज्ञानिकदृष्ट्याही पृथ्वीवरील उष्णता आणि शीतलता ‘एक्स्ट्रीम’ वाढून पृथ्वीचा अंत निश्चित आहे.त्सुनामी आणि तत्सम नैसर्गिक आपत्त्याही अधून मधून तोंड बाहेर काढत आहेत.म्हणूनच ‘ ग्लोबल सीड वॉल्ट‘ सारखा आतिशय मोठा प्रकल्प नॉर्वे येथे राबवला जात आहे,ज्यात बिल गेटस सारख्या लोकांचा सहभाग आहे. तरी जगाचा अंत इतक्या लवकर होईल अस वाटत नाही.पण येत्या काही दिवसात मिडिया जड जड शब्द वापरून मोठ्या मोठ्या विशेषणांसह जगबुडी हा विषय चांगलाच चघळणार आहे.मला वाटते जगाला खरा धोका कसला आहे तर तो प्रचंड प्रमाणात केलेल्या वृक्षतोडीमुळे निर्माण झालेल्या असमतोल पर्यावरणाचा ,प्रदूषणाचा ,होऊ घातलेल्या अणुबॉम्बयुक्त महायुद्धाचा…

तर ही पोस्ट टाकण्यास कारण म्हणजे पन्हाळगडाच्या निमित्ताने कोल्हापूरला केलेला पहिलावहिला आणि झटपट एकदिवसीय दौरा.तुम्ही म्हणाल माझ्या कोल्हापूर दौऱ्याचा आणि जगबुडीचा काय संबध ?तर संबध आहे.मलाही हे रहस्य तिथे गेल्यावरच उलगडल.ते आपल्या सर्वांसमोर मांडण्यासाठी हा लेखप्रपंच.तर भक्तजनहो नीट लक्ष देऊन वाचा, ही जगबुडी कधी होणार त्याची कहाणी.कोणत्याही शिवमंदिरात आपण जातो तर तिथे शिवलिंग मुख्य गाभार्यात व बाहेरील भागात नंदी पाहावयास मिळतो.पण कोल्हापुरातील रंकाळा तलावा किनारी असलेल्या मंदिरात नंदीची साधारण पाच ते  सहा  फूट उंचीची  मूर्ती मुख्य गाभार्यात आहे व शिवलिंग बाहेरील भागात आहे. तिथल्या एका व्यक्तीला ह्याबाबत विचारले असता त्याने सांगितले ,(…ढॅण टॅ णॅण… )कि हा नंदी  दरवर्षी गहूभर पुढे व तिळभर मागे सरकतो आणि हा सरकत सरकत जेव्हा रंकाळा तलावापर्यंत पोहोचेल तेव्हा जगबुडी होईल…युरेका …आहे कि नाही ‘तलाश’ सिनेमातील रहस्याहून जास्त धक्का देणार  रहस्य…  आणि आता निर्धास्त रहा कारण मी पाहीलय अजून तो नंदी तलावापर्यंत पोहोचण्यास बरच ‘मार्जिन ‘  आहे.

23

हेच ते मंदिर ….

तर काही कारणांनी कधी  जगबुडी झालीच तर ज्यांनी पन्हाळगडाला आजवर  भेट दिली नाहीये आणि समजा पुढेही तसा योग जुळून येणार नसेल  पण  त्यांनी इथे भेट दिली आहे त्यांना काही छायाचित्रांद्वारे पन्हाळगडासह कोल्हापूरची थोडक्यात सहल घडवण्याच्या प्रयत्न खाली करतोय…….

तर कोल्हापूर  शहराच्या वायव्येस सुमारे १८ किमी वर  समुद्रसपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर असणारा   पन्हाळा हा किल्ला म्हणजे शिवरायांच्या आयुष्यातील अनेक नाट्यपूर्ण घटनांचा जिवंत साक्षीदार.तसेच शिवाजी महाराज  आणि संभाजी  ह्यांचा आवडता किल्ला.दोन वेळा मराठ्यांची राजधानी म्हणून मान मिळालेला हा किल्ला.सलग चार महिने सिद्दी जोहारच्या वेढ्यात महाराजांचे वास्तव्य लाभलेला हा किल्ला.शिवाजी आणि संभाजी महाराजांबरोबरच बाजीप्रभू देशपांडे ,वीर शिवा काशीद,ताराराणी,कवी मोरोपंत,रामचंद्रपंत अमात्य अश्या अनेकांच्या आयुष्यातील  महत्वाच्या घटनांशी जुडलेला हा किल्ला. हा किल्ला शिलाहार वंशी राजा भोज दुसरा याने बांधला.पुढे अनेक राजसत्तांनी इथे राज्य केले हे तेथील दरवाज्यावर कोरलेल्या राजचिन्हातून दिसून येते.

वीर शिवा काशिद : सिद्दी जोहरच्या वेढ्यातून बाहेर पडतांना त्याला चकवण्यासाठी शिवाजींचे पेहराव धारण करणारा व वीरमरण पत्करणारा  हुबेहूब शिवरायांसारखा दिसणारा मर्द मावळा...

वीर शिवा काशिद : सिद्दी जोहरच्या वेढ्यातून बाहेर पडतांना त्याला चकवण्यासाठी शिवाजींचे पेहराव धारण करणारा व वीरमरण पत्करणारा हुबेहूब शिवरायांसारखा दिसणारा मर्द मावळा…

महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत प्राणपणाने लढा देऊन आपल्या पवित्र रक्ताने घोडखिंडीची पावनखिंड बनवणारे नरवीर बाजीप्रभू देशपांडे ...

महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत प्राणपणाने लढा देऊन आपल्या पवित्र रक्ताने घोडखिंडीची पावनखिंड बनवणारे नरवीर बाजीप्रभू देशपांडे …

तटबंदी

तटबंदी

4

दरवाजावर कोरलेली काही राजचिन्हे…

5

6 7

आजच एक चिन्ह .. 😦

9

10

11

8

14

अंबरखाना

13

कोठाराचा आतील भाग …

30

सज्जा कोठी : शिवाजी व संभाजी महाराजांची शेवटची भेट ह्याच ठिकाणी झाली होती .

15

सज्जा कोठीतून …

16

सज्जा कोठीतील नक्षी …

17

सज्जकोठीची गच्ची …

26

धनाजीराव वाकडे (धुमधडाका ) घर … 🙂

18

19

महालक्ष्मीआईच्या नावान चांगभल …

25

ज्योतिबाच्या नावान चांगभल …

21

येथे आत भिंतीवरील चित्र पाहण्यासारखी आहेत .अजिबात चुकवू नका.

24

22

कुस्तीच मैदान

20

न्यू पॅलेस व म्युझियम: अनमोल ऐतिहासिक वास्तूंबरोबरच आतील त्याकाळच्या दरबाराची मांडणी बघण्यासारखी आहे…

27

शालिनी पॅलेस…

28

रंकाळा

29

गुंग झालात ना पन्हाळा आणि कोल्हापूरची थोडीशी झलक पाहण्यात तर खरच आवर्जून आणि जास्त वेळ काढून भेट देण्यासारख हे ठिकाण आहे .तर आपण कुठे होतो … हा जगबुडी …भ्रष्टाचार आणि महागाईचा भस्मासुर कित्येकांना रोजच मरायला भाग पाडत आहे. त्या रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच सर्वजण गेले तर बरच होईल,अस भारतातील बहुसंख्य लोकांच मत असेल.आणि समजा झालीच जगबुडी, तर काय बिघडणार आहे? आपण सगळेच नसणार तर चिंता कसली? तेव्हा जगबुडीला घाबरलेल्या किंवा मुळत:च उदासीन असलेल्या चिंतातुर जंतूनो किंवा स्वतःचा अकार्यक्षमतेपणा लपवण्यासाठी ह्या संकल्पनेच्या कुबड्यां घेणार्यांनो वेळेवर जागे व्हा.ह्या आणि असल्या संकल्पनांवर स्वत:चा फायदा करून घेणारेही आहेत.मी सुद्धा कं मुळे इतके दिवस बंद असलेल्या ‘दवबिंदू’वर पोस्ट टाकण्यासाठी ह्या संकल्पनेचा कसा वापर केला आहे ते बघा.तेव्हा   जगबुडी नाही झाली तर काय होईल हा विचार करा आणि आपापल्या कामाला लागा… 🙂

हर घड़ी बदल रही है रूप ज़िंदगी
छाव है कभी, कभी है धूप ज़िंदगी
हर पल यहाँ, जीभर जियो
जो है  समा, कल हो न  हो….

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...