Tuesday, November 22, 2022

भिलाई किल्ला - कंडाळा किल्ला - प्रेमगिरी किल्ला - कण्हेर किल्ला

 https://www.bankapure.com/2019/08/Bhilaai-Kandala-Premgiri-Kanher.html

मंडळ :
~नितीन तिडके
~अमेय जोशी
~साकेत गुडी
~साईप्रकाश बेलसरे
~दत्तू तुपे

कण्हेरगडावरून दिसणारा धोडप किल्ला... 

दिनांक : १७ ऑगस्ट २०१९

                                   बऱ्याच महिन्यांनी झकास पंचतारांकित (साईप्रकाश फेम - फाईव्ह स्टार ट्रेक विथ अ थिम) ट्रेक करण्याची चांगली संधी दिल्याबद्दल साईचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत... सुमारे महिनाभर आधी ह्यांच्या ठरलेला "पिलान"  असतानाही मध्येचं माझी अचानक दोन दिवस आधी गाडीसकट ड्रायव्हर म्हणून एंट्री झाली... नाशिक जिल्हा तसा किल्ल्यांच्याबाबतीत प्रचंड श्रीमंत आणि त्यातही आड-वाटांवरच्या बागलाण प्रदेशातल्या किल्ल्यांना भेट द्यायची आहे, हे ऐकूनच  मी माझ्या दोन्ही Both of the two legs  वर ह्या ट्रेक साठी जायला तयार झालो...  ठरल्याप्रमाणे पहाटे ०५:३५ AM IST ला चिंचवड हुन जोशीबुवा, साकेत आणि साई ला गाडीत टाकून आणि वाटेत डिझेल भरून खेड घाटाच्यापलीकडे हॉटेल आकाश मध्ये चहा हाणला... थर्मास मध्ये चहा भरून थेट नितीन तिडकेच्या  "मिसळमूल्य" सल्ल्यानुसार सिन्नर मधल्या "गार्डन मिसळ" ला भेट दिली... टिपिकल नाशिक स्टाईल अप्रतिम चवीची मिसळ विथ बालुशाही, जिलबी  हाणल्यावर मनापासून ३.५ सेकंदांचा अखंड तृप्तीचा ढेकर दिला... त्यामुळे मालकांनी कुठून आलात, फोन नंबर वगैरे घेतला आणि ट्रूकॉलर वर नाव बघून थेट जात विचारली...पण माणुसकीपलीकडे कुठलीच जात मानणारे आम्ही,मालकाच्या त्या प्रश्नाकडे सोईस्कर दुर्लक्ष करून, थेट नाशिक मार्गे दगडी-साकोडे गाव ओलांडून आवळबारी खिंडीत गाडी थांबवली... वाटेत तिडके ला ट्रेक ला  विचारल्यावर साहेब सुद्धा यायला तयार झाले...
वेळ दुपारची : ११:५८ AM IST...

भिलाई : वरील फोटोस्फियर मध्ये माऊस च्या लेफ्ट क्लिक ने फोटो ३६०°  अंशात फिरवा ... 

किल्ले भिलाई : 
                                 आवरा-आवरी करून हलकं-फुलकं सामान घेतलं... खिंडीतुन उजव्या बाजूला एक वाट गडाकडे जाते .... चढताना उजव्या बाजूला वाघजाई देवतेची शेंदूर फासलेली शिळा आणि देव आहे... छाताडावरची चढाई चांगलीच अंगावर आली होती... पण पश्चिमेकडचा भर्राट वारा अंगावर आल्यावर चढाई बऱ्यापैकी सुकर झाली... काही मेंढपाळ निवांत बसले होते... वाटेत साईला एक खापर सापडलं... सुमारे अर्ध्या तासाच्या घसाऱ्यावरच्या चढाईनंतर पाण्याच्या टाक्यांपाशी पोचलो... पाच पाण्याच्या भरलेल्या खोदीव टाक्या आहेत... दोन खोदीव गुहा आहेत... एका गुहेत मारुती, शेंदूर फासलेले दगड आणि सप्तशृंगीदेवीची मूर्ती आहे... तसेच पलीकडे ट्रॅव्हर्स मारत दक्षिण टोकाला गेलो तर काहीच सापडलं नाही... माघारी येऊन एक छटाकसा रॉकपॅच चढून किल्ल्याच्या माथ्यावर डेरेदाखल झालो... समोर उत्तरेकडे सेलबारी - डोलबारी डोंगररांगेमधील  धुक्यात हरवलेल्या साल्हेर, सालोटा पासून थेट मुल्हेर किल्ल्यांपर्यंत नजर खिळली होती... अशक्य अफलातून नजारा... चणकापूर डोंगररांगेतल्या भिलाई सारख्या छोटेखानी किल्ल्याचा टेहळणीसाठी प्रमुख उपयोग होयचा... पश्चिमेला कंडाळा / पिंपळा किल्ला खुणावत होता...
वेळ दुपारची : ०१:१२ PM IST...
भिलाई किल्ल्याची संक्षिप्त माहिती : ट्रेकक्षितिज : http://trekshitiz.com/marathi/Bhilai_Fort-Trek-B-Alpha.html

भिलाई : चढताना उजव्या बाजूला वाघजाई देवता... 

भिलाई : साईला सापडलेलं खापर... 


भिलाई : वरील फोटोस्फियर मध्ये माऊस च्या लेफ्ट क्लिक ने फोटो ३६०°  अंशात फिरवा ... 

भिलाई : गडाच्या पश्चिम बाजूला असलेली सप्तशृंगी देवी... 

                                माथ्यावर फोटोग्राफी झाली... खादाडी झाली... पुन्हा रॉक पॅच उतरून डाव्या अंगाने ट्रॅव्हर्स मारत दक्षिण दिशेला गेलो... सप्तशृंगीदेवीची एक छोटी मूर्ती बरोबर सप्तशृंगीगडाच्या दिशेला ठेवली आहे... थोड्याचवेळात गाडीपाशी आलो ... तिडके ला फोन लावत होतो... वाटेत गाडीत बसून सुमारे पाऊण तासाने थेट मळगाव बुद्रुक पाशी पोचलो... एव्हाना तिडके आणि त्याचे दोन मित्र येऊन थांबलेले होते... गाडी लावली आणि सामानांची आवरा-आवरी करून निघालो ...
वेळ दुपारची : ०३:३५ PM IST...

वाटेत आढळलेल्या विरगळी... 

किल्ले कंडाळा / पिंपळा  :
                              
नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे चिखल झाला होता... गावातच गाडी लावून चिखलातून मार्ग वाट तुडवत पुन्हा डांबरी सडकेवर आलो... छोट्याश्या धरणाला उजव्या अंगाला ठेवत एक वाट डावीकडे वर गडावर जाते ... वाट चांगलीच मळलेली होती... त्यात गुराढोरांच्या शेणामुळे सांभाळून चढावं लागत होतं... अर्धी चढाई झाली नसेल तोच तिडके चे दोन्ही मित्र माघारी वळले कारण त्यांना नाशिकला परतायचं होतं... अर्ध्या तासात महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या नेढ्यात डेरेदाखल झालो... मुख्य नेढ्याच्या उजव्या बाजूला अजून एक होऊ घातलेलं नेढं आहे... पाण्याच्या दोन खोदीव टाक्या आहेत... शेवाळलेल्या निसरड्या वाटेने आपण पलीकडे जातो... नेढ्यात पोचल्यावर भुरभुर पावसाची सुरवात झाली... समोर पुन्हा एकदा धुक्यात हरवलेले साल्हेर, सालोटा आणि भिलाई किल्ले दिसले...  फोटोग्राफी उरकली... खादाडी हाणली... नेढ्याच्या वर छोट्याश्या रॉकपॅच ला चढून माथ्यावर पोचलो... माथ्यावर पाण्याच्या ३ टाक्यांचा समूह आणि सुमारे २५ एक पोस्ट-होल्स आहेत... एव्हाना पाऊस वाढायला लागल्यामुळे आम्ही खाली उतरण्याचा निर्णय घेतला...
पाऊण तासाने गावात पोचलो...
वेळ संध्याकाळची : ०६:२४ PM IST...
कंडाळा / पिंपळा किल्ल्याची संक्षिप्त माहिती : ट्रेकक्षितिज : http://trekshitiz.com/marathi/Pimpla-Trek-P-Alpha.html

कंडाळा : वरील फोटोस्फियर मध्ये माऊस च्या लेफ्ट क्लिक ने फोटो ३६०°  अंशात फिरवा ... 

   कंडाळा : वरील फोटोस्फियर मध्ये माऊस च्या लेफ्ट क्लिक ने फोटो ३६०°  अंशात फिरवा ... 

                        

   कंडाळा :वरील फोटोस्फियर मध्ये माऊस च्या लेफ्ट क्लिक ने फोटो ३६०°  अंशात फिरवा ... 

कंडाळा किल्ल्याच्या नेढ्यातून दिसणारा अप्रतिम सह्याद्री... 

रणगाडा आणि सरपंचांचं घर... 
साई  बनवलेलं अप्रतिम सांबार आणि राईस... 

                             शाळेच्या ओसरीबाहेर डास चावतात म्हणून गावातल्या सरपंचांनीचं माणुसकी दाखवत आमच्यासाठी त्यांच्या घरातचं आमची रहायची सोय केली... मग साई ने झकास गरमागरम सूप प्यायल्या दिल्यामुळे दिवसभराचा सगळा थकवा निघून गेला ... नाशिक जिल्ह्यातचं नाशिक शहरात पावसामुळे एवढा पूर येऊनही ह्या गावात मात्र अजूनही ग्रामस्थांना हातपंपाने रोजच्या पाण्याची सोय करावी लागतेय... शासनाच्या ओंगळ कारभाराचा अजून एक उत्तम नमुना म्हणजे हा प्रदेश होय ...  सुदैवाने आमच्या कडे २० लिटर "पु.चं .पा" असल्यामुळे पाण्याचा तोटा नव्हता... रात्रीच्या डिनरला साईने  मस्तपैकी गरमागरम सांबार आणि जिरा राईस बनवला होता... जेवण उरकल्यावर झकास गुलकंद पान खायला मिळाल्यामुळे दिवसाची सांगता सुद्धा खतरनाक झाली... थोडीफार रात्रीची नाईट फोटोग्राफी उरकली... आपापल्या स्लीपिंग बॅग्स मध्ये घोरावाडीच्या निद्रादेवीच्या आराधनेत ब्रह्मानंदीची टाळी कधी वाजली कळलंचं नाही ... पहाटे कानात डासांनी High Frequency मध्ये गुणगुणायला सुरवात केल्यामुळे जाग आली... उठून आवरा-आवरी केली... साईने पुन्हा एकदा जबराट गरम पोहे आणि मिसळ बनवली... सोबतीला चहा सुद्धा घेतल्यावर तरतरी आली... आवरून निघालो... गावाच्या बाहेर पत्र्याची शेडखाली एक मोठी विरगळ आणि काही शेंदूर फासलेले दगड आहेत...वाटेत पाणवठ्यापाशी भांडी घासून घेतली ... कळवण गावाच्या अलीकडे अजून काही शेंदूर फसलेल्या विरगळी सापडल्या... गाडी थेट एकलहरे गावापाशी थांबवली...
वेळ सकाळची : ०८:५२ AM IST...

मळगाव बुद्रुक मधल्या विरगळी... 

कळवण गावाच्या अलीकडे आढळलेल्या विरगळी... 

                       प्रेमगिरी : वरील फोटोस्फियर मध्ये माऊस च्या लेफ्ट क्लिक ने फोटो ३६०°  अंशात फिरवा ... 

                     प्रेमगिरी : वरील फोटोस्फियर मध्ये माऊस च्या लेफ्ट क्लिक ने फोटो ३६०°  अंशात फिरवा ... 



दिनांक : १८ ऑगस्ट २०१९

किल्ले प्रेमगिरी : 
                          मुख्य रस्त्यापासून दीड किलोमीटर आत शेणमिश्रित चिखलरूपी कच्च्या रस्त्यावरून जाण्यासाठी  गाडीचं ४x४ लावावं लागलं  तेव्हा कुठे एकदाचे धवला घरापाशी पोचलो... प्रेमगिरी किल्ल्याला उजवीकडे ठेवत समोरच्या खिंडीत धोपटमार्गाने चढाई करत खिंडीत पोचलो... तिकडून उजवीकडे प्रेमगिरी किल्ल्याची घसारायुक्त खडी चढाई सुरु झाली... आणि काही वेळातचं खोदीव पायऱ्या लागल्या... सुमारे २५ पायऱ्या ओलांडून पुढच्या १७ मिनिटांत माथ्यावर डेरेदाखल झालो... पाण्याच्या २-३ टाक्यांचा समूह आहे... मारुतीचं मंदिर आहे... हाही किल्ला चणकापूर डोंगर रांगेतील टेहळणीसाठी खास बांधण्यात आला होता... समोर उत्तरेला साल्हेर, सालोटा, मुल्हेर दिसत होते ... दक्षिणेला सातमाळेतील धोडप, कण्हेरा, सप्तशृंगी, रवळ्या-जवळ्या, अचला, अहिवंत दिसत होते...   मारुतीरायाचे दर्शन घेऊन पुनःश्च खाली उतरून गावात पोचलो... चढाई उतराई ला पावणे दोन तास पुरले... गाडीला स्टार्टर मारून वाटेत चहा मारून गाडी थेट सादडविहीर गावात आणली ...
वेळ सकाळची ११:१२ AM IST...
प्रेमगिरी किल्ल्याची संक्षिप्त माहिती : ट्रेकक्षितिज : http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Premgiri-Trek-Hill_forts-Category.html

कण्हेर / कण्हेरगड : वरील फोटोस्फियर मध्ये माऊस च्या लेफ्ट क्लिक ने फोटो ३६०°  अंशात फिरवा ... 



कण्हेरगड : भग्न दरवाजाच्याचे अवशेष????
कण्हेरगड : दोन खोदीव लेणी... 

कण्हेरगड : नंदी, वृंदावन आणि पाण्याचं टाकं... 

कण्हेरगड : उध्वस्त वाड्याचे जोती... 

            कण्हेरगड : वरील फोटोस्फियर मध्ये माऊस च्या लेफ्ट क्लिक ने फोटो ३६०°  अंशात फिरवा ... 


किल्ले कण्हेरगड / कण्हेरा : 
                              सादडविहिर गावापासून सुमारे दीड किलोमीटर पुढे रस्त्यावर गाडी लावली... सामान घेउन निघालो... समोर गडाचा बुरुज दिसत होता ... २० मिनिटांत सागाच्या झाडांमधून खिंडीत दाखल झालो...  खिंडीतून घसाऱ्याची खडी चढण  सुरु झाली... थोड्याचवेळात खोदीव पायऱ्या लागल्या... पायऱ्या चढून गेल्यावर आम्ही बुरुजाला उजव्या अंगाला ठेवत चढाई सुरु केली ... पुन्हा एकदा खोदीव पायऱ्या लागल्या... मध्येच एक मोठी पाण्याची खोदीव टाकी आहे... पुन्हा काही पायऱ्या चढून गेल्यावर नेढ्यापाशी पोचलो... नेढ्यात भर्राट वारा वाहत होता... समोर दक्षिणेला मोहनदरी किल्ला आणि त्याचं नेढं स्पष्ट दिसत होतं... समोर दक्षिणेला धुक्यात हरवलेला धोडप आणि रवळ्या दिसत होते...आग्न्येला कंचना उठवलेला होता... पूर्वेला चौल्हेर दिसत होता...नेढ्यातून निघून अजून काही खोदीव पायऱ्या चढून माथ्यापाशी जाताना एक तुटलेला दरवाजा लागतो... त्याच्यातून प्रवेश केल्यावर काही पोस्ट-होल्स आणि एक पाण्याची टाकी लागते... तिकडून डावीकडे छोटासा रॉक पॅच उतरून गेल्यावर खाली दोन खोदीव गुहा आहेत... गुहा बघून पुन्हा वर आलो... पाण्याच्या नैसर्गिक ३ तळी आहेत... शिवाय ३ खोदीव पाण्याच्या टाक्या आहेत... पलीकडे नंदी-आणि वृंदावन आहे... बाजूलाच पाण्याचं अजून एक टाकं आहे... त्याच्या शेजारी पडक्या वाड्याचे फक्त जोती दिसतात पण त्यातही पाणी साठलेलं आहे... असंच खाली चालत गेल्यावर नैऋत्येला धोडप सारखी एक खोदीव खाच आहे... गडफेरी करून पुन्हा एकदा आम्ही नेढ्यात पोचलो... साईने  जबरदस्त असं  आलं-लिंबू सरबत बनवलं... सोबतीला काही स्नॅक्स हाणले... रेडी टू इट गणेश भेळ बनवली... पुन्हा एकदा फ्रेश झालो आणि गड उतरून गाडी पाशी आलो...
वेळ दुपारची : ०३:२४ PM IST...
कण्हेरगडाची संक्षिप्त माहिती : ट्रेकक्षितिजhttp://trekshitiz.com/marathi/Kanhergad-Trek-K-Alpha.html                                   
कण्हेरगडाचा इतिहास : सह्यमित्र ओंकार ओक ह्यांच्या ब्लॉग मधून साभार : http://www.onkaroak.com/2013/06/blog-post_23.html

                   कण्हेरगड : वरील फोटोस्फियर मध्ये माऊस च्या लेफ्ट क्लिक ने फोटो ३६०°  अंशात फिरवा ... 

                         आवरा-आवरी करून निघालो... वेळेअभावी नाशिकच्या सह्यमित्रांची गाठ-भेट होऊ शकली नाही... तिडके ला नाशिक मध्ये टाकून थेट घारगावला "हॉटेल XXX " मध्ये रात्रीच्या डिनर साठी गाडी थांबवली... अख्खा मसूर, शेवभाजी, लसूणी मेथी, सोया फ्राय, ज्वारीची भाकरी आणि जिरा राईस असं जबरदस्त गावरान व्हेज  जेवण हाणलं... नारायणगाव ला नेहमीप्रमाणे बजरंगचं मलाई दूध पिऊन पुण्यात पोचलो...
वेळ रात्रीची :  ११:१२PM  IST...

धनुर्वाद,
ट्रेकळावे,
दत्तू तुपे.       

ठळक वैशिष्ठ्ये :
१. नेहमीप्रमाणे फाईव्ह स्टार ट्रेक करून लाड पुरवल्याबद्दल साईचे तीव्र आभार... 
२. ढगाळ वातावरण आणि भुरभुर पावसामुळे चारही किल्ल्यांची चढाई सोपी झाली... 
३. नाशिक मध्ये असताना रनटाईम बोलवूनही तिडके ट्रेक ला आलेला... 
४. हॉटेल XXX अप्रतिम जेवण आणि सोबतीला बजरंगचं मलाई दूध... मज्जा आली...

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...