Tuesday, November 22, 2022

भातराशी डोंगर

 https://www.bankapure.com/2013/09/BhaatrashichaDongar.html

 

 मागच्या वर्षी Google करताना शिवगड - दाजीपुर च्या ट्रेक साठी अनेक लोकांना फोन केला होता… त्यात बऱ्याच जणांनी दुर्लक्ष करून योग्य ती माहिती दिली नव्हती… मग शेवटचा प्रयत्न करून बघावा म्हणून प्रसिद्ध चक्रम हायकार्सचे सेक्रेटरी श्री. अमेय गोखले  ह्याच्याशी संपर्क साधून बघितला… आणि काय आश्चर्य… !!! गोखले ने वेळात वेळ काढून इत्यंभूत माहिती दिली आणि आमचा शिवगड - दाजीपुर ट्रेक यशस्वीरित्या सफल संपूर्ण झाला… त्याचे त्याच वेळेस मनापासून तीव्र आभार मानले… गोखले मुळे आम्हाला ट्रेकिंग जगतातले गुरुवर्य ढमढेरे काका भेटले … पुढे आमची वर्षभर बरीच फोना-फोनी… मेला-मेली… चॅटा-चॅटी… झाली ……  पण भेटण्याचा योग काही जुळून येत नव्हता… अखेर वर्षभराने भातराशी च्या डोंगरवर जाण्याचा योग आला … सोबतीला श्रवण आल्यामुळे अजून मजा आली…

पाटण गाव़ातून विसापुर किल्ला 

            जवळच जायचे म्हणून नेहमीप्रमाणे Tata Nano काढली … भल्या पहाटे ०६:३५ AM घरातून निघालो … बालेवाडी स्टेडियम पाशी श्रवण ला उचलले… आणि उशीर होयला नको म्हणून Express Highway वरून (टोल भरून) ताशी ९५ KMPH ने गाडी पळवत लोणावळ्यात ०७:३५ AM दाखल झालो… ०८:०० AM च्या सुमारास गोखले  बाहेर आला… मग हॉटेल रामकृष्ण मध्ये ताबडवून सकाळचा Breakfast उरकला… आणि गाडी तडक 'पाटण' गावात आणली … Express Highway वरून जाताना दुसरा बोगदा ओलांडल्यावर जो डावीकडे पहिला Food Mall लागतो … त्याच्यामागचा डोंगर म्हणजेच 'भातराशीचा' डोंगर होय … नावाप्रमाणेच भाताच्या राशी सारखा त्रिकोणी आकाराचा डोंगर आहे … ह्याच डोंगराच्या पलीकडच्या अंगाला प्रसिद्ध पण दुर्लक्षित अशी 'बेडसे लेणी' आहेत…

पुरातन मंदिर आणि  समोर नंदी 
कोरीव पायर्‍या

 नुकताच वरुण राजा ४ महिन्याची सुट्टी संपवून परतणार होता … त्यामुळे वातावरणात दमटपणा जाणवत होता … गाडी लावून आवरा - आवरी करून तडक निघालो… वाटेत गावाच्या वेशीबाहेर एक मंदिर आहे… आणि मंदिराबाहेरच काही छोट्या छोट्या ८ नंदीच्या मूर्ती आहेत… समोर उजवीकडे विसापूर किल्ला अजस्र्त्र भासत होता … किल्ल्यावरची तटबंदी स्पष्टपणे दिसत होती… तर डावीकडे भातराशीच्या डोंगराचे निमुळते टोक खुणावत होते… भरपूर ट्रेक्स च्या गप्पा मारत चढताना अचानक समोर उभ्या २० आणि डावीकडे काटकोनात वळलेल्या १५ अश्या टोटल ३५ कोरीव पायऱ्या सापडल्या … वाह !!!… म्हणजे ह्या डोंगराला सुद्धा ऐतिहासिक महत्त्व लाभलेलं आहे तर !!! … मजल-दरमजल करीत एकदाचे पाणवठ्यापाशी पोचलो… पाणी पिऊन अर्ध्या तासाच्या चढाई नंतर टेपाडावर आल्यावर दोन वाटा फुटलेल्या दिसल्या … जास्त बुचकाळ्यात न पडता उजवीकडची वाट धरली आणि खिंडीत येउन थांबल्यावर डावीकडे भातराशीचा डोंगर आणि उजवीकडे विसापूर किल्ला दिसतो … 

विसापूर किल्ला
डावीकडे भातराशी चा डोंगर आणि उजवीकडे तिकोना 

दूरवर … भेदरलेल्या गाई 
भातराशी चं पठार 

थोड्याचवेळात आम्ही मरगळवाडी येथे पोचलो… तिथे सुद्धा दोन रस्ते फुटले … डावीकडे बेडसे लेण्यांच्या रस्त्याला एक धनगरवाडा लागला… तिथे डोंगरावर जाण्याची चौकशी केली… पोटभर पाणी प्यायलो… रात्रीच पाउस पडून गेल्यामुळे सगळीकडे चिखलाचे साम्राज्य होते … आणि भरीसभर म्हणून काही ठिकाणी शेणचं शेण :) आणि परत माघारी जाउन उजव्या दिशेला लागलो… शाळेतल्या पोरांना विचारल्यावर 'सागर' नामक एका पोराने आम्हाला एक वर जायची वाट दाखवली… बऱ्यापैकी मळलेली असल्यामुळे आम्ही सुद्धा त्या वाटेने चढायला सुरवात केली आणि थोड्यावेळाने एका Rock Patch पाशी पोचलो… बघतो तर पुढे वाट गायब… मग अंदाज आला की ही बहुदा ढोरवाट असावी… समोर साप सुरळी ने आमची वाट रोखून धरली … असेच मग प्रस्तरारोहण करीत वर चढलो… वर मोकळ्या पठारावर आल्यावर समोरच्या भातराशी च्या डोंगराखाली साधारण १.५ किलोमीटर लांब पसरलेलं अफाट हिरवं पठार बघून चाटचं पडलो… आणि २०-२५ गाय-बैल मुक्त पणे चरत होते… हिरवाई ने नटलेल्या पठारावर सोनकी च्या फुलांनी चांगलाच बहर आणला होता … एकदम कुंजरगडाच्या सोंडेची आठवण झाली… अचानक आमच्या आगमनाने चरणाऱ्या गाई बिथरल्या… असले iTems त्यांनी सुध्दा पहिल्यांदाच बघितले असावेत… आम्ही लांब जाईपर्यंत आमच्या कडे टक लावून बघत होत्या :)


पठारावर ४-५ पाण्याची नैसर्गिक तळी आहेत… तळ्यापाशी आल्यावर काही मोठ्ठाल्या बेडकांनी पाण्यात पटापट धाव घेतली… तळ्याकाठी Photography झाली … तळ्यात एक बारकासा साप तळ्याबाहेर तोंड काढून बघत होता… लागलीच तो ही पसार … ४-५ मोठ्या कुत्र्याचा छत्र्या (Mushroom) दिसल्या … मग काही वेळाने आम्ही मुख्य भातराशी डोंगरावर चढून Summit केलं माथ्यावर स्थानिक गावकर्‍यांनी देव बसवला आहे … दक्षिणेला पवन-मावळात ढगात लपलेला तिकोना आणि खाली पवना धरण… त्याच्यावर तुंग किल्ला …पश्चिमेला विसापूरच्या मागे मोरगिरीचा उत्तुंग सुळका डोकावत होता… नैऋत्येला Express Highway चा एकसंध रस्ता दिसत होता … पूर्वेला कामशेतचा डोंगर आणि ईशान्येला त्याच्या पोटातून Express Highway वरच्या बोगाद्यामार्फत येणाऱ्या सुसाट गाड्या… उत्तरेला एकविरा देवीचा डोंगर… मस्त विहंगम दृश्य दिसत होतं … सारं काही डोळ्यात आणि 'क्यामेरात' साठवायचा प्रयत्न केला … मग पोळी बरोबर Thousand Islands चं Dressing खाऊन तृप्ती चा ढेकर दिला… घरी जिवंत असल्याचा निरोप दिला… एव्हाना तिकोना किल्ल्यावरचे काळे ढग हळू-हळू आमच्या दिशेने यायला लागल्याचे दिसल्यावर लगेच आवरा-आवरी करून खाली उतरलो…


ग्रामस्थांनी बसवलेला डोंगरावरचा देव 
मरगळवाडीतून डोंगरावर जायला कोरीव पायर्‍या

पठारावर आलो तोपर्यंत चरणाऱ्या गायी गायब झाल्या होत्या… उजवी कडचा रस्ता धरून खाली उतरताना पुन्हा एकदा १० कोरीव पायऱ्या सापडल्या… म्हणजे "सागर" ने जातानाचा चुकीचा रस्ता सांगितला होता तर !!! … मरगळवाडीत आल्यावर समस्त ग्रामस्थांना अचंबा वाटला … तुम्ही कुठून आलात? कशाला आलात?…  रीतसर उत्तरं देऊन … फोन नंबर घेऊन परतीच्या मार्गाला लागलो … अर्ध्या तासात खाली उतरलो… मग गाडी लोणावळ्यात आणून पुन्हा एकदा हॉटेल रामकृष्ण मध्ये जेवलो आणि गोखले ला लोणावळ्याच्या  'येष्टी ष्ट्यांड' ला सोडून पुण्यात ०६:३५ ला पोचलो…

Courtesy @ अमेय गोखले : L - R  : गोखले , श्रवण आणि दत्तू 

सुंदर ट्रेक बद्दल अमेय गोखले  चे शतश: आभार …

Google Maps ला वरुन (Top View) बघीतल्यावर भातराशी चा ड़ोंगर साधारण कोकणातल्या  पर्वतगड सारखा दिसतो…

पर्वतगड 
भातराशी चा डोंगर 




No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...