http://ahireyogesh.blogspot.com/2022/12/nisani-pratapgad-parghat.html
महाबळेश्वरला भला थोरला पहाड त्याच्या अवतीभोवती पसरलेलं जावळीचं गर्द रान. कृष्णामाई, क्षेत्र महाबळेश्वर, आदिशक्ती श्रीराम वरदायनी, भैरी कुंभळजाई, जननीमाता ही सारी पुरातन राऊळं. महाराष्ट्रात महत्त्वाचं स्थान असलेल्या कोयना, कृष्णा, सावित्री नद्याचं उगमस्थान हेच महाबळेश्वर.
"येता जावली, जाता गोवली"
शिवकाळात
स्वराज्यात मोलाचं स्थान असलेली ही जावळी शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये
चंद्रराव मोरे यांचा पराभव करून जिंकून घेतली. दुसरी इतिहासातील ठळक घटना
१६५९ मधील, विजापूरकर सरदार अफझल खानाचा वध करून स्वराज्यावर आलेलं संकट
परतवून लावले. आजही प्रतापगडावर शिवप्रतापदिन म्हणून दरसाल तिथीनुसार साजरा
केला जातो...
महाबळेश्वरला
परीटघडीचे पर्यटन व येथील काही ऐतिहासिक कोंदण लाभलेल्या दुर्ग व
घाटवाटांची मुशाफिरी झाली होतीच. तरीही आताच्या ट्रेकची उत्सुकता वाढली
होतीच. नरेश काका ने जाण्यायेण्याचा तसेच उदरभरण व मुक्कामाची सारी सोय
करून "मुकादम" ही त्यांच्या घराण्याला मिळालेली ब्रिटीशकालीन पदवी सार्थ
करून दाखवली, तसेही या आधीही ते करतच आले आहेत. असो...
रात्रीची
एसटी पकडून महाबळेश्वर स्थानकात उतरलो तेव्हा नुकतच उजाडू लागलं होतं.
गारेगार हवा घेत चहाचे घोट सोबत क्रिमरोल खाऊन. पिकअप मध्ये बसलो आणि
क्षेत्र महाबळेश्वर आर्थरसीट पाॅईंट रस्त्याला लागलो. बरोब्बर आर्थरसीट
पाॅईंट ४ किमी व सावित्री पाॅईंट २ किमी लिहलेला मैलाचा दगड आहे तिथे
उतरलो. भल्या सकाळीच आम्हाला या वाटेवर गव्यांचे दर्शन झाले.
ट्रेकची सुरूवातच थरारक झाली. अशातच निसणी घाटाची सुरूवात सापडणं काहिसं अवघड काम, थोडं मागेपुढे.. उजवं डावं... करत झाडीत शिरलो. तोवर फोनवर एका ट्रेकर दोस्ताकडून काकांनी वाट कन्फर्म केली. थोडीफार घुसखोरी केल्यावर लहानशी मळलेली वाट मिळाली. अधेमधे करवंदाची जाळी व महाकाय वेली यातून मार्ग काढत दाट जंगलात शिरलो. एकदम अठरा डिग्री एसी फिका पडेल असा गारवा. अर्ध्या तासाची उतराई करत पिवळ्याधम्मक मोकळवनात आलो. समोरच्या दरीत प्रतापगड खुणावत होता. डावीकडे महाबळेश्वरचा लाॅडविक पाॅईंट तर उजवीकडे एलिफंस्टन पाॅईंट कडील बाजू, महाबळेश्वर चा गर्द झाडीने भरलेला माथा खुपच लोभसवाणा वाटत होता.
दुरवर सुमारगड आणि महिपतगड नजरेत आले. सकाळची स्वच्छ हवा सोबतीला निळशार आकाश याचाच हा चांगला परिणाम. त्याच मोकळवनात पाण्याचं पुरातन बांधीव कुंड अर्थात या दिवसात झाडीने झाकले गेले असल्याने पटकन नजरेत आलं नाही पण सोबत असलेल्या पवन ने ते फिरून फिरून अचूक हेरले. बराच वेळ थांबा घेऊन चालू पडलो. वाट उतरणीला लागून पुन्हा झाडीत शिरली.
डावीकडे वळसा घेत पुन्हा बाहेर आली. आता पायथ्याचे दरे गाव स्पष्ट दिसू लागले. मुरमाड ट्रेव्हर्स मारत अगदी छोटासा पॅच उतरून दांडावर आलो.
एकेठकाणी भगवा झेंडा फडकताना दिसला. कातळ टप्प्यावर काही जागी पावठ्या कोरलेल्या. काही वेळातच झेंडा लावलेल्या गणपतीच्या स्थानी आलो.
निसणीच्या घाटवाटेवरील हि देवता, वरील पाण्याचे टाके, खोदीव पावठ्या हिच इतिहासकालीन पुरातन वाट असल्याचे साक्षीदार. अफझलखान युद्ध प्रसंगी शिवाजी महाराज याच वाटेने जावळीत आल्याचे ऐकले आहे. गणरायाला नमन करून बोडक्या दांडावरील उतराई सुरू ठेवली.
अधून मधून घसारा युक्त तर कुठे बारीक गवताळ घसरडे टप्पे पार करत पायथ्यालगतचा झाडीटप्पा उतरत खाली आलो. समोर मोठा ओढा, हीच ती कोयना नदी जी पुढे जात जावळी, पार, शिरवली, चतुरबेट करत पुढील प्रवासाला निघते. महाबळेश्वर पहाडाच्या कुशीत सामावलेलं दरे गाव आवडून गेलं.
या गावातून आम्ही उतरलो ती निसणी व बाजारपेठेची वाट या दोन घाटवाटांनी महाबळेश्वर जाता येते. सध्याच्या तुलनेत पूर्वी गावकरी याच वाटांनी सर्रास ये जा करत आता मात्र दाराशी गाड्या आल्यावर नवीन पिढीचा वावर फार कमी झालाय. आम्हाला पाहून शाळेतील काही लहान मुलं दोन काठ्या वर स्वतःला बॅलन्स करत चालवून तर काही चक्क पळवून नाचून दाखवू लागली.
पिछाडीवर राहिलेले भिडू येईपर्यंत ते पाहत चांगलाच टाईमपास झाला. ठरल्याप्रमाणे गाडीवाला आला, सारे गाडीत बसून जावळी मार्गे प्रतापगडाच्या दिशेने निघालो. वर वाहनतळावर न जाता मध्येच उतरून जून्या फरसबंदी वाटेने गड जवळ केला.
गडावर अर्थातच चिक्कार गर्दी होती. त्यात सॅक पाठीवर, हातात काठी, घामटलेले मळके साधारण कपडे असा अवतार पाहून बहुतेकजण हैराण. निमुटपणे गर्दीतून वाट काढत भवानी मातेचं दर्शन घेतले. महाराजांनी हि देवीची मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीतील शाळिग्राम शिळेपासून बनवून घेतली आहे.
मंदिरासमोर दगडी दिपमाळा व आवारात काही छोट्या तोफा ठेवल्या आहेत.

पूर्वाश्रमीचा
हा भोरप्या डोंगर याच स्थान बाकी मोक्याचं, जावळी महाबळेश्वर या परिसरातील
वाटा ते पारघाट व आंबेनळी घाटावर वचक ठेवण्यासाठी उपयुक्त. महाबळेश्वरच्या
जटात अन् पारघाटाच्या ओठात. महाराजांच्या आज्ञेनुसार मोरोपंत पिंगळे
यांच्या देखरेखीत हिरोजी इंदुलकर यांनी १६५७ -५८ साली प्रतापगड बांधून
पूर्ण केला.
महाबळेश्वरच्या दिशेला असणारा टेहळणी बुरूज, उत्तरेचा यशवंत बुरूज, पश्चिमेकडील रेडे बुरूज, सूर्य बुरूज, कडेलोट, मंदिरे, तलाव, टाकी, वनखात्याचे उद्यान, महाराजांचा अश्वारूढ पुतळा सारं काही पाहण्यासारखं. असो. प्रतापगडाबद्दल अनेक पुस्तकात तसेच इंटरनेट वर भरपूर माहिती उपलब्ध आहे, त्यामुळे फार काही लिहीण्याची गरज नाही. आमच्यातील बहुतेक जणांचा प्रतापगड आधी व्यवस्थित पाहून झाला असल्याने आम्ही गर्दीत फारं न जाता. भवानी मातेचे दर्शन घेऊन, वेळेचं भान ठेवत दुपारचे जेवण केले. गड सोडताना पुन्हा एकवार चौफेर नजर फिरवली.
आंबेनळी घाट ते उत्तरेला ढवळे खोर्यातील महादेव मुर्हा, कामथा खोर्यातील मंगळगड त्या पल्याड दूरवर वरंध घाटाकडील रांग, उत्तुंग रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर यांचे पश्चिमेकडे झेपावलेले रौद्र कडे. तर दक्षिणेला मकरंदगड त्या पल्याड जोम मल्लिकार्जून पर्वतचे पश्चिम टोक व काहिसा बाजूला असलेला मोठा महिपतगड सारं डोळ्यात साठवून निघालो. महादरवाजातून बाहेर येत उजवी मारली. आता टारगेट होते ते पारसोंड उर्फ मेट. आदिशक्ती श्रीराम वरदायनी मुळ स्थान. गडाला चिकटून गर्द रानातून वाट प्रथम आडवं जात उतरणीला लागली. विविध पक्ष्यांची किलबिल ऐकत रमत गमत चालू लागलो.
गडाला वळसा घालून वाट पश्चिमेकडे झाडीतून बाहेर आली.
आता सुरू झाली ती सह्यशिरोधारेवर समांतर अशी चाल. दोन टप्पे उतरतो तेच खालच्या कड्यावर वरदायनीचे मंदिर दृष्टिक्षेपात आले. मोठे गवताळ टेपाड उतरून मंदिराजवळ पोहचलो. खालच्या पार गावापासून या मुळ मंदिरापर्यंत कच्चा रस्ता आला आहे. पार गाव अंदाजे पाच सात किमी असावे.
प्रतापगड सोडल्यापासून तासाभरात आम्ही इथवर आलो.

आदिशक्ती
श्रीराम वरदायनी चे मुळ पुरातन स्थान असलेल्या या मंदिराचा गावकरींनी
जीर्णोद्धार केला आहे. मंदिर परिसर एकदम शांत सुंदर रमणीय. या भागात
आम्हाला अनेक वेळा मलबारी धनेश हाॅर्नबिल अगदी जवळून पहायला मिळाले.
मंदिराला बिलगून पश्चिम कडा खाली सरळ रेषेत आंबेनळी घाटरस्ता, रंकाडसरी व किनेश्वर आसपासची वाडीवस्त्या. वायव्येला मंगळगड, महादेव मुर्रा ची बाजू, उत्तरेला भव्य प्रतापगड तर दक्षिणेला कोंडोशी कुडपण कडील डोंगररांगा. मला तर हे लोकेशन खुपच आवडले. आम्ही ज्या वाटेने प्रतापगड हून मंदिरापर्यंत आलो त्या वाटेला चिपेची वाट म्हणतात हिच वाट मंदिरामागून (दक्षिणेला) क्रेस्ट लाईन म्हणजेच सह्यशिरोधारेवरून कोंडोशी व पुढे कुडपण ला जाते. थोडक्यात निगडा घाट वा भीमाची काठी कुडपण प्रतापगड हाच तो रूट.

जरावेळ
विश्रांती घेऊन, आम्ही चार पाच जणं पाण्याचा शोधात निघालो. मंदिरापाठीमागे
काही अंतरावर पाण्याचे टाके पण ते काही आम्हाला सहजासहजी मिळाले नाही. बरच
इकडं तिकडं भटकल्यावर एकदाचे सापडले. पण दुर्दैवाने पाणी मात्र पिण्यालायक
नव्हते.
पुन्हा माघारी मंदिरात परतलो, चहा घेऊन जरा तरतरी आली. आता पाण्याचा गहन प्रश्न सोडवायचा होता. दोन पर्याय होते पहिला पार गावात जाऊन पाणी घेऊन येणे तर दुसरा सारा बाडबिस्तारा आवरून गावात मुक्कामी जाणे. सर्वानुमते पहिला पर्याय निवडला गेला. पहिली तुकडी रिकाम्या बाटल्या पिशव्या घेऊन गावाकडे गेली. पाऊण तासाने पाणी घेऊन आल्यावर समजले की दूर गावात जाण्याची गरज नाही साधारण कच्चा रस्ता धरून दिड दोन किमी अंतरावर चांगल्या पाण्याचा लहानसा ओढा आहे. चलातर गावात जायचे कष्ट आणि वेळ दोन्ही वाचले.
कड्यावरून नितांतसुंदर असा सुर्यास्त पाहून आम्ही चौघे पाण्याच्या दुसर्या फेरीला गेलो. तूर्तास पाण्याचा प्रश्न सुटून मुक्कामाची खासा सोय झाली.

चहा मग सुप फेरी नंतर चांदणी रात्रीत शेकोटी पेटवली. गारेगार वातावरण सोबतीला शेकोटीची ऊब.
प्रतापगडाच्या मागून काही वेळातच चंद्रोदय झाला थोडेफार फोटो काढण्याचे प्रयत्न केले. गप्पा टप्पा नंतर चांगल्या गाण्यांची मैफल रंगली. नवीन ने तर लीड घेत एक से बढकर एक गाणी गायली. खरंच एकदम भन्नाट असा माहौल.. वेळ पाहत जेवण करून झोपी गेलो. सकाळी तांबड फुटताच लगतच्या टेकडीवरून महाबळेश्वर पहाडाच्या मागून सुर्योदय पाहिला.
आजची हवा पण स्वच्छ, वायव्वेला डोळे बारीक केल्यावर दूरवर किल्ले तोरणा पासून धारमंडप मोहनगड वरंध कडील सह्याद्रीची रांग सहज नजरेत आली. बराच वेळ सारा आसमंत पाहत रेंगाळलो.

आता
वेध लागले होतो ऐतिहासिक पार घाटाचे. पुरातन काळापासून पोलादपूर किनेश्वर
ते घाटावरील पार गावाला जोडणारी घाटवाट. चहा नाश्ता करून सॅक पाठीवर
चढवल्या. पुन्हा एकवार देवीला नमस्कार करून उतराई सुरू केली. मंदिरामागूनच
खाली उतरायला घेतले वाटेत एका झाडावर भगवा झेंडा लावलेला आहे. त्याच
झाडाजवळून आडवी मारली.
काही अंतर जात एकदम मळलेली पायवाट. अगदी रचाई केलेली अशीच, टप्प्या टप्प्यात खाली उतरू लागली. आधी कारवी मग जसजसे आत जाऊ लागलो तसे दाट जंगल सुरू झाले. अर्ध्या पाऊण तासात वाट डावीकडे वळून आडवी गेली. थोडक्यात कड्याला समांतर खालच्या बाजूस कोंडुशी कुडपण दिशा म्हणता येईल. काही अंतर जात वाटेतले दोन मोठे अर्थातच कोरडे ओढे पार करत पदराच्या टप्प्यात उतरलो. आता प्रतापगड मागे पडला.
मंदिरापासून या पदरात येईपर्यंत आम्हाला सव्वा ते दीड तास लागला.पदरात काही ठिकाणी पावसाळी शेती केल्याच्या खुणा. या भागात वाट थोडी गंडली एक मळलेली वाट मिळाली पण नंतर लक्षात आले कुठेही वळसा न घेत विरूद्ध दिशेला म्हणजेच आंबेनळी घाटाकडे जाते की काय ? पुन्हा माघारी फिरलो. मोकळवनात आल्यावर कड्याखाली लक्ष गेलं तर गायमुख जवळच बांधलेली पत्र्याची शेड दिसली. आता टारगेट समोर पण प्रश्न होता तिथवर पोहचण्याचा ! दोन गट पडले. पहिला गट सुनिल, इंद्रा, नरेश काका वगैरे दिशेनुसार आडवं चालत वाट धरून गेले. मी पवन व कुशल व मल्लीनाथ त्या गायमुख कडे कुठून उतरता येईल ते पाहू लागलो. आलो त्या वाटेवर पुन्हा मागोवा घेत गेलेल्या पवनला एक उतरणारी वाट मिळाली. बरोब्बर सहसा लक्षात येणार नाही असा यू टर्न वाटेने घेतलेला. असो... आमच्या गटाने त्याच वाटेने उतराई सुरू केली. जसजसे पुढे जाऊ लागलो तशी पध्दतशीर पणे वाट खाली उतरू लागली. काही अंतर जाताच भल्या मोठ्या ऊंबराच्या झाडाखाली बांधीव डागडूजी केलेलं पाण्याचं टाकं.
वरच्या कातळातून पाण्याची बारीक वाहती धार, बाजूलाच कुणीतरी ठेवलेली जुनी पाण्याची कळशी. पाणी पिऊन सोबत भरून घेतले. निघताना कुशल ने जितका शक्य होईल तितका गाळ त्या टाक्यातून बाहेर काढला. तेवढाच अजून स्वच्छ पाण्याचा साठा वाढेल.असो... या वाटेवर उतरताना ठराविक अंतरावर वीजेचे खांब आढळले, आता वर मंदिरात वीज नेण्याचे प्रयोजन की खाली गायमुख ला जोडण्याचं ते काही कळलं नाही.
मधल्या सपाटीवर कुण्या जुण्या घराचे अवशेष. तसेच पुढे जात पंधरा ते वीस मिनिटात गायमुख जवळ पोहचलो.
स्वच्छ नितळ पाण्याचे मोठे कुंड त्यालाच असलेले गोमुख, बाजूलाच एका दगडावर मारूती व शिवलिंग कोरलेलं.
गर्द रानव्यात हि गायमुख ची जागा फारच आवडली. पार घाटावर असलेल्या या महत्वाच्या पुरातन खुणा. मोठा ब्रेक घेऊन किनेश्वर कडे निघालो. किनेश्वर पासून या गायमुख पर्यत कच्चा रस्ता, आता प्रश्न चुकण्याचा किंवा वाटेचा नव्हता तर वेळेत किनेश्वर गाठणे त्यासाठी कापावे लागणारे अंतर. हा सारा मामला डोक्यात फिट्ट करून चालू पडलो. फोन ला रेंज होती. कळले कि पहिला गट आमच्या पुढे काही अंतरावर उतरून किनेश्वर अलीकडे पोहचला पण, गायमुख बायपास केल्याने त्यांचा वेळ वाचला. त्यांना जाॅईन होण्यासाठी अजून जोरात चालू लागलो. काही वेळात परत फोन आला, त्यांना एका ट्रक वाल्याने आड फाट्या पर्यत लिफ्ट दिली. हे ऐकून आमचं सारं अवसान गळून पडलं. कारण गायमुख ते किनेश्वर हि बरीच मोठी चाल जर एवढं अंतर कापूनही किनेश्वर मध्ये वेळेत गाडी नाही मिळाली तर आणखी आड फाट्या पर्यत पाच सहा किमीची चाल. डोंगरात जंगलात चालणं परवडलं पण टार रोड वरून चालणं म्हणजे जणू शिक्षाच. बराच वेळ चालल्यावर एके ठिकाणी मोरीवर सिमेंट काँक्रिट चे काम सुरू असलेले दिसले. काम करणारी मंडळी पण एवढं जड सामान घेऊन कुठून आले याच विचारात! तिथल्या ठेकेदार सोबत विचारपूस झाली. त्याला कुठून आलो ? काय काय पाहिले ? कुठे चाललो ? सारी कहाणी ऐकवली. त्या सज्जन माणसाने लगेच रेती सिमेंट वाहून नेणाऱ्या टेम्पो वाल्याला फोन लावला. वाजवी दरात तो थेट पोलादपूर पर्यत सोडायला तयार ही झाला. किनेश्वर जरी पार घाटाचे पायथ्याचे गाव असले तरी पोलादपूर पासून लांब साधारण पंधरा किमी व पाच सहाशे फूट ऊंचीवर वसले आहे. सहाजिकच घाटरस्ता व त्याची झालेली दुर्दशा. आम्हाला घेऊन पुढे आड फाट्यावर पुणेकर मंडळींना निरोप देऊन बाकी जणं मिळून पोलादपूर गाठले. दुपारचे जेवण करून चार वाजेची मुंबई एसटी अगदी वेळेत मिळाली..

मनात मात्र तेच चंद्रराव मोरेंच वाक्य घुमत होतं.... येता जावली, जाता गोवली.
सहभागी भिडू :
मुंबई:
नरेश काका
ईंद्रा
रोमा
नवीन
यो
नितीन
डेवील
शैलेश
अनिरुद्ध
अस्मादिक
पुणे :
पवन
मल्लीनाथ
कुशल
सुनिल
आशिष
कृतज्ञता :
नितीन मोरे सुतार
योगेश चंद्रकांत अहिरे

No comments:
Post a Comment