http://ahireyogesh.blogspot.com/2023/12/prachitgad.html
हल्ली ट्रेकला चांगली सोबत मिळणं दुरापास्त झाले आहे. व्हेवलेंथ जुळून येणारे व ट्रेक करणारे Near & Dear मुश्कील. अशातच शुक्रवार सकाळी साईप्रकाशचा मेसेज, काय विकेंड प्लान ? माझा काही प्लान तर नव्हता. साईला विचारले, कुठे ? रिप्लाय आला.. प्रचितगड धोधावणे. मनात चलबिचल सुरू झाली.
प्रचितगड बर्याच वर्षांपासून राहिला होता. दहा मिनिटांतच घरात
अश्विनी सोबत चर्चा करून विलंब न करता होकार कळवला... कामावरून ऐन वेळेस
हाफ डे, परवानगी घेऊन मिळवला. घरी येऊन तासाभरात सॅक भरून, मी व अश्विनी
गाडीला स्टार्टर मारून निघालो. प्रचंड खराब धुळमातीचा अनेक diversion
असलेला रस्ता पार करत रात्री पावणेदहाच्या सुमारास महाडला पोहचलो. फोनाफोनी
करत पुढच्या पंधरा मिनिटांत भोर फाट्याला, वरंध घाट उतरून पुणेकर त्रिकूट
भेटले. हायवेवर शेलार हाॅटेल मध्ये रात्रीचे जेवण करून टार्गेट संगमेश्वर,
NH 66 रायगड जिल्ह्यातील रस्ता हायवे म्हणायच्या लायकीचा नाही, महाड
पोलादपूर नंतर काय तो ठिकठाक. असो... साईप्रकाश बेलसरे, जितेंद्र बंकापुरे व
मिलिंद लिमये व आम्ही दोघे. गप्पा टप्पा हाणत गाडीने पण एव्हना वेग पकडला.
संगमेश्वर हून डावीमारत श्रुंगारपुरात दाखल झालो तेव्हा रात्रीचे दोन
वाजून गेलेले..
गावाच्या
सुरूवातीलाच लागलेल्या मंदिरात पथारी पसरली. मंदिरात लाईट व आवारातच
पाण्याची टाकी, थोडक्यात मुक्कामी खासा सोय झाली. दूरवर खेड्यात, डोंगरात
प्रदुषण मुक्त स्वच्छ वातावरणात अवघ्या काही तासांची झोप पण पुरेशी होते.
सकाळी ठरल्याप्रमाणे वेळेत उठलो. साई व मिलिंद नाश्तासाठी उप्पीट / उपमा तयारीला लागले.
प्रातर्विधी, चहा नाश्ता, साफसफाई, सॅक, खाऊ पाणी सारं आवरतं घेत सव्वा
आठच्या सुमारास प्रचितगड चढाई ला निघालो. गावाच्या एका बाजूला लहानशा
टेपाडावर मुख्य भैरी भवानीचे देऊळ आहे. त्याच देवळाजवळून पुढे जात ओढा पार
करून डावीकडे वळालो.. थोडक्यात देऊळ व ओढा उजव्या हाताला ठेवत शेताडीतून
आडवी चाल.
समोरच सह्याद्रीची भली मोठी रांग त्याच रांगेत बिलगलेला प्रचितगड सहज ओळखू
आला. या भागात सह्याद्रीच्या रांगेची ऊंची तीन हजार फुटाच्या आसपास सहज
असेल. प्रचितगडाकडे खालून पहाताना उजवीकडे साधारण निम्म्या ऊंचीवर लहान
सुळके असलेला डोंगर चिकटलेला आहे काहिसा भिमाशंकर ला जसा पदरगड आहे तसाच.
वाट त्याच भागातून वर जाते असे बंकापुरेने सांगितले.
सकाळच्या प्रसन्न वातावरणात वेगात चालू पडलो. जितेंद्र बंकापुरे दहा
बारा वर्षापूर्वी प्रचितगड येऊन गेला होता व आमचा त्याच्यावर विश्वास
असल्याने आम्ही वाटाड्या घेतला नाही. पण नवखे व कधीतरी ट्रेक करणारे असाल
तर वाटाड्या जरूर घ्यावा कारण दाट जंगल, निर्मनुष्य वाटा, जंगलात हरवणं,
कधीकाळी घडलेले अपघात या सर्व बाबी लक्षात घेत श्रुगांरपुरातील गावकरी पण
तोच आग्रह धरतात. असो....
शेतं, वाडी मागे पडून वाट वरच्या बाजूला चढत ओढा खालच्या टप्प्यात
ठेवत मार्गस्थ झालो. जसजसे पुढे जातोय तसे जंगल दाट व्हायला सुरुवात झाली.
एक गोष्ट मात्र जाणवली ती म्हणजे वाट बहुतांश मळलेली. अर्ध्या तासातच दोन
ओढ्याच्या संगमावर आलो. ओढा पार करून वाट चढणीला लागली, दाट झाडी पण
मळलेली वाट zig zag वळणं घेत ऊंची गाठत होतो. चढाईच्या सुरूवातीलाच फर्स्ट
गिअर मग हळूहळू सेट होत लय सापडली. तासाभरात सपाट गवताळ जागेवर आलो.
फोटोग्राफी ब्रेक घेत दक्षिणेला निघालो आधी म्हणालो तसे सुळका डोंगराच्या
दिशेने वाट पुन्हा वर चढू लागली या भागात तर साठ ते सत्तर अंशातील चढ. काही
ठिकाणी रानडुक्करांनी माती उकरल्याच्या खुणा. त्यात बहुतेक ठिकाणी वाटेची
धुप झालेली, घसारा व तीव्र चढण असा मामला पण बाजूला कारवीची सोबत बराच आधार
देणारी त्यामुळे दृष्टीभय असं नाहीच. मजल दरमजल करत तासाभराच्या आत अगदीच
लहानश्या एका ओढ्यात आलो. बंकापुरेने जेव्हा इ.स.पू. प्रचितगड पहिल्यांदा
केला होता. तेव्हा त्याने या जागेवर रात्री मुक्काम केला होता, ती आठवण
त्याने आम्हाला सांगितली. याच जागेवर एका ट्रेकरच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाटी
लावलेली आहे. असो. आम्ही सुका खाऊ फळं खात चांगला पंधरा वीस मिनिटाचा
ब्रेक घेतला. 
इथून पुढे सुरूवात झाली ती लहानमोठे राॅकपॅच सोबत स्क्री म्हणजेच घसारा होताच. ज्या भागात घसारा व तीव्र चढाईचे टप्पे आहेत तिथे लोखंडी शिडी बसवून काम सोपं केलं आहे. एकूण आठ शिड्या आहेत. त्यात सहावी व सातवी शिडी मोठी. एका टप्प्यात शिडी संपताच वाट धसल्यामुळे वरच्या झाडाला दोर लावलेला. त्यावर फार भरवसा न ठेवता, झाडाच्या मुळाचा आधार घेत पार केला. शिडी टप्पा पार करून वरच्या भागात कड्याखाली आलो इथून गडमाथा व गडाची तटबंदी सहज नजरेत आली. उत्तर टोकावर बुरूज दिसत होता तिथेच होती ती किल्ल्याची दरवाजातील मुख्य शिडी. आता आम्ही दक्षिण ते उत्तर किल्ल्याच्या खालच्या भागातून अरुंद ट्रेव्हर्स पार करत अंदाजे पाऊण तासात शिडी जवळ आलो. शिडी काय तो हल्लीच नव्याने बसवलेला मजबूत जिनाच होता. कधी काळी अस्तित्वात असलेल्या पण सध्या भग्न अवस्थेतील दरवाज्यातून गडावर प्रवेश केला. सुरूवातीस मोठे टाके तर दरवाजा बाजूस गडाचा उत्तर बुरूज. समोरचे छोटे टेपाड चढून नव्याने शेड व कोटा लादी लावलेल्या भैरी भवानीच्या देवळापाशी आलो. मंगळसुत्र घातलेली भैरी भवानीची मुर्ती तर बाजूला भैरोबाची मुर्ती. मंदिर परिसरात काही तोफा हे सारं पुरातन... पुढे कारवीतून वाट काढत डाव्या हाताला खालच्या बाजूस उतरलो. या भागात कातळात कोरलेल्या पावठ्या व पाण्याची टाकी. त्यात मोठ्या खांबटाक्यातील पाणी थंडगार व पिण्यालायक. तिथेच पाण्याच्या बाटल्या भरून वळसा मारत लहानशा मैदानातील उंबराच्या झाडाखाली आलो. गडावर सद्यस्थितीत सावली देणारं हे ऐकमेव झाड. याच झाडाखाली पंगत मांडली, जेवण अर्थातच घरून आणलेले. जेवण आटोपल्यावर थोडा आराम करून गडाच्या दक्षिण भागात निघालो. एक उंचवटा पार करून पडका वाडा दिसला. छप्पर गायब पण भिंती दयनीय अवस्थेत तग धरून आतमध्ये पहातो तर अपेक्षित पणे झाडोरा माजलेला. गडफेरी करताना दक्षिण उत्तर जाताना बहुतेक भागात मस्त बांधीव तटबंदी आढळते. गडाबद्दल बरीच माहिती पुस्तकात व इंटरनेट वर उपलब्ध आहे डिटेल्स घेऊ शकतात. सह्यशिरोधारेवर चिकटून असलेला हा गड त्याकाळात उत्तरेकडील नेरदेचा घाट, दक्षिणेकडे पाजेची वाट, तिवरे घाट. हे सारं कोकणातून घाटावरील कोयना चांदोली भागातील मळे व रूंधीव गावाशी जोडणारे पूर्वीच्या वाटा यावर लक्ष ठेवण्यास अतिशय उपयुक्त. पंधरा वर्षांपूर्वी बहुतेक ट्रेकर कोयनानगर, हेळवाक, रामघळ, भैरवगड, पाथरपुंज, मळे, प्रचितगड, चांदेल, कंधारडोह, राणीची विहिर ते पार कुंडी घाट, गोठणे, महिमतगड, मार्लेश्वर पर्यतचा दिर्घ पल्याचा कोयना ते चांदोली दाट अभयारण्य व सडा चे माळ तुडवत हा ट्रेक पूर्ण करायचे. अनेक सह्यमित्रांचे त्यावेळेचे या ट्रेक रूटची थरारक वर्णन ऐकून आहे. पण मागच्या काही वर्षांपासून हा घाटमाथ्यावरील भाग STRF म्हणजेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गेला असल्याने तिथली आधीच अल्प वस्ती असलेली गावं उठवण्यात आली. आता या संरक्षित भागात मुक्त भटकंती करण्यास मनाई आहे. जर कुणी प्रयत्न केला तर जबरदस्त दंड व शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आता सद्यस्थितीत आपण फक्त तो काळ, त्या वाटा याची कल्पना करू शकतो. असो...

गडावरून चौफेर नजारा पाहत मन भरून आले. एका बाजूला माथ्यावर गच्च रान
असलेले सह्यकडे तर दुसरीकडे दरीत पसरलेला हिरवा महासागर, तिवरे नायरी घेरा
त्यात दूरवर दिसणारे श्रुंगारपुर त्याच्या भैरी भवानी मंदिरामुळे ओळखता
येते.
सारं डोळ्यात व मनात साठवून अडीच वाजता गड उतरायला सुरूवात केली. मोठा
जिना उतरून खिंडीत आलो. आधी म्हणालो जसे प्रचितगड सह्यशिरोधारेला बिलगून
आहे. याच खिंडीतून वाट वर सह्यमाथ्यावर जाते मग पुढे मळे, रूंधीव पाथरपुंज
कडे जाण्याचा मार्ग जो सध्या बंदी असल्यामुळे जाता येत नाही. पुन्हा
गडाच्या तटबंदी कातळातून आडवी मारायला घेतली. मला तर हा ट्रेव्हर्स अलंग
गडाची आठवण करून देत होता. सकाळी सुरूवात केली तेव्हा हवेत गारवा व पश्चिम
चढाई असल्याने सावली होती पण आता सुर्य पश्चिमेकडे झुकू लागल्याने उन जाणवू
लागले. घामाच्या धारा सुरू झाल्या. त्यात भर म्हणजे जी माती सकाळच्या दव
मुले बसली होती ती आता भर उन्हात भुसभुशीत झाली. सहाजिकच घसारा स्क्री खासा
जाणवू लागला. सावधगिरीने लहान मोठे राॅकपॅच व शिडी टप्पा उतरलो. उतरणीला
मोठ्या धोंड्यावर अंदाज न आल्याने ताण येऊन माझ्या पायात क्रॅम्प आला.
नियमित पाणी पिणं सुरू होतेच पण तरी क्रॅम्प चांगलाच जाणवत होता. साईने
यावर रामबाण उपाय दिला, Fast & Up energy dehydration tablets.. ती
गोळी पाण्यात टाकून घेतल्यावर पाच मिनिटांत प्रचंड फरक जाणवला. डोंगरात
ट्रेक ला जर कुणालाही क्रॅम्प येत असतील तर ही Fast & Up गोळी जरूर
ठेवावी. Online Amazon वर उपलब्ध आहे. असो...
मागे पुढे एका लयीत उतरत बरोब्बर पाच वाजता खाली ओढ्याच्या संगमावर आलो.
मोठा ब्रेक घेत इथेच थर्मास मधील गरम पाण्यात ग्रीन टी घेतला.
पुढे अंधार व्हायचा आत मंदिरात परतलो. सॅक उतरवत दम खाऊन, अंघोळ केली
तेव्हा खरी तरतरी आली. साईने लीड घेत व्हेज पुलाव केला. रात्रीची मेजवानी
मस्तच. जेवण झाल्यावर फिरणं व थोडफार आकाशदर्शन. श्रुंगारपुर शांत व
आटोपशीर गाव या भागातील सह्याद्रीच्या घळी नाळा तून ओढे वाहत येत एकत्र होत
हीच शास्त्री नदी जी पुढे संगमेश्वर मार्ग कोकणातून पश्चिमेला वाहत जयगड
जवळच अरबी समुद्राला मिळते. याच संगमेश्वर श्रुंगारपुरात संभाजी राजांचे
काही काळ वास्तव्य होते. "बुधभूषणम" संस्कृत मधील ग्रंथ त्यांनी
इथेच लिहिला. दुर्दैवाने संगमेश्वर येथे देसाईंच्या वाड्यात मोगलांच्या
तावडीत संभाजी राजे सापडले. हा सारा इतिहास यात परिसरात घडला..
सकाळी लवकरच चहानाश्ता घेऊन, श्रुंगारपुरातून निघालो ते नायरी कडे.
गावाच्या वेशीवरून डावीकडे कच्चा रस्ता धनगर वाड्याकडे जातो. बंकापुरे ने
अगदी आत जिथे जाऊ शकेल तिथवर गाडी टाकली. आता टारगेट होते 'धोधावणे धबधबा'.
दुरवर कधी काळच्या तिवरे घाटाच्या वाटेवर दाट जंगलात लपलेला हा अविष्कार.
साधारण मार्च एप्रिल पर्यंत याला पाणी वाहतं असते. गावाबाहेर साधारण एक दिड
किमी वर धनगर पाडा, तिथून पायी मळलेल्या वाटेने निघालो. ओढा पार करून
मोकळवनात आलो. समोरच सह्याद्रीची भली मोठी रांग. पाजेची वाट व तिवरे घाट याच भागातून जातात. वाटेत काही ओढ्याच्या अल्याड पल्याड धनगरांची घरं.
तर आणखी आत गेल्यावर जुनी घरं व शाळा नजरेस पडली ही सार पूर्वीची तिवरे
नायरीची वस्ती, जी आता तिथून उठली आहे. काही भल्या मोठ्या झाडांच्या
बुध्यांखाली शेंदूर लावून दगड मांडलेले.
वाट दाट रानात शिरली एका ठिकाणी चुकायला झालं परत येत वाटेचा मागोवा
घेताना नेमके तिघं चौघं गावकरी भेटले. योग्य वाट माहित करून चालू पडलो. आता
वाट मोठ्या ओढ्यात आली. अश्विनीला डोकेदुखी मुळे अस्वस्थ वाटू लागले.
मंडळाला पुढे जायला सांगून आम्ही तिथेच ओढ्यात थांबायचा निर्णय घेतला.
ओढ्याला अजूनही वाहतं पाणी हेच धोधावणे कडून येतं. मी तर झटपट अंघोळ करून
घेतली. सकाळच्या कोवळ्या उन्हात तिथल जंगल फारच छान वाटत होतं. पाण्याचा
संथ नाद, पक्ष्यांची किलबिल. पाण्यात झपकन सूर मारणारा बगळा तर शांत बसलेला
खंड्या, मोठाल्या झाडावर कोतवाल, बुलबुल, सातभाई, शिळकरी कस्तुर,
भारद्वाज, ताबंटचा आवाज तर माझ्या आवडीचा. या प्रचितगड भागात पक्ष्यांची
रेलचेल आहे. गड उतरताना जितेंद्र ला स्वर्गीय नर्तक चे दर्शन झाले. हा अल्प
घडीचा थांबा आम्हा दोघांनाही यामुळे खुपच सुखावून गेला.
सह्याद्रीच्या गाभाऱ्यात शिरल्यावर हिच तर मजा असते. तिघेही चांगली दोन
अडीच किमीची पायपीट करून धोधावणे पाहून आले. पुन्हा तासभर चालत माघारी आलो.
एकवार नजर
फिररवून गाडीत बसलो ते याच दोन दिवसांची
उजळणी करत.. या गडकिल्ले डोंगरवाटा फिरण्याच्या आनंदाचा हिशोब काही लागत
नाही दरवेळेस काही तरी जमा होतेच....
निवडक फोटो..साईप्रकाश बेलसरे

No comments:
Post a Comment